जोडीदार तू माझा... भाग ५५

भाग ५५मोहिते निवासात तर लग्नाच्या वाऱ्याने ठाम मांडला होता. एकामागून एक लग्न, जसं लग्न पर्व सुरु झालं होतं. आईला आता सानूच्या लग्नाचे वेध लागले होते. अनयाला तिने पूर्ण स्वीकारलं नसलं तरी सुरुवात केली होती. सावंतांच्या प्रथेनुसार राणी काही लागलीच माहेरी पूजेसाठी येणारं नव्हती. तिकडलं सर्व आटपून ती येणार होती. तिचं कॉलेजच सामान अजून इथेच होतं.

सानू मात्र ह्या सर्वांपासून दूर स्वतःच्या दुनियात मग्न होती, तिच्यासाठी येणारा मुलगा हा नुसता पाहून जाणारा होता हेच तिच्या मनात होतं, तिला ह्या येणाऱ्या मुलाचही काही करायचं नव्हतं....

लग्न एक लग्न...आणि लग्न दुनेही लग्न... का करतात लग्न ? हा नारा तिने सोडला नव्हता....अजून काही लग्नाचा तिचा असा मूड नव्हता. कैलासला तर तिने मैत्रीच्या बंधनात बांधून ठेवलं होतं, त्याची आणि तिची मैत्री अगदीच निखळ होती, कैलासही जाणून होता पण त्याचा तो स्वभाव सानूला चिडवून सोडण्याचा आणि हीचं ते त्याला तसं वचवच बोलणं तेही काही घरातल्या लोकांना नवीन नव्हतं. लहानपणी च्या भातुकलीच्या खेळात दोघेही नवरा बायको होत असत, आणि मग कैलासला सानू आवडू लागली होती. सानू मात्र जवाबदारीच्या भव्रात गुंतली आणि भातकुलीचा खेळ विसरली. कैलासच्या बाबांचं निधन झालं आणि तोही कॅरिअरसाठी कसून मागे लागला. शेजार तुटलं आणि सानू कैलास दूर झाले. कैलासच्या आईने मोहित्यांच्या घराजवळच घर विकलं आणि तिथून दूर एक छोट घर विकत घेतलं, बाकी रक्कम तिने कैलासच्या शिक्षणावर लावली. तो पोलिसात उच्च पदावर लागला.  

पुढे कैलास आणि सानूची लहानपणीपासूनची मैत्री आयुष्यात जोडीदाराच्या स्वरुपात कायम व्हावी म्हणून दोन्हीकडून खूप प्रयत्न झाले पण आता ते सर्व भूतकाळात जमा होते आणि कुणीही परत त्या मार्गावर जाण्याच्या मूडमध्ये नव्हतं. कदाचित त्या दोघांच्या नात्याला घरच्यांनी स्वीकारलं होतं. कैलासची आई त्याच्यासाठी मुली बघत होती पण कैलासला सानू मनातून आवडत होती तरीही त्याने तिची मैत्री स्वीकारली होती.

आणि आता म्हटलं तर सुमंत अजून सानूच्या डोक्यातून निघून मनात शिरत नव्हता, तो सारखा  तिच्या डोक्यात अडकला होता, मनाने कितीही विनवण्या केल्या तरी तो तिच्या डोक्यात फिट होता. आपण त्याच्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर येतो हेच त्या मनाला माहित होतं मग कुठे तो शिरणार होता मनाच्या कुंपणातून थेट आत...

सकाळी सानूने तिची तयारी केली, घरी जेमतेम सगळे उठले होते. पण सानू मात्र तयार झाली होती, उमगत तर तिलाही नव्हतं, का आज तयार झाली होती ते, जायचं होतं ऑफिसला, तिचा तो अकडू बॉस आज येणारं होता.

आराध्या मावशी तिला चिडवत म्हणाली,

“काय ग सानू! काय मूड बीड आज, छान दिसत आहेस. जीन्स शोभतो ग तुला.”

तेवढ्यात अनु ही तिथे आली, तिला बघून आराध्या तिलाही म्हणाली,

“अनु तू जीन्स वापरात नाहीस का? तुलाही मस्त दिसणारं बघ.”

अनुच अचानक लक्ष आईवर पडलं, आणि ती तिच्या कडे बघतच म्हणाली,

“मावशी इथे नाहीत ना माझ्याकडे.”

“म्हणजे तू वापरतेस ना?”

“तसं नाही.”

आई स्वयंपाक घरातून भांडी पुसत म्हणाली,

“वापर ग बाई, उगाच माझ्या नावाच्या बोंबा नको, मुली वापरतात तुला कशाला बंदी, मुलींने शोर्ट आणि स्कर्ट.... आणि काय काय ते घालून ऑफिस, कॉलेज  केलंय आणि करत आहेत. एक गेली तिच्या जोडीदारासोबत, दुसरीही सासरी जाईल तिच्या जोडीदारासोबत, मला इथे तुझ्या सोबत राहायचं आहे. माझ्याकडून काहीही बंदी नाही... तुला जे आवडते ते वापर. ते तू आणि तुझा जोडीदार बघून घ्या.”

आराध्या हसली, “सानू अनुच्या जवळ आली, अनु तुला जे जे परमिशन पाहिजे असेल ना ते ते तू मावशी असे पर्यंत घे घेवून.”

आणि मावशी आणि सानूने एकमेकांना टाळी दिली. अनु मात्र जरा बावरली. तरीही मनातून खुश होती. आज तिला आणि अंकितला तिच्या माहेरी जायचं होतं. मग स्वयंपाक घरात अवघडत उभी होती. तर आई तिला म्हणाली,

“ह्हुम काय बोलायचं आहे, बोल.”

“आई ...”

“बोल, म्हण, काही हरकत नाही, आई म्हटलेलं चालेल.”

“आई, आज ते कोळी वाड्यात जायचं होतं...”

“मग जा की, या विचारपूस करून आई बाबांची. कारभार करून ठेवला, झालंय की वादळ शांत... या बोलून, बाकीच नंतर बघू.”

आणि मग तिच्या जवळ येवून म्हणाली, “आम्ही आहोतच ना, कशाला काळजी करतेस, आई बाबा आहेत तुझे, कधीपर्यंत नाराज राहतील. आणि समजा राहिले तर राहूदे आता... मर्जी त्यांची. कधी ना कधी माया सुटेल... लग्नाआधी या भेटून.”

परत भांडी आवरायल घेतली आणि म्हणाली,

मिठाई घेवून जा सोबत. निदान बोलून कडू झाले तर ही हातात दे प्रसाद म्हणून.”

अनुने गोड होकार दिला नी ती खोलीत आली, सानू आणि मावशी खोलीतून ते आईच आणि अनुच बोलणं आधीच बघत होत्या. अनु खोलीत येताच मावशी म्हणाली,

“अनु, तू शिरते आहेस हा तिच्या मनात... भारी कठीण काम आहे ग ते, भले भेल पळाले... बघ बाबा तू... तिच्या मनात पडलेल्या गाठी तुचं सोडवू शकते.”

आणि तिने परत सानुला टाळी दिली.

सानू आईला हाक देत ऑफिससाठी निघाली, इकडे हॉलमध्ये बाबांनी आणि भीमा काकांनी त्यांच्या पार्टीचा बेत तयार केला होता. आज वरच्या माळ्यावर सर्वांची पार्टी होती. खास अस्मित कुमारांनी आणलेल्या अमृताची. अस्मित अंकलला लिस्ट लिहितांना बघून सानू म्हणाली,

“काय अंकल कसला हिशोब लिहिताय? मावशीने केलेल्या खर्चाचा की अजून काही?”

“ये डोकावू नको हा, तुझ्या काही कामाचं नाही ते.”

“अरे म्हणजे, सांगा कुठला ब्रॅंड आणलाय... आम्हीपण करू इकडे घरात पार्टी.”

“तू ना, तुझ्या जोडीदारासोबत कर... झाल्यावर... मग बघ कशी मजा येते ते.”

“मावशी, काय ग तू पार्टी करतेस का अंकल सोबत एकट्यात. हे बघ मला काय म्हणत आहेत.”

आणि बाबा ओरडले,

”अरे ओ माय गॉड येत आहे, पळा पळा, नाहीतर आताच घर साफ करायला लावेल.”

भीमा काका तर बाहेर निघालेही होते. अस्मित मात्र चुकून तिथंच राहिला आणि आराध्याला सापडला,

“काय रे काय म्हणतोस हिला... गप्प राहा ना जरा... ठेव थोडं गुपित... आणि काय सुरू आहे तुझं, माहित आहे मला तुझी बॅग बघितली मी... आधी वरच्या खोल्या साफ करा सर्व मिळून, मग भेटेल ती बॅग... “

खोल्या स्वच्छ झाल्या की मिळेल बॅग असं ती जोरात ओरडली. आता सर्वाना काम करण  भाग होतं. आरध्याने अमृतांची बॅग लपवून ठेवली होती.

--

दुपारी अंकित आणि अनया कोळी वाड्यात पोहोचले होते, अनयाच्या वडिलांनी आधी त्यांना घरातच घेतलं नाही, त्यांना तर कळालं होतं की अनयाला अंकितकड्च्यानी  अजून सून म्हणून स्वीकारलं नाही म्हणून, आणि त्यांना कारण मिळालं, घरातही घ्यायला तयार नव्हते, आईला मात्र आलिया कडून सत्य परिस्थिती माहित होती, अनुला दारात बघून आईला भरून आलं होतं पण तिलाही त्यांनी बजावलं होतं, ते गप्प होते ते आईच्या सांगण्या वरून नाहीतर आतापर्यत त्यांनी अंकित आणि त्याच्या घरच्यांची वाट लावली असती. राग अजून गेला नव्हता, खरं तर त्यांनी अनुच लग्न माश्याच्या मोठ्या व्यापाऱ्यासॊबत ठरवलं होत आणि अनुच्या ह्या निर्णयाने त्यांना व्यापारात खूप मोठं नुकसान सहन करावं लागत होतं. आंतरराष्ट्रीय व्यापारात त्यांचा मासा आता जात नव्हता. आणि व्यापारात मंदी  आली होती.  त्यांनी तर अनुला मनातून काढून टाकलं होतं आणि घरात त्याचं दिवशी तिचं श्राद्ध केलं होतं. अनु घरच्या दारात दिसताच त्यांनी घरातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला होता. आणि आईला बजावून सांगितलं होतं कि अनुला घरात घेतलं तर मी ह्या घरात येणार नाही म्हणून.

बाबा समोरून निघून गेले हे बघून अनया अजूनच तुटली होती, त्याच क्षणाला अंकितने तिचा हात गच्च पकडला. आई आणि आलिया दारात उभ्या होवून बघत होत्या. अंकित पुढ आला आणि म्हणाला,

“येत्या रविवारी घरी लग्न आहे आमचं आणि बुधवारी कोर्टात, हेच सांगायला आलो होतो आम्ही, आणि ही आईने मिठाई पाठवली आहे. “

आलिया ती घायला समोर आली. पण आई मात्र काहीच बोलली नाही. दाटून आलं होतं तिला, घरात गेली आणि तिचे स्वयंपाक खोलीत जमवलेले दहा लाख होते, ते ती घेवून आली, अलीयाच्या हातात दिले आणि म्हणाली,

“आलिया, हे ताईला दे, एखाद सोन्याच काही करून घे म्हणावं, आणि ही माझी चपलाकंठी, आजीच्या पाटल्या, आणि केसांचा काटा आहे, अनुला आवडायचा, दे माझ्या कडून. घाल म्हणावं लग्नात आईचा आशीर्वाद म्हणून. माझे आशीर्वाद नेहमी सोबत असणारं तिच्या. बाबा आज रागात आहे, कळूदे त्यांना तुझी निवड यौग्य आहे ते... वेळ लागेल पण एकदा का विश्वास बसला की ते स्वतः येतील तिला भेटायला. जशी तू तुझ्या जोडीदारासोबत उभी आहेस तसं मलाही त्यांच्या निर्णयाला मान द्यावा लागेल. मी त्यांच्या शब्दाबाहेर जावून वागू शकत नाही, पण ह्याच जोडीदाराच्या नात्यात राहून तुझं जोडीदाराच नातं नक्की समजावण्याचा प्रयत्न करेन.”

अनुच्या डोळ्यातून अश्रू पडत होते, आणि ती रडतच म्हणाली...

“आई, तिकडे खूप आनंदी आहे ग मी... पण इथूनही आनंदी निघाले असते तर माझ्या सारखी भाग्यवान कुणीच नसतं.”

आलियाला म्हणाली, “आलिया, माझे डॉक्यूमेंट देतेस का? आपल्या खोलीतल्या कपाटात खालच्या कप्प्यात आहेत. आणि बाबांना सांग मी काम सूर करत आहे म्हणून.”

आलियाने डॉक्यूमेंट आणून अनुला दिले आणि अनया आणि अंकित तिथून निघून गेले. 

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्टस्टे सेफ...

Post a Comment

0 Comments