जोडीदार तू माझा,,, भाग ५७

 जोडीदार तू माझा भाग ५७



अंकितने गाडीला किक मारली, आणि अनु त्याच्या मागे बसली, घरातले सर्व बाहेर होते, आज खूप दिवसाने अनु आणि अंकितच्या नात्याने मोकळा श्वास घेतला होता. वाऱ्याच्या वेगाने अनुचे केसं उडत होते तश्या तिच्या मनातल्या मळलेल्या भावनाही उडत निघून जातं होत्या, थोड्या अंतरावर अनु अंकितला गच्च बिलगली, आणि स्पर्शाने सुखावलेला अंकित आनंदाने फुलाला होता. नात्यात आत्मविश्वास शिरला होता, आता मागे बघणे नाही हे दोघांच मन बोलत होतं.

अंकितने मध्येच गाडी थांबवली, अनु आणि अंकित जिथे भेटायचे त्या पाणी पुरीवाल्याला त्यांनी त्याचं लग्न झालंय असं दिलखुलास सांगितलं, तोही खुश झाला, अनुने आज कुणाचीही भीत न बाळगता मनमुराद पाणी पुरी खाल्ली. अंकितने राणीला आवडते म्हणून घरच्या साठीही पॅक केली. समोरच्या गल्लीत कॉम्पुटर  इन्स्टिटीयूट  होतं, अंकितने  गाडी तिथेही थांबवली, इथेच अनु त्याला भेटली होती, इन्स्टिट्यूटमध्ये त्याने जरा वेळ घालवला, तिथे कॉम्पुटर शिकवायला होता मग जुन्या बॉस सोबत थोडी थट्टा मस्करी करत वेळ घालवला. समोरच्या इस्क्रीम पार्लर मधून इस्क्रीम पॅक केली. समोर चणा चाटच दुकान होतं, रात्रीच्या चकण्याला सोबत म्हणून त्याने तेही घेतलं. अनुच्या सांगण्यावरून त्याने महिला मंडळ साठी सॉफ्ट ड्रिंक्स घेतल्या आणि रेस्टोरेन्टकडे निघाला.

इकडे घरीही धमाल होती, राणी आणि राजन पोहोचले होते. राणीला सुंदर नटलेलं बघून आईला आणि बाबांना अश्रू राहवले नव्हते. राजेशाही दागिन्याने नटलेली  गोरीपान राणी चक्क राणीच भासत होती. आल्या आल्या आईने दोघांचे पाय धुतले, नाही नाही म्हणत आईने राजनरावांचे पाय तर साडीच्या पदराने पुसले. नंतर देवघरात जाऊन आशीर्वाद घेतला, आजीच्या आणि आजोबाच्या फोटोला नमन केलं आणि जोडीने हॉलमध्ये विराजमान झाले.

हळू हळू महिला मंडळाच्या गोष्टी रमल्या आणि पुरुषांचा वेगळा गट पडला, राजन सगळ्यांमध्ये मिक्स झाला, त्यालाही आजच्या पार्टीचं सर्व काही माहित झालं होतं. त्याच्या गाडीतून पत्ते काढले, अस्मित कुमारांसोबत प्लॅनिंग केली. सगळे गोष्टीत रमले होते. तोच अंकितने जोरात हॉर्न वाजवला, भीमा काका बाहेर आले, समान घ्यायला मदत केली. अनुही हसतच घरात शिरली, तिचा हसरा चेहरा बघून घरातल्यांना अजूनच आनंद झाला. आल्या आल्या अनुने राणीला आलिंगन दिलं. पाणी पुरी पिशवीतून काढली आणि राणी आणि सानुला दिली, सानू तिला म्हणाली,

 “अनु आतापासून सरभराई काय ग आमची? मजा बाबा आमची.”

 

 

अनु फक्त स्मित हसली, आणि त्यांच्या सोबत बसली, राणीच्या गोड गोड गोष्टी सर्वाना आवडत होत्या. महिलामंडळ खाली हॉलमध्ये रमले होते तर वरच्या माळ्यावर पुरुष मंडळी रामिली होती.

--

सकाळीच आईची धापवळ सूर झाली होती, सानूला बघायला मुलगा येणारं होता, राजनच पहिल्यांदा सासरी होता, येत्या रविवारी अंकित आणि अनुच घरीच रीतसर लग्न होतं, आईची सारखी धावपळ सुरु होती. आई मुलींच्या खोलीत आली, सर्व झोपून होत्या, ती सानूच्या उश्याशी येवून बसली, तिला कुरवाडत मनात म्हणाली,

“हा मुलगा पसंत पडू दे माझ्या सानूला, मग कश्या सर्व... चिंता निघतील मनातून.”

सानू तिच्या मांडीवर परत रेंगाळत म्हणली,

“मी नंतर ही त्रास देईल, सोडणार नाही तुला, आणि काही विचार करू नको, माझा अजून होकार नाही त्या मुलाला.”

आता मात्र आईने तिच्या हळूच गालावर लावली, आणि हसली,

“तू ना नुसती छळ मला, उठ आता किती तयारी करायची आहे.”

मग राणीला हलवत म्हणाली,

“ये राणी उठ ग, ताईला काही फेसपॅक वगैरे लाव हिच्या चेहऱ्याला.”

बोलण्यात अनुही उठली, आई अनूलाही म्हणाली,

“अनु कर ग मदत राणीला, आणि ही सानूडी ऐकली नाही तर सांग मावशीला.

“ये आई हे भलतं सलतं सांगू नको मला, त्याला पसंत करायचं असेल तर असचं कर म्हणा... नाहीतर जा म्हणा उडत.”

सानू डोळे चोळत म्हणाली आणि तिची जीभ चावली, उडत हा शब्द तिच्या जिभेवर सारखा बसत होता, काल बाबांना सुमंत बद्दल सांगतानाही तिने तो वापरला हे तिच्याच लक्षात आलं होतं, मनात हसली आणि आईला मिठी मारली,

“ये आई तुला कसला आनंद होईल ग मला दूर केल्याने.”

“दूर कुठे करेल बाळा, पण आयुष्य जोडीने घालवावं हेच वाटते ना ग मला, तुझा जोडीदार येईल ना तेव्हा तुला कळेल किती महत्वाचा असतो ते, आई बाबा किती दिवस सोबत राहतील, फार फार तर अजून वीस वर्ष जगू आम्ही... नाहीतर नाहीही...मग कसं!, तुम्ही सर्वांनी आपल्या आपल्या जोडीदारासोबत सुखाने राहावं हेच वाटतं ग मला आणि बाबांना.”

“ये आई, इमाशनल ब्लेकमेल नको ना करू, माझं पानही हलत नाही माझ्या बाबांशिवाय.... “

“असं! बघू ग बाई!”

“माझा हिरो माझा बाबा आहे.... अजून तरी दुसरा नाही.... येईल तेव्हा बघेन...”

“असं !

मग, सारखी मागे लागत असते, हो बाजूला, वाश रूमला जावू दे.” आणि सानू निघाली.

आई आता राणीकडे वळली, झोपं लागली ना ग बाळा? बघ बाबा आमचा वाडा नाही ग सावंतवाड्या सारखा.”

आई काहीही काय ग, माझी खोली आहे ही,...

हो, जावूदे, काय खाशील, आमच्याकडे काही मेनू लिस्ट नाही बाबा, जे म्हणशील ते करून देईल पण, पोहो खाशील.”

“मस्त आई, पोहोच हवाय मला, मिस केला मी दोन दिवसापासून तुझ्या हातचा.”

आई उठली, आणि काही पावलं चालल्या नंतर परत थबकली, मागे वळली, अनु कडे बघत म्हणाली, “अनु येतस का स्वयंपाक खोलीत? पोहा घे शिकून, माझ्या मागे तुलाच करायचा आहे... माझ्या लेकी आल्या की करून देशील त्यांना, चल ये स्वयंपाक खोलीत आटपून.”

अनु लगेच केसांचा जुडा बांधत म्हणाली,

“हो आई, येतेच, मलाही शिकायचा आहे. आणि हे काय नेहमी नेहमी, माझ्या मागे मागे, मला काहीच येत नाही चहाशिवाय, सर्व शिकवा...” आणि अनु मागेच निघाली.

राणी मस्त आरामात उठली, तिच्या कपाटातून तिचं MBA च सर्व सामान काढलं,बॅगमध्ये भरलं, कॉलेज सुरु करणार होती ती पुढच्या आठवड्या पासून. तिचं फेसपॅकच सामान काढलं, सानू ताईसाठी तिने साडी आणि दागिन्यांची जमवाजमव केली. दोघी बहिणी मिळून गप्पा केल्या.

राजन रावांनी जरा खोलीच दार वाजवलं आणि डोकावलं,

“काय बहिणी मंडळ सुरु आहे का?

“अरे या हो, राजन रावं, घर आपलच समजा.”

“समजा काय, माझं सासर आहे हे, हक्काचं घर आहे, तुमच्या बहिणीने त्रास दिला की इथेच येवून राहतो मी... आता येवू का आत?

या हो म्हणत सानुने राजनला सानुने आग्रह केला, तोच राजनला शोधात अंकितही खोलीत आला. गप्पा रंगल्या होत्या तर अनु सर्वांचा पोहा खोलीतच घेवून आली. इकडे सर्व समवयीन जमून गप्पा करत पोहा खात होते तर तिकडे हॉलमध्ये घरचे सर्व मोठे बसून गप्पा करत होते.

आई आरध्याला म्हणाली,

“काय ग अरु, किती वाजेपर्यंत येणारं ग पाहुणे?

आराध्या मोबाईल शोधात ओरडली,

“ओ माय गॉड, मला मेसेज करणार होत्या त्या ताई, बघू दे ग, थांब सांगते.”

आराध्याने फोन शोधला आणि मेसेज बघितला, ओरडली,

“ओ माय गॉड! अग आता सकाळीच येणारं आहेत ते, हे बघ निघाल्याचा मेसेज आहे, ओ माय गॉड , माझं कसं लक्ष राहिलं नाही.... पोरींमध्ये विसरले मी ओ माय गॉड...तयारी ला लागायला हवं.

अस्मित कुमार पोह्याची प्लेट संपवत म्हणाले,

“वेंधळी आहेस तू, यु शूल्ड नो ग, चला काय काय करायचं ते ठरावा लवकर.”

“अण्णा, मी काय म्हणतो, मी बाहेरूनच सर्व घेवून येतो.”

आणि त्यांनी बाळूला आवाज दिला, “बाळू चल रे आपल्याला बाहेर जायचं आहे.

बाळू आणि राजन बाहेरची गडबड ऐकून बाहेर आले, राजन रावं म्हणाले,

“मी ही येतो सोबत, काय काय करायचं आहे ते सांगा.”

भीमा काका म्हणाले, “अहो पाहुणे तुम्ही कशाला, आम्ही आहोत ना.”

“नका हो काका नुसती फोर्म्यालीटी, इथे बसून काय माणस जपता येतील? येतो मी.”

आणि राजन आणि बाळू सहित अस्मित कुमार बाहेर सर्व मिठाई आणि काही जेवणासाठी भाज्या आणायला गेले.

इकडे आईची आणि मावशीची घाई सुरु झाली, राजनही पहिल्यांदा सासूर वाडीत होता, मग सर्व नीट करायचं होतं आईला. तिनेही पंच पकवान जरा जरा तयार केलेच. अन काही बाहेरून येणाऱ्या सामानांची सोबत होती. सुनीता काकिनी  बाबांच्या आणि भीमा काकाच्या मदतीने घर आवरलं.

अनु आणि राणी दोघीही मिळून सानूला तयार करण्याचा ठेका घेतला. नाही नाही म्हणत सानू एकदम झक्कास तयार झाली, तयार झाली की ती हुबेहूब आईची कार्बन कॉपी दिसत असायची फक्त रंग बाबांचा घेतला होता तिने. मेकअप करण्यात माहीर होतीच. स्वतःचा करण्यात गुंग झाली, मेकअप करतांना समोर अचानक आरश्यात सुमंतचा चेहरा तिला दिसला आणि ती परत मनाने भरकटली, मनातच रागावली,

“काय रे मना का छड्तोस मला

कप्या कप्यात दर्शवतो त्याला

ना कधी ना सुचले मला

बेभाण हे मन माझे मला

काय रे मना का छड्तोस मला. “

आणि अचानक भास व्हावा असं काहीस झालं, आरश्यातलं त्याच प्रतिबिंब हसलं, मनात प्रचंड कोलाहल सुरु झाला, मन बावरलं, आणि नाराज होवून बसलं, सुंदर चेहऱ्यावर एक नाराजी जरा विसावली, तरीही सानूला ते जाणवू द्यायचं नव्हतं कुणाला, मग बसली परत लॅपटॉप घेवून,

“राणी सांग ग मला तो मुलगा आला की, येते मी त्याला कटवायला... “

“ये तायडे, काहीही तुझं, चांगला मुलगा असेल ग, मावशी म्हणते म्हणजे... काही तरी विचार करून ना... तुझी तोड असेल बघ.

“हहम, माझी तोड... मी माझी तोड आहे राणी ... अपुन बोला तू मेरी लैला.... “

आणि ती गुणगुणायला लागली. मनात प्रश्न अनेक होते तिच्या, काय आपण लपवत आहोत हेही कळत नव्हत, क्षणभर वाटलं बाबांना सांगाव, कुणीतरी आवडतंय पण समोरचा नाही ना तसा, उगाच माझा पचका... . ह्या विचाराने ती स्वतःच थांबत होती. तिला सोडून सगळ्याची घरात घाई सुरु होती. आई आणि बाबा तर येणाऱ्या मुलाला पार जावई मानून चालले होते. आईची आनंदाला तर पारावर नव्हता... तिचं मन म्हणत होतं की सानू सारख्या वादळाला विसावा देणारा किनारा येतोय ते... घरात प्रत्येक जण मानून चाललं होतं की, सानू नाही म्हणार नाही.

Post a Comment

0 Comments