जोडीदार तू माझा.. भाग ६८

 

भाग ६८




राग, माणसाचा शत्रू पण जेव्हा हवाय तेव्हा त्याने यावं नाही तर सारा खेळ चौपट होतो. बाळूने आजोबांचा स्वभाव घेतला होता हे बाबांच्या आणि घरातल्या सर्वांना माहित झालं होतं.

इकडे बाळू त्याच्या खोलीत येवून रागात सर्व बोलत होता, अनु त्याला थांबवत होती. आणि अचानक अनुसाठी आणलेले कपडे अंकितच्या धक्यात त्याच्या बेडवर पडले, आणि सगळं वातावरण प्रेममय झालं....

अंकितने खोलीच दार जरा लोटलं, बेडवर त्याच्या धुंदीत तो पडला, जरा आत्याच्या चिंतेते तर जरा अनुच्या धुंदीत, अनुकडे बघितलं आणि तिला त्याने अंगावर ओढलं, अनुही अलगत त्याच्यावर पडली, तिचे केसं मोकळे झाले, हळुवार अंकितने तिचे केसं त्याच्या चेहर्‍यावर वरून बाजूला केले, ती अलगद लाजत बेडवर पाठमोरी झाली, हळुवार कुरवाळत तिच्या पाठीवरचे केसं अंकितने बाजूला केले, बोटाने तो त्याचं नावं तिच्या पाठीवर कोरत होता, स्पर्शाने शहारलेली अनु, जरा बावरली, अंकित, दार उघडं आहे रे ! काय करतोस?

असू देत, घरात कुणीच सरळ खोलीत शिरणार नाही नॉक केल्याशिवाय...ताईने रूल लावून ठेवला आहे.

असं ! आणि अनु कडा पालटून पाठीवर झाली.

“हो ग” अंकित परत तिच्या जवळ आला.

अनु परत बाजूला झाली, उठली, खाली चल, आपण बसुया सर्वांसोबत, मग ...

हुमम... हो येतो मी... अंकित धुंदावल्या सारखा म्हणाला.

अनु त्याला चिडवत म्हणाली,

आता खाली जो अंकित बोलत होता ना तो तू नाहीस का रे ?,

हुहूम... तोच मी... पण इथे तर ह्या खोलीत जोरुचा गुलाम, मंजूर मला... अनुंकित आहोत आणि व्हायचं मला.

असं ! मग उठ आणि चल खाली, सोबत जेवूया...नंतर तर...

“नंतर काय?”

अंकित उठला, अनुच्या आणखिनच जवळ आला, तिला अगदीच त्याने त्याच्या बाहुत बंद केलं.... अनुने त्याला त्याच जोराने ढकललं,

इथे माझे श्वास फुलवू नको, बघतेच तुला नंतर… आधी खाली जावूया, बंर दिसतयं का हे!

अग नंतर काय मी तर आताही तयार आहे.... ये, हे ड्रेस घालून दाखव ना ग ... तुझ्यासाठी आणले ना मी.

ये चल रे... नंतर... बर नाही वाटत ते, आपण दोघेच इकडे आहोत... वेळ काय, प्रसंग काय ...

वेळही आहे आणि प्रसंग ही... आता काय कुणाला भितो की काय मी...” म्हणत अंकित परत अनुच्या नजीक आला, आता मात्र दारावर नॉक झालं,

बाळू, ये खाली, सगळे वाट बघत आहेत... आई जेवायचं म्हणते आहे.

सानू बोलवत होती, अंकित ओरडला,

आलोच ग, ही ना...”

अनु असं ऐकताच म्हणाली, असं, मी ? तू गेलास आता...थांब, बघतेच तुला.”

अंकित मिश्कील हसला,

“जानेमन हम तो अभी भी तयार है, देखलो!”

“देखेंगे...”

म्हणत अनुने दार उघडलं आणि ती खाली हसत उतरली आणि हसता हसत परत शांत झाली, जरा चेहऱ्यावरचे भाव बदलत म्हणाली,

“अंकित येतोय... जास्तच चिडलाय तो. सुरू आहे जरा खोलीत चिडचिड त्याची.

कुणीच काही बोललं नाही, कदाचित सारे जाणून होते, अनु आणि अंकित आजचं जोडीदाराच्या भूमिकेत शिरले होते, त्यांच्या साठी घरातले आनंदी होतेच पण चिंता होती ती अंजू आत्याची. तिचं जोडीदाराशी नातं कीडलं होतं आणि जर ते तोडलं नाही तर तीही कीड लागून संपले की काय ह्या धास्तीती घरातले सर्वच होते. अंकितने घेतलेला निर्णय त्यालाच निभवायचा होता. जोशात निर्णय घेतात सर्व पण निभवतांना मागे येणारे बघितले होते बाबांनी. कदाचित त्याच भावनेने आजवर त्यानी अंजूची जवाबदारी घेतली नव्हती.

अंकित त्याच्या खोलीतून आला आणि तोच भीमा काका आणि काकी घरी पोहचले. सर्वांना बघताच ते म्हणाले,

“अरे व्हा, सर्व मंडळी हॉलमध्ये, आमचीच वाट बघणं सुरू होतं की!”

 “काय अरे अरुण, सदाला बऱ नाही रे, मग हिने स्वयंपाक करून दिला, आणि बसलो होतो तिथेच. त्याच्याकडे बघितलं की मीच माझा स्वतःला नशीबवान समजतो, निदान माझा जोडीदार माझ्या सोबत तर आहे. सून आणि मुलगा असून काय अर्थ, ह्या क्षणाला तर जोडीदार हवा असतो सोबत... आपल्याला समजून घेणारा, तो गेला की आपण अर्ध होतो रे... बघवत नाही मला त्याचे हाल, जेवतो काय, राहतो काय, काही माहित नाही. आज आम्ही दोघांनी सर्व किराणा भरला त्याच्या स्वयंपाक खोलीत. हॉस्पिटलमध्ये घेवून गेलो होतो त्याला, मग जरा वेळ झाला.”

अरुण गुमान म्हणाला,

“हो मित्रा, जोडीदार आयुष्यात खूप महत्वाचा असतो, सारं आयुष्य बरबाद होतं, ज्याच्या  भरोसे आपण हा प्रवास सुरु करतो, तोच जेव्हा दगा देतो ना तेव्हा आपण काहीच नसतो... किंमत काय उरते मग?”

आता मात्र भीमा काका बाबाजवळ आणि सुनीता काकी आरतीजवळ येवून बसले, काका म्हणाले, “काय रे झालं? आम्ही काही वेळेसाठी घरात नव्हतो, काय झालं इकडे.”

अरुण सुस्कारा देत म्हणाला,

“आपली अंजू रे!”

“आपली अंजू ?” काका सर्वांकडे बघत म्हणाले

“हो, आपली अंजू “

“काय झालं तिला ? परत मारलं की काय त्याने?”

“अरे, हो पण काही झालं नाही, पण... काही झालंही नाही ना ? “

“बसं, आयुष्याची हीच तर खंत आहे माझ्या, जगभर सोयरिका जोडतो, पण माझ्या बहिणीला सुखी नाही करू शकलो” भीमा काका हताश होवून म्हणाले

आता मात्र अंजू खोलीतून हॉलमध्ये आली,

“भीमा दादा, काय रे!  तुझी नाही ना चुकी, मीच चुकले... तू तर स्थळ आणत होतास माझ्यासाठी, पण, मीच हवेत होते, धुंदीत होते, तुम्ही सारे मला सांगत होता अमितबद्दल पण तो असा नाही हाच माझा विश्वास होता.”

“पण तरीही माझे प्रयत्न कमी पडले ना तुला समजवण्याचे ...”

“जावू दे रे, त्या वेळी तोच निर्णय योग्य वाटत होता ... आनंदी होतेच ना मी... आता वाटतं तुमचं सर्वांच ऐकलं असतं तर निदान आज ह्या घरात अशी उभी नसते,..”

आता अंकित परत जोरात बोलला,

“आत्तु, काय ग, अशी उभी नसते म्हणजे... तू आहेस तशी काय आम्हाला जड नाहीस, आता इथेच राहायचं, बघतो मी काय करायचं ते.”

“पण उगाच मी, तुमच्यावर ...”

“ओझं... म्हणायचं का तुला... ?बऱ तू तुझं कमावतेस ना? तेच सुरु ठेव, पण राहायचं इथेच... उद्याच छकुलीची शाळा बदल. तुला बुटिक टाकायला मी मदत करेन... मग काय ते तुझं तू बघ, काही मदत लागली तर तेही नक्की करेन... आणि हे काहीही मी माझ्या कडून करणार नाही, तुझा हक्क आहे तो... आणि हक्क आहे आयुष्य आनंदाने जगण्याचाही, काय अत्तु!” 

म्हणत अंकितने तिचे गाल ओढले आणि परत म्हणाला,

“काय हे आत्तु, गालही हातात येत नाही तुझे, हाडं लागतात नुसती, अनु, आई जेवायला घ्या आता, भूक लागली.”

अंकितला सर्व बघत होते, कर्ता पुरुष भासत होता, एक पिढी उभी झाली होती परत संसाराचा  वृक्ष उभा करण्यासाठी. एका जोडीने जोडीदाराची साथ देता देता केलेली चुकी एक जोडी सुधारू बघत होती. घराला पडलेलं अंजली साठीच कोडं आज पूर्ण होणारं होतं. आज कुणीतरी भक्कम तिच्या पाठीशी उभं होतं.

कसं आहे ना, कधी कधी आयुष्यात एवढं खचतो माणूस की काय योग्य आणि का नाही हे समजू शकत नाही, ओढल्या जातो खोलवर, संपण्यान्याच्या शोधात, आयुष्य रेटत असतो, मरणाची वाट बघत, अश्यांना कुणाच्या तरी भक्कम आधारची गरज असते, निदान त्या खोल गाड्द्यातून निघण्यासाठी तरी, एक हलकीशी हाक हवी असते, की पल्याळ कुणीतरी आहे ही जाणीव मनात रुतण्यासाठी. कुणी कुणाचं नसतं,  पण असं कुणी जवळपास असलं की एक हाक दिली तरी तो माणूस त्याच्या त्या विचारातून निघणार ना ?... नाहीतर ते आयुष्य काय जिथे कुणाला मरतांना बघूनही साधी हाक देवून विचरापूस होवू शकत नाही. आणि मग तो माणूस आपल्यातून निघून  गेला की... नुसत्या व्याफळ चर्चा...

अनुने केलेला स्वयंपाक सर्वांनी गुमान खाल्ला, खरं तर आज तिने स्वतःच्या मनाने स्वयंपाक केलेला आणि कौतुक अपेक्षित होतं पण घरात सारेच जरा अंजलीसाठी चिंतेत होते मग सारेच जेवतांनी शांत होते. आणि अनुने स्वतःला समजवलं, मनातच स्वतःच कौतुक केलं, सगळं आवरलं.

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com 

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्टस्टे सेफ...

Post a Comment

0 Comments