जोडीदार तू माझा.. भाग ७१

 

जोडीदार तू माझा.. भाग ७१  



अनुला पोहा करतांना तिचं सुटलेलं माहेर आठवतं होतं, त्या आठवणीत तिचा पोहा तयार झाला होता, घरात खमंग कडीपत्ता आणि मिरची कांद्याचा सुगंध पसरला होता. आता सारे पोह्याची वाट बघत होते. अनुने गरमा गरम पोहा सर्वांना दिला.

अंकितने पहिला घास खात म्हणाला,

“आई बघ अनुने तू करतेस ना तसाच पोहा केलाय. मस्त अनु, मस्त झालाय, झक्कास !!”

अनु अंकित कडे डोळे फाडून बघू लागली, तर आई म्हणाली,

“मग करणारच, तिला मी शिकवलाय.”

“हो आई, जमला का? खाऊन सांगा ना, मला जरा तेल जास्त वाटत आहे. तरीही काही तुम्ही करता तसा अगदीच झालेला नाही. “ अनु आईला प्लेट देत म्हणाली.

आईने एक चमचा खाल्ला, हसली,

“अग छान झालाय, तू पण घे. खूप काम आहेत आता. आवर पटपट, मला मदत कर नंतर.”

अनुने पोहा खाल्ला तेव्हा तिला तो नक्की कसा झालंय हे कळाल होतं, खर तर तो जरा खारट आणि तेलकट झाला होता पण सगळ्यांनी आनंदाने खाल्ला होता. कुणीच काही बोलत नव्हत पण अंकित तिला प्रत्येक घास खातांना चिडवत होता. म्हणायचं त्यालाही होतं की पोहा जरा खारट झालंय पण बायकोचं नवल तो नाही करणार तर मग काय! त्याने स्तुती केल्यानंतर कुणी कसं काय बोलू शकणार होतं. बायकोने जे आनंदाने समोर केलंय ते आनंदाने ग्रहण करण्याचं वचन तर दिलच होतं ना सप्तपदी घेतांना. अनुला अंकितची ही गोष्ट खूपच भावली. तीही हसली, म्हणाली,

“जरा मीठ जास्तच झालंय नाही, थोडी थोडी साखर आणि तिखट शेव टाकू का सर्वांना वरून.”

सानू हसली, “अनु त्यात तुझ्या प्रेमाचा गोडवा आधीच आहे, मला तरी नकोय, मस्त झालंय, मलाही शिकव, आईला केव्हांच म्हणते आहे... ती काही शिकवायची नाही, सुनेला बरोबर हाताशी घेवून शिकवलं.”

“ताई, मी कुठे अजून शिकले.”

“आई, अजून एक दोनदा बघावं लागेल नाही?”

“हो हो, सगळं शिकवेल तुला, माझ्या नंतर हा मोहित्यांचा वारसा तुलाच पुढे न्यायचा आहे.”

“काय हो आई, नेहमी नेहमी हेच तुमचं... चला ती यादी द्या मला, आणि आपण कार्यक्रमच सामान बघून घेवू.”

“सानूदी, तुमचे उद्याचे कपडे फिटिंग केलेय ना? काही करायचं असेल तर सांगा, मी बाबांना सांगते मशीन साफ करायला.“ अनु सानूदीला म्हणाली.

“नाही ग, काल म्हणूनच वेळ झाला होता ना, मी फिटिंग करून आणलय, तुला दाखवलही नाही, चल, तुला दाखवते, मग बघ तू, आणि आपण माझं सामान जमवून घेवू, राणी करायची ग सगळ म्याचींग वगैरे... चल बघ ना तू...”

अनु आणि अंकितने सगळा विषय बदलला होता, हलक्या फुलक्या बोलण्यात सगळे फ्रेश झाले होते. अनुने सानूच्या खोलीत जातांना अंजू आत्याला सोबत घेतलं होतं. आराध्या मावशी आणि आरती स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या होत्या. सुनीता घर आवरत होती. पुरुष मंडळी समोरचा बगीचा साफ करण्यात मग्न झाले होते. बाळूने मंडप वाल्यांना बोलावून घेतलं होतं आणि तो सगळं सांगत होता.

घर परत सज्ज झालं होतं सानूच्या जोडीदाराच्या आगमनासाठी. दुपारच्या जेवणापर्यंत मांडव पडला होता. आई आणि सुनीताने मिळून जवळपास आणि काही नात्यातल्या लोकांना फोनवर आमंत्रण दिलं होतं. आणि आता आईला राणीच्या सासूला फोन करायचा होता, मनातच तिची तयारी सुरु होती, आराध्या तिला बघून म्हणाली,

ओ माय गॉड.... ताई किती विचार करतेस?

अग, मुलीच्या सासूशी बोलायचं आहे, विचार तर करावाच लागेल ना, एकही शब्द इकडे तिकडे होता कामा नये. आता तिची सुरुवात आहे, माणसं रूळली आणि कळली कि मग चालतं, काहीही बोलायला, पण आता नको बाबा.

मग झालंय का पाठांतर, काय बोलायचं ते.

हो, जरा गप्प बसं आता, फोन लावत आहे.

आईने फोन लावला, सुंदर आणि मोजक्या शब्दात तिने आमंत्रण दिलं, सर्वाना येण्याचा आग्रह केला, त्यांच्या शिवाय कार्यक्रमाला शोभा नाही हे बोलताच पुढचं तिला काहीच बोलायची गरज पडली नाही, राणीच्या सासूने सह परिवार येण्याच आश्वासन दिलं होतं. आनंदात आईने फोन ठेवला आणि अंकितला आवाज दिला, अंकित लगेच आला,

बाळू, राजन रावांना रीतसर फोन कर, मी त्यांच्या आईला केलाय आणि सर्वांना आमंत्रण दिलंय, पण तू राजन रावांना नक्की कर. मान आहे त्यांचा.

हो तू आताच केलाय ना, मी जरा वेळाने करतो. जेवण झाल्यावर करतो. ठीक ना?”

बऱ, नक्की कर रे बाबा, आणि मी अनुला सांगते राणीशी बोलायला.

आई ते ठीक आहे, भूक लागली आहे, जेवायचं का? मग मला डेकोरेशन बघायचं आहे..”

हो हो, बोलावं सर्वांना, पानं घेतो आम्ही, या सर्व हात धुवून.”

हळूहळू घर सावरत पुढे सरकत होतं, घरात मंद मंद पावलाने आनंद शिरतं होता, सानू आज एकटीच बाल्कनीत बसून गुणगुणत होती, आणि तिच्या त्या गुणगुण गाण्यात घर आनंदाने डोलत होतं. बऱ्याच वर्षाने तिच्या मनाने उभारी घेतली होती, विचारात ती खूप पुढे गेली आणि अचानक गाणं गुणगुण बंद झालं, आपण आपलाच विचार करतोय का हा विचार कुठूनतरी तिच्या मनात डोकावला. ती शांत झाली तसं अनुच लक्ष तिच्यावर गेलं,

ताई गाणं गुणगुणत होता ना, गप्प का झालात?”

अनु बाल्कनीच्या पायऱ्या चढत म्हणाली,

तिने हातात महेंदीचे कोन आणले होते. पुढं ठेवत ती परत म्हणाली,

ताई, काय झालं शांत का झालात? तुमच्या त्या गुणगुणल्याने घरातले सर्व सुखाचा स्पर्श अनुभवत आहेत, आज नका थांबवू भावनांना.”

अग, मी स्वार्थी आहे ना? माझाच विचार करत आहे, आता बघ ना, अंकित आताच जॉबवर लागला, घराचे अजून हप्ते सुरु आहे... आणि आई बाबा ...

म्हणजे तुम्हाला अंकित वर विश्वास नाही तर...

तसं नाही ग, पण ही माझी जवाबदारी आहे, आणि मी ही सोडून जावू शकत नाही, आणि बाबा माझ्या शिवाय नाहीना राहू शकत, मी त्यांना एकट नाही सोडू शकत.

अंकित नुकताच फ्रेश व्हायला आला होता तर अनु त्याला खोलीत दिसली नाही, तिला शोधात तो माळ्यावर आला, आणि त्यानेही सानू दिला ऐकलं,

 तायडे, तू पण ना!, जान आहेस घरातल्यांची, मी पण नाही राहू शकत तुझ्या रागवण्या शिवाय, पण हे सुमंत राव आले ना आता मग ते घेतील माझ्या वाटणीच रागावणं, मी सुटलो रे बाबा, आणि काय ग बाबा काय नुसते तुझे आहेत?”

काय म्हणालास, तू सुटला? तुला बरी ह्या जन्मात तरी मी सोडायची नाही, आता तर मी असते पण नंतर तुला रागावून आणि छडून सोडीन, बाबांची काळजी घेतली नाहीस ना तर माझ्याशी गांठ आहे.”

असं, मग घेवून जा ना बाबांना सोबत, नाहीतर आण इकडे तिकडला पसारा...

असं! मी हाच प्रोजेक्ट सांभाळणार म्हणजे दोन तीन मह्निण्यात इकडे वारी असणार माझी, बघ कशी एन्ट्री करते साठेंच्या घरात... खूप झालं म्हणावं साठ्यांना शांत राहणं, आता वादळ येतंय... आणि तेही राज्याची राणी होवून...अस्सल राणीची एन्ट्री होणारं तिकडे... बघ कशी एका ऐकला सरळ करते.”

“सुटलो रे बाबा, आता ह्या घरात तरी वादळ वाहणार नाही... आणि काय ग कोण तिकडे सरळ नाही... सारेच तर आम्हाला जशे राजेशाही वाटले, काय बुवा तुझ्या त्या सासूचा तोरा, आणि मामा मामी तर असं वाटत होते की कुठल्या राजघराण्याला बिलोंग करतात की काय... तुचं सरळ होशील तिकडे.”

“अबे ये, मी सरळ करणार वादळ आहे, बघ कसं एका एकाला सरळ करते. मासाहेबानी सांगितलंय मला सर्व.”

“बापरे !!वाचवा रे बाबा त्या साठ्यांना आता... पण आम्ही सुटलो....”

“ये शेंबड्या, वादळ सरळ न सांगता येत जाणार इकडे मोहिते निवासात, मग काय करशील.... कसा सुटशील रे.”

“मग काय आलेया भोगाशी असेल सादर... कहर तो कहर....”

सानू शांत झाली, अंकित तिच्या जवळ येवून बसला,

“ये तायडे, कशाला काळजी करतेस, अजून तीन महिने आहेस तू मला इथून छडायला... घे छडून ...”

“शेंबड्या, जा, नाही जातं मी...”

“अरे मस्त, वरचा मजला बांधा आणि व्हा म्हणावं सुमंत रावांना इकडे घरजावई म्हणून शिफ्ट.”

“असं... तू थांब रे... तू होतास ना तो ज्याने सुमंतला मी वादळ आहे असं सांगितलं होतस? त्याने माझा नंबर वादळ म्हणून सेव केलाय.”

आता मात्र अनु आणि अंकित दोघेही हसायला लागले, हसता हसता अंकितच्या डोळ्याच्या किनारीला अश्रू जमा झाले होते, त्याने सानूला एवढं आनंदी कधीच पाहिलं नव्हतं, अश्रू पडू न देता तो माळ्यावरून खाली आला. अनुने ते ओळखलं होतं तिने खाली डोकावत अंकितला विचारलं,

“चहा घेशील का रे, ठेवू का.?”

अंकित ने आवंढा गिळत उत्तर दिलं,

“हो घेईल ना, ट्रेन मधला.”

“असं म्हणजे मी ट्रेन मध्ये मिळतो तसा करते का? मग झाला कि ओरडते, चाय लेलो चाय.... ये मग.”

“हो पण मला आवडतो ना, तू काहीही दिलं तरी, काय बाबा बायकोने काहीही दिलं तरी अमृत म्हणून घ्यायचं, तेव्हांच घरात शांती असते... आपण शांती प्रिय माणूस... तू ओरड चाय लेलो चाय ..आवडेल मला.”

अंकित हसत बाहेर मांडवा कडे निघाला आणि म्हणाला,

“बायको, चहा टाक... तलप आली तुझ्या त्या ट्रेन वाल्या चाह्ची...आणि ओरड नक्की!”

“अंकित !”

“अनु ! चाय लेलो चाय ....गरमा गरम चाय ....” अंकित अनुला चिडवत निघून गेला.

सानू हसली, “भांडता कशला? अनु चहा ठेव मस्त कडक, मग मेहंदी काढून दे मला, तोवर मी राणीशी बोलून घेते. आणि मेहंदी डिझाईन पण बघून घेते. तुला चालेल ना, म्हणजे तुझ्या नवऱ्याला तुझ्या हातचा चहा हवाय ना... मी टाकला असता, पण ...”

“ताई काहीही हा, मी टाकते, तुम्ही डिझाईन शोधा, आणि त्या पार्लर वालीला कॉल करा. मी जरा आपली वरिष्ठ मंडळी मागच्या अंगणात काय करत आहेत ते बघून येते आणि विचारून पण घेते की चहा घेणार काय ते.”

अनु घरात कार्याच्या निमित्याने घुळायला लागली होती. आणि घरात नांदता नांदता तिने घरतल्या प्रत्येकाच्या मनात नांदायला सुरुवात केली होती.... 

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com 

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्टस्टे सेफ...

Post a Comment

0 Comments