जोडीदार तू माझा ... भाग ७४

 जोडीदार तू माझा ...

भाग ७४



मैत्री, आयुष्याच्या कुठल्याही वळणावर कधीही, साथ न सोडणारी असते, आणि स्त्री पुरुषांची मैत्री तर दुर्मिळ असते. अशेच दोन बालपणाचे मित्र मैत्रीच्या रंगांत रंगून अजूनच मैत्रीचे नवीन रंग रंगवत निवांत बसले होते. सदा बडबड करून छळणारा आज गुमान वादळाला बघत शांत होता.

आणि मग अचानक आपणच बोलतोय हे सानूच्या लक्षात आलं...  आणि तिने त्याला प्रश्न केला

“कैलास तू सांग कधी लग्न करतोय तू? अरे कुणाशी करतोय ते तर सांग.”

“माझं काय ग, तू तर आता मोठ्या माणसाची बायको होणारं... आणि मला तर नाहीच बोललीस कधीची. मग काय करतोय लग्न आई म्हणेल त्या मुलीशी.”

हळूच हसत त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोटो सानूला फोन मध्ये दाखवला.

“अरे ही गौरी! हे... हे कधी झालं?” सानू पार बसलेली उठलीच आनंदाने.

“तू बसं आधी ती साडी बघ, सांभाळ, पाय ठेवशील आणि पडशील बघ...”

कैलासने उठून सानूच्या साडीचा पदर सांभाळला. आणि तिला बसवत म्हणाला,

“अग गौरी मला पसंत करत होती, आणि हे तिने आईला सांगितलं. मग काय आता आईला तिचं हवी आहे घरात.”

“भारी आहे ही, मजा रे तुझी, मला कधी बोलली नाही ही.... “

“तिला वाटत होतं की तुझं माझ्यावर प्रेम आहे... आणि माझंही...”

“आणि मी हर्ट होईल... हो ना..”

“असंच काही असेल.”

“ओ ओ ... मग... सांग तिला आहेच म्हणावं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण मित्र म्हणून. प्रेमाच नातं काय एकच असतं! सगळीच नाती प्रेमाची असतात. काय रे...? मस्त रे कैलासाची गौरी... मस्त मस्त... ही तर अजरामर जोडी आहे. जाम खुश यार !”

सानू कानातले हळुवार काढत म्हणाली.

“मग काय? तिने एक दिवस समोरून येवून मला प्रपोज केलं... आणि मी तिला सगळं सांगितलं तुझ्या बद्दल... आणि मग तिने आईला जावून सगळं सांगितलं... आणि अशी माझी गौरी मला भेटली. शेवटी मला माझा जोडीदार मिळाला आणि तोही माझ्या आईला सामावून घेणारा. जमते त्यांची.”

“कैलास जाम खुष तुझ्यासाठी... आता मला काहीच काळजी नाही. तुझ्या माझ्या नात्याचीही. गौरी मला आणि तुला नेहमी समजून घेईल. वाटलं होतं तुझ्या लग्नानंतर गमवेल मी तुला पण आता गौरीच तुझी जोडीदार म्हटलं तर ....”

सानू कैलासला तिच्या कुड्यांचा डब्बा घेण्याचा इशारा करत म्हणाली.

कैलासने त्याच्या जवळ पडलेला डब्बा घेतला नंतर त्याने तिच्या कानातल्या कुड्या त्यात ठेवून दिल्या, आणि डब्बा सानुला दिला.

“कुड्या मस्त आहेत ग, कुठून घेतल्या?”

“मामिसाहेबानी दिल्यात, पेशवाई डिझाईन आहे, तुला आवडल्या का? मी बघेन गौरीसाठी, विचारते त्यांना कुठून घेतल्या ते.”

कैलास, “बघ ग मला जाम आवडल्या, गौरीसाठी बघशील. मग उद्या भेटायचं का आपण चारही जणांनी, लग्नाआधी जरा गप्पा करूया म्हणजे सगळी नाती स्वच्छ राहतील, काय म्हणतेस... तू मी आणि आपले जन्माचे जोडीदार भेटूया आणि घालवूया जरा वेळ. मी उद्या सुट्टी घेतो दुपारपासून. आणि आपला नेहमीचा टेबल बुक करतो जेवणासाठी.”

हो, मी तर भेटणार आहे सुमंतला, त्याच्या सोबतच आहे मी उद्या मग तो निघणार आहे ना बुधवारी. मग आपण संध्याकाळी भेटूया.”

“चल तर मग, मी निघतो, मला कॉल कर. खूप वेळ झालाय, आई वाट बघत असेल. गौरीचा मेसेज येवून गेलाय दोन दा.

कैलास घरातल्या सर्वाना भेटून त्याच्या घरी परतला. कैलास आणि सानूची मैत्री घरात सर्वाना माहित होती, ती घरात कुणाशी मनातलं बोलणार नाही पण कैलासला सारच माहित असायचं.

घरात आणि नात्यात सर्वांना गैरसमज होतच कि ते दोघ लग्न करणार पण तसं होणार नव्हतं. सानूसाठी कैलास तिचा मित्र होता. कैलासने काही काळासाठी सानूशी लग्नाचा प्रयत्न केला होता पण त्याला कळून चुकलं होतं कि त्याच आणि सानूच नातं तर मैत्रीचेच उत्तम आहे.

दोन घनिष्ट मित्रांचे जोडीदार त्यांच्या आयुष्यात आले होते. सानूमय सुमंत झाला होता आणि कैलासला त्याची गौरी भेटली होती. जोड्या एकरूप होवून फुलत होत्या. आयुष्याच्या समांतर प्रवासासाठी सज्ज झाल्या होत्या.

--

सकाळची वेळ होती घरची सारी मंडळी आरामात गप्पा करत हॉलमध्ये बसली होती. सानू खोलीतून निघाली आणि बाबांजवळ येवून बसली, तिचा तो स्वतःसाठी खुललेला प्रसन्न चेहरा जणू साऱ्यांना प्रसन्न करत होता.

“काय बाबा, तुम्ही राहाल काय हो माझ्या शिवाय?” म्हणत सानूने बाबांना आलिंगन दिलं.

“नाही ग, पण तो विरह पण आनंद देईल मला, काळजी करू नकोस. तुझा बाबा येणारं बघ तुझ्या सोबत राहायला... तिकडे अमेरिकेत, नेशील ना मला?”

 बोलतांना बाबांचे डोळे पाणावले होते. सानूच्या डोक्यावर हात ठेवत बाबा तिला लाडाने म्हणाले.

“सानूही जरा भावूक झाली, अगदीच आपण लहान झालोय असं तिला वाटायला लागलं होतं,

“बाबा नक्की हा, माझ्या सोबत राहायचं. मी नाही काही माझ्या बाबांना सोडणार, काय हो बाबा.”

“अग बाई, म्हणजे म्हतारपणात, माझा जोडीदार माझी साथ सोडणार तर...”आई जरा चिडवत म्हणाली.

बाबा परत सानूला कुरवाळत म्हणाले,

 “जळण्याचा वास आला ना सानू?”

आणि मग परत आईला म्हणाले, “तुझी साथ तर ह्या जन्मात काय पुढच्या सात जन्मात काही मी सोडणार नाही. अरे माझी बुकिंग आहे तशी... पण काय पोरीच्या घरी जावू नाही म्हणतेस.” आणि त्यांनी सानूला हाय फाय दिला.

“नाही, तुम्ही जा हो खुशाल, मग मी काय इथे घर बघत बसणार काय? हा बाळूही जाणार म्हणे तिकडे अमृतसरला. आता ट्रेनिंग आहे म्हणतोय आणि मग पोस्टिंग. मग काय करू मी इथे?”

अंकित आईच्या जवळ येवून बसला,

“अग आई तू माझ्या सोबत चल तिकडे, जावूदे बाबांना अमेरिकेत. त्यांच्या लाडाच्या लेकीजवळ. बघू आपण किती दिवस राहतील तुला सोडून...”

नाही नाही... म्हणत होती तर आईचा मोबाईल वाजला, अनुने तो तिला आणून दिला, समोरून आराध्या मावशी होती, ती पहाटेच विमान तळासाठी घरून निघाली होती,

”ओ माय गॉड, ताई फ्लाईट अगदी वेळवर पोहचली बँगलोरला, आता घरी गेली की जरा बिझी होईल मग बोलायला वेळ मिळणार नाही म्हणून फोन केला.”

“हो का? काळजी घे, तुझ्या सासरच्या सर्व मंडळींना नमस्कार सांग. आणि तिथूनच निघणार आहेस का अमेरिकेसाठी?”

“ताई नाही ग, मुंबई वरूनच आहे फ्लाईट, भेटते मी जाण्याआधी, खूप बऱ वाटलं ग, सगळ्या मुलांना अंगाखांद्यावर खेळवलं आणि आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे त्यांचे जोडीदार  बघितले. आता तुम्ही दोघं जोडीदार आयुष्याचा पुढचा प्रवास मजेत घालवा, जपा एकमेकांना, मुलाचं काही टेन्शन घेवू नकोस, सगळं आपलं आपलं नीट करतात, त्यांच्या मागे आयुष्याची एवढी वर्ष काढली. आत कसं मोहिते निवास एक खंबीर वटवृक्ष झालंय, ते जप, ज्या पाखरांना उडायचंच होतं ती उडणारच ना! शेवटी घरंट दोघांचच असतं. पिलं काय! पंख फुटली आणि आता जोडीदारांसोबत आपली घरटी बांधतील, करू दे त्यांना.”

“हो ग, आपण बांधलेल्या घरट्यात नाहीना कैद करू शकत... आणि काय ग तू नेहमी मला लहान असून समजावतेस. खूप कौतुक आहे मला तुझं.”

“ताई, तुझ्या कडून शिकले मी आणि माझा माझीही मोठी मुलगी आसावरी पुढल्या वर्षी सोळाची होतं आहे... ती तर वाऱ्याचे पंख घेवून सदा उडायला उभी असते. असो, बाळू जातोय का ग नवीन प्रोजेक्टवर.”

“हो बोलत तर तसाच आहे.”

“बऱ, जावूदे, आपण कशाला त्याच्या प्रगतीच्या आड उभं राहायचं. शेवटी तुझे संस्कार आहेत त्याच्यावर, तुम्हाला परकं करणार नाही तो आणि त्याची बायको, सालस आहे ग ती, जीव लावं तिच्यावर. मग बघ तुझ्या मुली येणारं नाहीत पण ती आधी धावत येईल...”

“हुहहम” आई जरा गंभीर झाली.

“बघ ना, माझ्या सासूने मला जीव लावला नसता तर मी इथे आले असते का? दूर राहूनही तिने कधीच मला अंतर दिलं नाही. आता बघ घरी गेल्या गेल्या तिचं काय करू आणि काय नाही सुरू होईल. मी आणि अस्मित लाख म्हणू पण आई माझे आणि अस्मितचे लाड आताही पुरवते,  तुला आता सांगते, आम्ही माझ्या सासूला घेवून जातोय तिकडे कायमच. आता त्यांना इकडे एकटं नाही ठेवायच आहे आम्हाला.”

“अरे व्हा, खूप छान, तश्याही त्या इकडे एकट्याच होत्या ना?“

“हो ग, नणंद पण लग्न होवून तिच्या घरी आनंदी आहे आणि बाबा तर जावून दहा वर्ष होतील आता. मग आईला कशाला ठेवू इकडे. मीच म्हणाले त्यांना, तुम्ही येत असाल तर मी भारतात येत, नाही तर  नाही म्हणून, तर कुठे तयार झाल्या.”

“बऱ वाटलं ग ऐकून, सोनं केलंस नात्याचं, तुला आणि अस्मित कुमारांना बघितलं ना की प्रेमाला १०० पैकी १०० मार्क्स द्यावेसे वाटतात.  निघताना ये बऱ तुझ्या सासूबाईला घेवून.”

“नक्की, बघ बोलता बोलता घर आलं, आई दिसल्या, सावकाश बोलून झालं कि तुझ्याशी बोलायला सांगते त्यांना.”

“बऱ काळजी घे.”

आईच बोलून झालं होतं आणि खूप काही शिकवून गेला होता तो कॉल तिला, आराध्या सहज बोलली पण आई मात्र त्या बोलण्याने अगदीच सहज झाली होती. पिलं मोठी हे तिने स्वीकारलं होतं. आराध्या साऱ्याच बाबतीत त्यांच्या घरात वेगळी होती तरी तिच्या सासूने मुलाची निवड म्हणून अगदीच तिला मनात जागा दिली होती आणि आज आराध्या सासूला स्वतः सोबत घेवून जायला आली होती. तिच्या सासूच्या तिला सहज स्वीकारल्या मुळे आराध्या आणि अस्मितने भराभर प्रगती केली, आज त्यांची करोडोची प्रोपार्टी होती, नात्यात आरध्याचा दबदबा होता, घरात तिला मान होता. आणि सगळं तिला सासुमुळे मिळालं होतं. खरच सासूने मायची साथ दिली आणि अराध्याने ती सहज निभवली मग नाती बहरत गेली. आणि आज तिच्या सासूला तिची जास्त गरज होती, थकल्या होत्या त्या. मग आराध्या मागे कशी वळणार होती.

गप्पा रमल्या होत्याच तर समोर परत मर्सेडिज थांबली, आवाज येताच बाळू ओरडला,

“आयला, आला वाटतं आमच्या सानूदीचा राजकुमार... हे काही आता शांत बसणार नाहीत. ह्यांना वेड लागलं....”

हे एकताच अनुने फोनची रिंगटोन लावली, आणि ती गुणगुणायला लागली, तशी बाळनेही तिला साथ दिली..

रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा

कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे

का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे

मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे प्रेमाचे….

कथा क्रमशः

लवकरच पहिलं पर्व संपून नवीन प्रवास सुरू होणार आहे, कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा .... तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
लिंक- https://chat.whatsapp.com/IUtIE0RJdnE94Jna0UTviJ


© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो आभार गुगल

Post a Comment

0 Comments