जोडीदार तू माझा.. भाग ७५

 


भाग ७५

अनु आणि अंकित काही सानूला असंच सोडणार नव्हते... तरीही सानूने बाळूला रागवत गप्प करण्याचा प्रयत्न केला,

“बाळू गप्प बैस, येणारच होता तो.” सानू त्याला ओरडत म्हणाली.

आणि मग ती बाबांना म्हणाली, “बाबा मी आज बाहेर जाते आहे सुमंत सोबत, नवीन बंगल्याच डील आहे आज. आणि रात्री कैलास आणि गौरी सोबत डिनर आहे.”

“ही आपली गौरीच कैलासची होणारी बायको आहे ना, त्याची आई सांगत होती काल.” बाबा सानूला विचारत म्हणाले, आणि ते तसेच सुमंत रावांना घ्यायला बाहेर गेले,

“अरे या, आज सकाळीच येणं केलं आपण.”

“बाबा कशे आहात? सगळं ठीक ना, मुद्दाम लवकर आलोय, बोलायचं होतं तुम्हा सर्वांशी.”

सुमंत ने येताच बाबांना आणि आईला वाकून नमस्कार केला.

“अरे, या हो, आपलंच घर समजा.”

“आपलं म्हणजे, माझ्या बायकोच घर माझचं की...” आणि सगळे हसले.

“म्हणजे आता इकडे येणं झालं कि मॅडम जिथे मी तिथेच असणारं ना... म्हणजे तुम्हाला अडचण नसेल तर.”

“अहो अडचण कसली त्यात. केव्हाही.”

बाळू परत सानूच्या कानात बडबडला,

“काही इरादा बरा वाटत नाही मला ह्या सुमंतरावांचा, मला वाटतं मी तिसऱ्या माळ्याच काम सुरु करायला पाहिजे.”

सानूही बोलली, “असं मारेन ना, आता तू जाणार आहे ना? मग कशाला हवा रे तिसरा मजला... चल निघ... आम्ही इथेच अॅडजस्ट करू.”

“ये तायडे, भारी मजा येईल आपण राणीलाही सांगू राजन रावांना घेवून इकडेच शिफ्ट व्हायला...

कसं! हम साथ साथ है! “

“तू गेलास आता. ये अनु सांभाळ हा तुझ्या नवऱ्याला मारं खाणार हा...”

सानू त्याला हळूच ओरडत म्हणाली. आणि ती चेहऱ्यावर भावही ठेवत सुमंतशी हसत होती, म्हणाली, “मी तयार होते, तू बसं...गप्पा कर बाबांशी.”

खोलीत जाताना ती अनुला म्हणाली,

“अनु पोहा परत करशील...”

“अग ताई, हे काय बोलणं झालं, बोला अजून काही बनवू, आता मला खूप काही येत नाही पण आपके लिये कूछभी.!”

“आणि अजून ऐक कर, ह्या तुझ्या नवऱ्याला लगाम घाल... “

“लगाम... तो कुठे मिळतो... अमेरिकेत मिळाला की पाठवा... तोवर...”

“आयला, तुम्ही दोघही ना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहात... “आणि ती हात जोडून खोलीत गेली.

सुमंत आई बाबांसोबत बसला होता, घराकडे बघत म्हणाला,

“भीमा काका आणि काकी दिसत नाहीत.”

“अहो ते त्यांच्या घराकडे गेलेत सकाळी, येतील एक दोन दिवसात... त्यांना कुठे करमत नाही त्याच्या घरी...”

बाबा परत भावूक झाले, “माझा जीवा भावाचा दोस्त आहे तो. मुलगा आहे त्याला, तिकडे रशियात असतो... नाही तसं नाही, सुनबाई अगदीच गुणी आहे. पण ह्यांना तिकडे करमत नाही.”

“हो ना आपल्या लोकांचा हाच प्रोब्लेम आहे, आता मासाहेब नाही म्हणत आहेत ना तिकडे लागलीच निघण्यासाठी, थांबतो म्हणत आहेत इकडे लग्नापर्यंत.”

आता बाबांना जरा घाम फुटला, “हो का,” ते हळूच म्हणाले.

सुमंतला बाबा समजले होते, “मी बोललो त्यांना, की लग्नाचा मोठा सोहळा तर तिकडे शिकागो मध्ये करायचा आहे. इकडे तर नात्यातल्या लोकांसाठी पार्टी देवू, आणि आम्ही लग्न रजिस्टर करतोय. तुम्ही टेन्शन घेवू नका. आणि तिकडे शिकागोला तुम्हा सर्वाना यायचं आहे.”

“नाही नाही... आम्ही तिकडे काय करणार. इथूनच तृप्त झालोय आम्ही. तुम्ही दोघं एकमेकांना साथ द्या अजून काय हवंय...”

बोलता बोलता बाबांचा चेहरा आता खुलला होता. बाळूने अलगद बाबांच्या हातात हात दिला.

“काय मग आज फुल दिवस ताई सोबत?” अंकित परत चिडवत म्हणाला.

“हो रे.”

“बाबा नेऊ ना तुमच्या लाडाच्या लेकीला, परवानगी मागतोय...” सुमंत बाबांना म्हणाला.

“अहो हे काय! “

“सानू बाळा तयार झालीस का? जावई वाट बघत आहेत.” बाबांनी सानूला आवाज दिला.

तेवढ्यात अनया पोहा घेवून आली. सुमंतने तो स्मित हास्य देत घेतला. तो हळुवार घास घेत सानू बाहेर निघण्याची वाट बघत होता. तिची वाट बघणं त्याला कठीण होतं होत. शांतता तोडण्यासाठी तो म्हणाला,

“मी बुधवारी पहाटे निघतोय, मग आज नवीन बंगल्याची डील करतोय, माझ्या आणि सानूच्या नावावर करतोय नवीन प्रोपटी, नंतर सानू आणि आई घरातलं इन्टेरीअर बघून घेतील. आम्ही ऑफिस मधेही जावू आज, काही असाइनमेंट आहेत. मिटिंग पण आहेत. स्टाफला काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत, नंतर हा इथला प्रोजेक्ट सानू पूर्णपणे लीड करेल...”

तो बोलतच होता तर ओढणीला मागे फेकत सानू तिच्या खोलीतून बाहेर आली, तसा सुमंत जागेवरून उभाच झाला, तिची नजर पडताच तो भानावरही आला आणि परत बसत त्याने बोलणं परत पुन्हा सुरु केलं.

“मी बुधवारी निघतोय, पहाटे, आज प्रोपटी नावावर करतोय, सानुच्या... माझ्या... दोघांच्या ...हा इथला प्रोजेक्ट मी लीड करणार आहे... सानू बघेल...”

बाळू आता जोरात हसला, “जीजू पोहे संपले, अनु प्लेट घे ग, आणि ह्यांना पाणी आण लवकर... मिरची लागली त्यांना.”

सानू दात दाबून आणि खालच्या नजरेने बाळूला गप्प करत होती. पण बाळू काही केल्या थांबत नव्हता.

सुमंतने सानूला बघण्याच्या नादात मिरची खाल्ली होती आणि त्याला तिखट लागलं होतं.

पाणी पिताच म्हणाला, “आता तिकडे असं अस्सल तिखट खाण्याची सवय नाही ना, हिरवी मिरची मस्त होती... पण तिखट लागलं...”

“जीजू हिरवी मिरची समोरून आली म्हणून तिखट लागलं कि... अहो जीजू... तुम्हाला आता सवय करावी लागेल... ताई काही हिरव्या मिरची पेक्षा कमी तिखट नाही.”

सानूने परत अंकितला तिखट नजरेने बघितलं, तो तिच्या जवळ आला,

“काय तायडे, हे काय घातलस ग! शी चांगला वन पीस घालायचा होता... एवढे तर पडले आहेत तुझ्याकडे... त्याच काय लोणचं घालायचं आहे!”

सानू हळूच म्हणाली,

“हा नवीन आहे ना रे, आणि मला नवीन आणि नवीन फेशनचा आहे म्हणून घालायचा होता. तुला बघते मी नंतर...”

सानू सुमंतला म्हणाली, “सुमंत निघायचं का? ह्या बाळूच्या नादाला लागू नकोस... हा आणि ही अनु. आपण दोघ ह्यांना झेलू शकत नाही... अंतर्यामी आहेत ते... जोडीला जोड, ह्यांचा नाद काही परवडणार नाही आपल्याला, आपण निघूया.”

“बाबा निघतो आम्ही, वेळ झाला तर कॉल करते.”

सुमंत स्मित हसत बाहेर आला, तोही मनात हसता हसता हसला,

“ये, काय ग, काय बडबडत होता मी... काय वाटलं असेल बाबांना आणि आईला...”

“तू वेडा आहेस हेच... कळालं त्यांना आता... विचार करू नको माझी सेटिंग आहे बाबांसोबत.”

घरात सर्व गोष्टी सुरळीत होत्या, सानूच लग्न तीन महिन्यांनंतर होणार होतं, दरम्यान अंकित अमृतसरला जाणार होता आणि नंतर कदाचित अनुला घेवून...

तोही त्याच्या खोलीत अनुला घेवून आला आणि हसायला लागला... बोलता बोलता स्वप्नात शिरले दोघं... दोघांच नवीन विश्व सुरू होणार होतं... मांडणी सुरु झाली होती, दोघांच्या संसाराची.

अनु आणि अंकित त्यांच्या खोलीत पलंगावर पडून छतावर फिरणार्‍या पंख्यांकडे बघत जरा शांत झाले होते. अनु अलगद म्हणाली.

“आपलीही कसोटीच आहे अंकित, नाती सांभाळायची आहेत, सुटलेलं नेहमी‍साठी नको ना सुटायला.”

“हो ग, करू करू तेही प्रयत्न करू आपण, कळतंय मला... जावूया अजून तुझ्या माहेरी, ते लाख नको म्हणतील पण आपण प्रयत्न सोडायचे नाही.”

अनु त्याला बिलगली, “अंकित, दोन्ही ताई भरगच्च घरात पडल्या ना आपल्या.?”

“हो ग, आपण कुठे कमी पडायला नको. आपणही आपली सुरुवात समजूया. दोघेही मेहनत करू. तुला सांगतो, आराध्या मावशी आणि अस्मित काका ह्याच्याकडे कुठे काय होतं ग, पण आज बघ, काय दरारा आहे त्यांचा. शून्यातून विश्व निर्माण केलंय दोघांनी मिळून. आज काका शेअर मार्केट वगैरे बघतात... खूप शिकण्या सारखं आहे त्यांच्या कडून. म्हणून आई बाबा तिला आणि अस्मित काकांना खूप मानतात.”

“हो रे, जाणवलं मला, बोलण्यात जाणवतं ते, आकाशात भरारी मारूनही पाय जमिनीवर आहेत त्यांचे. त्या नौकरी करतात काय रे?”

“करायची मावशी, आयटी कंपनीत होती, आता तिची मुलगी दहावीत आहे यंदा आणि अस्मित काकांचा पसारा खूप वाढला आहे, मग तिने नौकरी सोडली आणि घरून काही तास ऑनलाइन बिजनेस करते, घरूनच फ्रीलायंस, मोठं मोठ्या कंपनीसाठी काम करते. आराध्या मावशीने जे केलंय ना ते कदाचित आपली अंजू आत्या नाही करू शकली, पण असही नाही म्हणू शकतं, टाळी दोन्ही कडून वाजायला हवी. नाहीतर अंजू आत्या चांगल्या घरात गेली होती. राज्याचा रंक झाला अमित काका. तो शून्यावर कधी आला हे कळलंही नाही आणि अस्मित काकाच्या बेंकेत शून्य वाढत गेले. जोडीदाराची साथ खूप महत्वाची असते ग.

आपल्या तसं व्हयाच आहे.... देशील ना साथ.? कदाचित म्हणूनच तुझ्या बाबांना मी पसंत नव्हतो, माझ्याकडे काय आहे ग स्वतः च अजून पण तुझा विश्वास माझ्यावर असाच ठेव मग बघ आपणही भरारी घेऊ.”

आणि अनुने अंकितच्या हातात हात देतं, गच्च मिठी मारली. त्यांचाही संसार सुरू झाला होता.

कथा नवीन पर्वात लवकरच.... तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा ....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो आभार गुगल

Post a Comment

0 Comments