जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग १०

 

जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग १०पाठवणी झाली होती, पाठवलं होतं मुलीला, तिच्या आठवणींना नाही, आई घरात शिरल्या-शिरल्या सहज बोलून गेली,

“सानू, आहेस कुठे ग? जाम थकले मी.”

बाबा आणि भीमा बघत राहिले, बाबा आईजवळ आले,

“राणीसरकार, मला म्हणता, आपण अडकला होता तिच्यात जास्त, हुमम.... आणि तुझी काय ग चूक माझी लाडो आहेच तशी.”

“अहो, विसरले होतेच हो, सानू तिच्या राज्यासोबत निघाली आहे, तिचा नवीन प्रवास सुरू झाला आहे तिच्या जोडीदारा सोबत... “

आईने डोळे पुसले, आणि घरातला पसारा उचलायला लागली,

इकडे, सानू आणि सुमंत मासाहेब बंगल्यावर पोहचले होते. स्वागत सोहळा थाटात होता. पेशवाई सनई आणि चौघडा वाजत, फुलांच्या वर्षावात सानूच भरगच्च स्वागत झालं. तसा तिला तो बंगला नवीन नव्हता. त्या वास्तुचा कोपरा नि कोपरा तिने सजवला होता पण आज ती त्यात नववधू ह्या नात्याने शिरत होती. आज तिच्या नात्यात जवाबदारी शिरली होती.

हळूहळू पाहुणे ओसरू लागले. सर्वांची सोय हॉटेल मध्ये केलेली होती. आता बंगल्यावर मोजके लोक होते.

रात्री साधारण नव वाजता, सुमंतच्या बहिणीचा अमेरिकेवरून व्हीडीओ कॉल आला. सारेच तिकडले त्या कॉलमध्ये होते. बहिण सारंगी आणि तिचा नवरा स्टेवीन, मुलगी जसिका. लहान भावू सुशील त्याची बायको प्रज्ञा, त्यांचे मुलं सुमित आणि शशांक. सारे ऑनलाईन होते.

सर्वांनी अभिनंदन केलं. सानूही आवक होती सांर बघून. एवढा मोठा परिवार होता सुमंतचा तरीही त्याची आई एकटी पडली होती. तिने सर्वांबद्दल ऐकलं होतच पण आजपर्यंत कुणीही तिच्याशी बोललं नव्हतं. सरांगीशी बोलतांना तिला जाणवलं कि ती सानूला गावठी समजत आहे म्हणून. ती उगाच तिच्या नवऱ्याशी सुपर इंग्रजीत बोलत होती. तिच्या मुलीने तर म्हटलंही,

“मॉम, सानू आँटी इज नॉट सो फेअर, लाईक अवर मामा, राइट.”

सुमंत ने सानूच्या अलगद हात धरला, सानू स्मित हसली,

“उ... सो नाईस जसिका, यु लूक सो स्वीट. तुला काय हवंय ग इथून. मी घेवून येईल, मराठी कळतं ना बाळा?”  

“नो आँटी, मला काहींही नको. तुम्ही उशिराच या. माझी परीक्षा सुरु आहे. मामा तुम्ही येताय ना दोन दिवसात.”

“सुमंत, जसिका, मी आणि मामी दोघेही येत आहोत. सोबत आजीही येत आहे.”

“सुशील, माझी खोली मी मॅनेजरला सांगितली आहे तयार करायल. उद्या माझं आणि सानूच काही सामान येणार आहे तिकडे. खोलीत ठेवायला सांग. माझी महत्त्वाची मिटिंग आहे दिल्लीला परवा. आम्ही सर्व इथून पाच दिवसात निघणार, माझी शुक्रवारी मिटिंग आहे तिथे. सानवी इथला प्रोजेक्ट तिथून सांभाळणार आहे. तुला वेळ असेल तर एक चक्कर ऑफिस मध्ये टाक, काही कागदपत्र आली असतील तर माझ्या डेस्कवर आणून ठेव.

सानूने हळूच इशार्‍याने शांत केलं. तसं तिला त्याचं अस बोलणं पटलं नव्हतं पण चालायचं, शेवटी तिचा मान त्याला जपायचा होता आणि तोच इथे तिचा होता. तशी सानूला कुणाच्या मदतीची गरज नव्हती. तिचा मान तिला स्वतः मिळवायचा होता. इकडे भारतातली आणि जरा मध्यम घरातली, साधारण नौकरी करणारी एवढीच ओळख तिच्या अमेरिकेतल्या कुटुंबाला माहीत होती. सुमंत तिच्या सोबत लग्नाला तयार झाला हेच काहीसं धक्कादायक होतं त्यांच्या सर्वांसाठी. त्याने लग्नाचा निर्णय सोडून दिला होता तेव्हां सर्वाना आनंदच झाला होता पण बोलत कुणी नव्हतं. मनात फक्त दु:ख होतं ते मासाहेबांच्या आणि जेव्हा सुमंतने सानूच्या नुसत्या फोटोला बघताच होकार दिला तेव्हां मासाहेबांनी सानूला  सून म्हणून आणण्याचा विचार पक्का केला. आणि मग जे घडत गेलं ते तर आपण जाणून आहात.

सानू मासाहेब, मामासाहेब आणि इकडे भारतातल्या परिवाराला ओळखून होती पण सुमंतचा खरा परिवार तिकडे शिकागो मध्ये होता. मासाहेबांच्या ती खूप जवळ झाली होती काही महिन्यात, त्यांची खूप आशा होती तिच्यावर. कदाचित त्यांच्या कुटुंबाची काळजी त्यांना होती. मुलगी सारंगी आणि मुलगा सुशील त्यांच्या आयुष्यात काहीच करत नसत शिवाय मौज मस्ती. सर्व कुटुंबाच करायचा तो सुमंत. कंपनीमध्ये शेअर सर्वांचे होते पण काम करत असायचा तो सुमंत. तिकडे सारंगी सांर घर सांभाळायची, तिचा नवरा स्टेविन स्वतःच घर सोडून इकडे सुमंतकडे राहायला होता. सुशील फार फार तर कंपनीत महिन्यातून एकदा जात असे. त्याचे बिल सबमिट करण्यासाठी. आणि त्याची बायको प्रज्ञा सतत पार्ट्या करत बिझी असायची. कुणाला सुमंत आणि त्याच्या बायकोच काहीही पडलं नव्हतं. पण सानू एक वळवणार वादळ आहे हे अजून साऱ्यांना कळायचं होतं.

कॉल संपला आणि मासाहेबांच्या डोळ्यात अश्रुनी गर्दी केली, हळव्या झाल्या होत्या त्या, सानू त्याच्या जवळ गेली, म्हणाल्या,

“सानवी, हे असं आहे बघ, मोठ्यांच खोटं कुटुंब, कुणाला कुणाचं पडलं नाही. नाती आहेत पण शेअर्सवर उभी आहेत. मला दु:ख हे नाही कि ते सगळे सुमंतच्या जीवावर उभे आहेत पण खंत ही वाटते कि तेही का सक्रीय नाहीत. आता तू बघणारच सारं, तुझ्या पासून काय ग लपवू, सांभाळ माझ्या सुमंतला आणि ह्या वैभवाला.“

सानूने त्यांना सारं काही नीट होईल ह्याची शाश्वती दिली आणि त्यांच्या खोलीत सोडलं.

भल्या मोठ्या बंगल्यात आता फक्त सुमंत आणि सानूच होते. श्रीमंतांचा श्रीमंत सोहळा, घरात लग्न कार्य असूनही सारे पाहुणे हॉटेलमध्ये राहायला निघून गेले होते. एवढा मोठा सजेलला बंगला,आणि घरात वावरत होती ती मोजकी माणसं आणि नोकर चाकर. लग्न असूनही घर मात्र मोकळं वाटत होतं. सानू जरा मोहिते निवासाची आठवण झाली, ह्या वेळी घर कसं दणादण पाहुण्यांनी भरून असेल, आणि गप्पा सुरू असतील ह्याची तिला आठवण झाली, आज कुणी काय घातलं, कुठेल दागिने घातले, काय बोललं ह्याचं पूर्ण पोस्टमार्टन घरी पाहुण्यांमध्ये  होत असणार ह्याचा तिने मनातच अंदाज घेतला. तोच सुमंतने तिचा हात पकडला,

“सानू, झाली तुला तिकडंली आठवण... आजच आलीस ग!”

“हो रे, सारं कसं मिस करत आहे मी, आज घरी ना झोपायला जागा नसणार, सगळे खाली हॉलमध्ये पडतील बघ...”

“आणि इथे कुणीही नाही, हो ना?”

“हुमम, पण इथे तू आहेस माझा...”

“मग झालं तर.. हे चित्र बदलणार लवकर, काय!”

“नक्कीच, आता ह्या चतुर राणीने साध्या सुध्या राजाच्या राज्यात एंट्री घेतली आहे ना..”

सुमंत हसला आणि स्वतः सानूला त्याच्या खोलीत घेवून गेला. सगळं  कसं  शांत आणि निर्मळ होतं. सिनेमासारखी सेज सजलेली नव्हती कि दुधाचा ग्लास घेवून सानू उभी नव्हती. नवल काय ती खोलीही सानूने तिच्या मर्जीने लावलेली होती. बसं आज ती त्यात हक्काने शिरली होती.

खोलीत शिरातच ती स्मित हसली, सुमंतला जावून बिलगली, खोलीचे दिवे मंद झाले होते आणि प्रेम प्रकाशात न्हावत होतं.

इकडे मोहिते निवासात सारच कस शांत होतं. बाबांना अस्वस्थ वाटत होतं. आरतीची काळजी वाढली होती.

रात्री सारं आवरून घरची सारी मंडळी हॉलमध्ये बसून रात्रीचा चहा घेत होती. बाबा हळूच बाळूला म्हाणाले,

“काय रे बाळू तू कधी पर्यंत आहेस इकडे.”

बाळूने अनुकडे बघितलं आणि म्हणाला,

“बाबा आहे मी अजून पंधरा दिवस, नंतर मी जाईल, अनु असेल इकडे महिना दोन महिने तरी. नंतर मी चांगलासा फ्लॅट किरायाने घेतो मग आपण सगळे शिफ्ट होवुया तिकडे.”

भीमा काका म्हणाले, “अरे मस्त, ये कि अरुण तिकडे दक्षिण भारत फिरून. जावून या तुम्ही. हवं तर आम्हीही येतो तुमच्यासोबत.

अरुण काहीच बोलला नाही. आरतीही गुमान गप्प होती. चहा साऱ्यांचा पिवून झाला होता. आरती अरुणला घेवून खोलीत गेलेली. बाळू आणि राजन हॉल मध्ये होते.

राजन राव बाळूला म्हणाले,

“उद्याच काय, कसं आहे अंकित? तसा मी प्लॅन करेन.”

“जिजाजी, ताई आली कि पूजा करून घेवू मग जेवणं आणि सारे मोकळे. आता ती इकडे जास्त दिवस नाहीच, गुरुवारी निघत आहेत ते. मग तीही उद्याच तिच्या बंगल्यावर परत जाणार कदाचित. म्हणजे माझं तर बोलणं झालं नाही पण तसचं असणारं.”

“भीमा काका तुम्ही पूजेच बघणार ना? मी जरा हे सगळं कॅटरिन वगैरे बघून घेईल. मला उद्या बँक मधेही जायचं आहे.”

“हो हो मी बघून घेईल. तू बघ तुझं सारं आणि तू ना उद्या डॉक्टरकडेही जावून ये. अरुणचे काही रिपोर्ट आणायचे होते.”

भीमा काका आणि सूनी काकीने हॉलमधेच गाद्या टाकल्या. सानूचे मामा मामी आणि इतर सर्वच गाप्पा करत हॉलमध्ये झोपले.

उद्याच्या तयारीत घरही सज्ज होतं. नवीन दिवस नवीन खूप काही घेवून उगवणार होता.

आपणही नवीन भागाची वाट बघूया.... लवकर सानू राणी म्हणून तिच्या राज्यात राज्य करायला निघणार आहे. राणीची धावपळ अजून सुरूच आहे. आणि अनु अंकित त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात नव्याने नवीन ठिकाणी करणार आहेत... कथेतल्या अजूनही काही जोड्या कथेची रंगत वाढवतील. अरुण आरती त्यांच्या उतरत्या वयात अजून परत नव्याने एकत्र सुरुवात करतीलच... मग भेटूया पुढील भागात...

कथेचा पुढचा भाग लवकरच.---
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
लिंक पहिल्या कॉमेंटला आहे. https://chat.whatsapp.com/IUtIE0RJdnE94Jna0UTviJ
कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा ....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो आभार गुगल/in.pinterest.

Post a Comment

0 Comments