जोडीदार.... प्रवास
तुझा माझा! –भाग १3
सानू आणि सुमंत
अमेरिकेसाठी रवाना होणार होते. तयारी जेमतेम झाली होतीच, सानूच्या लिस्टमधलं काही
समान राहिलेलं मग सुमंत आणि सानू मॉलकडे निघाले. वाटेत सिग्नलवर गाडी थांबली,
सुमंतची नजर समोरच्या अनाथ आश्रमावर पडली, सानूही त्याचं दिशेने बघत होती, दोघांची
नजर एकमेकांवर पडली, आणि सुमंतने गाडी सिग्नलवरून तिकडे वळवली. गाडी पार्क करून
दोघेही उतरले,
“सानू ह्या
आश्रमाला आपल्या कंपनीतून फंड जातो. आपली पॉलीसी आहे तशी. चल जावूया, भेटून घेतो
मी इथल्या संचालकाला, तुझाही परिचय होईल, पुढे मागे तुलाही बघावं लागेल.”
सानूने मान हलवली
आणि आश्रमाच्या बाहेर असणार्या चौकीदाराला आत जाण्यासाठी परवानगी मागीतली, लगेच
लक्षात आलं तिच्या, सोबत तर काहीच आणलेलं नव्हतं, मागे वळून सुमंतकडे बघितलं तर
समोर उभ्या असणार्या फेरीवाल्या कडून त्याने सारच खरेदी केलेलं दिसलं. ती अजून
काही बोलणार तोच समोर मेडीकल शॉपमध्ये जावून त्याने सर्व चॉकलेट घेतले. दोन्ही हात
भरून तो सानूकडे निघाला होता. सानूने मागे येवून त्याला मदत केली आणि दोघही
आश्रमात शिरले.
आश्रमातल्या
प्रत्येक मुलाला चॉकलेट, फुगा, भिंगरी हसत हसत सुमंतने दिली. निरागस मुलांच्या चेहर्यावर
दिसणारा आनंद दोघांच्या मनाला आनंद देत होता. शेवटी सुमंत कार्यालयात बसला,
सुमंतने चेक आश्रमाच्या कार्यालयात दिला. आणि आश्रमाची प्रत्येक सूचना कंपनीच्या
ईमेल वर करायला सांगितली. सानूच्या मनाला एक वेगळी मनशांती जाणवत होती, संचालकाशी मोजकं
बोलून ती व्हरांड्यात फिरत होती. मुलांच्या खोल्या, खेळण्याची जागा, अगदीच लहान
मुलांची खोली बघून तिला सगळं कसं आसुसलेलं वाटत होतं, त्या सगळ्या जागेला
प्रतीक्षा असते कुणाची तरी ही जाणीव तिला जाणवली, मन आतून भरून आलं होतं. कसा बसा आंवढा
गिळून ती पटांगणाकडे आली, पटांगणात खेळत असणार्या मुलांना बघत बसली होती. गुंग
झाली होती, तिला कळालंही नाही, तिच्या
जवळच एक मुलगा येवून बसला, साधारण दहा- बारा वर्षाचा होता, म्हणाला,
“मॅडम चॉकलेट खाऊन मजा
आली मला, आवडते मला ही, आणि ही भिंगरी तर मी खूप दिवसाने हातात घेतली, आवडली मला.
खूप धन्यवाद!”
सानू त्याच्या
बोलण्याची पद्धत बघून चकित झाली, एवढ्या मुलात तोच तिच्या जवळ आला होता, त्याला
बघत असताना तिला जाणवलं की बसताना त्याने त्याच्या कुबड्या बाकाच्या कडेला टेकल्या
होत्या. आणि सुर लगेच बदलला तिचा,
“हो तुला आवडते का
कीटकेट, मलाही आवडते ही, क्रंची असते ना...”
“हो, खूप दिवसांनी
खाल्ली ना. खूप धन्यवाद आपले.”
सानूने त्याच्या
सोबत भिंगरी फिरवली, तो हसत होता आणि आनंद सानूला होत होता. काही वेळाने तो कुबड्याच्या
मदतीने चालत निघून गेला. दूर बसून सांर समोर खेडणारया मुलाचं ओरडणं ऐकून रमत होता.
मग त्याने त्याची बासरी काढली. वाजवायला लागला, मुलही गोळा झाली आणि मग सर्व
त्याला गाण्याची फर्माईश करत होते. तो एक एक सूर धरत होता आणि मुल मस्ती करत होते.
सुमंतने सानूला निघण्याचा इशारा दिला, सानू उठली, कार्यालय संचालकला म्हणाली,
“हा मुलगा इथे कसा,
इथे हा एकटाच असा आहे.”
“मॅडम, हो, काय
करता, तो इथे असाच आलेला, चालू आहे प्रयत्न, परंतु त्याच्या इलाजासाठी आम्ही सर्वी
कडे प्रयत्न करत आहोत, त्याचा इलाज झाला तर तो चालू शकेल, म्हणून तो इथेच आहे. पण
आता आमचेही प्रयत्न संपले, कुणीही मदतीसाठी पुढे आलेले नाही अजून. मग कालच त्याला
इथून दुसरीकडे पाठवण्यासाठी बैठक झाली. त्याचाही खर्च असेलच आणि तोही मेनेजमेंटला
बघावा लागेल. असा सगळा घोळ आहे. त्याच्या बरोबर असणार्या जवळपास सर्व मुलांना
दत्तक घेतल्या गेलेलं परंतु हा बारा वर्षापासून त्याच्या आई बाबांची वाट बघतो, पण
त्याच्या नशीबात अजून ते आले नाहीत... आणि आता जरा अवघड आहे, मूल लहान असेल की
कुणीही समोर येतात, असो. आपण येत राहा. बोलला असेलच तो आपल्याशी. मुलगा बोलका आहे
हो...”
सानू काहीच बोलली
नाही. सुमंत आणि सानू निघून गेले. नंतर सानूने तिला हवं ते घेतलं पण मनात काही औरच
सुरू होतं तिच्या.
सकाळी पहाटे फ्लाईट
होती, सगळं आवरून काहीतरी घेण्यासाठी सानू खोलीत आली, गप्पच होती, सुमंतने तिला
मिठीत घेतलं,
“का ग, आश्रमातून
आल्यापासून तू गप्पच झालीस. मी त्या मुलाच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्च करायला
तयार आहे हा ईमेल मी आत्ताच केलाय.”
सानूच्या डोळ्यात
अचानक चकाकी आली, तिने सुमंतला घट्ट आलिंगन दिलं,
“पण मला ना त्याला
आपल्या घरी आणायचं आहे. चालेल काय रे.”
“हुम्म, हा मुद्दा
मात्र विचार करण्यासारखा आहे. आपण बोलू सविस्तर ह्या विचारावर..”
“ऐक ना, काय होतं
रे, आपल्याकडे एवढं आहे, आपण इलाज करू शकतो त्याचा इलाज, मला खूपच भावला तो,
बोलूया ना आपण मासाहेबांशी.”
“विषय गंभीर आहे,
जरा सावकाश हाताळावा लागेल.”
“बघ ना, आता मला
सहसा कुणाबद्दल असं वाटत नाही पण त्याला भेटून क्षणात वाटलं, त्याचं काही नातं
असावं माझ्यासोबत.”
“हुम्म्म, काय नातं
आहे.... तो कुछ... छुपा रहे हो आप... बता भी दो.”
सानूने बेडीवरची
उशी फेकून सुमंतला मारली,
“हो आहे ना, मला
त्याची आई व्हायला आवडेल रे, ही नवीन नातं तयार करायला मी तयार आहे, तू माझा नवरा
आहेस, मग तू...
“मला मग बाप व्हाव
लागेल... “
“सुमंत...”
“सानू, विषय गंभीर
आहे. पण नक्कीच बोलू आपण, तोपर्यंत तू त्या संचालकाच्या संपर्कात रहा, त्या
मुलांची माहिती घे, नाव माहीत आहे त्याचं तुला.”
“श्रीकांत म्हणाला
होता तो, आणि त्याला सर्व श्री बोलत होते...”
“घे हा मेल मी
तुलाही फॉरवर्ड केलाय, आता हे सगळं तू बघ.”
सानू गोड हसली
होती. तिला असं बघून सुमंत तिचे गाल ओढत म्हणाला,
“पण आता तू गोड
हसलीस हेच पुरे कि मला. काय राणीसरकार, आज काय इरादा मग...”
सानूने सुमंतला
लगेच दूर केलं,
“काय रे तुला त्या
तोंड उघडं करून पडलेल्या सुटकेस दिसत नाहीत काय. किती काम पडलं आहे. मला ना
मासाहेबांच्या औषधी पॅक करायच्या आहेत. डॉक्टरांना पण कॉल करायचा होता. अरे तुझा
तो लग्नाचा सुट पॅक करायचा आहे का? मी तर माझी ती मोरपंखी साडी घेतली आहे. आणि
माझा तो अनयाने डिझाईन केलेला घागरा, मी तर त्याला विसरले होते. “
सुमंतने सानूचा हात
पकडला, “सानू, राहूदे ना, इथलं इथेच, तिथे नवीन घे सर्व.”
“नाही रे पण तिकडे
पार्टी ठेवली आहेस ना तू, मग लागणार नाही का?”
“अग, मासाहेबांनी
आधीच डिझाइनरला सांगितलं असणारं, तुझं सारं काही तयार असेल बघ तिकडे.”
“मग मी काहीच
घ्यायचं नाही का, अनु म्हणाली होती, घागरा घालून फोटो पाठव म्हणून.”
“बऱ, पॅक कर, पण
आता नकोना, तू कुणालातरी सांग ना पॅक करायला, तू नकोना जावूस ग आता...”
“असं, म्हणजे
साहेबांना मी हवी आहे आता.”
“मग, एवढंच म्हणणं
आहे बाबा ह्या बिचार्या नवऱ्याच.”
“मग मी बायको आहे
तुमची, तुम्ही ना झोपा, नाहीतर उद्या उठणार नाही आणि फ्लाईट उडून जाईल. मला पेकिंग
करायची आहे.”
सुमंतने परत तिला
त्याच्याकडे ओढलं, त्याच्या श्वासच्या गर्मीत अजब गुर्मी चढली होती सानूला, तिचा
स्वतःवरचा ताबा सुटत गेला आणि रात्र रंगत पुढे गेली.
पहाटे दोनला अलाराम
वजाला आणि सुमंत उठला, सानूही उठली,
“अरे अलाराम लावला
कुणी होता? मी तर कशी झोपले माहितही नाही मला.”
सुमंत तिला परत
मिठीत घेत म्हणाला,
“राणीसरकार आमच्या
सोबत आहात तुम्ही, अजुतरी कुठलीच फ्लाईट सुटू दिली नाही आम्ही. आवरून घे, मी
गरमागरम चहा घेवून येतो तुझ्यासाठी, मग सांग कुठल्या सुटकेसच तोंड कसं बंद करायचं
ते आणि तुझं सारं समान आणून टाक पटापट. मी करतो सर्व लगेज पॅक, तू तयारी कर.”
सानूने परत घट्ट मिठी
सुमंतला मारली. माथ्यावरून ओठ सरकत ओठापर्यंत आले आणि ती मिठीतून निसटून पळाली.
सकाळी चार वाजता
मोहिते परिवार बंगल्यावर हजर झाले होते. घाई घाईत फारसं कुणाशी बोलून झालं नाही पण
मनाने सर्वांशी संवाद केला होता. आशीर्वाद घेऊन सर्व विमानतळाकडे रवाना झाले.
राणी आणि राजन
विमानतळावर परस्पर आले होते. त्यांची भेट घेऊन सानू एअर पोर्टच्या आत शिरली.
राणी आणि राजनने
तिथेच कॉफी घेतली, राणीच्या पोटात दुखायला लागलं होतं. खरं तर ह्या महिन्यात तिला
पाळी अजूनही आली नव्हती. हे राजनला माहित होतं पण अजून काही बातमी पक्की नाही हे
तो जाणून होता. तातडीने त्याने राणीला घरी आणलं, तिला शांत करत त्याने डॉक्टरची
अपॉइनमेंट घेतली. एवढ्यात त्याला काहीच घरी सांगायचे नव्हते. दरम्यान राणीने टेस्ट केलेली पण निगेटिव्ह आली.
राजनने तिला समजावलं, काही वेळात पाळीच सुरू झाली आणि राणी रडायला लागली.
कथेचा पुढचा भाग लवकरच.---
0 Comments