वर्क प्रेशर… द कॉर्पोरेट लॅडर भाग -१६
समृद्धी प्रोजेक्टमध्ये मिळेल ते काम करत होती. मनात सुहासशी तुटक झालेल्या नात्याची खंत तिला अजूनच कठोर बनवत होती. त्यात सत्यजितच तिच्या आयुष्यात असं येणं तिला अजूनच विचलित करत होतं. त्या दिवशी ती मंजिरीसाठी प्रेझेन्टेशन तयार करत होती. तसा माधव कॉरीडॉरमध्ये थबकला, त्याने समृद्धीला कामात मग्न बघितले. जरा स्मित हसला आणि परत कॅबीनकडे निघाला. हे सर्व मंजिरी कॅबीनमधून बघत होती. नेमकं काय घडलं तिला समजलं नाही पण काहीतरी घडलं हे तिने जाणलं होतं. तशी शंका तिला आली, हातातला पेन तिने मस्तकावर लावला आणि विचारत पुटपुटली, “ही समृद्धी खरच साधी आहे की साधेपणाचं सोंग घेऊन काम करते. तशी ही आजच्या पिढीची आहे, भावना हिला महत्वाच्या नसणारचं, हिला तर मोबदला हवा आहे नुसता... मी हिला अजून पोस्ट दिली नाही आहे. त्यात ही हुशार आहे. हिचे काम लवकर लक्षात येते, माधव हिची बाजू नेहमी घेते...”
ती समोर बघत विचारात होतीच तर समोरून समृद्धीने तिच्या कॅबीनचे दार नॉक केले, ती आत आली, “मंजिरी मॅडम, हे प्रेझेन्टेशन एकदा बघून घ्या. नंतर मी फाईनल करते. म्हणजे तुमच्याकडे आता वेळ आहे ना.”
मंजिरीने नुसतं स्मित हास्य दिलं आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवर ती बघू लागली, स्लाइड्स पूर्ण झाल्याच नव्हत्या तर मंजिरी म्हणाली, “समृद्धी हा आधी टेम्प्लेट बदल, नवीन अपडेट आले आहेत. ते वापर. आणि किती रंग भडक आहेत ह्या टेकस्टचे, प्रोफेशनल प्रेझेन्टेशनमध्ये असे भडक रंग नसतात ठेवायचे. प्लीज चेंज इट... मला हे बघायला सोम्य वाटत नाही. प्लीज डू इट अगेन.”
समृद्धी आधी तर दचकली, तिच्या मते तिने वापरलेली टेम्प्लेट अगदीच नवीन होती. तरीही ती काहीच बोलली नाही आणि कॅबीनमधून निघून आली. तसा तिला नवीन जॉईन झालेला सागर भेटला, ती मंजिरीकडे निघाला होता. समृद्धीत्याला आठमहिने सिनिअर होती तिकडे पण तो बिझनेस अनॅलिस्ट म्हणून जॉईन झालेला. तिला म्हणाला, “मॅडमचा आज मूड कसा आहे. मला जरा म्ह्त्वाचे बोलयाचे आहे.”
समृद्धी नुसती हसली आणि नजरेने नुसतं खुनावत निघून गेली. लॅपटॉप तिच्या टेबलवर ठेवून ती कॉफीसाठी निघाली. ती कॉफी मशीनजवळ उभी राहिली. हातात कप घेतला, आणि भिरभिरत्या नजरेने सगळीकडे बघत होती. समोर स्व्पानातल ऑफिस होतं पण त्यात ती अजूनही कुठेच नव्हती. काही महिन्यात वर्ष होणार होतं तिला घोसला कंपनी जाईन करून पण अजूनही तिला वागणूक ट्रेनीज अशीच मिळत होती. तिला असं बघून शनाया तिकडे आली, “हे, काय सुरु आहे.”
“काही नाही जरा कॉफी घेत होते.” समृद्धीच्या बोलण्यात थकवा जाणवत होता.
शनाया लगेच बोलली, “माहित आहे मला त्या मंजिरीने काहीतरी चूक काढली असले कामात. शी, ती ना अशीच आहे. कुणीच तिच्या हाताखाली प्रगती करू शकत नाही. मला तर ती कशी वागणूक देते माहित आहेच तुला. पण तुला ती असं का वागवते काय माहित. तू बोलत का नाहीस माधवसरांशी. प्रोजेक्टमध्ये तुला काही जबाबदारी माग, हे काय सगळे सिनियर म्हणतील ते काम करतेस.”
समृद्धी काहीच बोलली नाही जणू मनात युद्ध सुरु होतं, काय खरं आणि काय खोटं काही कळत नव्हतं. तसा तिचा फोन वाजला, सत्यजितचा होता. शनाया चालु दे असं इशाऱ्यात बोलून निघून गेली. समृद्धीचा रडका आवाज सत्यजीतने जणू ओळखला होता, तो म्हणाला, “काय झालं आहे. तू ठीक आहेस ना...”
समृद्धीने टाळाटाळ करत उत्तर दिलं तर तो परत म्हणाला, “हे बघ काम करताना खूप विचार करू नको. बसं काम कर... काम चोख असले तर समोरचा तुला अधिक काळ थांबवून ठेवू शकत नाही... “
त्याचं बोलणं समृद्धीला जणू खूप काही देऊन गेलं. तिने फोन ठेवला आणि कामाला लागली. काही वेळात तिला माधवने बोलावले, त्याला तर सुरुवातीपासूनच ती आवडत होती. पण तरीही समृद्धीने त्या त्याच्या भावनेचा उपयोगकरून घेतला नव्हता. तिला वेगळीच शंका आली होती. त्याचं भीतीने ती कॅबीनमध्ये गेली.
माधव तिला बघताच म्हणाला,”हे, समृद्धी, काय सुरु आहे तुझ सध्या, कामात खूप बिझी दिसतेस.”
तशी समृद्धी गडबडली, ती काही उत्तर देणार तोच माधव म्हणाला, “माझं काम आहे तुझ्याकडे. मी ऐकलं आहे ती एक्सेलमध्ये निपुण आहेस. एका फाईलचा जरा डेटा करेक्ट कर मला आज संध्याकाळ पर्यंत हवा आहे. तुला मेल केला आहे. जस्ट चेक.”
समृद्धीने मान हलवली, जरा वेळ मनात विचार आला बोलावं आपल्या कामाबद्ल पण मग विचार जसा आला तसा परत गेला. माधव मात्र तिच्या पुढे येऊन उभा राहिला आणि तिचा हात हातात घेत त्याने धन्यवाद दिला. त्याच्या त्या कठोर पण अनपेक्षित स्पर्शाने समृद्धी जरा हादरली पण तेवढीच ती सावरली.
टेबलवर आली, कप हातात घेतला, कॉफी आता थंड झाली होती. तिचं मन मात्र उकळत होतं. कुठलं काम आधी करावं हे समजत नव्हतं. माधवच काम करून त्याचा विश्वास जिंकावा आणि मग हलकेच आपले काम काढून घ्यावे असे तिच्या मनात वारंवार येत होते. पण दुसरीकडे मंजिरीकडे सर्वकाही होतं. तिच्या डोळ्यांसमोर अजूनही मंजिरी मॅडमचं स्मित हास्य फिरत होतं. ते नुसतं स्मित हसणं नव्हतं. तिच्या कडे सर्वाना कंट्रोल करण्याचा पावर होता जणू. खुद्द माधव तिला कधी क्रोस करत नव्हता हेही तिने अनुभवले होते. तिने प्रेझेनटेशन करायला घेतलं. काही कामासाठी मेल उघडली तर माधवचा मेल दिसला, “नीड धिस डेटा करेक्टेड टुडे इटसेल्फ. थँक्स.
हा थँक्स चा टोन तिला अजूनच वेगळा वाटाला. जणू तो आभार नसून आदेश होता. तिने मनात नसताना ऐक्सेल शीट उघडली. आणि मग त्यात गुंतली. तिच करता करता तिला सहा वाजले होते. तसं गणपत तिच्याकडे आला, “मंजिरी मॅडमने तुम्हाला प्रेझेनटेशन का काय त्यासाठी बोलावले आहे.” तेवढ्यात सागर तीकडे आला, “समृद्धी मला ती ऐक्सेल फाईल हवी आहे, अनॅलेसीससाठी. लगेच पाठव, माधव सरांनी सागितलं की तू काम करत आहेस त्यावर.”
समृद्धी गडबडली, म्हणाली, “सागर सर अजून ती तयार नाही, उद्या दिली तर चालले का?”
“नाही, मला उद्या फाईनलं डेंटा अपडेट करायचा आहे. चार्ट प्रिंटला द्यायचे आहेत. आता एक तासात हवी आहे मला. माधव सर तर बोलले होते...”
दोघांचा संवाद रुद्रने ऐकला होता. तो उठून समृद्धीच्या जवळ आला, समृद्धी तुला काही हेल्प हवी आहे का? खरच सागरला डेटा आजच मिळायला हवा. तुला कुणी बोललं नाही का हे? हे ताबडतोब कर. हवं असेल तर ती नवीन जॉईन झालेली मंजुषा आहे ना तिची हेल्प घे.”
तो बोलून निघून गेला. समृद्धीने मंजुषाच्या टेबलकडे नजर टाकली ती केव्हाच निघून गेलेली तिला दिसली. कानावर शनाया आणि बिपाशाच्या कॅफेटेरियामधून हसण्याचा आवाज येत होता. ती क्षणभर स्तब्ध झाली. आणि मंजिरी तिच्या समोर उभी झाली,
“हुम्म, समृद्धी माझ्याकडे पंधरा मिनिट आहे आपण स्लाइड्स रिव्हिव करूया.”
तिने शेजारची खुर्ची ओढली आणि बसली, समृद्धीला आता थरकाप सुटला होता, तिने प्रेझेन्टेशन उघडले, मंजिरी आता संतापली, “हे बघ मी तुला आधीच बोलले आहे मला कामात कामचुकारपणा नको आहे. हे तू अजूनही कॅरेक्ट केले नाही आहे. अजूनही रंग आणि फॉन्ट्स इम्प्रूव्ह नाहीत. समृद्धी काय प्रोब्लेम आहे. तुला साधं काम देते मी अजून कुठली मोठी जबाबदारी दिली नाही आहे. दिलं तर काय होणार... लक्ष कुठे आहे तुझं?”
समृद्धी हळूच म्हणाली, “मॅडम, ते माधव सरांनी फाईल दिली आहे...”
“तर, त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. आणि काय हे मागच्या तीनतासापासून काहीच इम्प्रूव्ह केल्या नाहीत तू स्लाइड्स...”
समृद्धी काही बोलणार तोच मंजिरी ओरडली, “एक्सक्युजेस डोन्ट वर्क हिअर, समृद्धी. यू नो द स्टॅंडर्ड्स वी मेंटेन.”
समृद्धीएन चक्क खाली मान टाकली. मंजिरी पुढे बोलणार समृद्धीचा फोन वाजायला लागला, फोन समोर होताच आणि सुहासचा कॉल येत होता. एवढ्या दिवसानंतर त्याने तिला स्वतःहून कॉल केला होता पण समृद्धी तो वेळेत उचलू शकत नव्हती. मंजिरी फोनकडे बघत उठली, “समृद्धी मला काम हवे आहे. हे पूर्ण कर आणि मला मेल कर. मी रात्री बघेन, मला हव्या आहेत ह्या स्लाइड्स आजचं.”
मंजिरी जाताच समृद्धीने सुहासला फोन लावला पण आता तो उचलत नव्हता... सात वाजले होते. आणि समृद्धीच्या डोळ्यात पाणी आले होते. तिचे काहीच काम झाले नव्हते. सागरने अजून तिला टीम्सवर पिंगकरून अपडेट मागितला होता. पण अजूनही डेटा तयार झाला नव्हता. तिने दीर्घ श्वास घेतला आणि आधी एक्सेल फाईल हातात घेतली, सगळं करता करता तिला आता आठ वाजले. तिने फाईल सागरला पाठवली. मान वर करून तिने डोळे जरा चोळले तर ऑफिसमध्ये रुद्रशिवाय कुणीच नव्हतं. ती उठली आणि रुद्रच्या जवळ आली, “सर मी निघते, बाकीचे काम घरून करते.”
रुद्र काहीच बोलाला नाही. त्याने नजरेने होकार दिला आणि परत संगणकाकडे वळला. समृद्धीला त्याच्या डोळ्यात वर्क प्रेशर स्पष्ट दिसत होते. आणि तिलाही आता घरी जाऊन मंजिरीने सांगितल्याप्रमाणे प्रेझेन्टेशन एडीट करायचे प्रेशर होते....
आधीचे सर्व भाग पेजवर आणि साईटवर आहेत.
सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा- सर्व भाग
to be continued...
----पुढील भाग लवकरच....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AI
0 Comments