जोडीदार...
प्रवास तुझा माझा... भाग १६
मोहिते
निवास
रात्रीचे
नव वाजले होते. बाबांना सानूशी बोलायचं होतं, त्याचं बऱ्याचदा बाळूला विचारून झालं
होतं. बाळूही आता तायेडीच्या फोनची आतुरतेने वाट बघत होता. सहज टीव्हीचे चॅनेल
त्याने सर्च केले आणि नजर एका अमेरिकन चॅनेलवर पडलं, सानू आणि सुमंतच विमानतळावर
झालेलं स्वागत त्यात वारंवार दाखवत होते,
न्यूज
होती, प्रसिद्ध बिजनेस टायकून सुमंत राणे ह्याची पत्नी शिकागोत दाखल, बऱ्याच
दिवसांची असणारी प्रतीक्षा आज संपली, शेवटी राज्याला राणी मिळाली.... द ग्रेट
बिजनेस टायकून सुमंत राणे, ह्यांची पत्नी सानवी मोहिते-राणे कंपनीची बरोबरीची
पार्टनर असणार ही न्यूज वारंवार दाखवत होते.
बाळू
जोरात ओरडला, “बाबा, आई, आत्या, अनु सर्व इकडे या, सानू आणि जीजू टीव्हीवर आहेत.”
सारेच
हॉलमध्ये क्षणात जमले, लगेच बाळूने राणीला कॉल लावला आणि तिलाही ते चॅनेल बघायला
सांगितलं, जवळपास साऱ्यांना त्याने क्षणात मेसेज केले. सारेच कदाचित टीव्ही समोर
जमा झाले होते, सर्व फोटो काढून आपल्याला आपल्या ग्रुपवर टाकत होते. अनुने त्या
साऱ्या न्यूजचा VDO करायला
सुरुवात केली. ते पंधरा मिनिट सारे बघत राहिले. नंतर सारं कसं शांत झालं...
आईने
रात्री दहा वाजता चहा केला, अनुने सर्वाना दिला, तेवढ्यात भीमा काका सूनी काकी घरी
पोहचले, सदाही त्यांच्या मागेच आला, कॉलीनीत सर्वाना जवळपास कळालं होत, सगळीकडे
धाम धूम होती.
राणे
पॅलेस....
सानू जराशी झोप घेवून उठली, दुपारचे बारा वाजले
होते. सुमंत टेबलवर बसून त्याचं काम करत होता,
“अरे,
तू झोपला नाहीस, थकला नाहीस का?”
सुमंत
लॅपटॉप मध्ये डोकं टाकून बसला होता, तसाच बोलला,
“अग, काम अडकली आहेत. काही बिल्स पेंडीग आहेत.
मी नाही केलं तर कोण करणार... तुही आता आलीस, मग हे सारं तुलाच सांगेन मी, तू माझी
पार्टनर असणारं आहेस कंपनीत.”
सानू
लाडात जावून त्याला मागून बिलगली, तोच सुमंतने टेबलवरचा फोन उचलून मारियाला दोन कॉफी पाठवायला सांगितलं. सानूने परत त्याला
गच्च मिठी मारली,
“अरे
राणीसरकार, थांबा जरा.... आधी फोन करा घरी, बाबा वाट बघत असतील, त्यांची झोपायची
वेळ झाली असेल... अकरा बारा वाजत आले असतील तिकडे ”
सानूने
फोन हातात घेतला, तिला येवढे मेसेज होते आणि काही कळत नव्हतं, बाबांना फोन
लावण्याआधी तिने सुमंतला विचारलं,
“हे
काय आहे सुमंत?”
“हुम्म्म,
द बिजनेस टाईकून सुमंत राणेची बायको आहेस... तू डिझर्व करतेस. सकाळी तिथे
एयरपोर्टवर मिडिया होती म्हणून तर तो थाट
घेवून आलेली होती ना आपल्या घरची मंडळी...
मिडिया नी कवर केलंय तुझं शिकागो च आगमन. जावूदे आता असं नेहमी असणार, तू
असशीलच टीव्हीवर कायम... सवय लाव... आणि बाकी सर्व मासाह्बे... देखो अभी आप जाणो
और आपकी सासुमा... तू आधी फोन कर, नाहीतर सर्व वाट बघून झोपायचे.”
सानूने
फोन लावला, तोच बाबाने उचलला,
“कशी
आहेस बाळा, प्रवास नीट झाला ना?”
“हो
बाबा, सगळं नीट आहे.”
“मग,
आज आगमन झालं तर तिकडे आपलं...”
“बाबा...”
“अरे
इकडे टीव्हीवर सारखं दाखवत होते, अरे सगळं गोकुळ जमलंय इकडे.”
“हुम्म्म,
बघते मी आता, आताच उठले मी, झोपले होते.”
तिने
कॉल VDO वर
टाकला. मोहिते निवासात सारेच होते. आई तिला दुरूनच म्हणाली,
“घर
कसं आहे ग, कोण आहेत घरी. ओळख झाली का?”
बाबाने
लागेच गप्प केलं, “ओळख काय लगेच होते का?”
“मग
काय, माणसं ओळखायला काय वेळ लागतो! आणि ते तर सारे रक्ताचे नातेवाईक आहेत.”
“काहीही
बोलू नकोस, सारी नाती पैशाने तोलल्या जाते आणि मला बोलल्या होत्या मासाहेब....”
आई
गुमान विचारात पडली, बाबाने उगाच शब्द बोलून तिला विचारात पाडलं होतं. जरा तीही
काळजीत पडली, नेमकं काय बोलायचं होतं अरुणला तिला कळेना. पण सानू समोरून बोलत होती
मग तीही जरा विसरली. बाबा सानूला परत म्हणाले,
“सानू
बाळा तू कशी आहेस? काही कुणाचा विचार करायचा नाही, आपलं मुद्देसूद बोलायचं आणि काय
काय ते तुझं तुला जास्त माहित आहे.”
“बाबा
माझी काळजी करू नका, सुमंत आहे इथे.”
तोच
त्यांच्या खोलीच दार वाजलं, सानू उठणार होतीच तर सुमंतने रिमोटने दार उघडलं. आणि मारिया
कॉफी घेवून आली. जरा वेळ शांतता होतीच तर सुमंत बोलला,
“बोल,
मारिया इज गुड... “
मारिया
सानूसोबत बसली, तिनेही तिच्या घरच्या सर्वाना हाय केलं. आणि ती खोलीतून निघून
गेली. मग सानूने खोली दाखवली. सुमंत बोलला, बाळूने खूप सानूची खेचली, बोलण्यात तो
बोलून गेला,
“तायडे
मी उद्या बँगलोरसाठी निघतोय. आता जायला लागेल. बॉस ऐकणार नाही ग.”
क्षणात
सारं परत शांत झालं, बाळूने घरात हे सांगितलच नव्हतं. पण आता साऱ्यांना माहित झालं
होतं. आई पुटपुटत राहिली, बाबा बघत राहिले. सानू त्याला म्हणाली,
“अनुला
ठेवतोस ना काही महिने, कि? बघ जमत असेल तर. तसं तिने तुझ्या सोबत राहावं हेच
म्हणेल मी.”
“नाही
नाही, ती आहे इथे. मी जरा माझं बघतो तिकडे आणि मग घेवून जाईल तिला... आणि जमलं तर
आई बाबांनाही, म्हणजे ते तयार हवे ग.”
बाळू
आणि सानू गप्पा करत राहिले, बाळूने आजवर थांबून ठेवलेलं सारं काही सर्वाना समोर
सांगितलं. हळू हळू विषय बदलत गेला, विचारांचे चेहरे परत हसरे झाले. सारे सोबत
बोलले. आणि सारं काही बोलून तिने फोन ठेवला. मोहिते निवासात रात्र झाली होती पण
मनात गोंधळ उडाला होता, अरुण गुमान शांत बसला, अनु बाळू त्यांच्या खोलीत निघून
जाणार तोच बाबा त्याला म्हणाले,
“बाळू
आता तू उद्या जाणार तर मग अनु इथे का राहिल... सानू बरोबर बोलली, ती तुझी बायको
आहे. तिने तुझ्या सोबत राहावं, इथे आमच्यासोबत नाही...”
आई
आरती त्यांना थांबवत म्हणाली,
“अहो
असं काय बोलता, घर खाली व्हायच ना? “
“नाही
रे, अनु इथेच राहिल, त्याचा तिकडे बंदोबस्त होई पर्यंत... राहील ती तीन चार महिने,
अजून काय?”
“नाही
नाही, आरती, हे ठीक नाही, तिने बाळूशी लग्न केलंय. ते काही नाही, हप्त्या भरात
तिला घेवून जा, आम्हीही येवू सर्व नीट करण्यासाठी....”
बाळू,
“ बाबा तसं नाही आहे, मलाही काळजी आहे?”
“असायला
हवी, जोडीदार आहे ती तुझी.”
“आणि
आता माझाच तिकडे ठिकाणा नाही, जम बसला आणि राहण्याची जागा मिळाली की घेवून जातो
तिला, आमचं ठरलं आहे, तुम्ही काळजी करू नका.”
“बर
मग ठीक आहे पण मला हे पटणार नाही कि तू तिला इथे आमची सेवा करायला ठेवशील म्हणून,
आणि ते करायचं असेल तर तू इथे थांब फक्त ती नाही... आम्ही आधी तुझी जवाबदारी
आहोत....”
बाळू
परत काही बोलणार त्या आधी आईने त्याला गुमान खोलीत जाण्याचा इशारा दिला, भीमा
काकाही म्हणाले,
“बाळू
जा तू खोलीत, तयारी असेल ना उद्याची. आपण बोलू नंतर..”
बाळू
आणि अनु खोलीतून निघून गेले. आता हॉल मध्ये, आई बाबा, भीमा, सुनीता, सदा आणि अंजू
आत्या होते. अरुणच असं बोलणं ऐकून अंजूनेही मनातले शब्द मनात कोंबले, ती गुमान
गप्प होती, तर अरुण तिला म्हणाला,
“अंजू
तुझं बुटिक तयार झालय ना मनासारखं, कसं सुरू आहे काम.”
“हो
दादा? सगळं नीट सुरु आहे.”
“मग
तू स्वतः च्या पायावर उभी राहायला तयार आहेस तर?”
“हो,
हो तर... बसं सामान भरायचं आहे. ऑर्डर येईल एक दोन दिवसात. बसं ह्या लग्नाच्या
गडबडीत राहून गेलं फॉलोअप करायला.”
“मला
माहित झालं तू बुटिकमधेच दोन खोल्या काढायला लावल्या म्हणून...”
आता मात्र अंजू बिचकली,
पण बोलायचं होतच तिला,
“दादा हो, मी कधीपर्यंत
इथे मोहिते निवासात राहणार. छकु पण मोठी होत आहे....आणि ...”
“तुझा निर्णय झालंय ना?”
“हो, दादा.”
“मग काही हरकत नाही, कधी
शिफ्ट होतेस ते सांग.”
“बसं पुढच्या महिन्यात कदाचित...”
“चालेल, आणि अमितने केस
वर सही केली का, तो सोडणार आहे कि नाही तुला कि तिकडे बुटिकवर येवून त्रास
देणार...”
“दादा, मागे बाळूसोबत महिला
सक्षम ग्रुपच्या अध्यक्षा गेले होत्या त्यांना भेटायला, सही मिळाली आणि कायद्याची
नोटीसही देवून आल्या त्या...”
“मग ठीक आहे, तुला खात्री
आहे ना? त्याला हाताळू शकशील तर मग माझी
काही हरकत नाही... पण जोडीदार नसणं म्हणजे एक वेगळं आयुष्य जगावं लागले अंजू...
कुणी आवडलं तर नक्की सांग मी तुझ्या पाठीशी उभा असेल आधी...”
“दादा...”
“मग, मी आणि आरतीने आधीच
तुझं नाव घालून ठेवलं आहे बऱ्याच ठिकाणी, स्थळ साजेसं आलं कि, बघ बाबा तुझी हरकत
नसेल तर...”
“दादा.. लग्नावरून
विश्वास उठला आहे... मग नकोस वाटतं मला...”
“अरे मग आमच्या सारख्यांच
काय ? आम्ही आहोत ना अजूनही लग्नाच्या गाठीत.... असो... तो तुझा निर्णय... पण
आम्ही आमचं काम नक्कीच करू...”
“काय रे भीमा, आहे का
तुझ्या नजरेत कुणी आपल्या अंजूसाठी, बघ काय म्हणते ती, लग्नावर विश्वास नाही बोलते
रे...”
“अनुभव लेका, जावूदे,
तिचा भाऊ अजून आहे जिवंत, मी असेपर्यंत तरी माझी बहिण जोडीदार शिवाय राहणार नाही,
आहे माझ्या नजरेत दोन स्थळ.... जरा वेळ जावूदे.... वाट बघत होतो उत्तम क्षणाची...
आपण आधी तिचं काय ते बुटिक बघूया....”
आणि सारेच हसले... रात्र
चढत होती. झोप डोळ्यात आली होती. सारे मार्गी लागले होते... भीमा आणि सूनी आग्रह
करूनही थांबले नाही, सूनीला काही काम होतं मग ते परत गेले, सदाही मागेच परतला.
मोहिते निवास परत रिकामं
होणार होतं... अरुण आरती एकमेकांकडे बघत त्याच्या खोलीत निघून गेले.... ह्या
आयुष्याच्या उतरत्या वयात त्यांना साथ होती त्यांच्या जिवाभावाच्या जोडीदाराची....
0 Comments