जोडीदार.. प्रवास तुझा माझा .. भाग १८
सर्व आपल्याच हातात
आहे असा अंदाज येता येता अलगद कुणीतरी बाहेरून येवून सत्ता हातात घेणं, मनाला
मान्य नसतं, असचं झालं होतं राणे पॅलेसमध्ये... सानूला हलक्यात घेणाऱ्यांना सानूने
येताच चपकार लावली होती, आवाज झाला नसला तरी जखम पडली होती.
घर आणि परिसर एवढा
मोठां होता कि सानूला आता तिची खोली कुठे आहे हेही कळत नव्हतं. सुमंत बिझी होता,
बच्चे पार्टी बिझी होती, खोली कुणाला विचारावी ह्या नादात सानू तिचा ड्रेस आवरत
फिरत होती तोच तिला सुशीलची बायको प्रज्ञा दिसली,
“प्रज्ञा, तू मला
माझी खोली दाखवतेस काय ग? मला गवसत नाही आहे.”
“दाखवायची काय,
मालकीण आहात ह्या घरची, शोधा तुम्ही, मी जरा बिझी आहे.”
आणि ती कुणाशीतरी
बोलायला निघून गेली.
सानू मनात
पुटपुटली, “चायला, सांगितलं असतं तर काय हिच्या पोटात दुखलं असतं...”
तोच जसिका तिथे
आली, “मामी यु नीड हेल्प?”
“प्लीज डियर, आय
वॉन्ट टु गो टु माय रूम... कूल्ड यू प्लीज...”
“शुअर मामी. कम विथ
मी.”
सानू जसिका सोबत
गेली, आता मात्र तिने खोली लक्षात ठेवली. जसीका तिच्या फोनवर मेसेज करत बाहेर उभी
राहिली, सानूने स्वत:ला आवरून घेतलं. काही वेळात दारावर नॉक झालं,
“एस, कम इन.”
मासाहेब दार लोटून
आत आल्या तशी सानू उठली,
“मासाहेब सॉरी”,
“अग बस, तुझ्याशी
जरा बोलायच होतं.”
“बोला ना.”
“अग खाली जो
सारंगीने थोडासा गोंधळ घातला ना, त्याला कारण आहे.”
“हो जरा आलं माझ्या
लक्षात... पण माझी काही अशी अपेक्षा नव्हती मासाहेब.”
“हो हो, पण आता जे
झालंय तेच योग्य आहे. तुला हयातून सगळा अधिकार मिळेल आणि तू सर्वांना वठणीवर आणू
शकशील.”
“म्हणजे?”
“म्हणजे तुला सगळं
हळू हळू कळेल... आणि तुला जे योग्य वाटेल ना तशी वाग. मला पूर्ण विश्वास आहे तू
ह्या घरात माझी उमेद आहेस...”
तेवढ्यात लँड लाइन
वरचा फोन वाजला, सुमंत होता,
“सानू ये ग खाली,
पाहुणे निघत आहेत. वी शुड बी हियर टुगेदर.”
“हो आलेच रे मी.
दोन मिनिट दे मला. “
“मासाहेब येवू
मी...”
“बर मी माझ्या
खोलीत जाते आहे. बाहेर जसिका आहे. तिच्या सोबत खाली जा.”
सानू आणि सुमंतने
सर्व पाहुणे जाईपर्यंत रीतसर हॉलमध्ये होते. सगळा हॉल खाली झाला होता. सुमंतने
मारियाला सगळं आवरायला सांगितलं आणि तो सानूला घेवून त्याच्या खोलीत आला.
रात्र खूप झाली
होती. दोघेही थकले होते, खोलीत सानूने सुमंतला प्रश्न केला,
“सुमंत, आज तू
घेतलेल्या निर्णयाने कदाचित घरचे बाकीचे खुश नाहीत रे.”
“मला तसा घ्यायचा
नव्हताच ग पण काही कारणं आहेत. मला तो घ्यावा लागला.”
“पण माझ्यावर एवढा
विश्वास?”
“हो, आता तू बघ ना,
तुला ऑफिसचे प्रोजेक्ट संभाळता सांभाळत घर नावाचं हे विस्कटलेल प्रोजेक्ट सांभाळाव
लागेल आणि त्यासाठी हा निर्णय गरजेचा होता.”
“म्हणजे रे?”
“आता प्रश्न नको,
झोपूया आपण. थकली आहेस.”
सुमंतने सानूला
सगळे दागिने आणि ड्रेस काढायला मदत केली आणि मग त्या मदतित मदानाने शिरकाव केला,
रात्र हळू हळू जशी सरकत होती तशी प्रेमाची नशा मनाच्या वाटेने शरीरापर्यन्त पोहचली
होती.
सकाळी सानू उठली
तेव्हां सुमंत तिकडे नव्हता, तिने स्वत :ला आवरलं, आणि भरा भरा खाली आली, येतांना
तिने लहान जावू जयाच्या खोलीतून येणार आवाज तिच्या कानावर पडला, जया तिला शॉपिंग
करायची आहे म्हणून बोलत होती. तर सारंग तिला टाळत नराजपणे उत्तर देत म्हणाला,
“तुला शॉपिंगची
पडली आहे, यू नो, ती काल आलेली सत्ता घेवून बसली आहे. अग तुला आता पैसे तिच्याकडे मागावे लागणार. दादा
पण ना, स्वत : तर घरात कधी राहत नाही, पण आपल्यावर ही टांगती तलवार ठेवली आता
त्याने. सगळी वाट लागली यार. सरळ आयुष्य सुरू होतं, पैसा कुठूनही काढा, दादाला
काही समजत नव्हतं, पण ही ती सानवी वहिनी आहे ना ती हिशोबत चोख आहे म्हणे. तिकडे
मुंबई ब्रांचचे फायनॅन्सचे प्रोजेक्ट हीच बघायची ग...”
“अय्या म्हणजे आता
दादाकडून आपल्याला काहीच मिळणार नाही काय हो.”
“तिच्या कडून
मागावे लागेल.”
“मग तर तिच्याशी
मला मैत्री करावी लागले.. .”
सानूने जेवढं ऐकलं तेवढं, ती सरळ हॉलमध्ये आली, मारिया
मुलांना ब्रेकफास्ट देत होती.
“मारिया, व्हेर इज
सुमंत?”
“ही वेंट आउट...”
मारिया निघून गेली,
तोच जसीक म्हणाली, “मामी, मोठा मामा जॉगिंगला सकाळी निघून गेला, तिकडून तो ऑफिसला
भेट देवून अकरा पर्यन्त येईल.”
“नाश्ता केला काय ग
मामाने.”
“नाही, आणि
त्याच्या साठी काही नसतं, तो आला की करेल. मारियाला सुट्टी असते दहा पासून तर बारा
पर्यन्त.”
“मग?”
“मग, मोठा मामा करतो
ना त्याचं.”
“का ग, काकी, ममा
नसतात का इकडे.”
“असतात पण कुणाला
करायचा नसतो त्याच्यासाठी. ममा तिच्या पार्टीची तयारी करत असते किंवा फोनवर असते.
काकी तिच्या माहेरी बोलत असते ह्या वेळी.”
“असं... आणि
मासाहेब.”
“आजी तर योगा करत
असते. तुला माहीत असणार ना, तिला तेलाचा वास सहन होत नाही आता. पण ती काहीच खात
नाही, सरळ जेवते, मारिया करते तिचं जेवण.”
“हुमम... बर”
“मामी तुला काही
हवं का ग?”
“नाही, मी बघते, तू
मदत करशील मला... “
“हो, मला आवडेल. “
जसीकाने स्वयंपाक
खोलीतकुठे काय आहे हे तिला जेवढं माहित होतं ते सांगितलं, सानू आईकडे कधी स्वयंपाक
खोलीत पाय ठेवला नव्हता. पण आता तिला आईच्या हातच्या पोह्याची आठवण येत होती.
करावा म्हणून तिने कढई हातात घेतली, आईला फोन लावला, सगळे इकडे झोपण्याच्या तयारीत
होते. आईला सानूला स्वयंपाक खोलीत बघून आश्चर्य वाटलं आणि आनंदही, आई जसं सांगत
गेली सानू तसं तसं करत गेली. घरात खमंग पोह्याचा सुवास सुटला होता. जवळपास एक तास
लागला तिला पोहो बनवायला, सुमंत घरी आला आणि पोह्याच्या सुवासाने सरळ स्वयंपाक
खोलीत शिरला, सानूला बघून म्हणाला,
“सानू तू पोहा
केलाय माझ्यासाठी?”
“अरे केलाय
प्रयत्न, बघ ना खाऊन.”
तिने प्लेट्स
डायनिंग वर लागली, आज सुमंत आणि सानू हसत नाश्ता करत होते. तेवढ्यात मासाहेब त्या
पोह्याच्या वासाने तिकडे आल्या, सानू आणि सुमंतला एकत्र बसून नाश्ता करतांना बघून त्यांनाही
आनंद झाला, सानूकडे येत म्हणाल्या,
“अग, कितीतरी वर्ष
झाले, आज घरात पोह्याचा सुगंध अगदीच आपल्या भारतासारखा आलाय. मलाही हवा आहे. मी
मारियाला कितीतरी वेळा शिकवला पण तिला काही जमत नाही.”
“बघ, सुमंत मी
बोलले होते ना, सानू ह्या घराला घरपण नक्की देईल...”
“अहो आई पण खाऊन
बघा, मी पहिल्यांदा केलाय...”
“मला माहित आहे, तू
कधीच मोहिते निवासात करत नव्हतीस, पण तरीही तू इथे ह्या बंगल्यात माझ्या सुमंतसाठी
केलास, त्यात सर्व आलं.”
सानूच नवल सारंगी
आणि जया त्यांच्या खोलीतून ऐकत होत्या. सारंगी बाहेर आली, आणि म्हणाली,
“अरे ताई, मला आवाज
द्यायचा होता ना... तुम्ही कशाला केला. आता मारिया येणारच होती. तिला सांगायचं ना,
आपण कशाला करायचं. उगाच, किती कामं असतात आपल्याला.“
सानू काहीच बोलली
नाही, तर ती परत म्हणाली,
“ताई मला आज शॉपिंगला
जायचं आहे, तुम्ही पण चला सोबत. मग चार वाजेपासून आपल्याकडे पार्टी आहे ना,
जवळपासचे सर्व येणार आहेत, माझ्याकडे काही नवीन नाही घालायला. येवू आपण दोन
पर्यन्त.”
सानूने सुमंतकडे
हलकीशी नजत टाकली, तो पोहो खाण्यात मग्न होता, सानूला इशारा समजला होता, सुमंत
तिला काही बोलणार नव्हताच, तिने मान हलवत जयाला होकार दिला. तिलाही जयाला समजून
घ्यायचं होतं. सारंगी जरा रागेट स्वभावाची वाटली होती सानूला मग जया गोड बोलून फोल
पाडणारी जरी असली तरी सानूसाठी पुरेशी होती. सानू तिला लगेच म्हणली,
“तुझं आवरलं की मला
आवाज दे, जावूया आपण.
आणि आजच्या पार्टीच काही
आपल्याला करायचं आहे काय ग?”
“नाही ना ताई, सगळं
बाहेरून येणार आहे. इकडे सगळं इवेंटवाले पटापट करतात. आणि हा आजचा स्वयंपाक भारतीय
आहे, तेव्हा तुम्हाला आवडेल.”
सुमंतला आता ठसका
लागला, त्याला जयाचा इशारा समजला होता तसा तो सानूला ही उमगला होता पण काय करता,
नवीन ठिकाणी नवीन लोकी, नव्याने प्रवास म्हणून सानू गुमान गप्प ऐकत राहिली.
सुमंत पुढे
म्हणाला, “सानू मला ऑफिसला जायला लागेल, कामं अडकली आहेत, मी येतो चार पर्यन्त. तू
जा जया सोबत, काही लागलं तर घे. आरध्या मावशी येणार आहे आज, आणि आपले सगळे भारतीय
ग्रुपचे मंडळी आहेत. निदान शंभर सवाशे लोक असतील आज. इवेंट मॅनेजर येईल काही
वेळाने तू बोलून घे. मी निघतो.”
सानूने गुमान होकार
दिला, जया तिच्या जवळ आली,
“ताई मी बोलते
त्यांच्याशी तुम्ही काळजी करू नको.”
जयासोबत सानू बाहेर
जावून आली, तिचं खूप काही तिने गुमान ऐकून घेतलं. तिने केलेला खर्च तिला पटला
नव्हता पण चलायचं म्हणून तिने जयाला काहीच प्रश्न केला नाही. घरी आली आणि तयारीला
लागली. तोच काही वेळात आराध्या मावशी आणि अस्मित अंकल आले. सानूच्या खोलीत आता
गोकुळ झालं होतं. सानूने अनयाने तिच्यासाठी तयार केलेला लेहंगा
घातला आणि तिचा झक्कास
मेकअप केला होता. सुमंतही भारतीय परंपरेनुसार आज तयार झाला होता. लक्ष्मी नारायणचा
जोडा जसा पाहुण्यांच्या स्वागताला तयार झाला होता. सुमंतने सानूची ओळख प्रत्येकाशी
करवून दिली. तिच्या गुणांची आणि रुपाची चर्चा पाहुण्याम्ध्ये रंगत होती. पाहुण्याकडून
बरंच काही सानूला समजत होतं. घरातल्या पोखर नात्यांची चुलबुल तिला दुसर्यांच्या शब्दात
जाणवत होती.
कथेचा पुढचा भाग लवकरच.---
0 Comments