जोडीदार... प्रवास तुझा माझा...19

जोडीदार... प्रवास तुझा माझा...

प्रसिद्धी आणि पैसा कितीसा पुरतो नाती जोडून ठेवण्यासाठी?

अमाप संपत्ति असूनही राणे पॅलेस दरिद्र होतं नात्यांच्या बाबतीत. मासाहेबांनी चुप्पी धरली होती. मुलगी मुलगा की सून जावई कुणाला बोलणार होत्या त्या. रक्ताची नाती होती पण परकी होती. हेच चित्र पालटावं असंच वाटत होतं त्यांना, त्यात सानूच्या येण्याने अजून काही चुकीच घडू नये अशी धाकधूक त्यांच्या मनात लागून राहिली होती. तिने हे सांभाळवं पण स्वत: ला सांभाळत असंच वाटत होतं. एका कोपर्‍यात त्या सारं काही बघत गुमान बसून होत्या. जयाच वागणं बोलणं, सारंगीचा तोरा काहीही तिच्यापासून लपत नव्हतं.  

कार्यक्रमात सारंगी खूप वेळ थांबणार नव्हतीच, तिला काही आवडलं नव्हतं, शिवाय तिच्या मनात आता भीती शिरली होती. ती निघणार तोच आराध्या तिला म्हणाली,

“सारंगी, बरं दिसणार नाही ते, तू मोठी आहेस घरची. थांब जरा, जरा पाहुणे ओसरू दे.

“आराध्या तू मला नको ग सांगू, कंटाळा आलाय मला आता सगळ्यांचा. वीट आलाय. माझी मी बरी माझ्या खोलीत. तुला माहीत आहे ना हे पाहुणे माझ्याबद्दल काय बोलतात, खटकते ग मी इथे.”

“बोलू देत ना, तुला कधी पासून फरक पडायला लागला ह्या सर्वांचा.”

“आता पडतोय ग, तू एन्जॉय कर मी निघते खोलीत.”

“सारंगी, सुमंतसाठी तरी तू थांबाव असं मला वाटते.”

“का ग, त्याने काय केलंय माहित आहे ना तुला!”

“पण का केलं असेल हे समजलं का तुला, ते समजून घे ना आधी.”

“अरु मला काहीच समजून घ्यायचं नाही.”

सरे, तू नाहीस ग अशी, थांब ग...”

ती निघून गेली. आराध्या आणि सारंगी बऱ्याच वर्षापासून एकमेकींना ओळखत होत्या. सारंगीच लग्न स्टेविन सोबत केलं तेव्हा ती खूप खुश होती पण मध्ये काय काय झालं हे आराध्याला नंतर समजलं नाही. सानू मावशीच्या जवळ आली,

“ताई अशी का वागते ग? मला तर कळत नाही.”

“काही नाही सानू बाळा, कधी कधी माणूस स्वत: वर रागवला असतो. म्हणून तो जगाचा राग करतो. सारंगी खूप गोड मुलगी आहे. तिला समजून घे. आणि कदाचित तिलाही ती कोण आहे हे समजून सांगावं लागणार तुला. वेळ दे तिला आणि तुझ्या तिच्या नात्याला. तू करशील ग सर्व... म्हणून तू पसंत आहेस ना मासाहेबांची.... माहित नाही त्यांनी काय ओळखलं तुझ्यातलं.”

“एवढा विश्वास आहे त्यांना माझ्यावर?”

“ओ माय गॉड, मी विसरले होते, अभिनंदन ग, ये पण कालचा सुमंतचा निर्णय मस्त होता.”

“धन्यवाद ग!”

“मिडियाने मस्त दाखवलं सर्वीकडे, तुझी मजा ग, राणी म्हणून राज्यात आलीस. ये पण जपून हा. तुझ्या असं अचानक येण्याने घरच्या मंडळींची मन दुखावली असणार ग, अंदाज आलाच मला.”

“अंदाज! अग खरं आहे ते, सगळ्यांना डंख मारल्या गेला आहे कालपासून.... सुमंतपण ना! आल्या आल्या कशाला केलंय हे काय माहीत.”

“अग त्याने काही विचार केला असेल ना... “

“म्हणतोय त्या शिवाय घरात तुला किंमत नसणार. आणि मासाहेब म्हणाल्या म्हणे अश्या. तुला तर माहीत आहे माझा ह्यावर विश्वास नाही, आपली किंमत आपण ठरवतो ग, पैसा आणि पोजीशन नाही ठरवत, ती दहशत पसरवते.”

“ओ माय गॉड, एवढा विचार करू नकोस. तू तुझ्या पद्धतीने हाताळ....”

“एस!!! तेच करणार मी... मला नाही रोब दाखवता येत, पण राणी म्हणून इथे आहे हे विसरणार नाहीच मी.”

“हो, जरा जपून ग बाई.”

“मावशी तुला तर माहित आहे आपण वादळ आहोत, बस जरा कानोसा घेणे सुरू आहे आता... बघू काय करता येते ते. अजून तरी माणसांना ओळखणं पूर्ण झालं नाही.”

“ते होतही नाही ग कधी, पण मला विश्वास आहे, तू घाई करणार नाहीस आणि उशीर होवू देणार नाहीस. तू करू शकतेस. आधी सुमंतचे बाबा होते ना तेव्हां ह्याच पॅलेसमध्ये नाती भेटायची ग, आज नुसती हाडा मासाची माणसं भेटतात. सुमंतने बिजनेस सांभाळला पण घर नाही सांभाळू शकला तो, सहदेवराव गेले आणि मासाहेब काही दिवस हरवल्या आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा सगळं त्यांच्या हातून निघून गेलं होतं. आता त्या कुणाला बोलणार. आता आता तर त्या बोलायला लागल्या, कदाचित सुमंतच्या काळजीने त्या बोलू लागल्या ग, पण तरीही मोजक्या बोलतात.”

“हुम्म्म, पण मी नाही करू शकले तर...”

“तर काय त्याचं आयुष्य त्यांनी कसं जगायचे त्यांनी ठरवावं, तू तर राणी आहेस राज्याची आणि ह्या सर्व संपत्तीची. पण नात्यांना जुळवून आणणं कठीण आहे बाळा.... प्रयत्न कर. हे केलंस ना तर ह्या घरातल्या लोकांच्या मनात राणी म्हणून राज्य करशील. जरा भरकटले आहे ग सर्व... सारंगी खूप हुशार मुलगी आहे. काय बिनसलं तिचं आणि तिने असा मार्ग पत्करला काय माहित. तू शोध घे बघ मग ह्या पॅलेसचीच नाही तर सर्वांची राणी होशील.”

“कठीण आहे ग, पण आपण पण वादळ आहोत, खत्रो से सामना तो होता राहता है! आप जाणते तो होंगे!”

“जाणते भी, और आपको पहचानते भी है!”

“मावशी इथे घर नावाच प्रोजेक्ट समोर आहे. आणि त्याला वेळेत पूर्ण करायचं आहे आता.... स्ट्रॅटजी सुरू आहे ग.”

“अग ग बाई, ओ माय गॉड, तुला काय सांगायचं. चालू दे तुझं, चल माझ्या मैत्रिणी बोलावत आहे, बसते त्यांच्यासोबत. तू हो सुमंतसोबत.”

पार्टी मस्त रंगली होती. शेवटी सुमंत आणि सानूने देसी डीजेवर डान्स केला. जेवण संपली आणि पाहुणे ओसरले. मावशी सुद्धा गेलेली. जरा वेळ सानूला मोहिते निवासात आल्यासारखं वाटलं होतं.

दोन दिवस सलग पार्टीने आता सानू थकली होती. त्यातच तिला आणि सुमंतला शेकडो आमंत्रण होते, आणि प्रत्येकाने आवर्जून बोलावलं होतं.

सानू सकाळी पडल्या पडल्या म्हणाली,

“सुमंत, तू झोपत नाहीस काय रे, मी रात्री झोपले तेव्हाही तू काम करत होतास आणि आता उठले तेव्हाही ती लॅप टॉपवर आहेस.”

“झोपतो ना, पण खूप कमी...”

“मला घरी सर्व असेच म्हणायचे जेव्हा मी काम करत बसायची पण तुला बघितलं की वाटते तू माझ्या पेक्षाही सव्वा शेर आहेस.”

“मग नवरा आहे तुझा, असायला नको. बर ते जावूदे, मी जरा बाहेर जावून येतो. तू आवर आणि ये खाली.”

सुमंत परत आज जॉगिंगला निघून गेला, सानू परत खाली आली, आता तिच्या लक्षात आलं होतं, सुमंतसाठी इथे कुणीच काही करत नव्हतं, तो सगळं करत असूनही त्याचं सगळं तोच करत असायचा. तसं हे उत्तम माणसाचं लक्षण पण सानूला जाणवलं...

आजही सानूने सुमंतसाठी पोहे केले, तेच तिला जमले होते, सुमंत म्हणाला,

“आजन्म हे पोहे मिळाले तरी काही हरकत नाही सानू, लाजवाब झालेत ग.”

“नाही रे, आज मीठ जरा जास्त झालं आहे.”

तोच जया आली आणि म्हणाली, “अहो ताई येत नाही तर कशाला करता. दादा तर सँडविच तयार करतात आणि खातात.”

“काही नाही ग शिकते ना जरा, हरकत काय.”

“गरज काय त्याची. आपल्याकडे भारतीय कुक येते ना रात्री, तिलाच सकाळी सांगूया यायला. आता इकडे कुणी खात नाही पोहे आणि हे सगळं गावाकडच मग सारंगी ताईने बंद केलं त्यांना. तुम्हाला हवा असेल तर आपण लावूया ना.

“नको, मी शिकेल ना, जरा काही दिवस तर लागतील मला सगळं आवरायला. तू काळजी करू नकोस.”

“अहो पण तुम्हाला वेळ मिळेल काय हो?”

“वेळ काढावा लागेल ग, तुझ्या माहिती साठी सांगते, आईकडे मी मागच्या पाच वर्षात स्वयंपाक घरात पाय ठेवला नाही आहे.”

“वो... मग हे सगळं... दादा साठी, पण ते करतात ना त्यांच, आणि सांगते सवय लावू नका हो, नाहीतर करत राहाल घरचं  आणि मग कुठे ऑफिस आणि सगळं, काही पार्टनर वगैरे नसणार तुम्ही..” ती  उगाच हसायला लागली.

सानूही हसली, आणि म्हणाली, “लग्न, चूल आणि मुलं ह्यासाठी केलं नाही पण घरातलं  यावं  जरासं  म्हणून हा सगळा थाट, माझा माझ्या साठी, तुला हरकत नसावी, काय ग  जावूबाई !”

जया अवघडली, “मला काय हरकत असेल, मी तर तुमच्या साठी म्हणाले.”

“थॅंक्स, चल तुला देवू का पोहा, म्हणजे माझ्या नवऱ्याने तर तो खाल्ला...”

“नको नको, मला नको तुम्हीच घ्या.”

सुमंतला विषय बादलायचा होता, सानूला म्हणाला, “सानू आज नको येऊस तू ऑफिसला, काही मेल आहेत ते बघून घेशील. असं कर ना, तू आठ दिवस येऊच नकोस, जरा आराम कर आणि कर तुझे एक्स्परीमेंट, मला काही हरकत नाही. तेवढच बायकोच्या हाताच खायला मीळले.”

“काय रे, काहीही काय तुझं, बरा झालंय रे पोहा..”

“म्हणजे तू केलाय, माझ्या साठी तर अमृत आहे... ते जावू दे, आपल्या त्या रोज इंटरनॅशनलची डील आहे पूढल्या शुक्रवारी, मी तुला तेव्हा सोबत घेवून जाईल, तुझी ऑफिसच्या स्टाफसोबत ओळख होईल आणि मग तू सुरू कर ऑफिस तुला जमेल तसं, तसंही तू घरून आपल्या मुंबईचा प्रॉजेक्ट बघणार आहेच ना.”

सानू आणि सुमंत ऑफिस बद्दल बोलत राहिले, जया तिकडे उगाच उभी राहून जरा अवघडली, आणि  तिथून निघून गेली.

कथेचा पुढचा भाग लवकरच.---

तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, कथेचे अपडेट तिकडे तुम्हाला सहज मिळतील.
लिंक पहिल्या कॉमेंटला आहे. whats app channel
https://www.whatsapp.com/channel/0029Va8KEVk5kg7FQqeLjX0b

कथेचा.. बऱ्याच वाचकांनी ही कथा पहिल्या पर्वा पर्यंत वाचली आहे आता पुढे जोडीदरासोबतचा प्रवास नक्की वाचा ....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो आभार गुगल/in.pinterest.

Post a Comment

0 Comments