जोडीदार... प्रवास तुझा माझा... भाग ३४

 जोडीदार... प्रवास तुझा माझा... भाग ३४




सुमंत गुणगुणत खोलीत शिरला, सानू वॉशरूममध्ये होती. सुमंत तिची वाट बघत बसला, सानू आली,
“सानू कॉफी घ्या गरम आहे.”
“अरे काय आज कॉफी आणली, काय बेत काय आहे.”
“बेत असा काही नाही, बस वाट बघतोय प्रसादाची... “
“असं, . आणि श्री रे उठला का?”
“उठला ना, त्याच्या भावांसोबत आहे तो, आताच मारियाला सांगितलं मी त्यांच्या खोलीत काहीतरी खायचं पाठव म्हणून. ती पासता करत आहे. “
“ श्रीला आवडेल की नाही माहीत नाही.”
“खाईल ग, खेळता खेळता आणि नीहीच खाल्ला तर करून देशील त्याला काही, येईल तो सांगत. आता जरा वेळ दे त्याला रूळायला आणि स्वत:हून बोलायला.”
“हो रे, मलाही वाटते. आता त्याने येवून मला सांगितलं ना की झालं मग, काळजी कमी होईल.”
दोघेही कॉफी घेत गप्पा करत होते. गप्पा म्हणजे बोलत होते बिजनेस डीलबद्दल, काही वेळाने श्रीने नॉक केलं आणि आत आला,
“ममा मला ना नाही आवडला ग पासता, तू काहीतरी करून दे ना, ब्रेडला शुगर लावून दे घी सोबत, नाहीतर आपण आणलेले ते आजीने केलेले लाडू दे मला.”
सानू हसली, “बरं तो बघ डबा आहे तिकडे घेवून जा, सुमित आणि शशांकला पण दे, मी खाली गेले ना की मारियाला शिकवते आणि तुझ्यासाठी करून पण देते.”
“आणि ममा माझी ती पॅन्ट दिसत नाही आहे, ब्लॅकवाली, तुझ्या बॅगमध्ये असले तर बघशील, हा पॅन्ट कॅनफरटेबल नाही ग.”
“हो हो, बघते, थोडा वेळाने चालेल ना.”
हो म्हणत, श्रीने लाडवाचा डबा उचलला आणि त्याच्या खोलीत निघून गेला.
“हुश.. बोलला रे हा, नाहीतर काहीही द्या काही बोलत नव्हता, भीतीच होती मला, कालपासून बोलत आहे, आणि आज तर बघ ना कसा बोलला, हायसं झालं बघ मला...”
“अग तुझ्यासोबत आहे तो, इथे न बोलणारे तुझ्याशी बोलण्या साठी आतुर आहेत, मग तो तर तुझ्यासोबत कितीतरी महिन्यांपासून बोलतोय.”
बोलता बोलता सुमंतने दार बंद केलं आणि त्याने सानूला त्याच्याकडे ओढलं. तिने केस हळुवार कुरवाळत म्हणाला,
“तुझा हा रंग सावळा, ही संध्या सावळी…”
आणि मग.... संध्या आज प्रेममय झाली होती.
दोन दिवस उलटली होती, घरात संवाद होता. सानूला जरा सकाळपासून बरं नव्हतं, ती आज घरून काम करणार होती. सकाळी सुमंतने श्रीला त्याच्या शाळेत सोडलं आणि तीही ऑफिसला निघून गेला. अजूनही सारंग सुमंतशी बोलला नव्हता, त्याची मनात तयारी सुरू होती, जरा वेळ हवा होता त्याला सुमंतशी बोलायला. व्यवहार होता, विचार करून बोलणं भाग होतं, शिवाय सर्व काही सानूच्या नजरे खालून जाणार होतं हेही तो जाणून होता. दादा आता नामधारी सत्ताधीश आहे हे घरात जवळपास सर्वांना माहीत होतं.
जयाच बोलणं अगदीच बदललं होतं सानूशी, ती मात्र तिच्या जवळपास राहत असायची पण अजूनही मूळ मुद्दा तिने काढला नव्हता, पण आज सारंगीने सानूशी बोलणं ठरवलं होतं, सानूला काम करतांना बघून ती तिच्या खोलीतून बाहेर आली,
“वहिनी, कशी आहेस? मा सांगत होती तुला आज बरं नाही म्हणून. काही.. ,,”
“अग बस काही नाही अजून, श्री अजून रूळायचा आहे, जरा असिडिटी झाली आहे, आणि काही असं असलं ना तर तुला सर्वात आधी सांगेल.”
हे ऐकूनच सारंगीचे डोळे पाणावले, पापण्या अलगद पुसत ती जवळ येवून बसली, लॅपटॉप तिने सोबत आणला होता. सानू म्हणाली,
“काही दाखवायच आहे?”
“हो, बघशील? मी नवीन सेटअप सुरू करते आहे माझा. आधी मी मॉडेलिंग करायचे.”
“हो.. सुंदर आहेस, मी बघितले आहे तुझे फोटो साइट्सवर आणि जुन्या मॅगझीनमध्ये, बोल्ड दिसत होतीस, आताही दिसतेस.”
सारंगी बघत राहिली, हरवली, सानू परत म्हणाली,
“काहीतरी दाखवणार होतीस.”
“हो, ही माझी साईट आहे, मी मॉडेलिंग तर नाही पण आता आपल्या काही इंडियन कॉस्मेटिक कंपनीसोबत बोलत आहे. आपले आयुर्वेदिक कॉस्मेटिक्स इकडे इम्पोर्ट करून सेल करायचे हा माझा प्लॅन आहे. त्यासाठी मी आधी स्वत: काही मॉडेल नेमणार आहे. पुढल्या महिन्यात लौंच करण्याचा प्लॅन आहे.”
“माझी मदत हवी आहे का?”
“तू आधीच मदत केली आहेस.”
“मग ग.”
“काही नाही तुला धन्यवाद देण्यासाठी तू माझ्या ह्या लोन्चींग सिरेमनीमध्ये यावी असं मला वाटते.”
“मी काहीच केलेलं नाही तुझ्या ह्या कामात.”
“ह्या कामात नाहीच केलसं, पण ह्या मागे लपून असणार्या माझ्या आत्मविश्वासावर तू काम केलंस. स्टेविन आणि माझे बिघडलेले संबंध तुला दिसले, आणि कारण तुला समजलं, माझी गिल्ट तुला कळली, मार्ग तू काढलास ह्यासाठी तू वेळ घेतलास, माझं बोलणं गुमान ऐकून घेतलं, राग सहन केलास, उद्धटपणावर दुर्लक्ष केलंस, आणि मुख्य म्हणजे माझ्या ह्या मागे असणार्यांना सर्व कारणांचा विचार केलास, फक्त तुझा विचार केला नाहीस. तू ठरवलं असतं तर तुझं सगळं उत्तम होतं, तुला काही कुणाच्या कशात डोकावायची गरज नव्हती. पण...”
“अग बाई, मी माझाच विचार केला, कारण मला तू अशी हवी होतीस, आता ये इकडे किती वेळची नुसती बोलत बसली आहेस.”
सारंगी उठली आणि सानूला जावून बिलगली. सानू तिला म्हणाली,
“माझी काही मदत हवी असेल तर बिनधास्त बोलायचं, हा आता जरा बिजनेस माइंडेड आहे मग जरा व्यवहार बघले तुला हरकत नसेल तर. “
“नक्कीच पण आता नको, माझा सर्व प्लॅन ठरला आहे. माझं बोलणं झालं आहे बँकेशी आणि लोन पण मंजूर झालंय. उलट इथल्या काही अंजन्सीने मला स्वत: भारतीय प्रोडक्ट इकडे आणण्यासाठी प्रोत्साहन आणि मदत केली आहे. काहीही लागलं तर मी नक्की विचार करेन...”
“नक्की हा, तशी माझी नजर असेल, तुला तर माहित आहे वादळ सुटण्याआधी वातावरण बघून घेत असतं.”
आणि दोघीही हसल्या.
हसता हसता सारंगी परत म्हणाली, “पण का ग सगळं केलंस, कसा विचार केलास सर्वांचा. “
“बघ सारंगी, तुझ्या भावाने मला त्याच्या बिजनेसमध्ये पार्टनर केलं, ह्या पॅलेसमध्ये राणी म्हणून आणलं, माझा दरारा मी तसाही ठेवू शकली असते, मागे पुढे तुम्ही सगळे माझ्या बोलण्याला काहीही म्हणू शकले नसते. पण त्याने काय झालं असतं मी नुसती राणी असते, नावाची आणि त्या बँकेतल्या रकमेची, पण मला ते मान्य नव्हतं, ह्या घरात राणी म्हणून राहायच असेल तर आधी ह्या घरातल्या लोकांच्या मनात ते माझं स्थान असायला हवं होतं, बसं मी माझ्या स्वार्थाचा विचार केला.”
“वहिनी, मानलं तुला, तू खरच राणी आहेस, मनाने आणि मानाने सुद्धा.”
तोच जया तिकडे आली, “हुमम काय सुरू आहे दोघींचं, मी यायचं ना?”
“जया ये ग, बस तुझीच कमी होती मैफिल बसायला, चल कॉफी घेवूया सगळ्या. मी करते आज.”
सानू उठली, आणि तिने कॉफी तयार केली.
आता बोलता बोलता सारंगी म्हणाली.
“आम्हाला पुढल्या आठवड्या शिफ्ट व्हायचं आहे.”
“कुठे ग?”
“वहिनी किती दिवस मी आणि स्टेविन इकडे राहणार. आता वेळ योग्य आहे आणि सगळं व्यवस्थित आहे मग आता अवकाश नको.”
“तुझा विचार झालंय ना, माशी बोलणं झालं का?”
“हो, आमचा दोघांचा विचार झालाय, आम्ही तुमच्या दोघांची वाट बघत होतो. स्टेविनला तिकडून जवळ पडते ना ग, आणि मी पण ऑफिस बघितलं आहे तिकडे, मॉम म्हणत आहेत की घरीच मी ऑफिस ओपन करावं, पण बघते मी काय कसं तर, कारण त्या पण इंटेररेस्ट घेत आहेत आणि सोशल नेटवर्क उत्तम आहे त्यांचं.”
“मग त्याचा तुला फायदाच होईल की आणि मला काय तू आणि स्टेविन आनंदात राहा म्हणजे सगळं आलं त्यात. शेवटी हा प्रवास आपल्या जोडीदारासोबत असावा.”
गप्पा रंगल्या होत्या. जयाच्या मनातही गोंधळ सुरू होता, तेवढ्यात सुमंत घरी आला आणि सर्वाना बघून स्टुडिमध्ये निघून गेला, सुमंतला असं बघून सगळ्या खोळंबल्या. त्यांना बोलून सानू त्याच्या मागे गेली.
कथेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचे आधीचे भाग पेजवर आहेत
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments