जोडीदार... प्रवास तुझा माझा... भाग ३५

 जोडीदार... प्रवास तुझा माझा... भाग ३५सानू खोलीत शिरली तसा सुमंत तिच्या कडे आला आणि तिच्या गळ्यात हात टाकत त्याने दीर्घ श्वास घेतला, सानूने प्रश्न केला,
“अरे का आलास इकडे, बसायच होतं ना आमच्यासोबत. “
“तू आधी बस इकडे, तुला अतिशय महत्त्वाची बातमी द्यायची आहे, “
“मग तिकडे सोबत सांगायची ना.”
“नाही, मला आधी फक्त तुला सांगायची आहे. “
“काय झालं?”
सुमंतने बॅग मधून फाईल काढली,
“सानू आपण रशियाचा कॉंट्रॅक्ट फाईनल करतो आहे. त्यांना तुझे डिझाईन आणि प्लॅन्स आवडले आहेत. आणि मला वाटते तू हा प्रोजेक्ट लीड करावा.”
“सुमंत इट्स ग्रेट न्यूज. आपण सगळ्यां सोबत शेअर करायला हवी.”
ती धावत येवून त्याला बिलगली, आणि मग तिचे केस सुमंतने हळूच मागे सारत तिच्या माथ्यावर ओठ टिपली, सानू त्याला म्हणाली,
“सुमंत, हा प्रोजेक्ट तू लिड कर, माझ्या हाती सध्या घर नावाचा मोठा प्रोजेक्ट आहे.”
“अग पण तो आता निस्तरला आहे ना. “
“नाही, तुला माहीत आहे ना आपण प्रोजेक्ट हँड ओवर केल्यावर सपोर्ट करतो, हायपर केअर देतो, इथेही गरज आहे. नाती आता कुठे गुंतत आहेत. त्यांना वेळ आता दिला ना की आयुष्भर आपल्याला काहीही त्रास होणार नाही.”
“सानू...”
“बस, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, आणि मी आहेच ना तुझ्या सोबत. पण मला आता जरा ब्रेक हवा रे, श्री आहे, मा आहे, घरात सगळं सुंदर होतं चाललं आहे... आता माझी इथे जास्त गरज आहे. जरा काही महीने निदान वर्ष दोन.. मग आहेच ना मी तुझी बॉस!”
“तू काय ग आताही माझी बॉस आहेस. ऑर्डर मिळालाय बॉसचा ऐकावा लागेल बाबा, आपण काय जोरूचे गुलाम!! “
“असं काय रे.. जावूदे, ते झालं पण तू ह्या कारणासाठी येणार नाहीस घरी.”
“हुमम, सारंगचा फोन होता, त्याला आज बोलायचं आहे माझ्यासबोत, रात्री सुद्धा मी बिझी आहे, जरा मध्ये वेळ होता माझ्याकडे मग मी आता आलोय. तू चल माझ्यासोबत त्याच्या लॅबमध्ये.”
“अरे त्याला तुझ्याशी बोलायच आहे.”
“आणि मी तू आहे, मी तुझ्याशिवाय पूर्ण होत नाही, माहीत आहे ना तुला.”
“बापरे! आज चढली आहे वाटते.”
“मग आज...”
“नुसता तिथे येवून अटकू नकोस.”
“आता तू एवढी सुंदर आहेस की मला राहवत नाही मग मी काय करू.”
“बघू...”
“मग पक्क ना आज ग.”
“सुमंत तुला सारंगशी बोलायचं आहे.”
“अरे हो... “
“ हो पुढे मी आलेच.”
सुमंत सारंगच्या लॅबकडे निघाला, जी घराच्या मागच्या बाजूला होती. सुमंत आला आणि बसला, सारंगने त्याच प्रेझेंटेशन सुरू केलं, तोच सुमंत म्हणाला,
“सारंग थांब.”
“दादा काय झालं?”
“सानू आलेली नाही अजून, तीचं इथे असणं महत्त्वाच आहे, माझ्या पेक्षा तिला आनंद होईल तुला असं बघून.”
तोच सानू खोलीत शिंकत आली, तिला केमिकल्सचा वास येत होता, जयाने तिला पाणी दिलं, सानू जरा स्थिरावली, तर सुमंतने सारंगला त्याचं प्रेझेंटेशन सुरू करायला सांगितलं,
सारंगने सर्व टेस्ट करून दाखवल्या, सर्व एक्सप्लेन केलं, नंतर जयाने तिचे सर्व प्लॅन सांगितले.
सानू तर चकित झाली होती सर्व ऐकून, म्हणाली,
“अरे तुला कुणाची गरज नाही, इट्स ग्रेट. नो वर्ड.”
सुमंत, “मी उद्या प्रेस बोलवतो. “
सानू, “पण का?”
“लेट्स टेक कोनफेरन्स! ह्या रिसर्चला ओपन करूया आपण! “
“नो, लेट्स पेटेन्ट इट फर्स्ट. हा रिसर्च आहे, आधी त्याच्या नावाने होवू दे.“
“सारंग फाईल कर, आणि सेट अप तयार कर, जया तुझं मार्केटिंग करेल. पण आधी लॉक इट. अरे कितीतरी कंपन्या विकत घ्यायला तयार होतील हा रिसर्च,ऑटोमोबाईल मध्ये किती स्कोप आहे ह्याला. किती चिप मटेरियल मध्ये टायरच मटेरील तयार झालंय हे. ते काही नाही, अजून सहा महीने काम करा आणि सेट अप तयार करा. ह्या सेट अपला उभं करायला कुठलीच बँक फीनान्स साठी नाही म्हणू शकत नाही. तुझा स्वत:चा सेट अप होईल हा. थोडा मोठा विचार कर. तुला काय आजच पैसे नकोय, आम्ही आहोत अजून, जरा अजून मेहनत घे आणि सगळा सेट अप उभा कर. ही जागा लहान आहे नाही... तुला जरा मोठी जागा हवी.”
सुमंत आता बोलला, “अरे आपली जागा आहे इथून शंभर किलोमीटरवर.”
“दादा पण ती माच्या नावावर आहे.“
“हुमम, मी बोलते माशी.” सानू म्हणाली.
सुमंत, “आधी तू त्या जागेला विचारात घेवून सगळा प्लॅन तयार कर, आणि त्याच वेळी हा रिसर्च रजिस्टर कर. मग आपण प्रेस बोलावू. हो ना सानू.”
“हो. सुमंत चेक बुक दे त्याला.”
सुमंतने चेक बुक, साईन करून सारंगच्या हातात दिलं, सानू म्हणाली,
“हे सुरुवातीच भांडवल आहे, परत करशील, नाहीतर गाठ माझ्याशी आहे.”
सगळे हसले, सारंग खूप खुष होता, सानूच्या पायाजवळ आला,
“वहिनी, मला समजून घेण्यासाठी मी आभारी आहे तुमचा, ह्या राणीची सत्ता ह्या घरात आम्हाला प्रिय आहे.”
आज पहिल्यांदा सारंग आणि जयाने सानू आणि सुमंतचे पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले होते.
राणे पॅलेसमध्ये बदलीचे वारे वाहत होते. सारंगी तिच्या नवऱ्या सोबत राहायला गेली होती. जया आता खूप बिझी झाली होती. सानूने भारतीय कुक ठेवला होता. घरात ती आणि जया आपल्या आपल्या कामात मग्न असायच्या, पण आवर्जून सकाळी सोबत बसायच्या, गप्पा शेयर करायच्या. श्री रुळाला होता. आता तो घरात मोठा होता. सानूची राणी म्हणून सत्ता सर्वांना प्रिय होती.
सावंत वाडा -
सहा महीने झाले होते. राणी ऑफिसच काम शिकत होती, ह्या वेळी तिची पाळी चुकली होती. घरात जरा वातावरण आनंदी होतं, तिच्या सासुचा तर उत्साह वाढला होता, आज रागिणीच्या मुलाच बारसं होतं. घरात पाहुणे होते. राणीच्या सासूला सुनेला दिवस गेले आहेत ही बातमी अजून कुणाला सांगायची नव्हती. ही बातमी तर मोहिते निवासात सुद्धा माहित नव्हती. राणी तिच्या खोलीत तयार होत होती, तोच आई आली,
“राणी, काही काम करायचं नाही, मी बोलवलं कि ये, बाकी काही करू नकोस.”
“अहो पण आई, रागिणीला कसं वाटेल.”
“ते मी बघेल, पण माझ्या सुनेला काही त्रास नको. “
“आई मला काही त्रास नाही आहे.“
आईने राणीची साडी बघितली, आणि म्हणाली, “राणी ही साडी किती वजनी आहे बाळा, काही हलकसं घाल.”
“अहो आई मला काही प्रोब्लेम नाही, आणि ही साडी तुम्ही घेतली होती मला, विसरलात काय, रागीणीच्या मुलाच्या बारश्यात घालायला.”
“अग हो, पण तेव्हा कुठे माहित होतं आपल्याला. आणि कुणाला बोलायचं नाही, अजून काही तीन महिने झाले नाही.
“आई.... “
“नकोच बोलू, हवं तर मी माफी मागून घेईल. आपण सोबत जावू मोहिते निवासात ही बातमी घेवून.”
राणी हसली, आणि हो म्हणाली.
रागिणीच्या घरची मांडली आलेली होती. राणी तशी सर्वाना ओळखीची पण ती दिसत नसल्याने तिला सारखं विचारल्या जात होतं. आरती अरुण आले होते. त्याच्या सोबत सुद्धा बोलतांना राणीची सासू सोबत होती. पण जराही काही जाणवू दिलं नव्हतं.
कथेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचे आधीचे भाग पेजवर आहेत
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments