जोडीदार.... प्रवास तुझा माझा.... भाग ३७

 जोडीदार.... प्रवास तुझा माझा.... भाग ३७मोहिते निवास
दोघेही परत आले. मोहिते निवास बघताच अरुण आणि आरतीच्या डोळ्यात चकाकी आली होती.
घर आवरलं, दोघेही थकले, अरुणने आरतीसाठी पाणी आणलं,
“अरु कुठेच करमत नाही ग इथल्या शिवाय, आज समजलं सदा घर का सोडत नाही. संगीताला जाऊन दोन दशक होतील पण अजूनही त्याला ती त्या घरात असल्याचा भास होते आणि तो घरात रमतो.”
“हो ना हो, आता मुलांच्या घरी ते आपली मुलं कमी आणि जोडीदार जास्त वाटतात. आपण कुठे मध्ये मध्ये करायचं. आणि आता तर अंकित जर्मन शिकतोय, जर्मनीला जाणार म्हणे तो.”
“तुला अनु बोलली का?”
“हो, तिने सांगीतलं मला, त्याला ऑफर आहे जर्मनीच्या प्रोजेक्टची.”
“घ्या लेकाने सांगीतलं नाही एका शब्दाने.”
“तुम्ही तिकडे नेहमी टांगल्या चेहऱ्याचे बसून असायचे म्हणून बोलला नसेल हो. मी अनु सोबत असायची तिने सांगीतलं मला. तशी माझी सून सगळं सांगते मला. आणि आता तो आणि ती काही वेगळी नाही ना.”
“हुम्म्म, शेवटी सुनबाई कामाची ना. मुलगा तर बाहेरचा असतो, सून आपली हवी ग, आणि अनु आहेच तशी, आपल्याला समजून घेते. म्हणजे तुझा लाडाचा लेक जाणार तर विदेशात. बहिणीच्या मागे.”
“हो जाणार आहे.”
“आणि अनु?”
“अनु सध्या नाही जाणार?”
“मग येणार आहे का ती इकडे.”
“ती बोलली, अंकित खूप काही वर्ष भरासाठी नाही जाणार आहे मग ती गेली तरी बघायसाठी जाईल. आणि कुठे राहायचं हे अजून तिने ठरवलं नाही, तिचा जॉब आहे मग कस करायचं सांगेल ती, आणि आपण तर आताच तिकडे राहिलो नाही तर प्रश्न आलाच ना तिला.”
“मला नाही आवडलं बंगलोर.”
“अहो पण मुलाचं घर होतं ना, काय सारखं आजारी दिसत होता तुम्ही. जावूद्या. शेवटी आता आपणच आपल्याला. चला मी तर आज पासून माझी सगळी राहलेली काम करणार आहे.”
“हो ग, आज पासून मी तुझं ऐकणार आहे.”
“राहूद्या हो, आजवर माझंच ऐकलं तुम्ही, आता मन मर्जी करा, आपण आजकालच्या मुलांसारखे कुठे जगलो, आपल्या मर्यादा वेगळ्या होत्या ह्यांच्या वेगळ्या आहेत. आपलं आयुष्य सीमित होतं ह्यांच अफाट आहे. बघा ना सानूने श्रीला आपलंस केलं. नाती जुळवून आणली.”
“हो आता ते तसा विचार करतात ना, आपण नाही केला. आपल्या भूमिका आपल्या मुलासाठी होत्या. मुलं म्हणजे जन्माला घातलेलीच, मग अपेक्षा वाढल्या. आजच्या मुलांच नाही तसं, आता बाळू काय म्हणतोय, बाळाचा विचार तीन वर्षाने करणार, तू म्हणाली, मग काही प्रॉब्लेम असला तर, तर बोलला काही हरकत नाही, दत्तक घेईल मी. नाही तर होईल ना दहा वर्षाने.”
“हो ना, आपल्या वेळी लोक मूल झाली कि नातं घट्ट, असं समजत होतो आपण.”
“तोही विचार योग्य होता ग, मुलं डोर असतात जोडीदाराच्या नात्याची.”
“काही नसते हो, आता कुठे कुणी आहे आपल्याजवळ. डोर बिर काही नसते, आपल्याला हवी असतात मुलं.”
“चल तुझंही बरोबर. आपण आपल्याला आता, कुणाचा विचार करायचा नाही, सगळे मजेत आहेत मग आपणही मजेत राहायचं.”
दोघांनीही परत नवीन सुरवात करण्याचा निर्णय घेतला होता. आता रोज नवीन काय करायचं हाच त्यांचा विचार चालत असायचा. सगळीकडे दोघं जात असत, नात्यात बारसं, साखरपुडा, लग्न काहीही असो दोघेही जोडीने हजेरी लावत असतं.
आज नात्यात दूरच्या भावाच्या मुलाच्या मुलीच्या मुलीचं बारसं होतं. अरुण आणि आरती दोघेही पोहचले होते. आता मुलांची कामगिरी एवढी होती कि त्यांचा मान सर्व नात्यात भारी होतो. आधी अपमानाने बोलणारे आज स्वागत करत असत.
खास अरुण आरती येईपर्यंत बारसं थांबलं होतं, आरतीला मोठ्या मानाने बाळाचं नाव ठेवायला लावलं.
अरुण बोलला, “सदाशिव तुझ्या मुलाच्या लग्नात यायला नाही जमलं होतं रे, पण तुझ्या नातीच्या बरश्यात आलो बघ.”
“अरे हे तर असं झालं गोगलगाई बारश्याला निघाल्या.” सदाशिव अरुणचा भाऊ बोलला.
सगळे हसले, अरुण म्हणाला, “तेव्हा जवाबदारऱ्या खूप होत्या. मुलं शिकत होती. आज मुलं आपल्या आपल्या जोडीदारा सोबत आनंदाने आहेत मग आम्ही दोघांनी राहलेले सर्व कार्य जोडीने पूर्ण करण्याचं ठरवलं रे. आता काही काम नसतं बघ, पण बँकेत पैसे जमा होतात. मोबईल रीचार्ज झाला असतो. मुलाकडे शब्द जरी काढला की आज बाहेर जाणार तरी ड्राईवर घरी येतो... सगळं आहे, मग मुलांची अपेक्षा करण्यापेक्षा आम्ही आमचं त्या वेळी मनात असूनही सुटलेलं जमेल तेवढं पकडण्याचा प्रयत्न करतो आहोत.”
सोहळा संपला, दोघेही घरी आले होते. आरतीने पाणी गरम करून आणलं आणि दोघेही पाय पाण्यात टाकून टीव्ही बघत बसले. आरती म्हणाली,
“अहो शोले लावा ना, मागे बाळूने सगळे जून सिनेमे टाकून दिले होते ना त्या कशात तरी. त्या काळ्या पेटीत.
“त्याला हार्ड डिस्क म्हणतात. चल माझ्या हेमामालिनीला बघतो आता आणि तुला बरं सुचलं ग.”
“अहो, किती वेळा विचार करायचे मी लग्नाआधी पण नाही जमला हा सिनेमा बघायला. मग तुम्हाला म्हणाले होते तर तुम्ही मला नाटक बघायला घेऊन गेला होता. मग पुढे तो थेटरमधून निघून गेला.”
“थांब लावतो. जरा वेळ पाय शेकुदे आणि मी काही खाणार नाही ग आता. “
“बरं, मग सूप करते, राणीने शिकवलं आहे मला कसं करायचं तर.”
“नको ग बाई. ते ती आली कि करेल. तू काही नवीन उपक्रम करू नकोस. आता ह्या वयात मला पचायचे नाहीत. तुझं तुला जे जमते ना ते कर. “
“जावूद्या हो, काही नवीन करावं म्हटल तर तुमचं आपलं सुरू असते, एवढे वर्ष तर माझ्या हातच बोट चाटत खाऊन काढले आणि आता नको म्हणता.”
“तू काहीही कर पण ते सूप नको करूस. “
“मग म्यागी?”
“तेही नाही. ताक असेल ना घरी, तू मठ्ठा कर, मस्त करतेस.“
“शी बाई, काही नवीन करू देत नाही हा माणूस. मला तर सूप करायचं होतं.“
“कर, माझ्यासाठी नको करूस. मला काहीही नको मग.”
“राहीलं, आधी सिनेमा लावा नाहीतर तिथेच घोरायला लागाल.”
दोघेही सिनेमा बघत बसले.
सऱ्यांचे दिवस जणू वाऱ्याच्या पांखाणी उडत असायचे पण मोहिते निवासात दिवस जात नसायचा. आरती रोज काय करावं म्हणून विचारात असायची. मुलांच्या फोनची वाट बघण्यात वेळ जायचा. कधी भाजीच आण, तर कधी नुसतं दूध आणायला दोघे जायचे. अरुण त्याच्या मित्रांना घरी बोलवत असायचा, आरती जमेल ते खायला करत असायची आणि मैफिल रंगत असायची. वेळ काढणं सुरू होतं दोघांच. आता अनुच्या जिद्दीने आईने घरी बाई लावली होती. आणि आईचा वेळ तिच्यामागे जात होता, मग तिच्या घरच्या गप्पा आणि सगळं गल्लीतलं राजकारण ऐकण्यात अरुण आणि आरतीचा वेळ जात असायचा.
राणे पॅलेस
आज सानू आणि सुमंतच्या लग्नाचा वाढदिवस होता, घरी जंगी पार्टी होती आणि सारंगची कोनफेररेन्स होती. सानू सुमंतने आज ऑफिस बंद ठेवलं होतं, घरातले सर्व तिकडे होते. रिसर्च ओपन झाला होता. खूप प्रशांश झाली होती. कंपन्या स्वत: हून त्या रिसर्चला वास्तवात आणण्यासाठी पुढे येत होत्या. आणि तेवढ्यात सारंगने त्याच्या कंपनीची घोषणा केली. सगळी कडे कौतुक होत होतं. राणे कंपनीचा विस्तार वाढला होता.
घरात सानूचा दबदबा वाढला होता. तिच्या शब्दाला पहिला मान असायचा. सारंग जया आणि सारंगी स्टेविन नेहमी सानूशी चर्चा करायचे. सानूने व्यवहार वेगळा ठेवला होता आणि नाती वेगळी. तिच्या ह्या निर्णयावर कुणालाही असहमति नव्हती. घरात घरपण आलं होतं. घरात सण वार एकत्र होत असत. जया पार बदलली होती, तिच्याकडे जराही वेळ नसायचा. मुलांना बडी मॉम सगळीकडे लागायची, जयालाही त्यात काही वावगं वाटत नसायच आणि सानूला नाही. दोघी ऐकमेकिंचे शेडूले सांभाळत मुलाचं करत असत. घरात नोकर सानुने वाढवले होते. मासाहेब जरा थकल्या होत्या, आजारपण लागलं होतं त्यांना. सारखं सु शी लागत असल्याने त्यांच्यासाठी नर्स घरात ठेवल्या गेली होती. जया किंवा सानू घरात कुणी ना कुणी राहत असत.
शिवाय, सारंगला सानू आणि सुमंतने शेजारची जागा दिली होती, आणि तिकडे घराचं काम सुरू होतं. वर्षभरात ते वेगळे राहणार होते. सारंगचा जम बसत चालला होता, आता वर्षभरात प्रोडक्शन बाहेर मार्केटमध्ये येणार होतं, बुकिंग सुरू झाली होती. मार्केटिंग जया बघत असल्याने ती सारखी बाहेर राहायची आणि सानूच मत घेत असायची. दोघीत मैत्री वाढली होती.
त्या दिवशी जया आणि सानू बोलत बसल्या होत्या तोच सानू अचानक भोर येवून पडली, जया घाबरली, सुमंत लगेच घरी आला, सारंग डॉक्टरला घेवून आला, आणि वार्ता समजली, सानू आता आई होणार होती. मग काय राणे पॅलेस आनंदात न्हावत होतं.
सानूला दिवस गेल्याची वार्ता आता सगळीकडे होती. सगळ्यात मागून लग्न झालेलं आणि आधी चान्स घेतल्याने सगळीकडे कौतुकपण होतं तीचं.
थेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचे आधीचे भाग पेजवर आहेत
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल-

Post a Comment

0 Comments