लग्न- जेंव्हा भ्रम तुटतो ...भवऱ्या सारखा ह्या फुलावरून त्या फुलांवर उडणारा रितेश. रागिणीशी लग्न जुळलं म्हूणन खूप वानवायचा. कही मुलींना नाकारल्या नंतर रागिणीच्या गोऱ्यापान रुपाने घायाळ केलं होतं त्याला. आपल्या सारख्या रुबाबदार माणसाला रागिणी सारखी रूपवान आणि गुणवान बायकोच हवी हा त्याचा मनाला शब्द होता. मीचं तिच्यासाठी परफेक्ट आहे हा विचार त्याला दिवसें न दिवसं तिच्यासाठी वेडा करत होता. मध्यम वर्गीय कुटुंबातून कष्टाने आणि चिकाटीने इथवर पोहचला होता मग तो मान दिसत होता त्याच्यात. सॉफ्टवेअर फील्ड मध्ये टीम लीडर होता. रितेशचा घरी आणि ऑफिस मध्ये दरारा होता. घरात त्याचा कुणी शब्द मोडत नसे. अगदीच टापटीपपणा आणि सगळं कसं वेळेवर  नीटनेटकं  हवं असायचं. साहेबाचा तोरा असा कि हमसे हे दुनिया सारी....

रागिणी सुकुमार रुपाची राणी, नाक मुरडत कही मुलांना नकार तिने स्वतः दिला होता. स्वतःला जणू अप्सरा समजायची.... आणि होती तशीच, गुणांची खाण, जी गोष्ट हातात घ्यायची हमखास पूर्ण करायची, स्वयंपाकात सुगरण, कलेची आवड, मेकअप सुंदर करायची आणि कपड्यांचा चोईस तर नंबरी होता तिचा. इंग्रजीत MA होती, भल्या भल्यांना फॉरेन अकॅसेन्ट मध्ये गुंडाळायची. लग्न रितेशशी जुळलं आणि आज मे उपर आसमा नीचे असं काहीसं होतं तिचं. माझ्यासारखी मीच जी रेतेशसाठी फिट आहे हा नाकावरचा नखरा अगदीच रुपाला फुलवत होता.

लग्नाच्या मांडवात दोघेही जोडीलाजोड होते. मेड फोर इच अदर हीच कमेंट योग्य होती त्यांना. दोघेही खूप खुश होते. लक्ष्मी नारायणाचा जोडा दारात आला आणि सासूने तोंडभरून कौतुक केलं. रीतसर कौतुकात दिवसं भराभर गेलीत आणि संसारचा गाडा पहिल्या स्थानकावर उभा राहिला. आज घरात कुणीच नव्हतं, घरचे नात्यात दूर लग्नाला गेलेले.

रागिणीने छान बेत केला, सुंदर तयार झाली, रितेश घरी आला आणि मग दोघेही लाडी गोडीत बाहेर फिरायला गेले. समोरून सुंदर गुलाबी रंगाची साडी घातलेली स्त्री येत होती, आणि रितेश बोलला, "वा!!काय सुरेख साडी, आणि मचिंग बघ ना, किती सुंदर केलंय."

रागिणीने डोळे वटारले, तर परत रितेश म्हणाला, "अग साडी छान होती नाही? म्हणून ती खुलली, तशी तुझी साडी पण खूप सुंदर आहे पण जरा मचिंग घातलं असतं ना सगळं तर शपत, काय दिसली असती तू !"

"रितेश, अरे आता विरुद्ध घालण्याची फॅशन आहे. कळत तर नाही काही? यू नो, ऑल बॉयज आर सेम.. .. शेमलेस ... "

झालं, रितेश बस इथे मार खायचा, हे अमेरिकन अकॅसेन्ट  त्याला जमायचं नाही.. बोलायला सुरुवात केली आणि गळबळला ...

"ये तू ना मराठीतंच बोल....राहूदे तुला नाही जमायचं." रागिणी चिडवल्या सारखी म्हणाली.

"ये अमेरिकन क्लायंट हॅंडल करतो मी, समजलं?"

"हमम .. बिचारे ..काय कळत असेल त्यांना देव जाणे!"

"आपल्याजवळ ठेव ..मराठी माणूस आहे मी!"

"असं .. मराठी माणूस स्त्रीला मान देतो....हे असं करत असणार तू मुलींना, म्हणूनचं मुली पसंत करत नसतील तुला"

"तू तर केलं" आणि तो मिस्कीलपणे हसायला लागला.

"मला कुठे माहित होतं तू असा गबाळी इंग्रजी बोलतो म्हणूंन....मला तर टीम लिडर आहेस असंच सांगितलं होतं"

बघता बघता... वातावरण बदललं ..हलकासा पाऊस पडत होता ... मूड जरा ठीक व्हावा म्हणून रागिणी रितेशला म्हणाली, "चल जाऊदे, पाऊस पडतोय.. भिजायचं का..पहिला पाऊस रे आपला.... "

"ये बाई, मला अजिबात पाऊस सोसवत नाही.. "

तरीही रागिणींनी रितेशला रेस्टोरेंट मधून ओढलं आणि हलकासा पाऊस होता.. फार फार तर केस ओले झाले होते आणि रितेश शिंकायला लागला, तसा तो गाडीत जाऊन बसला.... रागिणीला एकटच कसंस झालं मग तीही पाय आपटत गाडीत जाऊन बसली... लागलीच घरी आले, "अग रागिणी चहा ठेव ना!"

रागिणीलाही हवाच होता मग तिनेही म्हटलं, "चल, तुला ना स्पेशल चहा पाजते, माझ्या बाबांना माझ्या हातचा मसाला चहा अगदीच आवडतो.. छान असतो... सर्दी होतं नाही त्याने... "

रागिणीने अगदीच उत्सहाने चहा केला, मस्त क्रिम बिस्कीट काढली आणि चहा घेऊन बेडरूम मध्ये पोहचली, तेवढ्या वेळात राकेश ब्लॅंकेट गुंडाळून हुळहुळत बसला होता, रागिणीला हसायला आलं, हसतच तिने चहा रितेशला दिला. चहाच्या कपाची उब अनुभवत रितेशने एक सिप घेतला आणि लगेच बेसिन कडे धावला,

"हा कसला चहा! माझी आई कसा मस्त करते..."

रागिणीच्या सुगरण पणाला सर्व नात्यात तोड नव्हती आणि आज ती फेल झाली होती, मस्त कडक, आले विलायची आणि सिनॅमोन टाकलेला चहा कधीच रितेश प्यायला नव्हता. थंडीच्या हळबळीत रितेश म्हणाला, "सुगरण आहेस असं सांगितलं होतं मला... इथे साधा चहा करता येत नाही तुला.. राहूदे.. मी गोडी घेतो "

"हो तू गोडीचं घे, कधी सिनॅमोन चहा घेतला का.. .. मीही कुणाला बोलते, अरे दालचिनी टाकलेला चहा उत्तम असतो सर्दी खोकल्याला .. तुला काय कळणार?

चिटणीसारख्या भांडणात दिवस निघून गेला.

सहा महिने झाले असतील, रितेशला दिल्लीला प्रोजेक्ट साठी जायचं होतं मग दोघेही दिल्लीत शिफ्ट झाले.  राजा राणी संसाराला लागली होती. घर लावण्या पासून होणाऱ्या कुरकुरीत रितेशला कळलं होतं, कि त्याचं घरात काहीच चालत नाही, ऑफिस मध्ये भल्या भल्यांना गप्प करणार बायको समोर गुमान गप्प असायचा. रागिणीने घरासाठी निवडलेले पर्दे रितेशला मुळीच आवडले नव्हते पण घरात येणार प्रत्येक त्यांची स्तुती केल्याशिवाय राहायचा नाही. लग्न समारंभात प्रत्येक मुलगी माझ्या कडे बघते आहे हा भास आता रितेश मध्ये राहिलाच नव्हता कारण रागिणी तिच्या जिभेच्या कात्रीने कधी त्याचे पंख काटेल हे त्यालाही कळणार नव्हतं. स्वतःच्या मेकअप साठी नात्यात नावाजलेली रागिणी आता समारंभात नवीन मुलींकडून धडे घेत होती. दोघांनाही लग्नाने अगदीच फोल पाडलं होतं

लग्न नावाचं शस्त्र स्वतःचा भ्रम तोडण्यासाठी पुरेसं होतं....पण लग्न नावाची कात्री आपले भ्रम काटन्यासाठी हवीच असते नाही का? त्यातही एक वेगळीच मज्जा आहे...काय आहे ना.. सुसाट सुटणाऱ्या गाडीला लग्न नावाचं ब्रेक हवाच असतो कि...

काय मित्र मंडळींनो... तुमचाही असा भ्रम तुटला असेलचं ना ..लग्नानंतर ....माझे तर खूप तुटले ...

 

 .....................

©️उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

धन्यवाद! 🙏🙏

(फोटो साभार गुगल )

 

Post a Comment

0 Comments