ओव्हरटाईम… द कॉर्पोरेट लॅडर भाग -१७
समृद्धीने आपल्या बॅगमधून लॅपटॉप काढला आणि तिच्या टेबलवर ठेवला. वहिनी तिच्या खोलीत शिरली,
समृद्धीने जराही लक्ष दिलं नाही, तिने लॅपटॉप सुरु केला, चाराजिंग केबल लावला, आणि कामाला लागली होती. तशी वहिनी परत बोलली,
काय बोलते आहे मी, अगं सत्यजित आहे घरी. तुला तो हॉलमध्ये दिसला नाही का?”
समृद्धीने हलकं उत्तर दिलं, “नाही ना गं, आणि मला काम आहे गं वहीने....”
वहिनी तशीच तिच्यापुढे उभी होती. “नको ना अशी मध्ये मध्ये त्रास देऊ. जा तू, मी माझी जेवण करेन.” समृद्धीचे त्रासलेले शब्द वहिनीला काही कळत नव्हते. तरीही ती हक्काने ओरडली, समु, जेवण झाल्यावर कर सारं, बोल गं त्याच्याशी. तुझी दोनतासापासून वाट बघत आहे तो.”
आता मात्र समृद्धी भडकली, “मी बोलले होते का त्याला वाट बघायला... जा म्हणावं, उगाच कशाला माझी वाट बघतो. नाही करायचं गं वहिने त्याच्याशी लग्न.”
वहिनीने तिला इशाऱ्यात गप्प बसायला सांगितलं, आवाजाने दादाने आवाज दिला, वहिनीने समृद्धीच्या खोलीचे दार ओढले आणि ती हॉलकडे जणू काहीच झाले नाही असं दाखवत निघून गेली.
समृद्धीने लॅपटॉपतर उघडला होता पण तिला काम करायचं नव्हतं. आता जी ती वहिनीसोबत वागली होती त्याचं तिला वाईट वाटत होतं. तिने लगेच लॅपटॉपबंद केला आणि हॉलकडे निघाली.
ती दिसताच वहिनी म्हणाली, "हा ही काय आली समु, आज जरा जास्तच काम झालं तिला, घरी घेऊन आली आहे काम, आपण जरा लवकर जेवणं आटपून घेऊ.”
बोलता बोलता तिने आवराआवर केली आणि पंगती बसल्या. समृद्धीला मनात नसताना सुद्धा सत्यजीतसोबत जेवायला बसावं लागलं. त्याचं हळुवार घरात वावरणं आणि संवाद जणू तिला त्याच्याकडे आकर्षित करत राहिला. ती शांत झाली होती. जेवणं झाली आणि ती तिच्या खोलीत आली. सत्यजित अजूनही दादाशी गप्पा करत होता.
समृद्धी प्रेझेन्टेशन तयार करण्यात मग्न होती. तशी तिच्या दारावर थाप पडली, वहिनी असेल म्हणून तिने लक्ष दिलं नाही. सत्यजित येऊन तिच्या जवळच्या खुर्चीवर येऊन बसला, तशी ती दचकली, "अरे तू कसा?
“अगं दचकतेस कशाला. बसं, काम कर, मी मदत करू का? म्हणजे मला जमतं हे.”
ती काहीच बोलली नाही, पण नाही म्हणता म्हणता, सत्यजितने तिला मदत केली आणि तिने शेवटी ते प्रेझेन्टेशन मंजिरीला पाठवले. ११ वाजले होते. तो तिला म्हणाला, “ओव्हरटाईम टाक आज तू.”
ती हसली, “अरे मी अजून असे केले नाही. मंजिरी मॅडम काही बोलल्या तर...”
“का बोलणार? जे नियमात आहे ते करायचं, काम केलं आहेस तू. नक्की टाक..... ती काहीच बोलणार नाही.”
बोलता बोलता त्या ती गेटपर्यंत सोडायला आली, तो निघून गेला. आणि तिने दीर्घ श्वास घेतला. हॉलमध्ये आली तर वहिनी उभी होती, दोघींची नजर भिडली, पण समृद्धी काहीच बोलली नाही.
सकाळी ती ऑफिस मध्ये आली आणि सागरने तिला बोलावून घेतलं, “समृद्धी मला ही फाईल परत करेक्ट करून पाहिजे. यातला डेटा जुळत नाही आहे. माझ्याकडे वेळ नाही आणि मला आता मंजिरी मॅडमकडे जायचे आहे.”
आता मात्र समृद्धी मनातून चिडली, “मी तर सगळा डेटा बरोबर केला होता, ह्यालाच काय ते येत नाही.” तिचं पुटपुटनं जणू शेजारच्या शनायाने ऐकलं असं समृद्धीला वाटलं, शनाया तिच्याकडे बघून हसली,”काय गं झालं का त्या नवीन चमच्याचे काम.”
समृद्धी आता हसली, शनाया तू काही तर विचार करून बोलत जा, कुणी ऐकलं तर काय विचार करेल.”
“करू दे गं, आपण कितीही कामं करा आपल्याला काही हे ग्रेड वाढवून देणार नाहीत. ह्याचे मात्र असे वर्षभरात वाढतील.”
शनाया असं काही एकदम बोलले असं समृद्धीने मनातही आणलं नव्हतं, पण आता तिला ह्यावर विचार करायचा नव्हता. तिने लगेच एक्सेल फाईल उघडली, आणि तिला तिला ती बरोबर वाटली, तेवढ्यात माधवने तिला बोलवलं, ती लगेच गेली, तिकडे सर्वच होते, माधवने तिला फाईल उघडायला लावली आणि काय सागर जे बोलत होता ते काही खरं नव्हत हे सगळ्यांना अगदीच समजले. लगेच मंजिरीने पटापट स्क्रीनशॉट घेतले आहे प्रेझेन्टेशनमध्ये टाकले. काही वेळात मंजिरी आणि माधव बाहेर मिटिंगसाठी निघून गेले. सागरने समृद्धीला सॉरी म्हंटल, कारण त्याने फिल्टर लावून डेटा बघितला नव्हता आणि घाईत तोही असा बोलून गेला होता. जरा वेळ समृद्धी हलकी झाली.
काही वेळात रुद्रने तिला बोलावून घेतलं आणि काम समजावून सागितलं, सोबतीला त्याने नवीन जॉईन झालेल्या मंजुषालाही घ्यायला सांगितले. समृद्धी तिच्यासोबत काम करत होती. तशी मंजिरी ऑफिसमध्ये पोहोचली. इनोव्हा टेकच्या स्टाफने केलेल्या सर्व तक्रारी जणू तिच्या मंदूत फिरत होत्या. तिने रुद्रला बोलावून घेतेले, आणि बजावलं की आज जेवढे इन्सिडेंट मिळाले आहेत तेवढे सगळे टेक्निकॅल टीमकरून पूर्ण करून रीपोर्ट तयार करायचा.
रुद्रने त्याचे काम समृद्धी आणि मंजुषावर सोपवले, त्यांना दोघींनाही टेक्निकल टीमचा फॉलोअप घेयायचा होता आणि सारे इन्सिडेंट आजच बंद करून घ्यायचे होते.
समृद्धी आणि मंजुषा दोघींनाही ह्या कामाचा अनुभव नव्हता, पण काम कारायचे होते. समृद्धी सावीकडून हेच शिकत होती पण अजून काही परिपक्व झाली नव्हती. नवीन काम बघून तीही जरा गोंधळली. त्यात हे काम मंजिरीने रुद्रला तिला का द्यायला सांगितले हेच मुळात तिला कळत नव्हते.
दोन तास तिला काम समजून घेण्यात गेले. आणि अचानक तिला गणपत तिच्या पुढे उभा दिसला, “मॅडम माधव साहेबांनी बोलवलं आहे.”
तीही दचकली, तिला तर माहितच झाले नव्हते की माधव ऑफिसमध्ये परत आला होता ते, ती उठली आणि तडक लॅपटॉप घेऊन कॅबीनमध्ये पोहोचली. ती दिसताच माधव बोलला, “गुड जॉब समृद्धी, तू प्रेझेन्टेशन उत्तम तयार केले होते. परफेक्ट ! आणि सर्व डेटा अगदीच तंतोतंत होता. यु सेव डे. धन्यवाद!!”
तशी समृद्धी हसली, तिला तर हे कुणीही बोललं नव्हतं, काय बोलावे तिला कळत नव्हतं. ती अवघडली होती तर तो परत म्हणाला, तुला काही बोलायचे आहे. मी तुला हेच धन्यवाद देण्यासाठी बोलावले होते.”
समृद्धीला मनातून तिच्या पोस्टसाठी बोलायचे होते, शब्द जिभेवर लोळत होते ओं ओठातून बाहेर येत नव्हते. तशी ती पटकन म्हाणाली, “नाही सर!”
माधवने कॉफी मागवली होती, गणपत घेऊन आलेला, समृद्धीला जरा परत अवघडेल, तिने कॉफीचा कप घेतला, आणि अवघडत ती पीत होती.” माधव तिला बघत कॉफीची मजा घेत होता, तसा बोलला,” घरी कोण कोण आहे गं तुझ्या?”
“अ... दादा, वहिनी, त्यांची मुलं आणि मी...”
“ओ, आणि आई बाबा.. तुझे.”
“ते दहा वर्षाआधी बस अपघातात गेले, तेव्हापासून दादा आणि वहिनी माझे आई बाबा आहेत.”
“ओ, म्हणजे लाडाची बहिण आहेस तर भावाची....”
समृद्धी हसली.. तिची कॉफी झाली होती आणि काम खूप होतं. ती उठली, तसा तो परत म्हणाला, “ओके! एक काम आहे, मी तुला काही इमेल फॉरवर्ड केले आहेत. जरा बघून रीप्ल्ये कर.”
ती परत अवघडली,”मी कशी करू त्यावर रीप्ल्ये...”
“तुला मी फॉरमेट पाठवला आहे तसाच करायचा, फक्त शीटनुसार कंपनीचे नावं बदल. एवढंच.”
तिने मान डोलावली तर तो हसत म्हणाला, “थॅंक्स फॉर द हेल्प... “ आणि निघून आली, मंजुषा तिची वाट बघत होती, दोघी अजूनही काम समजतच होत्या, सहा वाजले आणि समृद्धीने टेक्निकॅल टीमला मिटिंगचे आमंत्रण पाठवले. नंतर त्यांच्याकडूनही तिला काही नवीन गोष्टी समजल्या. ते समजून घेण्यात परत एक तास गेला. मंजुषाला निघायचे होते, तिची आई हॉस्पिटलला भर्ती होती, आणि समृद्धी तिला थांबवू शकली नाही.
रात्रीचा नऊ वाजले होते. ऑफिसमधली लाईट्स अजूनही चक्क सुरु होते. तेवढ्यात तिच्या स्क्रीनवर टीम्स नोटिफिकेशन आलं, “घरी जा आता, काम उद्याही होईल.. ते काही पूर्ण होण्यासाठी नसते.”
ती नुसती हसली. ओवरटाईम झाला होता... पण तो मिळणार की नाही हेही अजून पक्के नव्हते. आणि समृद्धीला मनातून वाटू लागले, “हल्ली मी सगळीकडे ओव्हरटाईम करत आहे, पण मोबदला मिळत नाही आहे.”
खरं तर होतं ओव्हरटाईम फक्त ऑफिसमध्ये नाही, तिच्या आयुष्यातही सुरु झाले होते... कामाचं, नात्यांचं, अपेक्षांचं आणि कुठेही ‘ऑफ’ बटण नाही तिला दिसत नव्हतं.
to be continued...
----पुढील भाग लवकरच....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AIt

0 Comments