अंतिम वर्षाचे पेपर सुरु होते.
संधिका खूप अभ्यासात होती. वरच्या माळ्यावर ती अभ्यास करत होती तर तिला भगवंत काका
येतांना दिसले, भगवंत काका लग्न जुळवन्याच काम करत असत, अभ्यास करता करता संधिका
विचलित झाली, मनातच बोलली, “हे काका कशाला आले आता, बाबाने सांगितलं ह्यांना कि
आईने, शी बाई, आईला ना जरा धीर धरवत नाही, आता माझी परीक्षा तर वोवून जावू द्यायला
हवी होती ना.”
ती भरा भरा पायऱ्या उतरून दाराशी
येवून उभी राहिली, हृदयाचे ठोके वाढले होते, कान तिने टवकारले होते.
तर बाबा म्हणाले, “अहो भगवंत रावं, माझ्या
संधूची परीक्षा झाली नाही.”
बाबांचा हा शब्द ऐकताच संधिकाला धीर
आला, तिने परत आता आईच्या शब्दा कडे लक्ष टाकलं
आई म्हणाली, “बघा, मुलाला संधिका
पसंत आहे म्हणता, पण थांबा म्हणव त्यांना, आम्ही काही मुलीला सांगणार नाही तिची
परीक्षा झाल्या शिवाय.”
भगवंत काका म्हणाले, “अहो, मुलानेच
सांगितलं आहे असं, कि संधीकाला अजून सांगू नका, बसं बोलून ठेवा म्हणाला मला, बाकी
काही नाही, अहो मुलगा समजुदार आहे... अजून काय हवं.”
बाबा, “हो आलं लक्षात ते, आम्हाला
हरकत नाही, पण हरकत हे आहे कि आम्ही आता संधूला सांगू शकत नाही.”
“हो मी कुठे म्हणतोय, मी तर हा इकडे
आलो होतो साने कडे बसं तुमची फटफटी बाहेर दिसली मग आलो भेटायला, असचं समजा हो...चला
मी निघतो, हा आपल्या संधिका ची परीक्षा झाली कि मी येतो रीतसर स्थळ घेवून...”
संधिका तशीस पायऱ्या चढत वरच्या
माळ्यावर गेली, हुश झालं तिला, पुस्तक परत उचलल, पण मन काही लागत नव्हतं, मग त्या
मुलाचा विचार शिरला, तो माझ्या परीक्षे साठी चिंतेत आहे, आणि मी पुस्तक टाकलं, “छे,
हा काय विचार करते मी.... “आणि संधिका अभ्यासाला लागली. हळूच मनात विचार शिरत होता
पण निघतही होता, “त्याला माझी परीक्षा महत्वाची आहे आणि मी अभ्यास करायला हवा...”
ह्या विचारात ती जोरात अभ्यासाला लागली.
आईने आवाज दिला ती जेवायला खाली आली,
आई काहीच तिला बोलली नाही, बाबा जरा बघत हसत होते, संधिका मनातच लाजली, “मी आता
कुणाचीतरी लवकरच होणार, त्याला मी आवडते, त्याला माझी काळजी आहे.” ह्या मनातल्या
मनात विचारात ती चिंब झाली होती तर भावाने चिडवल, “ये गधडे, ताटात काहीच नाही
तुझ्या आणि काय घास बनवतेस ग, आहेस कुठे.?”
आई ओरडली, “ये गुमान गप्प जेवं, तिला
चिडवू नकोस सारखा...”
संधिका परत आई कडे बघत मनात पुटपुटली,
“हुम्म आता बघ ह्याला मला चिडवू ही देत नाही, केली का हिने मनात तयारी मला इथून
घालवण्याची... हुम्म, जावूदे, त्याला मी आवडते.” ती मोठ्या नादात ताट घेवून उठली, “आई
जेवले मी, माझी परीक्षा आहे, निघते मी अभ्यास करायला, मी भांडी घासणार नाही,
परीक्षा आहे माझी.”
ती वरच्या माळ्यावर निघणार होती तर
अलमारीच्या आरश्या वर नजर पडली, ती थबकली, “जाडी झाली का मी, छे, हे केसं जरा लाब
हवेत, होतील एक दोन महिन्यात, मी ना जरा फेशिअल करुवून घेईल, मग सुंदर दिसेल अजून,
अरे सुंदरच आहे मी, त्याला मी आवडते मी पसंत आहे त्याची. हुम्म,” एक मानेला झटका
दिला आणि परत अभ्यासाठी निघाली.
दिवसभर आज ती आनंदी होती, अभ्यास
मस्त झाला होता, आपण कुणालातरी आवडतो, आपली कुलातरी काळजी आहे ही भावनाच तिला
सुखावत होती, अलगत ती त्याच्या प्रेमात पडली होती. आता परीक्षा लवकर संपावी असं
तिला वाटत होतं. तिचे पेपर संपले आणि ती मस्त गेले होते, मन प्रसन्न होतं त्याला न बघताही ती
त्याच्या प्रेमात होती. त्याच्या पहिल्या भेटीची आतुरता तिला लागली होती. आता आई
बाबा बोलत जरी असले तरी ती कान टवकारून ठेवायची, त्याची चाहूल कधी होणार हे तिला
जाणून घ्यायचं असायचं. आणि त्या दिवशी तिला आई म्हणाली, “संधू, तुला ना ऐक गोष्ट
बोलू?”
“हुम्म,,, बोल, मी भांडी घासणार नाही
हा, आताच सांगते, मी नेल पेंट लावलं आहे बोटांना...”
“अग हो, नको घासू, एक स्थळ आलंय ग..”
मनाला ज्या गोष्टीची आतुरता होती ती
आज तिला ऐकायला मिळणार होती, तरीही मोठ्या नादात आईला म्हणाली, “असं, मी काय जड
झाली का तुला, सारखी मागे लागली असतेस, बाबा सांगा आईला, माझ्या मागे लागू नको
म्हणून. “
बाबा पेपर मधून डोकं बाहेर काढत
म्हणाले, “हा संधू उद्या तुला बघायला येणारं आहेत. मुलाला तू आधीच पसंत आहेस. तुझा
काय तो निर्णय तू नंतर सांग...” म्हणत बाबा उठून बाहेर गेलेही.”
संधीकाच्या मनात आज प्रेमाची बरसात
होतं होती, ती तिच्या खोलीत शिरली, काय करू आणि काय नाही असं झालं होतं आणि त्याच
वेळेवर नेमकं गाणं लागलं पहिले न मी तुला ... तू मला न पहिले... मन वेळे गुंतले...
संधिका गुंतली होती संदीपमध्ये, त्याला
न बघता ती त्याच्या प्रेमात पडली होती. त्याला मी आवडते ही भावना तिला निरंतर
सुखावत होती. संदीपला तिच्या मनाने होकार दिला होता. मनाची मनात गाठ पडली होती.
संदीप समोर आला आणि संधीकाने होकार
कळवला, खर तर तिला सावळ्या मुलाशी लग्न करायचं नव्हतच पण मन गुंतलं होतं आता नकार
निघणार नव्हताच. घरच्यांना भीती तिचं होती कि संधिका नकार देईल म्हणून पण तिचा
होकार सर्वांना आनंद देवून गेला.
कथा छोटशी, पण लग्न जुळण्याआधीच्या भावना दर्शवणारी होती, जी आजही बऱ्याच स्त्रीमनात जिवंत असेल.. बसं त्याचीच एक आठवण ..कशी वाटली नक्की कळवा...
माझ्या नवीन कथेसाठी पेजला लाईक करायला विसरू नका....https://www.facebook.com/manatlyatalyat
©उर्मिला देवेन
0 Comments