तुझे नी माझे व्हावे मिलन… भाग 3


रंजीतची घरात गडबड सुरु होती. राधिकाच मन गुंतलं होतं मोहनमध्ये. आणि असा समोरून आलेला नकार आता कसा हाताळायचा हा प्रश्न रंजितला पडला होता. बाबांशी आणि आईशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता हे तो जाणून होता.

आई घरात एका खोलीत परत बसून होती. स्वतःशी बडबडत होती, “माझंच चुकलं, राहिली ना येवढे वर्ष... निघून जायला हवं होतं त्याच क्षणाला... राहिले इथे माझे भोग भोगायला, दोन मुल पदरी पडले आणि संपल सांर... काय होते मी आणि काय झाले... बाबा म्हणाले होते मला चल म्हणून, माझ्यातच मान शिरला होता ह्या घराण्याचा. वाटलं होतं कधीतरी ह्या माणसाला कळेल पण ... मी आता न कळण्या सारखी झाली आहे, ना मला ना माझ्या मुलांना, कुणालाच तर माझी इथे कदर नाही, मुलानांही ती रसिका योग्य वाटते. मोठी गोड गोड बोलते ना... अरे बोलणार कशी नाही... जिंकली ना ती .. आणि मी हरले, ह्या मोठ्याच्या घरात हरवून गेले...” आणि ती जोरात रडायला लागली.

तिचं रडणं ऐकून राधिका खोलीत शिरली, मन तर तिचही पार ठेचलं होतं, आईला सांभाळत होती, तर आई म्हणाली, राधिका मला पसंत आहे तो मोहन, लग्न तू त्याच्याशीच कर

आता राधिका रडली, “आई त्यांनी नकार कळवला आहे.”

“अग बाई... झालं ... ह्या माणसाने अजून काय कारस्थान केलं आता, बाई बाई ... माझं तर सांर संपवलं आता माझ्या मुलांच्या जीवावर उठलाय कि काय बाई?”

रंजित खूप वेळ पासून मोहनला फोन लावत होता आणि ती लागत नव्हता, तोही खोलीत शिरला, “आई बाबांनी नाही काहीच केलं, तू तू बोलली त्या बैठकीत... काय ग गरज होती तुला नको तिथे उगाच बोलायची. तू तुचं...म्हणून ते बाबा रसिका आईकडे जातात.” रंजित खूप रागात होता. राधिका रडत तिच्या खोलीत परत निघून गेली. राग जरा आवरून रंजित आईपुढे हात जोडून बसला, “आई नको ना ग.... किती तिरस्कार करशील? रसिका आई त्यांची बायको आहे आता, आणि ती त्यांची चुकी होती. त्यांनी तुला सोडलं आहे तिच्यासाठी हे अंतिम सत्य आहे. आम्ही स्वीकारलं आहे तुही स्वीकार... खरं तर ही आपल्या आजोबांची चूक, त्यांनी ते संबंध स्वीकारले असते तर बऱ झालं असतं. आता का तू तेच ते घेवून भांडत असतेस. आम्हांला कंटाळा आलाय आता तुझ्या आणि बाबांच्या भांडणांचा. बाजूला ठेव आता, लहान नाही आम्ही दोघे, कळत कोण कुठे चौकात आहे म्हणून... आणि बाबा नाही चुकले ह्या वेळी, मान्य आहेच ते चुकले तुझ्या सोबत, पण रसिका आईने स्वीकारलं आहे ग, ती आम्हाला कधीच हेळसाळ करत नाही. मी जेव्हाही तिला भेटलो ना तिच्या बोलण्यात अतोनात प्रेम होतं माझ्यासाठी आणि राधीकासाठी, आणि नजरेत तुझ्यासाठी आपुलकी आहे तिच्या. तिने बाबांना खचू दिलं नाही ग... “

आई शून्यात बघत गप्प बसून होती जसा तिच्यावर रंजित च्या बोलण्याचा काही परिणाम होणार नव्हताच.

रंजित खोलीतून निघून गेला आणि त्याने परत मोहनला फोन लावला, मोहनने त्याला भेटायला बोलावलं होतं. नकाराच कारणही सांगितलं, त्याचे बाबा म्हणाले होते, “मुलगी ही तशीच असणारा, नको आपल्याला अशी मध्ये मध्ये उगाच बोलणारी...” आणि म्हणून त्यांनी स्थळ नाकारलं होतं.

रंजितने राधिकालाही सोबत घेवून जाण्याचा प्लन केला होता. मोहन उद्या अमेरीकला निघण्या आधी भेटणार होता.

राधिकाच्या खोलीत शिरत, रंजित म्हणाला, “राधिका, रडू नको, चेहरा रडका दिसायचा उद्या मोहनला.”

राधिका उठली, दादा!

“हो उठ, काय ते तुचं फेशिअल वैगेरे कर..उद्या जावूया आपण मोहनला भेटायला... मी बघतो हे मिलन कसं होतं नाही ते.”

राधिका रंजितला जावून बिलगली, दादा! म्हणू ती लाजलीच.

सकाळी परत तिचं मन तेच गाणं गुणगुणत होत.

गंध फुलांचा गेला सांगून

तुझे नि माझे व्हावे मिलन

व्हावे मिलन....

आणि रंजित खोलीत शिरला, राधिका तयार हो लवकर, निघायचं आहे. म्हणत तो आईच्या खोलीत शिरला, आई आताही तशीच बसून होती. त्याने आईला हात लावला अंग तापलं होतं, “आई काय हे, उठ मी नाश्ता केलंय, खावून घे, औषध देतो घे आणि आराम कर कशाला विचार करतेस ग?”

ती हळूच म्हणाली, “मला तो माणूस ह्या घरात नको आता....”

“बऱ तू उठ आधी.”

“आणि त्याने होकार दिलेल्या मुलाशी माझी मुलगी मुलीचं लग्न करणार नाही, माझी मुलं आहात तुम्ही, मी मी जन्म दिलाय.... तो तर पाळला होता.”

“आई, आपण नंतर विचार करू, अजून लग्न झालेलं नाही ... तू आधी उठ, मला आणि राधिकाला बाहेर जायचं आहे. तू आवर.”

त्याने आईच आवरून तिला औषधं दिलं, खोलीत झोपायला सांगितलं. आणि राधीलाला घेवून तो मोहनला भेटायला निघून गेला. राधिका मनातच स्वप्न बघत होती. मनात ती त्याला भेटली आणि स्वतःचा होकार देवून मोकळी झाली. रंजितने गाडीचे ब्रेक लावले आणि राधिका स्वप्नातून बाहेर आली, समोर मोहन उभा होता. त्याला बघताच तिचं मन परत तेच गाणं गुणगुणायला लागलं. पहिल्या नजरेतलं प्रेम हेच काय ते ती अनुभवत होती. मोहनही त्याच भासातून जात होता. पण बाबांच्या स्पष्ट नाकारणे जरा गोंधळला होता.

कसं आहे ना, लग्न दोन मनाचं पण किती आणि कशी मन गुंतली असतात हे मला आणि तुम्हाला माहीतच आहे. पालक खूप महत्वाचे असतात ह्या नव्या उंबरठ्यावर.

मोहन स्मित हसला आणि राधिकाच्या त्या नाजूकपणात गुंतला होता. रंजीत्ने गाडी लावता लावता मोहनला नमस्कार केला. राधीकाही स्मित हसली. तिघेही समोरच्या कॉफी शॉप मध्ये शिरले.

राधिका अवघडत बसली आणि मोहन बोलला, मला राधिका पसंत आहे.. पण आई बोलल्या नसत्या तर माझे बाबा नाकर कधीच देणार नव्हते. मी बाबांना आता कसा समजावू हे कळत नाही ना मला. रंजित माझी आई तुला माहित आहे कशी आहे ती, जरा वेडी वागते मग माझ्या बाबांची ही चिंता कि राधिका असं वाकडं घरात बोलली तर कसं जमायचं, प्रश्न इथे येवून निरुत्तर राहिला रे.”

रंजितने कॉफी ऑर्डर केली, जरा शांत झाला, राधीकाकडे बघितलं, तिच्या त्या टपोऱ्या डोळ्यांमध्ये मोहनची छबी त्याला असवस्थ करत होती, मोहन, माझं काय म्हणणं आहे, माझी राधिका तशी नाही. माझी आई जरा विचारात गुंतली असते रे

हो मला माहित आहे रे सांर पण असं सर्वांसमोर नको ना. म्हणजे असं आमचं सर्वांच मत पडलं घरी. मी जरा विषय थांबवला, काय आहे ना जरा वेळ जावूद्यावा म्हणतो.

राधिका परत लाजली होती. मोहन तिला पसंत होता हे तिच्या नजरेत दिसत होतं. पण काय करणार होती, नकार सोमोर होता.

मोहन हे बघ, म्हणजे हे बघा..

नाही मला तू म्हंटल तरी चालेल तू

मोहन हे बघ, तुला राधिका पसंत आहे का हे मला सांग, कारण माझ्या बहिणीला तू पसंत आहेस. मला जर हे आता कळाल कि तुझं काय मत आहे तर आपण काही मार्ग काढू शकतो ना?

हो नक्कीच, हो मला राधिका पसंत आहे.

मग झालं तर... पण प्लीज ...

हो हो, मी बघतो बाबांशी बोलून, पण जरा वेळ जावू दे, मी अमेरिकेतून येतो आणि तोवर सगळं शांत होतं, मग मी बोलतो, माझ्याकडून काही प्रोब्लेम नाही.

रंजित उठला, फोन वाजला म्हणून उगाच बाहेर निघून गेला, आता मोहन आणि राधिका समोरा समोर होते, आवाज होता ओ कॉफीच्या घोटांचा, मोहन अलगत राधिकाला हात लावत म्हणाला, काय तुला पसंत अहो मी?

तुम्हाला पसंत आहे ना मी..

अरे प्रश्न माझा होता.

उत्तर प्रश्नात आहे,

अरेच्या, जमले बुवा माझं, आहेस मला तोड... बोलतो मी बाबांशी, तू काळजी करू नकोस.  रंजित खूप प्रेम करतो तुझ्यावर.

हो माझा दादाच आहे मला. माझ्या सोबत सतत उभा असतो. खूप जपतो मला...

हो, मग माझं कसं होणार ग.

तुम्ही तुम्ही असाल ना. पण दादा दादा आहे माझा.

व्हा, पटलं मला, असा प्रश्न करूनही तुझं उत्तर चुकलं नाही. काळजी घे त्याची. मी तुला फोन करेन तिकडे पोहचल्या नंतर. बोलू आपण. मला वेळ होतोय, फ्लाईट आहे ग रात्री, निघायचं का आपण.

दादाला बोलावू का?

नको, आपणच जावूया ना बाहेर.

दोघेही बाहेर आले, रंजित आताही रसिका आईशी बोलत होता, तिला सांगत होतं काय काय झालं ते, आणि विनवणी करत होता कि बाबांना समजावं म्हणून. राधिकाला आणि मोहनला बघून त्याने रसिका आईला सांगून फोन बंद केला.

अरे, निघायचं का? झालं तुमचं बोलून. चल राधिका निघूया.

मग मोहन बोलूया आपण लवकरच. तुमचं बोलणं झालं ना ऐकमेकांशी. नंबर घेतले ना तुम्ही.

हो, मी करतो तिला फोन, पण आता निघतो, तुम्ही दोघही काळजी घ्या. आणि काळजी करू नका.

आठवडा झाला होता आणि राधिका मोहन मध्ये पार गुंतली होती. आईही जरा बरी होती.

त्या दिवशी बाबा घरी आले होते, राधिकाशी खूप बोलत होते, तिला आनंदी बघून त्यांनाही आता मोहन आवडायला लागला होता. रंजित राधिका आणि बाबा गप्पा करत होते आणि रसिका आईच्या गोष्टी निघाल्या, बाबा सहज बोलले, “अरे रंजित रसिकाला बऱ नाहीं आहे, आणि मला आज शेतीचा माल पण पोहचवायचा होता.”

“बाबा मी करतो तुम्ही जा, तिकडे”

आणि हे शब्द आईने ऐकले, खोलीतून तू धावल्या सारखी आली, आणि रंजितला म्हणाली, अरे मी तुला लहानाचा मोठा केलेला आणि तुला त्या रसिकाचा पुळका येतो”

राधिकाला तर तिने दोन थोबकाडीत लावल्या, काय ग, तुला सांगितलं ना कि त्या मोहनशी बोलू नको म्हणून, कळत नाही का? मला पसंत नाही तो मुलगा. त्याचा तो बाप, अक्कल नाही त्याला.”

आईच ते भयानक रूप बघून सारेच घाबरले होते. बाबांनी तिला गच्च पकडल, तुझी लढाई माझ्या शी आहे, मुलांना का मधात आणतेस ग.”

रत्नाने स्वतःला सोडवल, अरे ये माणसा तू माझ्याशी लढाईच्या ही लायकीचा नाहीस, तू तू ज्या जागेवर उभा आहेस ना ती माझी आहे. माझ्या नावावर आहे हा वाडा. तू जा ना रे त्या रसिका कडे. कशाला येतो इथे, नाही तिचं पाठवते तुला, आता तिला हा वाडाही हवाय ना!

अग ऐक, मला आणि तिला काहींही नकोय, निघतोय मी.

हो निघा हो पळकुटे..

आणि ती राधिकाला म्हणाली, तू आता त्या मुलाशी बोलली ना तर माझ्या सारखी मीच असेल. खबरदार!

आता मात्र रंजित आणि राधिका घाबरले होते. दोन दिवस झाले तरी तिने मोहनचा फोन उचलला नव्हता. रडून तिचा हालं बेहाल झाला होता. रंजितला ही काही सुचत नव्हतं.  आईला समजवायचं हा विचार सुरु होता त्याचा पण काही मार्ग सुचत नव्हता. आता बाबाही काही उत्तर देत नव्हते.

बघूया अंतिम भागात, खरच राधिका आणि मोहनच मिलन होते काय ते

Post a Comment

0 Comments