काय करते तू दिवसभर?




 “रुमाल हातात भेटेल का मला, ऑफिस ला जायला वेळ होत आहे”. 
राकेश दरवाजेत उभा राहून ओरडत होता. 


अनघा, “आलीच, ह्या मुलीपण ना एक वस्तू धड ठेवत नाहीत, हे घ्या”.
“हे काय आहे? हा बघ...कसलातरी डाग लागलाय याला”, राकेश ओरडला. 


“अरे..रे..सॉरी, मी दुसरा आणते”, अनघा चुकल्यागत बोलली. 
“राहूदे, मी घेऊन घेईल वाटेत. मला वेळ नाही” राजेश रागानेच बोलला.

 
“फक्त १ मिनटं, मी आलेच दुसरा घेउन” ती आत जाताजाता बोलली. 
“जरा जॉब करुन बघ, काय करते तू दिवसभर ? …..”. 


असं खेकसल्यासारखं बोलून राकेश अनघाला गप्पं करून निघून गेला.

रात्रीचे ९ वाजले होते, राकेश घराकडे निघता निघता, मोबाईल चेक करत होता, बघतो तर काय, त्याच्या मोबाइल वर एवढे मिस कॉल्स बघून त्याला आश्चर्यच झालं. त्यातला कुठलाच नंबर त्याच्या ओळखीचा नव्हता. त्यानी पहिला नंबर ट्राय केला तर तो मुलीच्या शाळेच्या बस ड्राइव्ह चा होता, दुसरा शाळेतून होता, तिसरा सोसायटी वाल्याचा, नंतर मुलीच्या डान्स क्लास वरून, किराण्या वाल्याचा, हॉस्पिटल मधून, राजेशच्या गावच्या शेजाऱ्याचा, पार्सल वाल्याचा. इस्त्रीवाल्याचा.... बापरे!!!

राजेशला वाटले ह्या सर्वांनी मला का कॉल केले असावेत. घरचा पत्ता नोंदवतांना, दुसरा नंबर म्हणून अनघाने राजेश चा नंबर दिला होता. घरी येता येता राजेश ने अनघाशी भांडण्याचा पूर्ण प्लॅन केला होता.

घरच गेट खोलून तो आत आला, आत येता येता त्याचे बूट आणि पॅन्ट पाण्याने ओले झाले होते. पाण्याची टाकी भरून वाहत होती. त्याच्या जवळच्या चाबीने त्याने दरवाजा हळूच उघडला. आत्ता या वेळेवर अनघा मुलांना झोपवत मुलांच्या खोलीत असेल हे त्याला माहित होतं. घरात रागातच पॅन्ट पकडून शिरला,घरात सर्वीकडे धिंगाणा पसरलेला होता. सकाळचा ओला टॉवेल बेड वर तसाच होता. ओले कपडे बाथरूम मध्ये तसेच होते. तो हॉल कडे वळला, बघतो तर काय, सकाळच्या नाश्त्याची प्लेट डायनिंग वर तशीच होती.

बेसिन भांड्याने भरून होतं. घरात कचऱ्याचा वास येत होता. घराची अशी स्थिती बघून आत्ता मात्र राजेश घाबरला. त्याच्या मनात भयंकर विचार येऊ लागले. विचारांनी त्याला भीती वाटली होती.

अनघा---अनघा म्हणत तो ओरडू लागला. मुलं आणि अनघा कुठेच दिसत नव्हते. अनघा आज मुद्दाम मुलांना घेवून वरच्या खोलीत होती. तो सर्वांना शोधात वरच्या मजल्यातल्या रूम मध्ये गेला….. बघतो तर काय... अनघा मुलांना झोपवून बाहेर येण्याच्या तयारीत होती, त्यांना सगळयांना सुरक्षित बघून राकेश च्या जीवात जीव आला. अनघा रूम मधून शू -शु म्हणत बाहेर अली. अनघाला बघताच राकेश ने तिला गच्च मिठी मारली.

ऑफिस मधून रोज जेव्हा राकेश घरी यायचा, तेव्हा घर छान नीटनेटकं, सुंदर असायचा, घरात अगरबत्तीचा आणि खमंग भाजीचा सुवास असाय़चा. मुलं जेवून शांत झोपलेली असायची आणि अनघा राकेश ची वाट बघत, त्याच्या गोष्टी नीट लावत असायची. आल्या आल्या, पाणी भेटायचं, मग हळूच जवळ येऊन थकलास का रे म्हणून मिठीत शिरायची............... पण आज ते काहीच नव्हतं.

अनघाने दिलेल उत्तर, राकेशला कळलं होत. आणि त्याला त्याची चुकही कळली होती. अनघाच्या कामाच्या तुलनेत त्याच काहीच नव्हतं. उलट घरी आल्यावर तो TV, मोबाईल बघत बसायचा सोफ्यावर पसरून बसायचा. कधी तर आज फार थकलो म्हणत झोपायचा आणि अनघा मात्र घर आवरात दुसऱ्या दिवशीच्या तयारीला लागायची.

आज राकेश ने घर आवरायला अनघाला मदत करत होता, तर अनघा म्हणाली," राहूद्या हो, तुम्हाला कळालं ना तेच हवंय, बाकी हे काम मला काही जास्त नाही. मी रोज आनंदाने करते. बसा तुम्ही."

राकेश मात्र अजूनही तिच्या मागे पुढे करत राहिला, खर तर त्याला जोरात भूक लागली होती पण म्हणणार कुणाला, अनघाही उपाशीच होती ना....

घरी राहणे हा स्त्रीचा गुन्हा आहे का? गृहिणी ही एक घर नावाच्या संस्थेची CEO असते. घराला घरपण आणण्यासाठी ती प्रत्येक भूमिकेत शिरते. घरच्यांनां आनंदी ठेवण्यासाठी ती सतत २४/७ कार्यरत असते. गृहिणी ही उत्तम शिक्षक, कूक, होम डेकोरेटर. घराचा डॉक्टर, कामपूर्ती इंजिनिअर, अकाउंटंट, सेविका आणि अश्या बऱ्याच भूमिका ती वेळेनुसार करत असते. तिच्या घरी राहण्याला मुद्दा बनवून तिला घालून पाडून बोलणं हा गुन्हा  नाही का ?

आपण स्त्रिया, घरच सर्व सांभाळून नवऱ्याला ta-ta, bye-bye हसत करतो, तेंव्हाच पुरुष बिनधास्त नौकरी करू शकतात ना .........

सर्व स्त्रियांना समर्पित !


कथा लघुकथा विभागातून पूर्व प्रकाशित २०१८, आणि अनेक पुरस्काने गौरवल्या गेली आहे.

https://www.facebook.com/manatlyatalyat

तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रोसाहन देतील.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

नमस्कार मंडळी 

मनातल्या तळ्यात घेवून येत आहे एक सुंदर सदर.. जोडीदार..तू माझा...  मराठी दीर्घ कथा मालीका. #Manatalyatalyat टाकून YouTube channel ला नक्की बघा 

आपला जोडीदार आपलं आयुष्य उभ करायला खूप महत्वाचा असतो, 

आयुष्याच्या क्षणात हवासा असतो... 
प्रत्येकाच्या जोडीदाराच्या संकल्पना वेगळ्या असू शकतात पण जोडीदार आयुष्याच्या वळणांवर हवाच असतो, 
समजून हेणारा, सखा सोबती...रक्ताचा ना गोत्याच्या तरीही हवा हवासा... 
बघूया जोडीदारांच्या वेगवेगळ्या छटा...कथेतून कधी त्या तुमच्या असतील कधी त्या माझ्या... 
रंगवूया कथा, एक अनोख्या रंगानी, मनापासून तर मनापर्यंतच्या नात्याची 

.."जोडीदार..तू माझा "


जोडीदार कि दीर्घ कथा म्हटल्या प्रमाणे आठवड्यातून दोनदा प्रकाशित होईल. 





©उर्मिला देवेन
धन्यवाद!!

 

Post a Comment

0 Comments