बहिण नावाचं माहेरपण...

 



जानवी गेल्या सहा महिन्यापासून माहेरी गेलेली नव्हती. आईच्या दागिण्यावरून जरा खटकलं होतं वहिनीसोबत तीच. आई देवाघरी गेलेली मग रोज असा फोनही नसायचा. मनातल्या मनात काहीशी चुकलेली असायची. कधी ती स्वतःला बरॊबर समजत होती तर कधी वहिनीला, वाहिनीने आईचे दागिने मोडून तिच्या आवडीचे केलेले होते जे तिला पटलं नव्हतंच. मग काही न बोलताच तिने वाहिनीशी बोलणं बंदच केलेलं.

रक्षाबंधना जवळ येत होतं आणि जानवीची ओढ वाढत होती. भावाकडे जावं आणि राहावं दोन दिवस असा विचार मनात सारखा येत होता. पण विचार मनात येवून मेंदूतून परत निघून जात होता. कामात तिची चिडचिड वाढली होती.

सकाळी नुसता नवऱ्याने चहा मागितला आणि जानवी भडकली, "घे ना, समोर तर ठेवला आहे, हातातच द्यायचा का? सगळं मीच करायचं, माघार मीच घ्या, बोलाही मीच, कराही सर्व मीच. मीच आहे कारणीभूत साऱ्या साऱ्या गोष्टीला."

अमित जरा दचकलाच, हिला अजून PMS सुरु तर नाही झालं ना, म्हूणन कैलेंडर बघायला लागला. पण महिन्याची तारीख तर खूप दूर होती. जरा गप्प होवून गुमान चहा पिऊ लागला आणि हळूच म्हणाला, "आता कधीही वनवास सुरु होतो माझा. बहीण नाही ना मला, माहेरपणाला."

आता जानवीं गदकण हसली आणि अमितच्या जवळ येऊन बसली. अमितने लागलीच तिच्या हातात ट्रेनची तिकीट दिली आणि म्हणाला, "तुझा सूर दोन दिवसापासून मी ओळखला होता, कालच बुक केलीत, जावून ये भावाकडे, सोडतो तुला उद्या स्टेशनवर मी."

जानवी एका पायाची बोटं दुसऱ्या पायाने चेंगघळत म्हणाली, "तसं नाही, पण वहिनी?"

"जावूदे, कधी तिलाही फिल कर कि सासर.... आई नंतरच. तू माहेरी गेलीस ना कि तुझं माहेर सासर होईल तिचं."

आणि दोघेही हसले...

सकाळी आनंदाने जानवीने तयारी केली, मनात एक मन तिचं तिला खुडत होतच. पण ती मुलाला घेवून माहेरी पोहचली. घरच्या काळूने तिला खूप दुरूनच ओळखलं आणि त्याच्या घरात फेऱ्या सुरु झाल्या. वहिनीला क्षणभर कळलंच नाही कि काळू एवढा भुंकून आतल्या बाहेर करत काय सांगतोय म्हणून. शेवटी त्याने वहिनीला घरातून पदर खेचुन बाहेर आणलं आणि जानवी दारात होती.

नणंदेला एवढ्या दिवसांनी बघून वहिनीलाही आनंद झाला. तिच्यासाठी सासरची जवळची अशी एकमात्र तीच होती. तोंड भरून स्वागत करत भाच्याला पटकन कळेवर उचलून घरात घेतलं तिने.

जानवी सहज वाहिनीच्या खोलीत शिरली तर तिला तिची पेंटिंग आजही भिंतीवर दिसली. वाहिनीने तिला परत नवीन फ्रेम केली होती. तिची खोली आज वाहिनीची होती. मनभर पेंटिंग नेहाळत होती तर वहिनीच्या कानातल्या कुड्यावर लक्ष गेलं तीच,

"वहिनी, ह्या आईच्या ना, ह्याला नाही मोडल्या तू."

"आईला खूप आवडायच्या ह्या, माझ्या पहिल्या पगारात मी आईसाठी नवीन फॅशनच्या केलेल्या, माझ्या पसंतीने, आईने जातांना माझ्या हातात दिल्या होत्या आणि नेहमी घालून राहा असं सांगून गेलेल्या. त्याचा आशीर्वाद आहे ह्यात."

"पण तू तिचे दागिने मोडून नवीन केलेस ना?"

"हो, ह्या मी नवीन घेतल्या होत्या तेव्हाच त्या मला म्हणाल्या होत्या, कि त्यांचे सर्व दागिने नवीन करायला दे म्हणून, पण त्याआधीच... मग मी त्यांची इच्छा म्हणून सर्व मोडले आणि नवीन केलेत. अगदी तुला देण्यासाठी ठेवलेले सुद्धा, तुला नक्की आवडतील. थांब जरा घेवूनच येते मी."

तेवढ्यात राजन आला आणि जानवीला घरी बघून आनंदाने ओरडू लागला, "चला माझ माहेरपण आलं. ये बायको, चहा कर ग, जरा माहेरपण जगू दे आता. सारखी कट कट करत असते, आली आता माझी बहीण, ऐकून घ्यायला माझं. थांब तुझ्या सगळ्या गोष्टी सांगतो तिला, माझ्या घरात मलाच सासूर वास आहे. "

"जानवी हिला ना हि सासरी असल्याचा फील दे ग जरा. हळूहळू सगळ्यांनाच आपल्या बाजूला केलंय हिने."

जानवी खुद्कन हसली, "नाही रे, तुझं माहेरपण आता मीच आहे हे कबूल, पण तीच सासर हे नाही राहीलं आता .. तीच हे घर संसार नावाचा वटवृक्ष झालाय ज्याच्या गर्द सावलीत आपण माझं तुझं माहेरपण जगतो आणि ती अजूनही तुझं माझं माहेरपण जपते.. ."

भाऊ आणि बहिणीने माहेरपण भरभरून अनुभवलं आणि ते जपलं वहिनीने.

मग या रक्षाबंधनाला बहीण भावातलं माहेरपण अनुभवाचं. कारण बहीण ही भावासाठी माहेरपण असते.

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!!
पूर्व प्रकाशित सकाळ ११ ऑगस्ट, २०१९ आणि मनातल्या तळ्यात पेज.  
©️उर्मिला देवेन

धन्यवाद! 🙏🙏

फोटो साभार गुगल

कथा आवडली आवडला असेल तर माझ्या नवीन लेखासाठी/कथेसाठी माझ्या पेजला नक्की  like किंवा फॉलो करा https://www.facebook.com/manatlyatalyat/


तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रोसाहन देतील. 

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. 

जोडीदार तू माझा कथा YouTube channel ला प्रकाशित झालेली आहे,




Post a Comment

1 Comments

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)