तिला गरज असते प्रेमाची, विडंबनेची नाही!

 


तिला गरज असते प्रेमाची, विडंबणेची नाही!!

“काय ह्या आजकालच्या मुली एका बाळंतपणात काय काय नखरे करतात. आम्ही काय मुलांना जन्म दिलाच नाही.. बाईबाई काय ते नवल. आले बाई मी माझ्या मुलीकडे. काय तर म्हणे बेडरेस्ट सांगितली आहे डॉक्टराणी, काय ह्या आजकालच्या डॉक्टरणी, वेवसाय करून ठेवला आहे सारा.”

“आई, गप्प ग, किती बोलतेस वहिनीला, तुला काही माहीत पण आहे का?”

“ये गप्प ग तू आता सुर नको होवू. तूही तशीच आहेस. जरा काही झालं की सांगत सुटतेस.”

“आई तुला काहीच त्रास नव्हता काय ग, आपले दिसवं संपले की असं बोलायच नसतं ग, सरळ निर्णय करून मोकळी होतेस, गोष्टीचा गाभारा बघत नाहीस काही.”

राधिका आणि तिची मुलगी रेवती बोलत होत्या, राधिका मुलीकडे आलेली होती. आणि बोलता बोलता जरा शांत झाली होती, म्हणाली, “मुलीचा जन्म, कुठे विचारात घेतला जातो ग, करा करा करा आणि मरा.. जन्म देवून नाव बापच लागतं, मग आपण मेल्यावर आपण कुठे राहतो. सगळं करून जिला प्रेमाचा शब्दही मिळत नाही, अशी ती बाई.”

राधिकाचे डोळे पाणावले होते. रेवती लगेच म्हणाली, “मग काय, तरीही वहिनीला बोलून मोकळी झालीस. तिच्या जागी मला ठेव ना, नाहीतर तुला ठेव, आजही अंगाला काटा येतो माझ्या ह्या घरातले सुरुवातीचे दिवस आठवले की, सात वर्ष मूल झालं नाही, माझी वेदना मला माहीत होती तरीही बायकांनी वांझोटी म्हणून क्षणो क्षणी विडंबना केली, शवेटी मुलगी झाली तरी बोल होतेच. सीझर रूमध्ये माझी मीच होते मला. हे तर सीझर रूम मध्ये मला शिव्या देवून बाहेर गेले होते, म्हणाले होते, तुलाच कसं दुखंत आहे, जरा सहन करशील तर सीझरचा पैसा वाचेल” नंतर  सासूने, नणंद बाईने, आणि ह्यांनीही कुठे कमी केली नही माझी विडंबना करण्यात, सारखं घालून पाडून बोलणं, ह्याच्या त्याच्या नावाचा उद्धार करणं, स्वताला आरश्या समोर बघून राग येत होता. मी स्त्री आहे की बस विडंबणेची मूर्ती कळत नव्हतं. आता जरा निवांत आहे जीवाला. पण अजूनही चार चौघात ऐकून घेवून गुमान गप्प असते.”

राधिका गुमान शांत झाली होती, तिच्या कुठे वाट्याला त्या काळात प्रेम आलं होतं पण मुलीच्या मनातलं ऐकून तीचही मन दाटून त्या दिवसात शिरलं होतं.

रेवतीने दाटून आलेला आवंढा गिळला, आईला हातात चहा दिला, म्हणाली, “रांधा, वाडा, जीव बेजार पण दोन प्रेमाचे शब्द म्हणून कधी मिळत नाही ग. येवढ मन लावून स्वयंपाक मी करते पण कधीच जेवणाच्या टेबलवर कौतुक म्हणून पदरी पडलं नाही, आता सवय झाली, आपलं करत राहायचं, पण विचार करते माझ्या मुलीने असं सहन करायला नको, मी कुठे एकटी हे सारं बदलू शकते? बस एक प्रयत्न केला तुला बोलून. रु सासू आणि आई दोन्ही आहेस पण आधी स्त्री होवून विचार कर.”

“मला तर माझ्या आयुष्यात कधीच प्रेमाचे बोल मिळाले नाही, आयुष्यभर समोरच्यांची चिंता केली. तुझ्या बाबा सोबत आयुष्य काढलं, त्याची खूप सेवा केली पण बघ माझ्या आधी देवाघरी गेले आणि तिथेही मी दोषी ठरले. खर आहे तुझं, तेव्हाही मला खूप गरज होती प्रेमाची पण बाबा गेले आणि विधवा म्हणून मलाच बोलणी मिळाली. ससारच्या लोकांनी नाती तोडली आणि माहेर तर नाहीच ग आता. जिला घरातल् सर्व करूनही घरी राहणारी म्हणून संबोधल्या जातं. ती असतांना कुणाचही तिच्या वाचून पान हालत नाही आणि ती नसतांना कुणाच अडत नाही असं होता आपण.”

“आई तुला म्हणून सांगते, इथे जुळवून घेतांना खूप त्रास झालं ग मला, बोलले नाही कधी पण मारही मी खाल्ला ह्या घरात. आज इथे टिकून आहे कारण बेशरम झाले, निघून गेले असते तरी काय पदरी पडणार होतं विडंबणेशिवाय. राहिले तर आज निदान निडर होवून आहे ह्या घरात. प्रत्येकाचे करते आणि राहते. प्रेमाच्या शब्दाची अपेक्षा करतच नाही. आपण जे करतो त्याची परतफेड कुणीच करू शकत नाही निदान प्रेमाचे शब्द तरी हवे ना... आता वाहिनीच बघ किती किती साथ दिली तिने दादाला, आज तो मोठ्या कंपनीत आहे. अर्थात तू आई आहेस त्याची पण बायको म्हणून खूप केलंय ग तिने, त्याची नौकरी गेली होती तेव्हा कंस सगळं सांभाळलं तिने, आता सगळं नीट आहे तर तू तिला बोलतेस उलट. तीचीही अपेक्षा असेल दोन प्रेमाच्या शब्दाची, एक स्त्री ह्या नात्याने आपण देवू शकतो तिलाही सर्व. तिच्या वेदना कमी करूच शकत नाही, निदान प्रेमचे बोल!”

तेवढ्यात राधिकाच्या सुनेचा फोन आला, राधिका लगेच म्हणाली, अग बाई हिचाच की फोन, फोन उचलला आणि म्हणली, “कशी आहेस ग, काळजी घे, मी येतच लवकर. मग आपण दोघी जावू हॉस्पिटल मध्ये.”

रेवती हसली, आई आजच आलिस ना?

आज राहते उद्या निघेल, माझ्या सासूने नाही केलं माझं, नुसती चार चौघात विडंबना केली. तुझ्या बाबानेही कधी माझ्या कामाला मोल दिलं नाही, आपण त्यांच्या आयुष्यात किती महत्वाच असतो हे आपल्या लोकांना कधीच कळत नाही, आता काय माझं मीपण संपल, पण सुरुवात करते माझ्या पासून. खरच तिला प्रेमाची गरज असते, विडंबणेची नाही... म्हणतात ना दुसर्‍याच्या डोळ्यांतले कुसळ दिसतें, आपल्‍या डोळ्यांतले मुसळ दिसत नाहीं…. पण माझ्या मुलीचं बघून मला ते दिसलं ग.

राधिकाने मुलीकडे एक दिवस मुक्काम केला, आणि दुसऱ्या दिवशी निघाली सुनेकडे, रेवतीनेही मनाला घट्ट केलं होतं, तिच्या वाटेला आलेलं मुलीसाठी तिला कधीच समोर येवू द्याचं नव्हतं.

कसं आहे ना मंडळी, स्त्रीच स्त्रीची जननी आहे पण तिचं तिची विडंबणा करण्यात पुढे असते... जिथे तिला प्रेमाची गरज असते तिथे ती विडंबणा सहन करत असते. स्त्रीनेच स्त्री जातीला लावलेली कीळ जोपर्यंत नष्ट होतं नाही तोपर्यंत तिला प्रेमाचे बोल कधीच लाभणार नाही... विडंबणाच होणारं.... निर्णय आपला.... आपण ते कधी समजणार की तिला प्रेमाची गरज असते... विडंबणेची नाही!!

 कथा कशी वाटली नक्की कळवा. माझ्या नवीन कथेसाथी मला फब ला लाइक नक्की करा.

©उर्मिला देवेन

फोटो साभार गुगल

धन्यवाद!!

लेख आवडला असेल तर माझ्या नवीन लेखासाठी मला इथे like किंवा फॉलो करा https://www.facebook.com/manatlyatalyat/

जोडीदार ह्या कथेचा पुढचा भाग प्रकाशित झाला आहे निक्की बघा ... मराठीचा पहिलं प्रयोग - दीर्घ कथा मालिका

 

Post a Comment

0 Comments