जेव्हा सुनबाई मनात नांदते- भाग २




पहिला भाग इथे वाचा ->👇👇👇👇

 https://www.manatalyatalyat.com/2021/09/blog-post_7.html

दोन दिवसांनी सुरेशने आईला रेल्वे स्टेशन पर्यंत सोडून दिलं आणि त्या मुलीकडे निघून गेल्या. जातांना सुरेशशी  बोलल्याही नाही. मनात बोलावस वाटत होतं पण शब्द ओठावरून मागे फिरत होते. मुलाने आपली मनधरणी करावी असं वाटत होतं.

काय आहे ना... आईच्या प्रेमाच हक्कात रुपांतर झालं होतं आणि जेव्हा प्रेमाला हक्काची कीड लागते तेव्हा नातं पोख्र्रल्या जातं. आणि मग मायलेकाच नातं तोडण्याचा आरोप सुनेवर लागतो. २५ -३० वर्षापासून जपलेल्या मुलाला आई सुनेच्या हवाले करायला तयार नसते आणि मग सुरु होत खेळ सुनबाई नांदवण्याचा.

आता सानिका सर्व स्वतः आवरून कामही करत होती. ती घरूनच on line लहान सहान प्रोजेक्ट करायची. पदोपदी सासूची गरज भासत होती. कळत होतं तिला बोलत नव्हतो तरी घरात असणंही महत्वाच होत सासूचं. येणारे जाणारे विचारात होते उत्तर देतांना पळ काढवा लागत होता. मनोनन ठरवलं होतं आता परत आल्या कि नमतं घेवू या. काय करायचं आहे. माल गरज आहे आता.

जमत नव्हत तरी सगळ घरातलं, तरीही हळू हळू करत असायची. सुरेश घरी आल्यावर तोही घर आवरू लागायचा. काही विचारायला गुगुल काका मदत करायचे. शेजारणी, मैत्रिणी, कधी आई, कधी वाहिनी ह्यांच्या सल्याने दिवस जात होती.

शेजारच्या काकू तिला नवीन नवीन पदार्थ खायला आणून द्यायच्या. जणू त्याही स्वतः ला तिच्यात बघत होत्या. मैत्रिणी तिच्या सोबत दवाखान्यात येत असत आणि आई रोज फोन करून हालचाल विचारात होती, तिलाही घाई लागली होती कि कधी तिच्या सूनेच बाळंतपण होतं आणि सानिकाला घरी आणते. अडत तअर नव्हतच ना सासुशिवाय, पण असत्या तर काय झालं असतं हे आपण विचार करू शकतो, सासू सुनेचं नातं बहरलं असतंच ना!

 

इकडे सासूबाई आरतीकडे पोहचल्या होत्या. मुलीकडे तिचे सासू सासरे, आणि येणारे जाणारे सर्वच होते. आरती सकाळी स्वतच आवरून कामावर निघून जात होती. तिची सासू स्वतः तिला तिचा दुपारचा डब्बा हातात देत होती. घरात सर्व आरतीच्या मनासारख होतं. दिवसभर तिची सासू मुलासाठी जशी वाट बघायची तशीच अरतीसाठीही.

नातीला तयार करून बालवाडीत सोडायच्या, परत येतांना शेजाऱ्यांशी गप्पा करत सुनिबद्द्ल चुकुनही वाईट बोलत नसत. बोलतांना सुनेवर प्रेम दिसायचं. काळजी वाटायची. घरातली कुठलीच गोष्ट आरतीला विचारल्या शिवाय करणं त्यांना जमत नव्हत. त्यांनाही दोन मुली होत्या, एक विदेशात आणि एक दूर शहरात. मुलींशी फोनवर बोलन सुरूच असायचं पण आरती बद्दल कधी चुगली केली नाही त्यांनी. त्यांच्या मते सुनेबद्दल कुणाशीही काहीही बोलल तरी ते कधी ना कधी सुनेपर्यंत जाणारच. मग कशाल दोन सहानुभूतीच्या शब्दांसाठी वाईट बोलयचं. 

त्या दिवशी घरी जावयाने पाणी पुरी मागवली होती आणि आरती नेमकी घरी पोहचली नव्हती. तिच्या सासूने सर्वांना दिली आणि आरतीच्या आईने सुद्धा सर्वांसोबत मज्जा घेतली. पण आरतीच्या सासूने आग्रह करूनही एकही पाणी पुरी तोंडात टाकली नाही. सतत मोबाईल बघत आरतीची वाट बघत होत्या. दोनदा तिला फोनही लावला त्यांनी, ती घरात येताच तिची पर्स हातात घेत तिला आधी वाशरूम मध्ये जायला सांगितल. सर्व TV बघत होते. पण तिची सासू आरतीसाठी पाणी पुरी तयार करत होती. जरा वेळाने दोघीही जेवणाच्या टेबलवर बसल्या आणि पाणी पुरी खात गप्पा करत होत्या, आरती आज घडलेलं सर्व सासूला हसून हसून सांगत होती. नंतर आरतीने तिच्या पर्समधून सुंदर टिकलीच पोकीट काढलं आणि सासूला दिलं,

"आई, आज मी त्या जुन्या बाजारात गेली होती, आणि हे तुम्हाला आवडतात म्हणून घेवून आले. उद्या मी तुमचं आणि माझ ते मोठ मंगळसूत्र पोलिश करायला टाकणार आहे, काढून ठेवाल, नहीतर मी विसरायची निघतांना."

"अग, माझ्या कुड्या पण घेवून जा, मोडून टाक, आणि काही तुझ्या आवडीच्या नवीन कर माझ्यासाठी, तुझा पगार आहे ना उद्या, येतांना माझ्यासाठी ते मोतीचूरचे लाडू घेवून ये आणि तुझ्या आईसाठीपण काहीतरी आण कि, आपल्या मिठाई वाल्याकडून."

"काय हो आई? दर महिन्याला नुसते मोतीचुरचे लाडू हवे असतात तुम्हाला, मला तर तुम्ही करता ते बेसनाचे लाडूच खूप आवडतात. माझ्या ऑफिसमध्येही डिमांड असते तुमच्या लाडूची, आजचं माधवी विचारात होती, कधी लाडू करताय तुझ्या सासूबाई म्हणून."

"बरबर, करेल मी, सरळ बोल ना, लाडू संपलेत म्हणून, उद्या येतांना लोणी घेवून येशील, आणि माझे लाडू विसरायचे नाही."

आणि मग गोष्टीत सासूने तिची शेवटची पानिपुरही आरतीच्या प्लेट मध्ये टाकली आणि आरतीने आवडीने तीही फस्त केली. नंतर सासू तिच्या आईसोबत गप्पा करण्यासाठी त्यांच्यासोबत सोफ्यावर बसल्या आणि आरती स्वयपाक करत होती. आरतीची आई हे सर्व बघून मनातच खूप विचार करत होती, क्षणात तिला मुलीवर खूप गर्व वाटत होता पण काहीस चुक्ल्यागत वाटत होतं.

महिना झाला होता तिला मुलीकडे येवून, पण तिने साधा सुनेला फोनही न केलेला. पण आरतीच बोलण होत होतं आणि आईला बोलून काहीच फायदा नाही हे ती जाणून होती. मुलीच्या सासरी असूनही तिला घरातल्या कुणीच असं विचारल नव्हत कि अजून किती दिवस राहणार. ह्याही गोष्टीच नवलच होत तिला. त्यांना विचारात सुनेची आई आठवली, दोन महिन्याआधी सहज चक्कर मारावी म्हणून आलेली, फक्त दिवसभर राहून संध्याकाळ पर्यत थांबली होती तरही तिच्याशी बसून बोलल्याही नव्हत्या त्या.

आरतीची सासू नाह्मी तिला सोबत घेवून फिरायची, घरात कधी दुझा भाव दिला नाही. आणि आरतीला तर तिची सासू तिच्या आईशी वाईट वागेल असं कधी वाटणं शक्यच नव्हत. ती स्वतःहून फारसं लक्षही देत नव्हती आईवर.  

आरतीच्या आईच्या मनातली घालमेल एवढी वाढली होती कि तिला कळतच नव्हत. मनोमन मुलीची तुलना सुनेशी करत मनातच झुरत असायची, सुनेला दोष देवून झाला कि मग मुलाला मनातच दोष देवून शांत होत होती.

त्या दिवशी आरती खोलीत तयार होत होती तर आरतीला तिच्या खोलीत येवून म्हणाली, "किती सुंदर जपतेस ग तू तुझं आणि तुझ्या सासुच नातं, नाशिवान आहे तुझी सासू. माझी तर तुला गरजही भासत नाही, तुझी सासू तुझी दुसरी आईच आहे."

"आई, मी नाही जपत त्या जपतात नातं, बघतेस ना मला तर वेळाही मिळत नाही फारसा. आणि नातं कसं जपायचं हे मी त्यांच्याकडून अजूनही शिकत आहे. ज्या दिवशी ह्या घरात पाय ठेवला ना त्याच दिवशी त्या मला म्हणाल्या, तू सून आहेस ह्या घरची, माझ्या मुलाला प्रिय आहेस आणि म्हणून तू मला अतिप्रिय असणार आहेस.

माझ्या बाळंतपणात त्यांनी माझी खूप काळजी घेतली, माझी प्रत्येक इच्छा पुरवली, तुला तर माहित आहे माहेरी मी एक महिनाच राहिले बाळंतपणात. आधी मी त्यांच्याशी बोलायलाहि घाबरायची पण त्यांनी ती भितीही कशी घालवली मालच माहित नाही. आता तर मी त्यांना कसल्याही सुरात काहींही बोलू शकते अगदी तुला बोलते ना तस, कदाचित त्यापेक्षाही जास्त. आणि त्या नेहमी म्हणतात कि माझी सून माझ्या मनात नांदते.... घरात नाही."

तेवढ्यात तिच्या सासूने तिला आवाज दिला आणि ती आईला तसच खोलीत सोडून सासूकडे निघाली, तिची आईही मागेच निघाली काय गोंधळ आहे ते बघायला. तिच्या सासू स्वयपाक घरात पडल्या होत्या, आणि घरातली सर्व मंडळी त्यांना उचलून खोलीत नेत होती. आरतीने लगेच डॉक्टरांना फोन लावला, नवऱ्याला फोन लावला आणि सासूच्या अगदीच जवळ जावून बसली. डॉक्टरांकडून सर्व औषधी तिने समजून घेतली. ऑफिस मध्ये पाच दिवसाची रजा टाकली. सासूला हव नको रोज बघायची. देवापुढे रोज विनवण्या करायची कि सासूला बर होवू देत म्हणून. सर्व घरात तिचाच नाद असायचा. सासूच्या तोंडावर सुनेच नाव असायचं.

मुलगा आईशी बोलायचा, वेळ घालवायचा पण सासूला काय हव नको ते तर सुनेलाच कळणार होतं. आणि हे सगळ बघून अरीतीची आई खूप गौरांकित होत होती पण मनात नाराजही होती. आता तिलाही परत जावसं वाटत होतं पण आरतीच्या सासूला बर नसल्याने ती म्हणंत नव्हती.

सासूबाई परत जातील सुनेकडे? काय गुपित आहे आरतीच्या सासुच कि ती सुनेसाबत जुळवून घेते. सुनेच्या मनाला मान देतात. वाचायला विसरू नका कारण आरती त्या घरातल्या मनात नांदते... नुसती घरात नाही. घरात काय, हक्काने, अधिकाराने नाहीच काही तर भांडूनही राहू शकतोच पण मनात राहायला मनाची संमती लागते. आणि नातं मनाने निभवाव लागतं अधिकाराने नाही.

आयुष्यात शिरणार प्रत्येक नात प्रेमासोबत वेळेनुसार गरज घेवून शिरत. एक नात घट्ट करण्यासाठी त्याच्यासोबतची सर्व नाती मनात जपावी लागतात,. आणि ती नाती प्रेमाने जपतांना गरज सांभाळावी लागते. कधी ती आपली असते तर कधी ती समोरच्याची...

ढचा भाग लवकरच वेबसाईट आणि पेज वर https://www.facebook.com/manatlyatalyat

कथा कशी वाटली नक्की कळवा...

उर्मिला देवेन

जोडीदार तू माझा कथेचा पुढचा भाग इथे प्रकाशित झाला आहे, नक्की बघा !







Post a Comment

0 Comments