जेव्हा ex परत येतो...भाग ५

 


आधीचा भाग इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/2021/09/ex-4.html

माधव पेपर घेवून होता तोच वरांड्यात परत अवनी धावत होती. माधव आवाजाने उठला, दाराकडे गेला, अरुंधती तिच्या मध्ये धावत होती, तिचा तो गळ्यातला स्टेथोस्कोप तिच्या मंगळसुत्रासोबत गुंतून होता आणि आनंदाने हलत होता. खूप आनंदी दिसत होती ती. तिला असं बघून माधवला साऱ्या प्रश्नाची उत्तर जणू गवसली होती. नजरा स्वतः कडेवळल्या, मनात कोलाहाल उभा झाला, ज्यात तो गुन्हेगार म्हणून उभा होता, तिला नजरा मिळवू शकला नाही, तिची नजर पडण्या आधी तो लपला, त्याच्या जागेवर आला, परत नजरेत ते स्टेथोस्कोप तिच्या मंगळसुत्राच मिलन त्याला भेदत होतं, म्हणाला, “तुझा आनंद इथे होता आणि मी हेच काढून फेकत होतो. पण चूक आता गवसली मला... प्रेम फक्त पेम नसतं ग, समोरच्याच आनद जपावं लागतो. तेच खर प्रेम....”

सुस्कारा देत तो बसला, घरचं तर कुणी नव्हतच त्याच्या सोबत. त्याचा विश्वासू मॅनेजर येणारं होता त्याला घरी घेवून जाण्यासाठी. पण का कुणास ठाऊक आज त्याला अरुंधतीशी बोलल्या शिवाय जायचं नव्हतं.

पण अरुंधती डॉ राणे होती. तिला भेटायसाठी योग्य कारणच लागत होतं. कासावीस झाला, नर्स खोलीत आली, तर म्हणाला, “अरुंधती....म्हणजे डॉ राणे.. “

“राणे मॅडम, त्या तर आताच निघून गेल्या, त्यांचे सासू सासरे आले होते ना, आणि त्या मोठ्या मॅडम, आहेत, फक्त सर्जरी करतात. बाकी सगळ बघायला आपल्याकडे जुनिअर डॉं खूप आहेत, काही हवं असेल तर मी बोलावते.”

आणि ती आता कुनाची ड्यूटी आहे हेही बघायला लागली.

“मोठ्या  मॅडम? मग आता त्या येणारं नाहीत का आज.”

“हम्म... आता तर नाही, पण रात्री त्यांना एक सर्जरी आहे. तुम्हाला तर डिस्चार्ज झालंय ना...”

माधव शांत झाला, तेवढ्यात सेक्रेटरी सायशा आणि त्याचा मनेजर आले.

“वो माय डार्लिंग, किती लागलेय रे तुला. आता ना मी तुला कुठेच जावू देणार नाही. माझ्या शिवाय.” सायशा येवून त्याला बिलगली. आणि मनेजर नर्स सोबत बिल्स आणि इतर गोष्टी सांभाळण्यासाठी निघून गेला.

सायशाने माधवच सामान आवरलं, सोबत आणलेल्या बॅग मध्ये ठेवलं. माधव तयार झाला होता पण मन तयार नव्हतं. कसातरी निघाला, बाहेर निघात्ताना हॉस्पिटलच्या बाहेर संथापाकाची यादी लागली होती त्यात अमित राणे मोठ्या अक्षरात लिहून होतं. आणि खाली डॉक्टरांच्या यादीत डॉ. अरुंधती अमित राणे

 

माधवच्या काळजात तीव्र वेदना झाल्या होत्या.... मन अजूनही शोधात होतं, त्याने काय सोडलं होतं जे अमितने धरलं हे त्याला आता जाणून घायच होतं.... जरा थबकला, मनेजरला म्हणाला, गाडी एखाद्या हॉटेलकडे घ्या. मला आज बोलायचं आहे तिच्याशी. मनेजर काहीच बोलला नाही, तोही अरुंधतीला ओळखून होताच. त्यालाही सांर काही माहित होतं. माधवच काय काय झालं अरुंधतीच्या मागून हे त्यालाच ते माहित होतं. न बोलता त्याने गाडी हॉटेलकडे वळवली. सायशाही माधव सोबत त्याच्या खोलीत थांबली होती. आज तिची जादू काही माधववर चालत नव्हती. माधव गुमान गप्प होता. त्याला अरुंधतीला आयुष्यात परत आणायचं होतं. विचारत होता.

इकडे अरुंधती घरी आली होती, तिच्या सासूबाईचे रिपोर्ट पाहिजे तेवढे बरे नव्हते. सासू सासरे दोघेही सोफ्यावर बसून होते आणि अरुंधती औषधी बदलत होती, म्हणाली, “आई उद्या पासून सकाळी जॉगिग सूर करा बाबांसोबत.”

सासू हसली, “म्हणजे मीही तो स्पोर्ट पेंट घालू, एक रबरी पट्टी डोकं दुखत नसलं तरी डोळ्क्याला बंधू. ती थर्मोस ची बॉटल हातात घेवू. ते तू आणून वर्ष झालेले माझे प्रदर्शना साठी ठेवलेलं बूट घालू,एक पांढरा टॉवेल उगाचच खाद्यावर ठेवू आणि घरातून पळत निघू.... मला नाही जमायचं, मी ना त्या घरातल्या पाळणाऱ्या मशीनवर धावते.”

बाबा आता जोरात हसले, “मग काय हरकत आहे, करतेस काय सकाळी सकाळी?”

अरुंधती लगेच म्हणाली, “ते काही नाही, सकाळी अलाराम लावते मी, दोघही सोबत जायचं आणि यायचं. आई ती पाळण्याची मशीन माझ्या साठी आहे, तुम्ही वापरू नका उगाच अजून काही व्हयाच. “

“हो ग, तू पळतच राहतेस ना...”

अरुंधतीने, अर्थला अभ्यासाला बसवलं, सासरे अनवीला शिकवत बसले. सासूबाई घर आवरत होत्या आणि अरुंधती स्वयंपाक करायला गेली. स्वयंपाक आवरून तिने स्वतःच आवरलं, “बाबा मला हॉस्पिटलला निघायचं आहे, एक सर्जरी आहे आता. सकाळी काही करणास्थ्व झाली नाही, निघायचं आहे मला. आणि उशीर पण होईल यायला.”

“अग पण, तुझं जेवण.”

आई तिला हळूच म्हणाली, “तो गेला काय ग आज?” बाबाने तिला इशाऱ्याने गप्प केलं.

आई थबकली, तिला बघताच अरुंधती म्हणाली, “माधव काय? हो आज डिस्चार्ज दिलाय सकाळी.”

आई निवांत आता सोफ्यावर बसली, जणू बिनधास्त झाली होती. अरुंधती गेली आणि बाबा आईवर ओरडले, “काय ग, तुला करायचं काय?”

“अहो काही नाही, काळजी वाटते हो.”

“हमम, तुला तुझी काळजी आहे, आणि तिची, अमित नाही आता, तिला कुठे काही वाटत नसेल का? जोडीदार आयुष्यात नसला ना कि आयुष्य कसं वाळवंटा सारखं होतं... पण आपली अरुंधती कशी हिम्मतीने सांर काही आपल्या साठी करते बघतेस ना तू? मग का तुला मध्ये मध्ये बोलून त्रास देतेस.?

तुझी काळजी तिची नाही तुझी आहे... हे समजतं ग मला, अरुंधतीच्या जराश्या निर्णयाने आपलं सगळं साम्राज्य हलू शकतं... हे तुलाही माहित आहे.

पण मला जेवढ माहित आहे त्यावरून सांगतो, ती कधीच असा तसा निर्णय घेणार नाही, आणि घेतलाही...”

जर ती स्वतः साठी स्वार्थी झाली तर... “ आई पटकन म्हणाली.

“काय हरकत आहे ग...? “ बाबा चष्मा पुसत बोलले.

“अहो काय बोलता आहेत तुम्ही”

“मी काय बोलू, सांग, आपला मुलगा तर राहिला नाही... मग तिच्या आधाराने आपण आहोत.”

“मग काय काहीच बोलायचं नाही का?”

“अग आपल्याला काही माहित आहे का? ती काय जाणार आहे का त्याच्यासोबत... काय उगाच बोलत असतेस. चल अनवीला भरव, मी अर्थचा अभ्यास घेतो, परीक्षा आहे त्याची आता.”

अरुंधतीला सर्जरी संपवायला दहा वाजले होते. ती सर्व आटपून घाईत निघाली होती. तोच तिला पार्किंग मध्ये तिच्या गाडीजवळ माधव उभा दिसला, तिने दार उघडता उघडता लावलं, माधव तू इथे, अरे आराम करायचा ना? घरी गेला नाहीस?”

तुला काळजी आहे अजूनही माझी…

“का नसावी... माझा पेशंट आहेस तू.”

“घरी जायला हवस तू तुझ्या, आराम हवाय तुला, अजून जखमा भरल्या नाहीत.”

“कुठलं घर अरु... तू नाहीस ना तिथे...”

“तुझं घर...?”

तो लगेच तिच्या जवळ आला, “अरु माफ कर ग मला, आपण परत ...”

“माधव तू सिमा ओलांडतो आहेस, डॉ राणे म्हणायचं, मी पेशंट म्हणून बोलत आहे तुझ्याशी. “

अरु, जावूदे ना ग..

मिस्टर पंडित, मला वेळ होतं आहे, माझ्या घरी सगळे वाट बघत असणार माझी.”

“कुठलं घर ग? उगाच लादून घेतलं आहे तू, दुसऱ्यांच करत आहेस. तो मुलगा तुझा नाही... ती मुलगी मला नाही वाटत तुझी असेल म्हणून...”

“मिस्टर पंडित तुम्ही सिमा ओलांडताय...”

“नाही तुला सीमा दाखवत आहे ओलांडण्या साठी... अग अमित राहिला नाहीच आता... आणि मी पण परत आलोय..... ”

“मिस्टर पंडित, काळजी घ्या...”

“अरु ऐकून तर घे... मी तू जे म्हणशील ते करेन ग, मला मान्य आहे तुझी डॉक्टरकी... तुझी प्रत्येक गोष्ट... मी सांभाळेल ना सर्वाना, काहीच कमी नाही ग मला, आपण सगळ्यांना आपल्या बंगल्यावर घेवून जावू.... पण तू मला हवी आहे... विचार कर ना ग, येवढ मोठं आयुष्य आहे समोर तुझ्या?”

“मिस्टर पंडित, निघते मी.”

अरुंधतीने गाडी सुरु केली आणि तिने काच वर केला, माधव अलगत बोट काचेवरून काढली, अरुंधती मिघून गेली. अरुंधतीच्या मनात विचार शिरला होता. माधवच्या नजरेत पश्चाताप तिला दिसत होता. माधव एवढ्या वर्षाने परत माझ्या सोमोर का आला हेच तिला कळत नव्हत. त्याच्यावर खूप प्रेम होतं तिच पण भूतकाळ म्हणून तिने त्याला कधीच मनातून काढून टाकलं होतं.  

मागेच माधवही गेला, त्याला तर जिद्द चढली होती. काय घडलंय हे त्याला जाणून घ्यायचं होती. अरुंधतीच कर्तव्य बोलतय, ती का बोलत नाही हे त्याला महित करून घ्यायचं होतं.

कथा अंतिम चरणात लवकरच...पुढचा भाग पेजवर लवकरच..... तेव्हा स्टे connect टू मनातल्या तळ्यात. कथा कशी वाटली नक्की कळवा. माझ्या कथा वाचण्यासाठी माझ्या पेजलाही लाईक करू शकता.

कथेच्या प्रकाशाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

©उर्मिला देवेन

धन्यवाद!!

फोटो साभार in.pinterest.

    जोडीदार कथेचा पुढचा भाग इथे प्रकाशित झाला आहे.. नक्की बघा ..आणि लवकरच जोडीदार तू माझा वाचकांसाठी वेबसाईट पहिल्या आणि दुसऱ्या पर्वासोबत येत आहे.



Post a Comment

0 Comments