एक डाव तिचा.... “द बुमरेंग” -भाग 7


आधीचा भाग इथे वाचा भाग ६

सानिका रोज मरत होती आणि रती रोज राणी म्हणून आयुष्य जगत होती. रतीशी राजेशच गोड बोलणं सानिकाला खटकतं असायचं पण राजेशहि रतीच्या ह्या वागण्यात तेवढाच सहभागी होता हेही ती जाणून होती. साऱ्या गुन्हेगारांना ती समोर जगतांना बघत होती पण धाडस नव्हतं स्वतःची सीमा लांघून धडा शिकवण्याचा.

इकडे रती जळवजवळ सांर विसरली होती, तिने अजून राजेशला माफ केलं नसलं तरी मुलीचा बाप म्हणून तिने त्याला माफ केलं होतं.  पण स्वतःला ती माफ करू शकत नव्हती तरीही खुश होती मुलीसाठी. सांर काही रुळावर आलं होतं...पण एकांतात तिला स्वतःला राग मात्र येत होता... मुलगी तीन महिन्याची होतं आली होती आणि तिने हळूहळू ऑफिसच्या फाईल्स बघणं घरूनच सुरु केलं होतं...

राजेश सांर काही विसरला नव्हता, सानिका त्याच्या समोर असतांना त्याला तिच्यात रती दिसायची, रतीने जे केलं होतं ते त्याला राहून राहून आठवत होतं. सानिकाला समोर बघितलं कि त्याला रतीचा उलटा सलवार दिसायचा, मग मयूरच ते घाणेरड हसणं त्याला छळायच. त्या दिवशी जेव्हां रतीने मयूरच्या गालात लावली होती आणि मयूरने अलगत VDO सुरु केला होता, तेव्हांच तो ऑफिसच्या दारातून आत शिरला होता, आणि मयूरच ते घाणेरड हसणं ऐकून तिथेच थांबला होता. सांर काही ऐकलं होतं त्याने आणि सारा प्लान त्याने तिथेच आखला होता. रती फसत गेली आणि मयूर उध्वस्त झाला, पण ह्या कथेचा अजूनही एक महत्वाचा माणूस आहे हे त्याला कधीच लक्षात आलं नव्हतं.....

मयूरला रतीशी बदला घ्यायचा होता, त्याच्या मते तिने त्याला वापरलं होतं.. खरं काय ते आपल्याला माहित आहे, पण... त्याची मानसिकता इथेच घुमत होती. सानिकालाहि तो तोच मार्ग अवलम्बून राजेशला उध्वस्त करू पाहत होता. पण सानिका त्याचं कधीच ऐकत नव्हती, तिला राजेश कधीच वाईट वाटला नाही... तिला घृणा होती ती रतीची.... पण रती आता आई झाली होती... आणि ऐका आईला उध्वस्त करण्याचं धाडस तिच्यात नव्हता... तसं पाहिलं तर ती तिच्या नवऱ्याला ओळखून होती, गुन्हा त्याचाहि होता, नवरा म्हणून तिने त्याला माफ केलं मग रतीला का नाही.... मी का तो मार्ग धरावा, आयुष्य तर काही वेगळं वळत आहे ह्या विचारात ती पार गुंतून होती.

आज मयूरने मनात आणलं होतं कि राजेशला फसवून त्याच्याकडून पैसा काढायचा. सानिका कडून त्याने तिचा शेडूल विचारून घेतला. सानिकाच्या मनात युद्ध सुरु होतं, तिने आज स्वयपाक खोलीतली सुरी बॅगमध्ये टाकली, तसंही सांर असह्य झालं होतं, स्वतःला संपवावं अशी ती नव्हती पण आज तिने विचारात अलगत सुरीच बॅगत टाकली. भरल्या डोळ्याने ती घरातून निघाली, ती निघताच मयूरही निघाला.

राजेशला आता सानिका हवी होती, तिच्या अंगावर असलेल्या जखमांना त्याला त्याचा स्पर्श करत मलम लावायचा होता. तिच्या त्या गोऱ्या चेहऱ्यावर हसू आणायचं होतं. आज त्याने सकाळीच सांर काही ठरवलं होतं, तो तयारी करतांना पर्फुन्म वापरत होता तोच रती खोलीत शिरली,

काय रे आज काही खास, तू सहसा लावत नाहीस पर्फुन्म, तुझा तो घामाळ वास येत असतो, एवढा मोठां झालास, चला आजुपासून लावायला शिकलास, उत्तम.

ये रते, तू शिकवत नाहीस ना असल्या गोष्टी मग?

:काय आज मूड दिसतोय तुझा, नाहीतर चिडला असता मी असं म्हणूनही.

आज ना मला मनशांती मिळणार आहे.... एक खूप दिवसाचं अडकलेलं काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे...

असं, काय रे सांग कि, हल्ली ऑफिस मध्ये नसते मी पण तुझी काम माहित आहे मला...

आहे ग, तुला नाही कळायचं, पुरुषाला हि मन असतं, त्यालाहि भावना असतात.... मनात खटकत असतं काही... समोर असूनही मनाला आवरणं कठीण होतं...

तोच त्याची मुलगी रडली, रती, राजेश सांग मला काम झालं कि, एकेन मी तुझं हे भावनिक काम... तुला शांती म्हणजे घरात आनंद बाबा.... चल आटोप लवकर, जानवी रडत आहे... आपण नंतर बोलू…

ती धावत मुलीकडे निघून गेली... राजेश मात्र आज ठरवून होता, त्याला मयूरला आज ती मनस्थिती अनुभवू द्यायची होती. सानिकाला जवळ करायचं होतं आणि.....

त्याने ऑफिससाठी तयारी करतांना चुकून त्याची एक फाईल घरीच ठेवली. आणि तसाच निघून गेला.

रती मुलीशी खेळत असतांना तिची नजर त्या फाईलवर पडली, तिने कामाची असावी म्हणून हातात घेत हाताळली, ती फाईल सानिका जो प्रोजेक्ट हाताळत होती ती होती. सानिका नाव तिने ऐकलं होतं पण फार तिला काही तिच्याबद्दल माहित नव्हतं. तिने केलेली डिझाईन त्या फाईल मध्ये होती, तिचं काम बघून तिला तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता झाली, तिने कंपनीची वेबसाईट बघितली, तिच्या बद्दल सांर काही माहित केलं, ती मयूरची बायको असल्याचं तिला कळालं... आणि धक्का बसला. गेल्या वर्षभरापासून ती राजेशसोबत काम करत होती आणि राजेशने तिच्याबद्दल रतीला सांगितलं नव्हतं. सानिका उत्तम डिझानर आहे हे तिला आधीच माहित होतं, मयूर उध्वस्त झालंय हेही तिला कळालं होतं, पण ते तर त्याच्या पापाची फळ असं समजून ती आनंदी होती, पण सानिका तिच्या ऑफिस मध्ये काम करते आहे हे तिला पचवंण अवघड होतं... मयूरला ती उत्तम ओळखून होती, हा सारा त्याचा डाव असावा हेच तिला वाटू लागलं..... पण सानिका तशी नाही ह्यावर ती वारंवार येत होती, त्यात तिला राजेशच असं पर्फुम लावणं... काहीबाई बोलणं काहीतरी अनपेक्षित घडणार हे सांगत होतं....

विचारात होतीच तर मुलीला बघणारी बाई तिला सांगत आली,

“मॅडम जानवी दुध पीत नाही आहे, अंगहि तापलं आहे तिचं, आपण तिला घेवून हॉस्पिटलला जायचं का?”

रतीने लॅप टॉप खालीच टाकला आणि ती तशीच निघाली....

इकडे सानिका तिचं काम करण्यात गुंग होती. मयूर ऑफिसच्या बाहेर लपून होता. राजेश ऑफिसमध्ये शिरला हे त्याने बघितलं होतं. त्याने सानिकाला फोन केला,

“हे बघ सानिका, आज मी तुला घ्याला येणार आहे, तू ऑफिस मधेच थांबायचं.”

“अहो पण त्याची काहीही गरज नाही, मी येईल ना वेळेवर उगाच इकडे येवू नका.”

“ये मला शिकवू नकोस. गुमान जे बोलतोय ना तेच कर... मी येईपर्यंत ऑफिसमधेच थांबायचं.”

ती बोलतच होती तर पिवून तिला सांगायला आला,

“मॅडम, राजेश साहेबांनी तुम्हाला त्यांच्या कॅबीन मध्ये बोलावलं आहे.”

मयूरने ते ऐकलं होतं, तो लगेच म्हणाला, “आता गुमान जा त्याच्या कॅबीन मध्ये, आणि आज तू जास्त वेळ थांबावर आहेस, ओवर टाईम द्या असं बोल, गरज आहे म्हणावं मला...”

“अहो नकोय मला... तुम्ही माझ्या ऑफिसच्या कामात बोलू नका, घरी आली कि मारा मला पण.... इथे जगू द्या.”

“गुमान बोलायचं, आली मोठी सतीसावित्री... आज जर ती माझं ऐकलं नाहीस ना तर घरी यायचं नाही, मग बघतो तुला कोण जागा देतं ते, तुझे ते माहेरचे तर नाहीच आता... कोण आहे का तुझा वाली... आली मोठी... ठेव फोन, मी करतो तुला.”

सानिका राजेशच्या कॅबीन मध्ये पोहोचली, राजेश आज खूप खुश होता, त्याने तिला बसायला सांगितलं,

“सानिका, आज तू जरा थांबशील का, मला जरा त्या नवीन प्रोजेक्ट बद्दल तुझ्याशी बोलायचं आहे. तुझे डिझाईन फार आवडेल आहेत.”

हो सर, पण, घरी लवकर...

“मी सोडतो, काळजी नको, आणि ओवर टाईम टाक ना...”

“नाही नको मला,”

“माझ्याकडून घे, तू उत्तम काम करतेस.’

“सर असं काहीही नको मला, माझ्या कामाचे पैसे मिळतात मला.”

“सानिका, तू फार भोळी आहेस, आज थांब, तुला सांगतो मी सर्व, तुझं प्रमोशन करायचं ठरवलं आहे मी.... मग हे असं चालायचं नाही.”

“सर, मी आणि माझं काम, बाकी नको मला....”

“काय नको मला, नको मला म्हणतेस...तुझ्याजागी कुणी दुसरी असती तर...”

“तर काय रती झाली असती काय...”

सानिका मनात पुटपुटली पण ओठ हलले होते तिचे. राजेश तिला असं बघून तिच्या जवळ आला,

“काय ग, काय विचार करतेस, आणि हे काय अजून मार खल्लास कि काय तू तुझ्या त्या नवऱ्याचा....असो आज तू थांबते आहेस.”

सानिका काहीच बोलली नाही, गुमान तिच्या जागेवर आली, काही वेळाने परत मयूरने तिला फोन केला. तिने त्याला फारसं काहीच सांगितलं नाही पण ती थांबत आहे हे बोलून मोकळी झाली. सानिकाला काहीही केल्या रती व्हयाच नव्हतं, तिला मयूर आणि राजेशच वागणं पटत नव्हतं, आपण पळून जावं हा विचार तिच्या मनात येत होता, मनात मनाचा संवाद सुरु होता,

“...पण पळून जावून करायचं काय, इथेच राहून करते काय ते, मीही बघते, माझं शरीर माझं आहे, ह्यावर कुणी त्याचा हक्क दाखवावा हे सर्वस्वी माझ्या मनावर आहे, मलाही वाट आहे आता सहा नंतरची....”

अलगत तिने कंपनीची वेबसाईट उघडली, रतीचा बोल्ग वाचला, तिचा नंबर होता तिथे, करावा का तिला कॉल ह्या विचारात तिने तो तिच्या मोबाईल मध्ये सेव केला, पण रतीला तर ती विषकन्या समजत होती... नंबर तसाच सेव करून सोडून दिला.

घडीचे काटे सरकत होते तसे साऱ्यांच्या मनाला काटा कोरत होता, चारही लोकं जणू वेळेची वाट बघत होते.

इकडे रती मुलीला घेवून होस्पिटल मधून घरी आली होती. तिला झोपवून तिने, परत कंपनीची वेबसाईट उघडली, ऑफिस मध्ये फोन करून सानिकाबद्दल माहिती काढली, पण काहीच तिला वाईट ऐकायला मिळालं नाही, सानिका मनापासून काम करते हेच तिला सारे सांगत होते, पण मन तिचं मानत नव्हतं... कुठेतरी काही तरी सुटत आहे ह्या विचारात मोबाईलं चाळत बसली होती तर, ऑफिसच्या सेक्युर्टी सिस्टम सॉफ्टवेअर अप्प तिला दिसलं, सहज उघडून बघितलं, प्रत्येक खोली बघितली, काही वेळाआधी सानिका राजेशच्या खोलीत होती हे तिला माहित झालं, नंतर तिने दारावरचा विएव बघितला, तर सकाळी तिला त्या आवारात मयूर दिसला, थोडा वेळा आधीही तो दिसला... परत तिने ऑफिसचा आतला विएव बघितला, सर्व स्टाफ गच्च काम करत होता, सानिकाला तिने कंपनीच्या प्रोफाईल फोटो वरून कसं बसं ओळखलं, तीही काम करत होती. तिने सगळे विएव सूर ठेवले, आणि ऑफिसची तयारी केली, प्रत्येक क्षणाला सार ती बघत होती. मयूर परत ऑफिसच्या समोर आला होता, त्याने फोन लावला, सानिकाने तो उचलला, त्याचं बोलणं सुरु होतं. इकडे राजेशच्या खोलीत राजेश सानिकाला बघत बसला होता हेही रतीने ओळखलं होतं, त्याने टेबलवर दोन वाईन बॉटल ठेवल्या, आणि रती चाकाकली, कॅबीन मध्ये वाईन त्यांनी सोबत कधीच घेतली नव्हती....ह्या विचारात ती अजुनच त्रासली.

पुढचा अंतिम भाग इथे वाचा ... कथेचा अंतिम भाग....इथे क्लिक करा

आधीचे भाग इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/search/label/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95?&max-results=8

Post a Comment

0 Comments