कश्यपी... विषकन्येचं प्रेम

 


कश्यपी... विषकन्येचं प्रेम

….आणि मग ती ओठांवर गाण गुणगुणायला लागली...

"नागिणी मी मानव लोकांची.

पैजणावर नाचते.

मोहिनी मी मृत्यूची.

एक स्पर्श तुझा शोधते...

पैजणावर नाचते...

मी पैजणावर नाचते!!!"

"मग आमच्यावर मनापासून कोण प्रेम करणार? हुम्म... फु ss फु... मृत्यूवर कुणी प्रेम करतं का?"

जरा वेळ शांत झाली, मनात हरवली, मनाच्या वाटेने दूर निघाली, एकटीच दिसली, भावना शब्दात आल्या,

“किंतु कुणी प्रेम केलं तर...?”

ती जोरात हसली, राग अजून वाढला तसा दाणकन खाली आला,

“ह्या उर्वीवर आहे कुणी, जो माझ्यातल्या ह्या गुर्मिला शमवून माझ्या उर्मिला सामावून घेईल...? असं कोण असणार? आणि असलं तर ?

तिच्या चेहऱ्यावर अलगत गुलाबी छटा पसरली होती आणि हळूच मनाने उत्तर दिलं,

“त्याच्या प्रेमावर भारी असेल कश्यपीच प्रेम... एका विषकन्येचं प्रेम...”

कथा एका विषकन्येच्या मनाच्या तळमळीची.....

आणि.... मग तिला मगध साम्राज्याच बोलावणं येत....

राजकुमार सुशीमला त्याच्या मित्राकडून दिलेलं तिचं वर्णन...

"राजकुमार, देवी कश्यपी अमाप सौंदर्याची राणी किंतु मृत्यूची मोहिनी आहे. तारुण्यात येतांनीच देवीने कही राज्यांना आणि राज्याच्या दरबारातील शत्रुंना यमसदनी पाठवलं आहे. देवीच्या नुसत्या स्पर्शानेही मुके प्राणी निळे हिरवे पडतात. त्यांच्या काळ्या नागिणी सारख्या केशसंभारात सदा एक विषारी सर्प बांधून असतो. त्यांच्याशी बोलतांनाही नाका तोंडावर वस्त्र ठेवून दुरूनच बोलावं लागतं. देवीच्या शरीराची सुंदरता दिवसे न दिवस कात टाकलेल्या सर्पासारखी तजेली नवनवीन भासते. नजर रोखून बघण्याचा मोह कुणालाच सुटत नाही. देवीची मोहकता आणि मादकता सर्पासारखी लवचिक किंतु विषारी आहे हे काय नव्याने सांगू, स्वर्गलोकातील अप्सराही लाजेल जणू. काय ते मृगनयनी नयनात साठलेलं निळं विष डोळ्यांना कुणालाही नजरेने घायाळ करण्याचं सामर्थ्य प्रदान करत समोरच्याला आकर्षित करून फसवतं, जसा निळा सागर जणू, नुसतं त्या नयनात बघत रहावसं वाटतं.

देवीचे कर्ण, चतुर नागिणी सारखे दुरूनच पुरुषांना भापून घेतात. सोनेरी कंचुकितुन उभारलेले स्तन, पाषाणाच्याही मानसिकतेला विचलित करू शकतात. ती नाजूक कटीवर असेली खाच, स्पर्शासाठी मोहित करते.

रत्नजडीत बाजुबंदाने नटलेले लांबसडक हस्त आणि ती सुवर्ण कांती सारखी मोहात पाडणारी काया. तो विषकन्येचा तोरा, निळा सोनेरी भरजरीचा पेहराव, सुवर्ण नक्षीकाम असलेला त्यांचा तो खांद्यावरून खाली लोंबणारा गर्द निळा शेला, जसा हेवा अंतरंगात भरतो. तिचा तो रत्नजडीत अलंकारांचा श्रुंगार, पैजणांची छुमछुम... आहा... आहा काय ती भावविभोर करणारी अप्सरेची छबी!

ती नागिणीसारखी चाल...

त्यावर पैजणांचा ताल...

भल्या भल्यांच्या मनाला करतो बेताल...

असा तो बाणा तिचा, राजकुमार.

नाही सुटणार चंचल स्वभावाचा अशोक तिच्या मोहापासून.

आणि  कश्यपी महालात पोहचते.... तिची राजकुमार अशोकशी भेट आणि मग तो प्रेमाचा गंध ह्या सुवासात सारं काही... बदलत जातं... अशोकाचा राजकुमार पासून तर सम्राट आणि सम्राट पासून तर चक्रवर्ती सम्राट पर्यंतचा प्रवास... त्यात कश्यपीची भूमिका, विष प्राशन करणारी पण प्रेमाला अमृत देवून जाणारी....प्रिय राणी कश्यपी आणि सारच कसं राजेशाही.... राजकींय, राजनीतिक, कुटनीतीने भर भरून असेलली कश्यपी हि कादंबरी, थरारक आणि रहस्यमयी ऐतिहासिक प्रेमकथा वाचकांसाठी सादर आहे....

प्रिय वाचक,

आपण नेहमी वेगवेगळे विषय हिंदी आणि इंग्रजी मधून वाचत असतो, हिंदीत विषकन्यावर पुस्तक आहेत.... पण मराठीत पहिल्यांदा एक नवीन आणि वेगळा विषय हाताळण्याची हिम्मत मी माझ्या वाचकांच्या जोरावर केली आहे.

विषकन्येचं प्रेम, हि साधारण २५०० शब्दाची कथा मी प्रतिलिपीच्या ऐतिहासिक कथा स्पर्धेत टाकली होती. त्यानंतर त्या कथेवर अनेक ठिकाणी चर्चा झाली, वाचकांनी पंसती त्याला लाभली, साधारण ४२ हजार वाचक नुसते प्रतिलिपीवर त्याला लाभले. ३५० आणि खाजगी अनेक निगेटिव्ह पॉजिटिव्ह  प्रतिक्रिया होत्या. कॉपी राईट वाचवण्यासाठी कथा वर्षभराआधी मी तिथून काढली. त्याच कथेची ऑडिओ कथा मराठी अभिनेत्री दिप्ती भागवत बर्वे ह्यांच्या मधुर आवाजात अतिशय गाजली, त्यालाही २५ हजाराहून जास्त वेळा ऐकल्या गेलं...

त्या व्यतिरिक्त कही platform मी ती टाकली, कितीतरी लोकांना स्वतः पाठवली... अनेक प्रश्न होते..... प्रतिक्रियांचा भडिमार आणि स्तुती होती ... पण उत्तर होतं... लेखिकेची स्वतंत्रता आणि कल्पना शक्ती... ज्याला बंदी नाही... आणि कथा historical fiction ह्या प्रकारात...

त्यातंच कथेला नाटकासाठी मागणी होती... विचारात पडेल होते, काहीच अनुभव नव्हता... नाटकं जेमतेम तयार होतं आणि मग कोरोना आला आणि थेटर बंद पडले... हुश्ह्ह.... तरीही मनात धाकधूक होती, कथेचा विषय खूपच वेगळा आणि पहिल्यांदा मराठीत... इतिहासाचे कही पान उघडायचे होते, पुस्तकांची खरेदी... वाटेल ते वाचन सुरु झालं... आणि काय काय ते.... पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग... मार्गदर्शक मिळत गेले... विविध platform वरून ह्या कथेला सविस्तर मांडा म्हणून मागणी होती, शिवाय कथेच्या संकल्पनेला चोरीची भीती जास्त होती... कथा कादंबरी स्वरुपात असावी, कथेचा व्याप दिसावा, कथा इतिहासात असावी, कथेची भाषा आणि अश्या अनेक विचारात कथा अतिशय नाजूक रित्या मूळ इतिहासाला धक्का न देता  हाताळायची होती...

अर्थात ती प्रसिद्ध केलेली छोट्शी कथा आणि प्रस्तुत कथा कादंबरी खूप अंतर आहे...

आणि तीन वर्षात एक कादंबरी तयार झाली.... रसिक मायबाप, कथा वाचा, आणि अभिप्राय नक्की द्या.

आपण ऐतिहासिक सीरिअल बघतो, हिंदी मध्ये कथा वाचतो... दाद देतो, डोक्यावर घेतो.... मग अश्याच गोष्टी जर आपल्या मायमराठी भाषेत येत असतील तर वाचायला काय हरकत आहे... आपण मराठी माणूस म्हणून जर मराठीची कदर केली नाही तर अनेक तोंड उभी आहेत मराठी माणसाला दाबण्यासाठी, मराठी आहात मग मराठी ऐतिहासिक कादंबरी तेही अश्या अगदीच वेगळ्या विषयावर वाचायला आपल्याला नक्कीच आवडेल.....

कथेचा वाचक खूप मर्यादित असणार हे आधीच लक्षात होतं, कारण हि सासू सुनेची किंवा नुसती प्रेमकथा नाही... पण तरीही वाचक त्याला आधीही लाभला आणि आताही लाभेल हीच सदिच्छा...

कथा भारताच्या संपूर्ण platform वर उपलब्ध आहे. जागतिक वाचक ती किंडल किंवा गुगल पेवर वाचू शकतात.

पुस्तकाचे मुखपृष्ठ संपदा कटरेने रेखाटले आहे. खूप आभार!!

कथेचा पूर्ण इंटेरिअर bluerose publication सारख्या प्रसिद्ध नंबर एकच्या प्रकाशनने हाताळला आहे.

कादंबरी अवघ्या दहा दिवसात पहिला ५० चा स्टॉक sold आउट होती. नवीन स्टॉक नुकताच उपलब्ध आहे.

कादंबरी Amazon, flipkart, bluerose publication, Kindle Edition, google pay वर उपलब्ध आहे. लिंक खाली कमेंट मध्ये आहेत.

किंवा आपण kashyapi-Vishkanyech-Prem-Urmila-Deven ह्या नावाने सर्च करा आणि नक्की अभिप्राय द्या...

Amazon link

https://www.amazon.in/Kashyapi-Vishkanyech-Prem-Urmila-Deven/dp/9356115923/ref=sr_1_2?keywords=urmila+deven&qid=1653061332&sprefix=Urmila+dven%2Caps%2C1086&sr=8-2

flipkart link

https://www.flipkart.com/kashyapi-vishkanyech-prem/p/itm2bd00fabbed9d?pid=9789356115927

bluerose publication

https://bluerosepublishers.com/product/kashyapi-vishkanyech-prem/

Kindle Edition

https://www.amazon.com/%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80-Kashyapi-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%82-Vishkanyech-Marathi-ebook/dp/B0B1XCT5H3/ref=sr_1_1?crid=24KIUPJBNGM87&keywords=Kashyapi+-+Vishkanyech+Prem&qid=1653458008&sprefix=kashyapi+-+vishkanyech+prem%2Caps%2C220&sr=8-1

google pay-

https://books.google.co.jp/books?id=iVpwEAAAQBAJ&pg=PT1&lpg=PT1&dq=sampada+katre&source=bl&ots=EVVsfjz_Io&sig=ACfU3U3kNq2y7D4fL8Z7cU-ncdoKhVIr4A&hl=en&sa=X&sqi=2&ved=2ahUKEwj1-aff-_n3AhUgJzQIHeSoB0wQ6AF6BAgQEAM#v=onepage&q=sampada%20katre&f=false

मी उर्मिला देवेन, लेखिका म्हणून माझं खूप मोठं नाव नाहीच, पण साहित्याच्या दुनियेत माझं अस्तित्व निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. ही कथा कादंबरी माझी पहिली ऐतिहासिक फिक्शन कथा आहे. आशा करते आपण कथेला कथा म्हणून वाचून तसा आस्वाद घ्याल.

अर्थात, वाचकांची दाद हवीच. नुसती कौतुकाची दाद नको तर मला वाचकांच्या मार्गदर्शनाचीही गरज आहे.

धन्यवाद!

उर्मिला देवेन

भ्रमणध्वनी क्र. +८१-७०-३५२२-३५८० 

Urmiladev@gmail.com

https://www.manatalyatalyat.com/

https://www.urpanorama.com/

https://www.facebook.com/manatlyatalyat

 

 

Post a Comment

0 Comments