जोडीदार तू माझा... भाग १४

 जोडीदार तू माझा... भाग १४ 

जोडीदार...

मनाला भावणारा आणि हवा हवासा वाटणारा सखा असतो.

तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असा तो जोडीदार...

मग बघुया आजच्या भागात काय होतं ते...

मंडळी हॉलमध्ये रमली होती, भीमा आणि सुनी तिथे होतेच मग वातावरण कसं बदलायचं दोघांना पक्क माहित होतं. भीमा आणि सुनिता दोघेही जोडीला जोड होते. ते कुठेही असले कि नुसता आनंद भरत असत.

भीमा काका आणि सुनी काकींचा प्रेम विवाह होता, त्या काळात प्रेम विवाह म्हणजे कसोटी होती पण पार केली होती दोघांनी. भीमा, सुनीता आणि अरुण एकाच कॉलेज मध्ये होते. अरुणने बरीच मदत केली होती दोघांना म्हणून आजही संबंध कायम होते त्यांचे. सुनीताची फैशन आणि भीमाचा खोडकर स्वभाव नेमही घरात आनंद देत असायचा.

भीमा काकाचा मुलगा परदेशात होता. सुनबाई फॉरेनर होती त्यांची. बऱ्याचदा जावून आले होते मुलाकडे. सून विदेशी होती तरीही सगळं हसत आनंदाने स्वीकारलं होतं दोघांनी. मुलाच्या लग्नात हौस झाली नव्हती मग जवळच्यांच्या मुलांचे लग्न जुळवन खूप मिरवायचे. आरती आणि अरुणची मुलं त्यांच्या अंगाखाद्यावर खेळली होती, खूप जीव होता त्यांचा सर्वांवर.

एकमेकांना खेचून बोलण्यात त्यांना भारी आनंद भेटायचा, सून इग्रजी बोलणारी होती आणि मनमिळाऊ होती मग सुनीताला सुनेसोबत भांडण्याच स्वप्न पूर्णच झालं नव्हत, मोजकं बोलणं होत होतं आणि भाषाही कळत नव्हती, तरीही तिची सुनेसोबत राहण्याची ओढ कमी होत नसायची. राहिला भांडणाचा प्रश्न तर मग भीमा काकांशी कुठेही त्या वाद घालायच्या आणि स्वतःला शांत करायच्या. आजही त्याचं तेच सुरु होतं, तू तू मै मै.

तेवढ्यात आरती चहा आणि कॉफीचे कप घेवून जातांना म्हणाली,

“हो ग, पण माझी सानू.... अजून किती दिवस बिना लग्नाची राहिल.”

भीमा काका म्हणाले, “अहो वाहिनी साहेब, त्याने जन्माला घातलं, म्हणजे तिचा जोडीदार आहेच समजा... हा आता मला थोडा त्रास होईल, हे हिने घेतलेले जुते जास्त घालावे लागतील माझ्या सानूसाठी, हरकत नाही... माझ्या मुलीसाठी तेही करेल मी.”

“हुम्म, मग काय, माझ्या सानूच लग्न जूळल्या शिवाय मी काही हे जोडे टाकून देणार नाही...” सुनिता, भीमा काकाची बायको, ठसक्याने बोलली, मग काय, सर्वच हसायला लागले.

नवरा बायकोच नातंच तसं ना .... जोडीदाराच! सर्व नात्याच्या पार... एक वेगळं नातं. 

भीमा काका आणि सुनी काकीच्या घरात येताच घर दणाणलं होतंच. राणीही खुश होती आणि वातावरण अगीदीच फ्रेश होतं.

भीमा काका अरुणला म्हणाले, “काय रे, गोष्ट समोर वाढवायची ना? काय म्हणणं आहे तुम्हा सर्वांच, नाही, मी तेच जाणून घ्यायला मुदाम तो राजन रावांचा मेसेज बघून आलो बघ.”

अरुणने समोर ठेवलेल्या प्लेट्स जमा केल्या आणि म्हणाला,

“हो रे, राणी आणि राजनने एकमेकांना पसंत केलंय, मुलगा आधीच मनात भरला होता पण आता तो राणीची पसंत आहे... अवघड आपल्याकडून काही नाहीच, सानू अलगत वेगळी झाली बघ. पण राजन कड्ल्यांना सानू पसंत होती म्हणून जरा काळजी वाटते... पाहुणे मंडळींचे विचार बदलायला हवते ना! लग्न हे घरांचही होतं असतं ह्या आरतीच्या मताला मी सहमत आहे. आपली राणी, सानू सारखी बेधडक नाही रे, ती आपली नाजूक, सहन करणाऱ्यातली आहे, शांत आहे रे. लवकर मिसळत नाही... तिला जरा त्यांच्यात मिसळायलाही वेळ लागले... काही कळत नाही मला.. आता सर्व राजन आणि तुझ्यावर सोडलं मी आणि आरतीने”.

तेवढ्यात सानू ऑफिससाठी निघाली होती, जरा वेळ ती हॉलमध्ये थबकली, नंतर आईचे गाल ओढत म्हणाली,

“आयडे, कशाला काळजी करतेस माझी? बघ माझ्यासाठी राजकुमार येईलच... मर्सिडीज़ बेन्ज़ येतील तुझ्या दारात.. बघाशील तू...”

“मर्सिडीज़ बेन्ज़? साधी आपल्याकडे मारोती नाही राणी, मग मर्सिडीज़ बेन्ज़वाला मी कसा शोधू...”

आईने नाराजीने मान हलवली, नी सानुने तिचे गाल परत ओढले,

:आयडे, तुला शोधावा लागणार नाही, तरीही मी तुझ्या पसंतीच्या मुलाशीच लग्न करेल. बघ तू.... पण आता तू राणीचा विचार कर. राणीला गरज आहे आपली सर्वांची.”

आई जरा हसली, “राहू दे ग, मला आणि बाबांना चांगलंच माहित आहे तू का सगळं टाळतेस म्हणून, आमच्या सर्वांची आई आहेस तू... आज जरा लवकर ये घरी.”

“आज? अजून काही नाहीना तुझं... कालचा प्रकार खूप झाला मला, अजून सहा महिने तरी मला लागतील त्यातून बाहेर यायला.”

सानू बाबालाकडे आली,  “बाबा सांगा आईला. नको मला ते चहा पोहे देणं, आपल्याला नाही जमात.”

आणि सगळेच हसले, आई डोक्याला हात लावत म्हणाली,

“टीम लीडर बाई असचं म्हणाले ग, कधीतरी घरी लवकर येत जा. काही तरी शिक स्वयंपाकाच, कालही म्हणालीस सावंत बाईंना, मला फक्त खिचडी येते ते, आता त्यांना काही फरक पडत नव्हता पण तुझ्यासाठी दुसरं स्थळ शोधावं लागले, तिथे जर खिचडी खाणारा नाही मिळाला तर ग काय!”

“तर काय, तो करेल ना स्वयंपाक माझ्यासाठी.”

सानूने आईचे गाल ओढले आणि मान हलवत ती बाबांना हाय फाय करत डोळा मारात निघून गेली. ती गेली आणि क्षणभर सारे शांत झाले, तर परत भीमा काका म्हणाले,

“बऱ मी लागतो माझ्या कामाला, जावून येतो मी सावंत साहेबांकडे, तसे ते उद्या येणारच आहेत ना सुभेदारांच्या मुलीच्या लग्नात. पण मी बोलायला हवं आधी त्यांच्याशी, काय म्हणता तुम्ही वहिनीसाहेब.”

आईची काळजी व्यर्थ नव्हती. तिचं मन दोन्ही मुलींमध्ये गुंतलं होतं. आता निर्णय सावंताकडे होता.

आरती भीमा काकाला म्हणाली

“माझी काळजी वाढली हो, माझी राणी हळवी आहे, आणि...”

“आणि काय वहिनी साहेब काय म्हणता तुम्ही? बोलायचं ना पुढे?”

“मी काय बोलू माझी तर सगळी आशा तुमच्यावर आहे. बसं मुलीचं मन तुटायला नको. राणी खूपच भावूक आहे म्हणून काळजी वाटते हो. सावंतांचा दरारा आपल्या लोकांमध्ये भारी आहे. आणि त्यांच्या मुलाला नकार आपल्या घरातून मिळालाय हे त्यांना पचायचं नाही असं वाटते मला.”

भीमा, “तेही आहे पण, राजनने राणीला पसंत केलंय मग इथे नकार कुठे.”

“आता सानूने आणि रावांचा बोलणं परस्पर तेच झालंय, पण त्यांच्या घरचे? म्हणून जरा भीती वाटतं आहे.”

त्यात सुनी काकी म्हणली,

“मग काय, काही बाई ऐकावं लागेल ना आपल्या राणीला. आपल्या मुलीला त्रास होईल तिकडे.”

भीमा तिला थांबवत म्हणाला,

“असं काही नाही, होईल सगळं नीट. तू उगाच नाट लावू नको, बोलूच नको मधात.”

आरती, “बोलू द्या हो तिला, तिच्यामुळे आपल्याला दुसरी बाजू कळते ना, उगाच सर्व चांगलं आहे असचं आपण का वाटून घ्यायचं!”

आरती सुनीताचा हात धरत म्हणाली,

“सुनी, मला माहित आहे तुझा किती जीव आहे ते माझ्या मुलांवर, तू असलीस ना माझ्यासोबत की समोरच्या बायकांचं सारं काही हुडकून काढतेस, मला नाही बाई जमत ते, तू माझ्या सोबत हवी मला.”

सुनिता, “ह्याचं काय धरून बसतेस ग, माझ्या मुली आहेत, मी तर सगळं बघणार, उगाच माझ्या मुलींना त्या सावंत वाड्यात त्रास नको. असेल त्यांना दरारा, आपण काय कमी आहोत, करोडोची संपप्ती असेल त्यांची पण आम्हीही जीवाचा तुकडा देत आहोत, ज्याच काही मोल नाही.”

आता मात्र भीमा काकाने तोंडावर बोट ठेवलं. आरतीने स्वयंपाक मांडला होताच. सकाळचं जेवण इकडेच झालं भीमा आणि सुनिताच.

इकडे सावंत वाड्यात, राजन कडे काहीतरी वेगळंच सुरु होतं. राजनच्या घरातले सर्व चहा पीत होते तोच राजनच्या आईने राजन समोर काही मुलींचे फोटो ठेवले आणि म्हणाली, “राजन, हयातल्या एका मुलीवर बोट ठेव, बघ त्या सानवीपेक्षा कितीतरी पटीने उत्तम आहेत. ह्यांनी फोर्स केला म्हणून आपण गेलेलो मोहित्यांकडे, चल बघ बघू आणि सांग... कोण पसंत आहे तुला. त्यांची हिंमत कशी झाली सावंतांना नकार देण्याची. आम्हाला काही मुलींची कमी नाही, तशी ती गव्हाळ सानावी शोभली नसती तुला. हे तर बाबा होते ज्यांना तिच्या गुणांनाचा पुळका आला होता.”

“आई, तुला सांगितलं ना, मला राणीशी लग्न करायचं आहे, विषय संपला.” राजन जरा मोठ्या आवाजात म्हणाला.

“असा कसा संपला! आहे काय त्या राणीत? ना शिक्षण, ना बोलण्याची ढब, भुरळ पडली का तुला... माझा विरोध आहे ह्या नात्याला. काहीही काय रे तुझं!”

“आई, काहीही बोलू नको, आणि शिक्षणच म्हणशील तर शिकेल ती लग्नानंतर, आणि नोकरीही करेल... नाहीतर नाही करेल, मला काही फरक पडत नाही, तू नौकरी करतेस मग बाकीच्या काय तुला फालतू वाटतात काय? तुझ्या मागून आमची अवस्था काय होत होती हे आम्हालाच माहित आहे. म्हणून मला नकोय नौकरी करणारी बायको. नौकरी करणं वा न करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न ग... ती ठरवेल ना. विषय इथेच संपला, मी भीमा काकाला पुढचं बोलायला सांगणार आहे तेही राणीच्या परीक्षेनंतर.“

राजनची आई संतापली होती, ती राजनच्या बाबांना म्हणाली, “काय हो तुम्ही काही बोलत का नाही, तुम्हीच घेवून गेला होता ना त्या मोहित्यांकडे.”

“अग पण असा काही होईल हे मला माहित होतं का? तू जरा शांत हो” राजनचे बाबा आईला शांत करत म्हणाले.

“आणि राजन ही काय पद्धत झाली का आईशी बोलण्याची. आई आहे ती तुझी.”

“बाबा, मी सांगितलंय ना मला राणीशी लग्न करायचं म्हणून... नाही जमत असेल तर माझा विषय संपला... मला लग्नच करायचं नाही! आणि मला सांगा, मी सानूला होकार देवून काय हो फायदा! तीने मला सर्रास नकार दिलाय...” राजनही त्याच जोशात म्हणाला.

“आई, मला तुझं मत फारसं पटलेलं नाही, माल माझी बायको कशी असावी हे मला ठरवू दे! मला नाही बघायच्या आता मुली वगैरे.”

राजनचे बाबा त्या शब्दावर गप्प झाले होते, जरा वेळ त्यांनाही हे जाणवलं होतं कि नौकरी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि आज जो नौकरी करतोय तो उद्या सोडूही शकतो किंवा न करणारा उद्या करू शकतो. त्यांच्या मनात विचार फिरायला लागले होते कि आधीच सर्व गुण संपन्न असलेली मुलीगी आपलं काही चालू द्यायची नाही पण स्वतः आपण उभी केलेली मुलगी आपल्याला नक्कीच मान देईल. जरा हसले आणि म्हणाले,

“राजन, तुझं असं बोलणं मला मान्य नाही पण तुझा निर्णय मान्य आहे, आपण उभ करू राणीला. मी सोबत आहे तुझ्या पण आधी आईची माफी माग.”

राजन आईच्या जवळ आला, “आई मला तसं म्हणायचं नव्हतं ग, पण मला राणी पसंत आहे ग, सॉरी, पण मी ह्या मुली वगैरे आता... मला मुलीचं बघायच्या नाहीत.”

राजनला आनंद झाला होता, नंतर तो बाबांना मिठी मारायला आला. “बाबा मला समजून घेण्यासाठी धन्यवाद, पण जरा थांबूया, राणीची परीक्षा झाली कि आपण लग्नाची बोलणी करूया. मला खात्री होतीच तुम्ही मला साथ द्याल ह्याची. आईशी बोला तुम्ही.”

आई गुमान गप्प बसली होती. राजन आईशी पुढे काहीही न बोलता घरातून निघून गेला. आईही चुक्ल्यागत झाली होती आणि राजनचे बाबा तिला समजवायला जवळ गेले.

राजनचा पक्का निर्णय बघून आई आणि बाबा अवाक होते. त्याला राणीशी लग्न करायचं होतं.

बघूया पुढच्या भागात काय होते ते, राजनचे बाबा त्याच्या आईची समजूत कढण्यात कितपत यशस्वी होतो.


कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments