जोडीदार तू माझा....भाग ५३

 जोडीदार तू माझा....भाग ५३



भाग ५३

सावंत वाड्यात अजून काही सकाळ झाली नव्हती. राणी मात्र आत्याबाईच्या बोलण्याने जरा मनातच गडबडली होती. होता नव्हता सर्व आत्मविश्वास इथेच हरवला होता. पाणी पाण्यामध्ये भरून आलं होतं, पण त्याच पापण्या त्यांना अडवून होत्या....

राणी अजूनही खोलीत परत आली नाही म्हणून राजन तिला शोधत स्वयंपाक खोलीत डोळे चोळत आला,

“राणी तू खोलीत हो आधी, तुला काही स्वतःच काम असेल तर आवर, इथे कुणीही भरकटणार नाही आठ शिवाय. आणि अम्मा काकी सांभाळतील सर्व. आई येईल ना तुला बोलवायला.”

राणी बावरली, तर राजन म्हणाला,

“आत्या काही बोलली का ग तुला, बोलली असेल तर ह्या कानातून ऐकलंस ना त्या कानातून सोडून दे. आणि अजून एक गोष्ट ही गोष्ट बोलूही नको घरात कुणाकडे.” 

आणि हसत म्हणाला, “तुझ्या आईकडे सांगितलं तरी चालेल पण इथे नको, आईलाही नाही. तू इथे नवीन आहेस आणि नातीही, तू जे सांगशील ना ते परत माझ्यापर्यंत पोहचेपर्यंत खूप बदललेलं असेल म्हणून इथेच सोडून दे, मला सांगितलं तर चालेल...”

राणी राजन काय बोलतोय हे समजून घेत होती, तोच राजनने तिचा हात पकडला,

“राणी... काय, कुठे आहेस, काहीही विचार करू नकोस, इथेच सोड सगळं, चालतेस ना खोलीत? अरे यार.... दिल अभी भरा नाही...”

म्हणत राजनने तिच्या कुरळ्या केसांना हात लावला, राणी गालात हसली, म्हणाली,

“काय हो सांगायचं ना मला निघतांना.... मी कशी धावत सुटले होते, आईने बजावलं होतं लवकर उठायचं म्हणून...”

“काय...”

राजन मात्र त्याच्या धुंदीत होता, पण गुणगुणत राहिला,

“की दिल अभी भरा नाही हे...”

“अहो...

“कशाला तुलाही कळायला हवं, घर तुझंही आहे, मीच का तुला सगळं सांगायचं,  घे माहित करून आता सगळं, हा,... आता मी मागे उभा राहिल पण समोर तुला चालावं लागले.”

राजन राणीला परत सोबत घेवून गेला, जातांना अम्मा काकीला म्हाणाला,

“काकी दोन झक्कास कॉफी घेवून या, राणीला कडू देत तुमच्या हातच्या कॉफीला इथे का डिमांड आहे ते.”

अम्मा काकी हसत हो म्हणाली.

मोहिते निवास:

मोहिते निवास सकाळीच जागं झालं होतं, घरात आत्या आणि मावशी नाश्ता तयार करत होत्या, आई आणि सुनिता काकी, मामी सामान आवरत होत्या. सानू आणि अनु त्यांची खोली आवरत होत्या.

“आईने आराध्या मावशीला हॉलमध्ये बोलावलं आणि विचारलं,

“काय ग, तू बोलली होती ना सानूसाठी त्या स्थळबद्दल... काही योग आहेत का?”

“अग आहेत म्हणजे, अस्मित येणारं आहे रात्रीपर्यंत आज परत बंगलोर वरून, नंतर आपण ठरवू. तोपर्यंत मी सानूशी बोलून घेते, ती पुढल्या आठवड्यात कधी घरी राहू शकते ते. एकदा बघण्याचा कार्यक्रम करून घेवूया मग बाकीच बघू सुत जुळतात काय ते.”

“अग म्हणजे अस्मित कुमार आज परत येत आहेत, किती हेलपाटे ग त्यांना.

“मग काय, राणी सानू लाडाच्या आहेत त्यांच्या. येतो म्हणाले आज, मिटिंग झाली की, फ्लाईट बुक झाली त्याची.”

बाळू तिथेच बसून होता, जरा विचारात पडून म्हणाला,

“काय ग आई, एक मुलगी आताच सासरी गेली आणि तुला दुसरीलाही पाठवण्याची घाई झाली आहे का?

“नाही रे तसं नाही...”

“मग कसं?”

“आणि मी काय म्हणतो, येत्या शुक्रवारी आम्हाला कोर्टात जायचं आहे, रजिस्टर लग्नासाठी अर्ज दिला होता, तारिख मिळाली आहे. काय करायचं? आता राणीचं लग्न झालय. अनुलाही सारेच ओळखतात... आता तरी...”

आई त्याला गप्प करत म्हणाली,

“विषय तू काढलाच आहेस तर ऐक, सगळे घरचे आहेत, रविवारी भटजी घरी बोलावत आहोत आम्ही, रीतसर सारं करूया आणि मग तू रजिस्टर पण कर तुला हवं तसं. आम्हाला काहीही हरकत नाही.. पण अनुच्या घरच्यांच काय? येतील कि सोडून द्यायची आशा. पोरीला माहेर नाही असं समजायचं का आम्ही?

अनु समोर उभी होती आणि सर्व शांत झाले होते.

अनयाने सर्व ऐकल होतं, तिलाही एवढे दिवस इकडे राहून इथली माणसं कळाली होती, म्हणाली,

मग काय, काही हरकत नाही, नसू देत ना माझ्या माहेरचे, आता हेच तर माहेर झालं आहे. पण एकदा आईकडे जाऊन बोलून यायला काही हरकत नाही माझी, अंकित जायचं का आपण? म्हणजे आपण दोघचं जाऊया असं म्हणतेय मी, कारण मला आपल्या घरच्या कुणाचा अपमान होऊ द्यायचा नाही.

अंकित उठला आणि तिच्या जवळ आला,

 “हो हो नक्की, आपण दोघेच आधी जाऊया, काही वाटलं नाही तर मग आई बाबांना सांगू बोलायला.”

“काय आई बाबा काय म्हणता?”

बाबा आईकडे बघत म्हणाले,

"तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं... आमची काही हरकत नाही. आणि आम्ही तोही अपमान सहन करू रे बाळांनो, त्यात काय? पण तुम्ही आनंदी हवेत मग सगळं नीट होईल, मुख्य म्हणजे आम्हाला अनुला दुखवायचं नाही आहे. तेंव्हाच मोहिते निवासात शांती राहील ना... काय ग अनु?"

काय बाबा तुम्हीपण...

आणि अनु हसली, घरात एवढा गंभीर विषय होता पण अनुने अगदीच हसत सांभाळला हे बघून आई मात्र मनात चिंता मुक्त झाली होती. तिची धुकधुक कमी झाली होती.

सर्वांनी नाश्ता केला. आणि सर्व आवरा आवारी करत कामाला लागले, मामी मामा निघण्याची घाई करत होते. तर आईनें त्यांना आग्रह केला पण मामाची नौकरी आणि मुलांच कॉलेज असल्याने ते थांबणार नव्हते. मामी मामाला अंकितबद्दल अचानकच कळलं होतं मग मामा मामी बाहेर जाऊन अणुसाठी गिफ्ट घेऊन आले होते. निघतांना त्यांनी ते अनुला दिलं, आशीर्वाद दिला आणि निघाले. आता घरात पाहुणे असं कुणीच नव्हतं, होती ती अगदीच घरची मंडळी.

एवढ्या दिवसापासून सुरु असलेली लग्नाची तयारी एका दिवसात संपली, लग्न आटोपलं होतं आणि उरल्या होत्या त्या अनेक आठवणी. घरात जागोजागी पसरलेलं सामान आई बाबा दुपारी आवारात होते, राणीच्या आठवणी घरात होत्या. आणि त्या तश्याच राहणार होत्या फक्त राणी तिथे नसणार होती, आई सहज बाबाना म्हणाली,

“कसं ना, जन्म घ्यावा एका घरी आणि जन्मभर राहावं दुसऱ्या घरी... अशी ही प्रत्येक स्त्रीची कहाणी.”

बाबा राणीच्या महेंदीच्या वह्या नीट करत म्हणाले,

“हो ना.... पण तू एक विसरलीस नातं दोन्ही घराशी तीच जन्माचच असतं... एका घरी ती जन्म घेते आणि एका घरी जन्मभर असते. तुला सांगतो, माझ्या मुलींचं नातं मी कधीच तोडणार नाही, त्या लग्न होऊन गेल्या तरी त्यांचा ह्या घरावर तेवढाच हक्क असेल जो आधी होता... ह्या घरातलं कुठलंच कार्य माझ्या मुलींच्या सहकार्याशिवाय होणार नाही... त्यांच्या मताला तेवढाच मान असेल...”

“लाडाच्या ना तुमच्या मुली, आमचं कुठं असं नशीब होतं, लग्न झालं आणि माहेरचं नातं फक्त आमंत्रण देणं एवढंच राहीलं,.. भावाने राहतं घर विकलं साध विचरलं नाही... जाणार होते का काही मागायला पण आठवणी होत्या माझ्या. म्हणूच मला अनुबद्दल कधी कधी वाईट वाटते.”

“हहम... असो तिचा जोडीदार भरून काढेल ना तिच्या आयुष्यातली ही खंत... मी नाही काढली का?

“अहो पण माहेर आहे मला, आणि नुसतं असल्याची जाणीवही खूप असते, भाऊ एकदमच भाव देत नसला तरी येतो माझ्याकडे निदान काही कामात तरी, बहिणीशी नातं उत्तम आहे माझं. जोडीदार आयुष्याची सगळी पोकळी भरून काढतोच असं नाही ना, काही गोष्टी सलत राहतात आयुष्यभर... येवढच कि आम्ही स्त्रिया जोडीदाराच्या प्रेमात क्षणासाठी विसरून जातो आणि मग तोच क्षण आयुष्य होऊन जातो...पण तिला...”

“हो पण तू आनंदी आहेस ना, माझ्यासोबत... तुला ह्या जन्माच्या नात्यापासून तर काही खंत नाही ना?”

“अहो हे काय... मी आपली भावनेत बोलले, तुम्ही आयुष्यात आहात म्हणूच तर मला आयुष्याच्या जोडीदाराचा अर्थ कळला, लग्न तर नुसती जोडी बांधण्याचं कार्य आहे पण ते बंधन जोडीदाराचं होण्यासाठी सतत एकमेकांची मन जपण्याच कार्य करावं लागतं. आणि लग्न टिकवायचं असेल तर दोघानांही एकमेकांच व्हावं लागतं, जे मी तुच्या कडून शिकले....”

“चला भरून पावलो... चला आता अजून एक कार्य बाकी आहे... त्या भटजीला फोन कर आणि कळव, विचार काय कसं ते, आणि काय ग आपल्या सानूसाठी ते ओ माय गॉड काही तरी म्हणत होती ना?”

“अहो तिचं नावं आराध्या आहे, कधी तर तिचं नावं घेत जा... काय सारखं तिला ओ माय गॉड म्हणता हो.”

“ये बाई, तू ना माझ्या आणि तिच्या मध्ये येवूच नको, अरे माझ्या सासरची ती एकचं आहे जी मला पटते... अरे साली तो आधी घरवाली होती है... आणि तो अस्मित कुमार मस्त पोरगा आहे. बिनधास्त... तुझ्या भावासारखा नाही घमेंडी, ढेरपोट्या... कुठल्या जगात राहतो काय माहित?”

“असं!! माझा भाऊ घमेंडी, ढेरपोट्या... होता ना सकाळपर्यंत... बोलायचं होतं त्याला... तेव्हा तर मार गळे भेटणं सुरु होतं.”

“ते काय...करतो तुझ्यासाठी... काय बोलायचं त्याच्याशी, त्याचं त्याला तरी कळत नसतं काय बोलतो ते, बऱ झालं होतं बाळूने त्याला कॅटरिनवाल्या वर नजर ठेवायला ठेवलं होतं ... चागलं किरकिर करून सगळं संभाळलं पण त्याने... कामी आला तुझा तो भाऊ.”

“अहो काय चान्स मिळाला की लागले बोलायला, माझ्या माहेरच्या लोकांना बर  बोलणं सुचतं, तुमची ती नागपूर वाली बहीण आली होती ना, मोठी मिरवत होती, तिची मुलगी म्हणे जर्मनीला आहे. काय तिचा तोरा, थांब म्हणून विनवण्या केल्या मी पण नाही, काम आहेत म्हणाली. आणि ते पंढरी काका, नुसते पान खातात, काय बोलतात काय माहित, अनुला राणी समजत होते, आणि मग मलाच म्हणाले, मांडवात दोन दोन नवऱ्या का आहेत म्हणून.”

“अग त्यांना दिसत नाही, आता राणी आणि अनु, दोघीही गोऱ्यापान, सुंदर मग झाली त्यांची चूक....”

“जावूद्या हो, उगाच काहीतरी विषय हवा होता त्यांना, काय स्टेजवर राणी होती समजत नव्हतं. किती फोटो घेतले त्यांनी तिकडे. असा काढ तसा काढ करत माझ्या जावयाला थकवलं, ते तर राजन राव भरल्या घरातले आहेत म्हणून नाहीतर असे लोक डोक्यात जातात तरुण मुलांच्या...”

“आणि तुझी ती बहिण गोमती, चायला अनुच्या मागेच लागली होती...”

“तिचं काय आराध्याने केलं तिला गप्प, पण तुमच्या काडल्या लोकांना कोण बोलणार होतं, रंजना ताई बघत होत्या. मला बाई वाईट वाटलं, शेवटी मुलीची सासू, नातेवाईक असे वागले ना कि मनात ठेवतात.”

“हुम्म, काही ठेवत नाहीत, सावंतांचा मोठा परिवार आहे.”

“हुम्म, आपलं ते मापलं...”

“आता हे काय तुझं नवीन.... तू मी आता एक....”

आरती आता हसली, आणि म्हणाली,

“जावूद्या हो, मी काय म्हणते, सानूशी बोला ना हो, तिला म्हणा ना एक दिवस सुट्टी घे, तो अमेरिकेचा मुलगा येणारं आहे ना... जरा बघण्याचा कार्यक्रम तरी...”

आई बाबांच्या परत गप्पा फिरून सानूवर आल्या होत्या. तुम्हीही तोच विचार करत आहात ना.... भेटूया पुढल्या भागात

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्टस्टे सेफ...

Post a Comment

0 Comments