टेंडर भाग २

 


सहा वाजले होते, ऑफिस संपायला आले होते. समृद्धी आनंदात होती. तिला सुहासला भेटायचे होते, घरच्यांसाठी आवर्जून काही घ्यायचे होते. तिची जमवाजमव सुरु होती. तसा फोन वाजला, “समु अजून पेमंट जमा झाला नाही गं.”

“अरे होईल... झालेत बिल पास... नाही झाला तर उद्या तर नक्की होणार.”

“उद्या! नाही गं मला आजचं पैसे हवे आहेत.”

ती बोलत होतीच तर रोहन माधवला घेऊन तिकडे आला, जोरात म्हणाला, “हे काय आहे मंजिरी, महिना संपला तरी पेमेंट पास झाली नाहीत. अरे पेमेंट मिळाला नाही तर आपल्या कंपनीची किती बदनामी होईल. अरे विश्वास  आहे लोकांना आपल्यावर.... सगळं झालं तरी चालेल पण पेमेंट वेळेत व्हायला हवे तेव्हाच लोकं काम करतात वेळेत....”

समृद्धी पार घाबरली, तिने फोन बंद केला. आता तिला काय झाले असणार हे कळत होते. त्यात मंजिरीने एक नजर समृद्धीवर टाकली, ती परत घाबरली. पण मंजिरी तर मंजिरी होती, सरळ म्हणाली,

“रोहन इथे मारामारी होते घोसला कंपनीसोबत काम करण्यासाठी, अश्या छोट्या मोठ्या कंपन्या वाट बघू शकतात. त्यांना तोंड उघडण्याची मुबा नाही, नाहीतर पुढंच काम मिळणार नसते. तेव्हा एक दोन दिवसाने काही होणार नाही... तुझ्या अश्या कांगावा करून काही होणार नाही... तुझं डिपार्टमेंट बघ... कशाला वेळ घालवतोस अश्या गोष्टीमध्ये. मला अजून रीपोर्ट मिळाली नाही तुझ्या रशिया व्हीजीटची.”

मंजिरीने माधवसमोर ही गोष्ट बोलल्याने रोहन कावराबावरा झाला होता, विषय सोडून तो माधवला म्हणाला,

“सर, अश्या लहान कंपन्या आपल्याला मदत करतात तेव्हाच आण काम वेळेत करू शकतो. म्हणजे बघा त्यांचा पेमेंट थांबवणे म्हणजे...”

मंजिरी आता परत ओरडली,” हो ह्या वेळी मला काही गडबड दिसली आहे त्या अकाऊंटमध्ये म्हणून मी थांबवले आहे पेमेंट, बघेन मी, आधी सर्व क्लिअर करेन तेव्हा अप्रूव होतील. आणि वेळ लागला तर रीतसर दिलगिरी व्यक्त करू आपण, घोसला कंपनी ह्यातही मागे नाही, होना माधव सर, काय म्हणणं आहे तुमचं?”

माधव काहीही न बोलता, मंजिरीला मंजुरी देत निघून जाणार तोच त्याने समृद्धीला आणि मंजिरीला इशारा करत म्हंटल, “त्या फाईल्सची एक कॉपी  माझ्या टेबलवर सुद्धा पाठव मंजिरी. समृद्धी मला सांगेल सगळं.”

समृद्धीला धडकी भरली होती, सुहासचा टेंडर तिच्याकडून काय काय करवून घेणार होता हेच तिला समजत नव्हते. आणि आज महिना होऊनही तिला इथल्या माणसांना ओळखता येत नव्हते. कोण कसं हे समजणे कठीण झाले होते. कधी मंजिरी तिला वाईट वाटायची तर कधी अजून कुणी... रोहनचं आपुलकीने बोलणं तिला कळला होतं आता पण मंजिरी ती सांगू शकत नव्हती... तिची नजर तिला खात होती. त्यातच मंजिरीने फाईल तिच्या हातात ठेवली,

“जा घेऊन सरांकडे, तुला सविस्तर सांगता येतं ना... गो गेट इट साईन... माधवची पण साईन चालेल.”

मंजिरीचे शब्द ऐकताच समृद्धी परत घाबरली, तिने भीतभीत फाईल घेतली आणि माधवच्या कॅबीन मध्ये  शिरली, गुमान तिने फाईल त्याच्या पुढे केली, त्याने ती बऱ्याच वेळ बघितली आणि मग साईन केल्या, तिच्या हातात परत देताना त्याने तिचा अलगद हात स्पर्श केला. समृद्धीने हात मागे घेतला. ती निघणार तोच त्याने तिला सोबत कॉफी घेण्याचा आग्रह केला. ती गुमान कॉफी पीत होती. माधव तिला बघत होता, हळूच बोलला, “या रविवारी नवीन प्रोजेक्टची स्टार्टअप पार्टी ठेवली घोसला फार्म हाउसमध्ये, तुला यायचं आहे तिकडे. आपला सगळा स्टाफ असणार आहे. माझ्याकडून आवर्जून आमंत्रण आहे तुला. नक्की यायचं.”

समृद्धी स्मित हसली तर तो तिच्या जवळ आला, तिच्या खांद्यावर हात ठेवला त्याने, ती गडबडली, सावरत म्हणाली, “हो सर जमलं तर नक्की येते.”

आता मात्र माधवने तिच्या खाद्यवरचे हात घट्ट केले, “जमलं तर म्हणजे, नक्की ये, मी वाट बघेन तुझी, तू आली नाहीस तर मग काय अर्थ ना...”

समृद्धीला घाम फुटला होता, तसा माधव गोष्ट बदलत म्हणाला, “अरे नवीन लोकांनी यायला हवं, ओळखी वाढवायची आहे ना... की बसं इथेच अडकून राहायचं आहे.”

बोलता बोलता खांद्यावरचे हात हातात आले होते माधवचे, तिने हात सोडवले आणि वेळही,

“हो सर नक्की येणार, मी मंजिरी मॅडमला सांगते आणि मग येईल मी..”

“आ.. मांजरीला कशाला सांगायचं, मी बोललो ना... तू ये. ती काही बोलणार नाही.. आणि ऑफिस मध्ये कुणाला बोलू नको.. सर्वाना आमंत्रण नसते तिकडे.. काही मोजक्या लोकांनाच तिकडे परवानगी आहे. मोठे साहेब राहतील, बरीच मोठी मांडली असेल... तुझी ओळख करून देऊ आम्ही... अरे घोसला कंपनीची स्टाफ आहेस तू....”

माधवचं बोलणं आज समृद्धीला काही केल्या कळत नव्हतं, आज तिला मंजिरी का ह्या कॅबीन मध्ये येण्यापासून अडवते हे समजले होते. ती कशी बशी निघाली. पण प्रश्न अजूनही उत्तर देत नव्हते.

जागेवर आली तेव्हा सुहासचे कॉल्स तिला दिसले, तिने कॉल केला तर कळाले, घोसला कंपनीचा इमले आहे की पेमेंट पुढल्या आठवड्यात होईल. सुहास नाराज झाला होता आणि समृद्धी उत्तरहीन.... तिची छोटशी चुकी तिच्या समोर प्रश्न होऊन पुढे होती. जरा काही वेळाने समजले की दुपार झाल्यामुळे बँकला पेमेंटसाठी कळवणे कठीण होते. आणि आता मंजिरी स्वतः सगळ्या फाईल्स परत बघणार होती.

तसा काही वेळात तिच्या मोबाईलवर मेसेज आला तिचा पहिला पेमेंट झाला होता. खूप आनंद झाला होता तिला पण दुसऱ्या क्षणी तिला सुहासचा रडका चेहरा आठवला...

तिला आता निघायचे होते. मनात कासावीस वाढत होती. तशी परत  कॉन्फरन्स रूममध्ये अचानक मीटिंग बोलावली गेली. रोहन त्याचा अपमान सहन करणाऱ्यातला नव्हताच. त्याने काय केले होते कुणाला माहित नव्हते.
मंजिरीने खुर्चीवर बसताच टोकदार आवाजात सुरुवात केली,
पेमेंट प्रोसेसवरून खूप चर्चा झाली आहे. काही चुका झाल्या आहेत, आणि मला माहिती मिळाली आहे की काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत. हे अजिबात चालणार नाही. रिपोर्ट्स माझ्याकडे आहेत.”

तिच्या डोळ्यांची नजर थेट समृद्धीवर थांबली. तसा रोहन चिडला आणि  लगेच बोलला, मंजिरी, समृद्धीने फाईल नीट बघितली आहे. खरं म्हणजे ह्या फाईल्समध्ये प्रॉब्लेम तुझ्या बाजूने होता.. तू विसरली होतीस... हुम्म हल्ली तुझं लक्ष नाही...”

समृद्धीचे हृदय धडधडायला लागलं. माधव सरांनी टेबलावर हात आपटला.
स्टॉप इट, रोहन. समृद्धी नवीन आहे. तिला मध्ये ओढू नका. मला फाईल्स मिळाल्या आहेत, आणि माझ्याकडे योग्य रिपोर्ट येईल. आणि मला मंजिरीवर विश्वास आहे. तू हा विषय वाढवू नको आणि मंजिरी तुही... उगाच इथल्या वादात ते थर्ड वेंडर बोंबलतील.”

मंजिरी आता ओरडली, “मला ऑफिस मध्ये वातावरण प्रदूषित नको. कुणाला काय बोलायचं आहे त्याने पुढे येऊन बोलावं उगाच मागून काड्या करू नये... नसेल मी बॉस म्हणून पटत, आवडत... तर सोडावं काम... कंपन्या आहेतच ना मार्केटमध्ये.”

माधव परत बोलला, “मंजिरी थांब... वाद नको... तुला जसं हवं तसं तू वाग... आता हा विषय इथेच संपला. रोहन तू माझ्याबरोबर ये मला काही रशिया युनिट बद्दल बोलायचे आहे.”

समृद्धीने एक दीर्घ श्वास घेतला.  पण तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. ती गप्प जागेवर आली, मीटिंग संपल्यावर मंजिरी तिच्या जवळ आली. समृद्धी, तुला सांगतेय, काम नीट कर. इथे टिकायचं असेल तर डोकं खाली, काम वर. समजलं?”

तिचा आवाज कठोर होता पण डोळ्यात एक वेगळं कडवट करुणं दडलं होतं.... समृद्धीला सुहासच्या त्या टेंडर मानसं शिकवले होते....


#द कॉर्पोरेट लॅडर चे आधीचे भाग पेजवर आणि साईटवर आहेत!!
to be continued...
----पुढील भाग गुरुवारी...
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.

@followers@topfans #उर्मिलादेवेन #मनातल्यातळ्यात #मराठी#कथा मन माझे मराठी #मराठीstoriesies #marathii मन माझे मराठी
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AI

Post a Comment

0 Comments