जोडीदार तू माझा .. भाग ५९

 


भाग ५९  

सुमंत खाली येताच राणी आणि अनु माळ्यावर आल्या, सानूला तर स्वप्नात आपण आहोत हाच भास होता, ती मनातच कुठेतरी स्वतःला शोधात होती, राणीने तिला हलवलं,

ताई, काय कसं वाटलं सरप्राईज?  जीजू पसंत ना?”

सानू तिला धूर्त नजरेने बघत म्हणाली,

राणी, तुला माहित होतं का ग, की येणारा मुलगा माझा अमेरिकेतला बॉस आहे म्हणून... आणि काय हे सर्वांच सुरु आहे, माझ्या मनातलं...मनातलं, मी सागितलं का कुणाला?”

“सांगायला कशाला हवं! बाबा आहे ना! तुला ओळखणारे, आणि योगायोग ग, तुला पसंत असणारा सुमंत, मावशीने तुझ्यासाठी पसंत केलाय ते, तिला काही माहित नव्हतं, पण मग सगळे धागे जुळले आणि सकाळी सर्वाना कळाल की सुमंतच ज्याने तुला पार प्रेमात बुडवल आहे... “

“सुमंतला माहित आहे हे?”

“नाही,... त्यांची बाजू आम्हाला माहित नाही बाबा! ते तू विचार.”

आता मात्र सानू ने सुटकेचा श्वास घेतला आणि खोलीतल्या पलंगावर पडली, टक लावून वर फिरणाऱ्या पंख्यांकडे बघत निपचित पडून होती.

राणी आणि अनु एकमेकींकडे बघत तिला बघत होत्या, आणि इशारा करत निघून गेल्या,

खाली सगळी मैफिल जमली होती, सगळे सानूची वाट बघत होते, राणीला आईने इशारा केला आणि राणीने मला काही माहित नाही असा इशारा केला. आईने बाबांकडे नजर टाकली, बाबाने आईला दिलासा देत शांत राहायला सांगितलं. ,

”सुमंत रावं, मासाहेब जेवायला घ्यायचं का? म्हणजे... तुम्हाला यौग्य वाटत असेल तर...”

“म्हणजे, होणाऱ्या सूनेच घर आहे माझ्या, बसुया पंगतीने सर्व आम्हाला कुठे असा योग येतो नेहमी, ह्या बहाण्याने सुमंतसोबत बसायला मिळेल.” सुमंतची आई हसत म्हणाली.

“आणि आहे कुठे माझी सुनबाई.... खूप ऐकलं आहे तिच्याबद्दल, आमचं इथलं ऑफिस तिचं सांभाळते ना?”

“हो हो,” बाबा होकार देत म्हणाले.

“आता, सुमंतच्या खांद्याला खांदा लावून सर्व बिजनेस चालवायचा आहे तिला, शोधून सापडली नसती अशी मुलगी आम्हाला, जिला आधीच आमच्या सर्व बिजनेसबद्दल माहित आहे... कदाचित सुमंत म्हणूनच आजपर्यंत लग्नाचा होता... आणि मी उगाच त्याला काय काय म्हणत होते. बोलवा माझ्या होणाऱ्या सुनेला...”

शब्द संपलेच नव्हते तर सानू पायऱ्या उतरत हॉल मध्ये आली, तीही हसली, आणि बाबांना इशारा करत तिने होकार दिला. आणि सरळ खोलीत निघून गेली, मागेच मावशीही गेली. तशी सानू बिनधास्त पण आज लाजली होती, चेहऱ्यावर एक औरच गुर्मी चढली होती तिच्या तरीही बावरलेली, जरा घाबरलेली, मनातच शहारलेली भासत होती. स्वप्न समोर उभ होतं पण अनुभूती अजूनही तिला होतं नव्हती. आपण आणि लग्नाला होकार देणार हेही तिला काहीस गोंधळवत होतं.

तिला अलगत होकार देतांनी सुमंतसह घरच्या सर्वच लोकांनी बघितलं.

इकडे बाबांनी सानूचा इशारा मिळताच सोमर ठेवलेला पेढ्यांचा डब्बा उचलला, आणि आरतीला आरतीची थाली घ्यायला सांगितलं. शाल श्रीफळ देत त्यांनी सुमंतला जावई म्हणून आशीर्वाद दिला.

 

 

बावरलेली सानू खोलीत गुमान अरश्या समोर बसली होती. मावशी सानूच्या खोलीत आली आणि हसायला लागली,

“काय सानू म्हटल होतं ना तुला, इसबार कोई चान्स नाही, ना बोलनेका ते... आणि बघ सगळे योग जुळून आलेत बाळा... आता सुटका नाही तुझी... आणि खरं सांगू का मुलगा तोड आहे तुला...

“मावशी तू ना खूप चीटन्ग केली माझ्या सोबत...”

“हो... मग मजा कशी आली असती तुझी.”

“मावशे!”

“अग आम्हालाही पूर्ण माहिती नव्हती ग, ते तर सकाळी जीजू मला बोलायला लागले की तुला कुणीतरी आवडतं पण कदाचित समोरचा काही भाव देत नाही म्हणून तू गप्प आहेस.”

“बाबा म्हणाले?

“मग काय!”

“असं! अजून काय म्हणाले ग ते?”

“म्हणाले की तुला कुणीही फोर्स करू नका जर तुझा नकार असला तर...”

“हुमम.. बाबा ना...”

“आणि त्यांनी तुझ्या बॉसबद्दल मला सांगितलं की कदाचित तो मुलगा तोच असावा...”

“असं होय, बाबा पण ना हल्ली अंदाज घ्यायला लागले माझा.. आईची साठगाठ आहे... पण तरीही...”

“तरीही काय! मग मी आणि तुझ्या अंकलने सर्व गोष्टीची जुळवा जुळवी केली आणि निष्कर्ष निघाला की बघायला येणारा सुमंत हा तुला आवडणार मुलगा आहे... तुझा बॉस, सुमंत!”

सानू आता पार लाजून लाल झाली होती तिचे तिच्या नजीक असेली लहान उशी उचलली आणि मावशी कडे फेकली,

“आणि सुमंतला सांगितलं का तुम्ही मग? सर्वांनी मिळून माझी ना...मज्जा घेतली.”

मावशीने उशी झेलली आणि  ती परत जागेवर ठेवली आणि म्हणाली,

“सानू, आम्हाला सुमंतच माहित नाही... त्याला तू पसंत होतीस की नाही हे काही माहित नाही बाबा...पण तुझी पसंत आम्ही तुझ्या समोर ठेवली... येवढच!”

सानू आता गळ्यातल्या माळेशी खेळत म्हणाली,

“तो तर ठरवूनच आलाय ना... मला कुठे विचरतोय... म्हणे सकाळपासून माझा पूर्ण इतिहास आणि भूगोल शोधतोय...आणि म्हणे तुझ्याशीच लग्न करायचं ...”

“ओ माय गॉड, अरे बाबा... हे काही आम्हाला माहित नाही बाबा... ते तुम्ही दोघ बघा...”

“मावशी... हा पसारा तू मांडलाय .”

“मग? आणि तू तर हो सांगितलं ना जीजुला... तिकडे हॉलमध्ये शाल श्रीफळ झालं देवून सुमंत रावांना....आता तू आणि तो ठरवा काय ते...पंगती सुरु करतोय, चल ये तू पण...”

“मावशी तुला ना मी बघून घेईल..”

“घे घे... सर्वाना बघून घे.. आणि बाळूला आधी.....त्यानेच संगीतलंय सर्व सुमंतला... तुला तो वादळ बोलतो ते...घे घे बदला घे ग...आम्ही सर्व तयार आहोत...चल मला जावूदे, तयारी करते पंगतीची ....”

“मावशी...तू ना...”

“काय ग, तू येणारच आहेस ना आता अमेरिकेत... तिकडे बघ मला ...”

“मावशी!...”

“काय, पाठवू काय सुमंतला, बोलून घ्या अजून... तसाही तो आठवड्या भरात निघणारा आहे. सर्व ठरवून घ्या, लहान तर नाहीच तुम्ही दोघही...आणि आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर .”

“मावशी...काहीही तुझं “

“काहीही ना... थांब पाठवते त्याला.”

“मावशी... मावशी उगाच काही बोलू नको बाहेर....”

आरध्या हसत बाहरे आली आणि सानू परत बावरली, सुचत नव्हत काय करावं आणि काय नाही तिला, तिच्यासाठी तर आकाश ठेंगण झालं होतं... आज मै उपर आसमा नीचे झाला होता ....

स्वप्न जणू समोर उभ होतं. आणि मन परत परत स्वप्नात शिरत होतं. तोच दारावर थाप पडली,

“येवू का मी आत? म्हणजे तुला योग्य वाटत असेल तर बोलूया.” सुमंत दारात उभा होता.

त्याला बघून सानू खूप गोंधळली, मावशी असं काही करेल हे तिने अपेक्षित केलंच नव्हतं, ती ताडकन उठली आणि काहीच बोलली नाही, गोंधळ उडवणारीचा आज गोंधळ उडाला होता, स्वतः ला लपवत ती उभी झाली, मावशी खोलीत आली आणि तिने सुमंतला आत यायला सांगितलं,

“सुमंत बोल हिच्याशी, काय ते आपसात ठरावा, तुला निघायचं आहे ना पुढल्या रविवारी, ताई सांगत होत्या. मग ठरावा आणि आम्हाला सांगा.”

“हो मावशी, बघतो सानवी काय बोलते ते, ही तर बोलतच नाही, गप्प राहणारा मी बोलायला लागलो आणि... ही...”

“हो ना, बघ बाबा...वादळ म्हणतो आम्ही हीला... आणि... ही...”, मावशी सानू जवळ येवून म्हणाली,

“मावशी, पुरे ग, वादळच आहे मी, काय वादळ सतत असतं का?” सानू हळूच मावशीला ओठ ओठंवर दाबत म्हणाली. आणि शांत राहायला इशारा करत होती.

“असं! मग ही वादळा आधीची शांतता आहे असं समजायचं का आम्ही.” मावशी तिला चिडवत म्हणाली.

“जा, समज जे समजायचं, मी ना सोडत नाही ऐक ऐकाला... बघते मी...”सानू नाराज झाल्या सारखी म्हणाली.

“तसं नाही ग, तू बोलत नसलीस तरी तुझ्या भावनांमधून तुझा आंतरिक आनंद सारं घर अनुभवत आहे, आमच्या वादळाला सामावणारा आलाय ना...”मावशी सानुला हळूच म्हणाली

नंतर ती सुमंतकडे वळत म्हणाली, “सुमंत तुला पसंत आहे ना आमची सानवी?”

सुमंत मान हलवत म्हणाला,

“हो तर, मी तर सकाळीच आईला निर्णय दिलाय, आता हिचा निर्णय समोर ऐकायचा आहे... मला कहीही नको. माझ्या आईचा शोध संपला आणि मला आयुष्याचा जोडीदार मिळालाय.....”

“बोला तुम्ही दोघे, ठरावा, तुम्हा दोघांही सर्व माहित आहे, बिजनेस, कुटुंब, दोघंच करिअर....मग आम्हाला काय चिंता. “

मावशी खोलीतून निघून गेली. ती जाताच सानूच हृदय जोर जोरात धड धडायला लागलं, तिला काहीच सुचत नव्हतं, पोटात गोळा आला होता. तहान लागली होती, समोर ठेवलेली पाण्याची बाटली तिने उचलली आणि ती आधी पाणी प्यायली.

स्वप्न समोर उभं बघून सानूचा गोंधळ उडाला होता... प्रेमात होती पण सांगणार कशी होती... बघूया दोघांची चर्चा पुढच्या भागात...

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्टस्टे सेफ...

Post a Comment

0 Comments