जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग ११

 

जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग ११मोहिते निवासात सकाळी सानवी आणि सुमंत पोहचले होते, सोबत असं कुणी आलं नव्हतं. आई आरतीने रीतसर स्वागत केलं आणि आश्चर्याने विचारलं,

“पाहणे कुणी येणार आहेत का? की...”

सुमंत म्हणाला, “नाही आई, आम्ही दोघेच आहोत, सगळे काल हॉटेलवरच होते आणि मग तिकडून परस्पर निघणार आहे. तसाही रेसेपशिनचा कार्यक्रम नाहीच इथे. तिकडे सुशीलने पार्टी ठेवली आहे, मग...”

“बरं, हरकत नाही. या या, जरा बसा, सारं काही आवरलच आहे.

सानवीकडे अजूनही पाहुणे होते. घरात गडबड होती, बघून तिलाही हायसं वाटलं. सुमंतला हॉलमध्ये सोडून ती लगेच तिच्या खोलीत शिरली.

लग्न एका दिवसाचं असलं तर जमवा जमव जशी वर्षानुवर्षाची असते ना तशी लग्न झाल्या झाल्या घर खाली झालं कि मन नाराज होतं, नाही का? मनातला ओलावा सतत राहावा नाहींतर नाती कोरडी पडतात.

इकडे खोलीत आत्या, राणी, सर्व महिला मंडळ इकडे मजा करत बसून होतं, सानू आल्याला आल्या सर्वांना बिलगली. राणी तिला बघताच ओरडली,

“वू वू.... काय दिसतेस ग तू, साडीवर, ही साडी?

“मासाहेबांनी दिली मला आज.”

“व्हा दी, मस्त आहे ग आणि तुला अगदीच मस्त दिसत आहे. काय मग कसा झाला कालचा प्रोग्राम?”

“ये राणी काहीही काय, कुठला प्रोग्राम ग? काही नाही तिकडे, मी आणि सुमंतच तर होतो बंगल्यावर.”

“मग ग कोण हवय त्या प्रोग्रामला, आहा ही चेहर्‍यावर आलेली लाली आणि हे तेज... काय बाबा... राणीची तर एन्ट्री झाली तिकडे... बंगल्यावर...

“असं आता तू ओढ ना माझी? बघते तुला.”

“मला नको बघू तू ला जीजुला बघ...”

आत्या राणीला थांबवत म्हणाली, “ये राणी काय ग उगाच छळतेस तिला, तुझे दिवस तर अजूनही तेच आहेत.”

“सानू लक्ष देवू नकोस, कधी निघणार आहात तुम्ही तिकडे?”

सानू आत्याजवळ येवून बसली,

“अत्तू गुरुवारी, आत्ये मावशी कुठे आहे, कानावर आल्या पासून ओ माय गॉड ऐकायला आलं नाही.”

“अरु जरा बाहेर गेली आहे. तिच्या मुलीला इथलं काही सहन होत नाही ग आणि काल लग्नाच्या गडबडीत तिचं लक्ष नाही राहिलं मुलांवर, मग दोघेही आज उलट्या करत होते. गेली आहे हॉस्पिटलला घेवून त्यांना. येयील इतक्यांत.”

राणी तिला लागलीच म्हणाली, “आत्या आता दी चं ही तसचं होणार ग?”

अनु हसली, पण सानू काही प्रतिसाद देत नव्हती, तिने विषय मोडला आणि म्हणाली,

“अनु, बाबा कसे आहेत?”

“ठीक आहे दि, आता ते फारसं आमच्याशी बोलत नाहीत, तुम्ही जा त्यांच्याशी बोला, तोवर सगळं आटोपतं आणि एक विचारायचं होतं, म्हणजे आज किती वाजेपर्यंत तुम्ही आहात इकडे.”

“अग हो, आम्ही थांबणार नाही, ह्यांना रात्री मिटिंग आहे. संध्याकाळी निघू.”

आई आरतीने दारातून सारं ऐकलं, आत येत म्हणाली,

“काय ग एका दिवसात तू तिथला विचार करायला लागली, व्हा वादळ असं बदललय हे मला कळतच नाही. वाटलंच नव्हत ग कधी कि माझी सानू...”

“आई तुझी सानू आता बायको आहे सुमंतची, आणि मालकीण आहे कंपनीची.” राणी आईला आवारात म्हणाली.

बाळू खोलीत डोकावत म्हणाला, “अरे म्हणजे आमच वादळ शमलं तर किनाऱ्याला... म्हणजे काय झालं बाबा नेमकं?”

“ये शेंबड्या, तूचं वादळ म्हणत होतास ना, आणि काय रे शमलं बिमलं काही नाही, आता बघ हे वादळ तिकडे समुद्रा पलीकडे कसं शमवते सारं...”

राणी तिच्या जवळ येत म्हणाली, “अग हो तायडे, तिकडे जीजूची मोठी फॅमिली आहे ना, झालं का बोलून त्यांच्याशी.”

“हो, काल बोलले त्यांच्याशी, मोठी कामगिरी आहे ती... सांगते तुला निवांतपणे.”

तेवढ्यात बाबा म्हणाले, “सानू, मोठी पेशवेबाई, तुझा काही वेळ मिळल काय ग मला?

सानू खोलीतून लागलीच बाबांकडे गेली,

“बाबा हे काय? काल पासून हेच बोलत आहात तुम्ही.”

“अग मान तुझा, काल लग्नात तुला तुझ्या सासरचे सगळे ह्याच नावाने बोलावत होते.”

“पण मी तुमची सानूच,  मी येणार तुम्हाला भेटायला जाण्याआधी, बोलू आपण निवांत.”

बाबांशी बोलताना तिची नजर टेबलवर ठेवलेल्या बाबांच्या दवाखान्याच्या फाइलवर पडली, तिने ती पटकन जावून उचलली, चाळली, त्यात लागेलेले  औषधिचे कागद दोन दिवसा आधीचे होते. सानू बघून शांत झाली, बाळू खोलीत आला आणि त्याने ती फाईल तिच्या हातून घेतली, म्हणाला,

“तायडे, मी आहे इथे सगळं बघायला, तू हो हॉलमध्ये सर्व तयारी झाली आहे पुजेची, भीमा काका बोलावत आहेत.”

“अरे पण मला कसं माहित नाही हे सारं ते सगळं तर आत्ताच दिसत आहे. काय झालंय बाबांना सांगशील काय ?”

“अग काही नाही, तू लाडाची ना त्यांच्या, मग जरा गडबडले होते पण आता ठीक आहेत बाबा.

“हो का बाबा”, सानू बाबा जवळ जात म्हणाली.

“हो हो तर, हे काय मस्त मजेत अहो मी, सानू बेटा काळजी करू नकोस, आता गेल्यानंतर तू परत येत आहेसच ना महिनाभरात.

“हो हो बाबा, तिकीट बुक आहे माझी, इथला प्रोजेक्ट संपणार आहे काही महिन्यात मग त्याचं काम असणारं म्हणू मी येणार आहे. पण तुम्ही? मला कुणी काही सांगितल नाही... हे डॉक्टर काका मला भेटले होते पण तेही बोलले नाही.”

“बाळू तू काही लपवत तर नाहीस ना?

“नाही ग तायडे, आधी तू हॉलमध्ये हो मग ही फाईलं बघ निवांत, आणि येत आहेस ना बाबांना भेटायला निघण्याआधी, तेव्हां मी उभा राहीन तुझ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी. आता चलं तू. आणि काय ग मस्त दिसत आहेस.”

आणि त्याने तिच्या हातातल्या हिरव्या बांगड्यांना हात लावला,

“काय ग मस्त आहे हा चुडा, आणि ह्या बांगड्या काय सोन्याच्या आहेत ना, आईने नाही दिल्यात नक्कीच.”  

“बाळू, काहीही तुझं, माझ्या मामीसाहेबांनी दिल्या काल, आणि विषय बदलू नकोस रे, बघते तुला मी नंतर.”

भीमा काकाने आणि सूनी काकीने सत्य नारायणाची कथा घडवून आणली. घरातल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेवून झाला. आईने नवीन जोड्याला आज्जीच्या फोटोसमोर आणलं,

“सासूबाई, जावई आहेत हे. आशीर्वाद द्या तुमच्या लाडाच्या नातीला. आता विदेशात असणार तुमची नातं, बघा ना म्हणत होत्या ना मला, माझी नात विदेशात आपला तोरा मिरवणार म्हणून, द्या तिला आशीर्वाद.”

सुमंत सानूला बघून हसला, डोळा मारला आणि हळूच म्हणाला,

“काय ग तुझं काय आधीच प्लॅन होतं काय ग, तिकडे विदेशात जावून धिंगाणा घालण्याचं.”

सानूने त्याला हळूच ढोपराने धक्का दिला आणि आशीर्वाद घेण्याचा इशारा केला. सुमंत हसतच खोलीतून बाहेर आला, राजन त्याला म्हणाला,

“दादा, उद्या आमच्याकडे आमंत्रण आहे तुम्हाला, आई आणि बाबांनी बोलावलं आहे. तसं ती फोन करेल पण मी माझ्या आणि राणीकडून आमंत्रण देतो.”

सुमंतने राजनला मिठी मारत होकार दिला, आणि त्याने सानूला घडीकडे बघत निघण्याचा इशारा केला. आईने ते अलगत टिपलं आणि ती जेवणाच्या तयारीला लागली.

सूनी काकी आणि अंजलीने पटापट सगळं आवरलं आणि पंगत बसली, सुमंत खरं तर असं खूप आवडत होतं, त्याला हे कधी असं अनुभवायला कमीच मिळायचं. सुमंत पंगतीत बाबांजवळ बसला, हळूच त्यांना म्हणाला,

“काळजी नका ना करू, तुमच्या लेकीला काहीच कमी पडू देणार नाही. आणि तिला भारतातले प्रोजेक्ट बघायचे आहेत मग तिचं येणं जाण वरचे वर असणार. आणि मासाहेब इथेच राहायचं म्हणतात मग मी पण येत राहिल. काही काळजी करू नका.”

बाबा काहीच बोलले नाही. स्मित हसले, नंतर म्हणाले,

“काळजी मला तिची नाही सुमंतराव, माझी पोरं वादळ आहे. तिथेही ती धुमाकूळ करेल. सहज गप्प राहावी अशी ती नाही... पण मी जरा गुंतलो ना मग...”

सुमंत स्मित हसला, “बाबा सगळं नीट होईल.”

पंगती संपल्या आणि सानू निघण्याच्या तयारीला लागली.   

आता मात्र आई रडायला लागली, “काय ग सानू बाबांना सांग ना जरा, काय मी म्हणत होते त्यांना नेहमी एवढं गुंतणं बऱ नाही पण काय ग तू आणि बाबा मी तर वेगळीच पडले.”

अनुने आईंला आवरलं आणि सानूला म्हणाली,

“दि, बाबा माहित आहेत तुम्हाला, काही नाही, मी आहे त्यांना सांभाळायला. तुम्ही काळजी करू नको.

तेवढ्यात सानूचा फोन वाजला, मासाहेब वाट बघत होत्या, घरी काही पाहुणे आले होते आणि सगळे वाट बघत होते.

सानू आईचं बोलणं थांबवून म्हणाली,

“आई मी येते ग निघण्याआधी मग निवांत बोलूया. पण आता आम्हाला निघावं लागेल. घरी काही पाहुणे आले आहेत आणि वाट बघत आहेत.”

सानूला असं बघून आईच्या डोळ्यात पाणी आलं, असं सानूला बघून तिला आनंद होतं होता कि मनात चुणचुण काही कळत नव्हतं.

सानू आणि सुमंत संध्याकाळी निघून गेले. आज घरी आलेली सानू घरात कुणाला त्यांची सानू वाटली नाही, पण सानुसाठी जवाबदारी वाढली होती. बाबा तिच्यासाठी आजही प्रथम होते पण बाकीच्या जवाबदऱ्या ती नाकारू शकत नव्हती. नाती नवीन होती आणि अजून खूप काही समोर येणं बाकी होतं.

मग भेटूया पुढच्या भागात...

Post a Comment

0 Comments