जोडीदार.. प्रवास तुझा माझा... भाग २६

 

जोडीदार.. प्रवास तुझा माझा... भाग २६सानूची आज अतिशय महत्त्वाची मीटिंग होती डिसूजा ब्रदर सोबत, तशी तिने पूर्ण माहिती काढली होती त्यांच्या कंपनीची. काही वर्षा आधी डिसूजा ब्रदरने एक प्रपोजल राणे इंडस्ट्रीला दिलं होतं पण सुमंतला वेळ नसल्याने आणि काही ती फाइल सुमंतपर्यन्त न पोहचल्याने पुढे ते गेले नव्हते. सानूच्या हाती ती फाइल ऑफिसामध्ये लागली आणि तिने डिसूजा ब्रदरला भेटण्याचा निर्णय घेतला. तिला हे माहीत होतं की निकोलस डिसूजा हा स्टेविनचा मोठा भाऊ आहे आणि म्हणूनच तिने ही मीटिंग तातडीने घडवून आणली होती.

तिने निकोलसला २% इक्विटिमध्ये फाईनस करण्याचा निर्णय दिला, अट एवढीच होती की ह्या पुढे डिसूजा ब्रदरमध्ये स्टेविनला बरोबरीची भागीदारी असावी.

डिसूजा ब्रदर केमिकल फॅक्टरी होती, आणि राणे इंडस्ट्रीला सुद्धा ते वेन्डर म्हणून ऱ्ओ मटेरियल प्रोव्हाईड करत होती. 

सानूने सुमंतला विश्वासात घेवून इथे तिचा पहिला डाव फेकला होता.  डिसूजा ब्रदरने डील फाईयनल केली. आणि स्टेविनला निकोलस कंपनीत परत घ्यायला तयार झाला. बोलता बोलता सानूला स्टेविन आणि सारंगीबद्दल बऱ्याच  गोष्टी माहीत झाल्या.

स्टेविनने सारंगीशी लग्न केल्यामुळे त्याच्या घरात वाद होतं असत, आणि सारंगीने कंपनी डुबताना सुमंत कडून मदत घेतली नव्हती. स्टेविन आणि सारंगी मध्ये वाद वाढत गेले, शेवटी तिने त्याचं घर सोडलं. आणि नंतर काही वर्षाने स्टेविनही तिच्या सोबत राहायला आला. तसा तो उत्तम होता कामात पण हल्ली त्याचं आणि सारंगीच काहीच जुळत नव्हतं. आणि त्याच्याकडे काही काम नव्हतं. सुमंतला त्याला जॉइन व्हायच नव्हतं. स्वत: काहीतरी सुरू करायचं होतं. त्यात सारंगी त्याला मदत करत नव्हती. म्हणून त्यांचं जमत नव्हतं. तो जसिकासाठी राणे पॅलेसमध्ये राहत असायचा. 

सावंत वाडा...

रागिणीच लग्न होवून दोन महिने झाले होते. ती राजकोटला रविंद्र सोबत निघून गेली होती. राणीने एमबीएचं पहीलं वर्ष पूर्ण केलं होतं. राजन जाम आनंदी होता. पुढच्या वर्षभरात राणी त्याचा नवीन सेटअप सांभाळण्यासाठी सज्ज होणार होती.

राजनचे बाबा आणि आई आज निवांत त्यांच्या खोलीत गप्पा करत होते.

आई, “अहो मोहितेंची काही खबर आहे का तुम्हाला.”

“काय ग काही नवीन?”

“अहो अरुण रंवांच्या बहिणीने लग्न केलयं म्हणे. तिने तिचा जोडीदार दुसर्‍यांदा निवडलाय.”

“हो माहित आहे मला. मी भेटलो आहे आदर्शशी.”

“अग बाई कधी, बोलला नाहीत तुम्ही.”

“सहज भेट झाली ग, बरा आहे मुलगा. त्या दिवशी मी आपल्या राजनच्या नवीन ऑफिससाठी लोनच विचारायला बँकेत गेलो होतो. अंजू तिकडे दिसली होती मला त्याच्या सोबत. मग गेलो बोलायला.

“अग बाई, ती तिकडे, का?

“अग तिने बुटिक सुरू केलं आहे. तिचा आपल्या सलवारचा, कुरतीचा नवीन ब्रंड रजिस्टर केला आहे तिने. आता काम वाढलं आहे म्हणत होती मग लोनसाठी आले होते ते दोघं.

“असं....”

“अग ती तुझी मागची तुझ्या बहि‍णीने पाठवलेला सुट नव्हता का, ज्यावर मराठी वरली आर्टची डिझाईन होती, आण तर तो.

रंजनाने लगेच कपाट उघडलं आणि ती कुर्ती काढली, राजनचे बाबा त्याचा टॅग बघत म्हणाले,

“हे बघ, अंजू डिझाईन लिहिलं आहे. तेव्हा तू म्हणत होतीस कोण अंजु म्हणून, आठवते.”

“अय्या हो, पण हा तर माझ्या बहि‍णीने  ऑनलाइन बुक केला होता माझ्या साठी. “

“हो हो, आदर्श बघतो म्हणे ऑनलाइन शॉपच सर्व आणि आपली अंजु तिचे दुकान बघते.”

“अरे व्हा, खूप बरं वाटलं तिच्या बद्दल एकूण ऐकून. पहिल्या जोडीदाराने  तिला कुठे नेवून ठेवलं होतं हो, बिचारी कीव येत असायची तिची.”

“आणि आज तू तिला बघायला हवं, किती आत्मविश्वास भरला आहे तिच्यात. खूप वाईट दिवस बघितले तिने.”

“पण हे झालं कसं हो, ती तर पार खचली होती. आणि तिचा तो बेवडा नवरा...

“अग अंकितने म्हणे तिला पाठवलंच नाही त्याच्याकडे. तिच्यासाठी उभा राहिला आणि अनुने तिला हे सगळं करण्याचं सुचवलं.”

“अग बाई, आली का ती इकडे?”

“नाही तिकडेच आहे बंगलोरला आणि दोन वर्ष वगैरे येणार नाही तो इकडे.”

“हो का, मोहिते निवास रिकामा असेल हो आता. सगळे भरारी घेवून उडून गेले.”

“हो ग, आपण जायचं का कधी तिकडे?”

“जावूया.... अहो पण त्या अंजूला सोडचिठ्ठी मिळाली का त्या दारोड्याकडून.

“रीतसर सोडचिठ्ठी झाली त्यांची. अंकितने केलं सर्व. आपल्या अरुण रावांची काही हिंमत नव्हती बघ, हाच असा निर्णय त्यांनी दहा वर्षाआधी घेतला असता तर अंजू कधीची आनंदी असती...”

“जावू द्या, भावाने नाही तर भाच्याने केलं ना...

“जरा छकुसाठी चिंता सुरू आहे त्यांच्यात, पण होईल सगळं नीट.

“हो ग  बाई, बिचारी कोण कुठली ती छकु, तिला आई बापाची माया मिळायला हवी. नाहीतर आजकाल कोण कुणाचं असतं हो. आता आपल्या त्या मागच्या बंगल्यातली नंदिनी, आली हो नवऱ्याच घरं सोडून.”

“का ग? ती तर खूपच खुशीत असायची ना.”

“नाही हो फाटलं ना त्यांच, नंदिनी सोडचिठ्ठी घेणार आहे म्हणे, कांबडे बाई रडत होत्या हो. मुलगी पाच वर्षात माहेरी आली म्हणून.”

“जावूदे, नाही जमलं असेल. हे नातंच मुळात ना रक्ताच ना गोत्याच, नुसत्या मनाच असतं बघ, इथे दोन सख्या भावात जुळत नाही, घरातल्या घरात लोकं जुळवून घेत नाही मग बाहेरून आलेल्या मुलीला लोकं कसं जुळवून घेतील. सारी गफलत ना इथेच होते. समजून घेत नाहीत ग.”

“अहो पण मग तिच्या नवऱ्याने तर समजून घ्यायला हवं ना.”

“तिथेच तो कमी पडला असणार नाहीतर घर सोडून ती इकडे का येणार, अरे जोडीदार साथ देणारा असला ना तर मग बाकीचे काहीच करू शकत नाही, दोन दिवसाची असतात ती नाती पण जोडीदार आयुष्यभराचा असतो.”

“नाहीतर काय, आता नंदिनी घरी असते आणि कांबडे बाई फारच काळजी असतात हो, बिचारे ते भाऊ तर आजारी पडले म्हणे मुलीच्या काळजीने.

“हुमम, कीती महीने झाले ग ती इकडे आहे.”

“अहो आता वर्ष होईल ना...

“अरे म्हणजे त्यांना तर सहज कायदा वेगळा करू शकतो.”

“म्हणूनच तर आहे ना ती, तिच्यापण ना नाकावर राग असते आणि रूपाचा अंहकार भारी आहे तिला. म्हणते दूसरा जोडीदार शोधणार.”

“मुली पण ना ग, समजून घेत नाहीत, कुठे रूप कामी पडतं, चार दिन की चांदिनी ती, आणि दूसरा जोडीदार म्हणजे पानी सुद्धा फुंकून पिण्यासारखं आहे.”

“त्याबाबतीत मी सुखी आहे बाबा, माझी सून कधी आवाज मोठा करून बोलत नाही की तिला तिच्या रूपाचा अंहकार आहे. राणी राणीच आहे माझ्या राजनची.”

“अरे बापरे, तुला तर ती नको होती ग.”

“जावू द्या हो ते आता, मला तर माझ्या सुनेच नवल आहे, बाकी माझं काय ते मी बघून घेईल आणि हो मी कितीही काही तिला बोलले ना तरीही तो आहे ना तिचा जोडीदार तिला परत माझ्यापुढे उभी करायला, बघितलं आहे मी त्याला, ना मला वाईट वाटू देत ना तिला, पण बाजू तिचीच घेत असतो.”

“अग  ते जावूदे, आपण जायचं का मोहिते निवासात  सहज म्हणून.”

“जावूया हो वेळ मिळाला की, नाहीतर राणी तर जातच असेत ना. काही घाई नाही.”

“आजही जाणार आहे का ती तिकडे?”

“काही माहित नाही मला, आता ती आणि राजन जसं म्हणतील तसं, जातील दोघं आणि येतील भेटून.”

तोच राणी आणि राजन खोलीत शिरले, राणी हसत म्हणाली,

“नाही, आज नाही जाणार आहे मी बाबांकडे...

“अग मी असंच बोलले ग.” आई तिला बघताच म्हणाली.

राजन, “आई आता तिला सवय झाली आहे ग, तिला माहीत आहे तुझ्या मनात काही नसतं ह्याची.”

“तो तिचा मोठेपणा आहे रे, मोहित्यांची मुलगी आहे ना, तिच्या स्वभावात आहे ते.

राणी येवून आईच्या अगदीच जवळ बसली, आणि राजन बोलला,

“आई बाबा, तयार व्हा, आज आपण सर्व बाहेर जातोय जेवायला.”

बाबा, “अरे पण काय आहे आज, तुम्ही दोघं जावून या ना. अम्मा करेल आमच्यासाठी काही तरी.”

“अम्मा आज सुट्टीवर आहे आणि आम्ही दोघे जाणार होता, राणी बोलली तुम्हा दोघांनाही घेऊया, चला तयारी करा.”

“पण आज काय खास?”

“अहो बाबा तुम्ही मागे लोनसाठी गेला होता ना, बँकेच्या मॅनेजरचा फोन होता, लोन मिळणार म्हणून.

“मग तर आनंद आहे... चल ग रंजू तयारी कर. जावूया आपण. तसंही बोर होतं होतो आपण, चुगल्या करून.”

आता सगळे हसले, तर बाबा म्हणाले, “राणी आम्ही तुझ्या माहेरच्या चुगल्या करत होतो ग, आता काम काय आम्हाला.”

“असं, मग चुगल्या चांगल्या होत्या कि....”

“चांगल्या होत्या बाळा... अंजू आत्याच्या गप्पा सुरू होत्या ग... तिला सुखाचे दिवस लाभले बरं वाटलं. कधी कधी जोडीदाराची निवड चुकते आणि मग असं तिच्या सारखं भोगावं लागते.”

“हुम्म्म, बाबा पण आता नाही चुकली त्यांची निवड. आदर्श काकांचा स्वभाव खूप मनमिळाऊ आहे आणि त्यांना तर काही व्यसन नाही.”

राजन, “चला चला, तयारी करा मग ट्राफिक खूप होते मुंबईच्या रस्त्यावर.”

सगळे आपल्या आपल्या दुनियेत मस्त होते... शांतता होती ती मोहिते निवासात... बाबांना सर्व कठीण जात होतं. ते बोलत नव्हते. वरून वरून सर्वांशी हसत आनंदात बोलत असत पण मन लागत नव्हतं त्याचं. भरलेले घर अचानक खाली झाले होते. आई बाबांच्या गोष्टी अनुला सांगत असायची आणि अनु मग बाबांचा क्लास घेत त्यांना रागवत असायची. तिनेही तिकडे बंगलोरला जॉब सुरू केला होता. दोघेही त्यांच्या कॅरिअरच्या मागे लागले होते.

कथेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचे आधीचे भाग पेजवर आहेत
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments