जोडीदार.. प्रवास तुझा माझा.. भाग ३०

 

जोडीदार.. प्रवास तुझा माझा.. भाग ३०



आई बाबा त्यांच्या येणार्‍या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करत त्याच्या खोलीत मग्न होते. दारावर थाप पडल्याने दोघेही जरा दचकले, आईने पैठणी काढून फेकली आणि साडी गुंडाळली. बाबाने ही त्यांची टोपी बाजूला काढून ठेवली. सगळं नीट करून बाबा दारा कडे वळले, दार उघडलं, दारात सर्व उभे होते, सानू सुमंत, राणी राजन, अंकित अनु... सोबत म्हणाले,

“लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा, यायचं का आम्ही?”

आई बाबा आनंदाने मोहरले होते, घडीवर नजर पडली, बारा वाजले होते, सगळे खोलीत आले, श्रीने केक आणला, बारा वाजले होते आणि आई बाबांनी श्री सोबत केक काटला. सर्व आनंदात होते. आईला मागचा लग्नाचा वाढदिवस आठवला, डोळ्यात पानी आलं, म्हणाली,

“परमेश्वराने माझी प्राथना ऐकली हो, मागच्या वेळी ही तिघं होते आज त्यांच्या त्यांच्या जोडीदारासोबत आहेत.”

आईला सर्वानी येवून आलिंगन दिलं. गप्पा रंगत गेल्या मग बाबा सर्वांना म्हणाले,

“अरे उशीर होतोय, झोपा आता, बाकीच  उद्या काही शिल्लक ठेवायचं की नाही.”

आता सानू परत बोलली, “अरे बाबा उद्या इकडे धमाल आहे. सगळे येत आहे...”

आई जरा गडबडली, “सगळे म्हणजे ग?”

राणी, “अग आई, माझी सासू आणि सासरे येत आहेत. अनुचे आई बाबा येत आहेत आणि सानू ताई कडेले म्हणजे तिचे मामासासरे आणि आत्याबाई पण येत आहेत.”

बाबा चश्मा काढत म्हणाले, “आणि माझी अंजु, आदर्श, भीमा सूनी रे?”

“अहो त्यांना कसं विसरणार, सगळे येत आहेत. सदा काका सुद्धा.” सानू बाबांना बिलगत म्हणाली.

“हा मग ठीक आहे, चला झोपा आता... मग उद्या खूप कामं असतील ना?” , आई काळजीत म्हणाली.

“काही नाही, बारबेक्यू गार्डनर पार्टी आहे. मी ऑर्डर दिला आहे. उद्या सकाळी माणसं येतील. तुम्ही चिल करो हो आई बाबा.”

“सानू तू पण ना! कधी हे सर्व करतेस काय माहीत.”

“अहो बाबा इथे मी एकटीच नव्हते हो, अनु राणी होत्याच की, सब का कमाल आहे हा... चला झोपा सगळे.”

दुसऱ्या दिवशी सगळी धमाल होती मोहिते निवासात, सगळे हजर होते, श्रीकांतला सर्व कुटुंबासोबत भेटवून देण्यात सानू यशस्वी झाली होती. कुणाच्या मनात काही होतं तर कुणाच्या काहीही नव्हतं. पण श्रीकांत सानू आणि सुमंतच्या आयुष्याचा भाग आहे हे मात्र आता सर्वांना पटलं होतं.

अंकितकडून आजची पार्टी अनुच्या नवीन जॉबची होती. राजनकडून राणी साठी नवीन गाडी घेतल्याची आणि सुमंत कडून त्याच्या मुलाच्या स्वागताची आणि आई बाबासाठी हा सोहळा मनात भरून ठवण्यासाठी होता.

अनु अंकित दोन दिवस राहून निघून गेले. सानू आणि सुमंत तब्बल वीस दिवस इकडे मोहिते निवासात होते. सुमंत त्याचं सारं काम इथून करायचा, सध्या मोहिते निवास राणे कंपनीच कार्यालय होतं. त्याच्या तास दोन तास चालणाऱ्या मीटिंग आणि घरात सारखं फोन वर बोलणं सुरू असायचं, त्यात मग सानूची आणि सुमंतची कामासाठी वरच्या माळ्यावर सुरू असलेली मीटिंग कितीतरी तास चालायची. घराला सर्व माहीत असायचं.

त्यात सानू नवीन नवीन पदार्ध आईकडून शिकत होती आणि सुमंत ते बसून खात असायचा. आई आणि बाबा श्रीच सर्व काही करायचे. त्याला व्यायाम करवून देणं, बागेत फिरवण, भरवण त्याच्या सोबत खेळणं सारं काही उत्साहात आई बाबा करत असत.  त्याला घेवून ते जवळपास फिरायला जात असतं, मोठ्या मनाने शेजाऱ्यांना सांगायचे त्याच्या बद्दल. त्याच्यासाठी त्यांनी दोघांनी मिळून सोन्याचा गोप केला त्यांची आठवण म्हणून. आईने आणि बाबांनी मिळून श्रीच्या आवडीचे पापड आणि कुरड्या अजूनही खूप काही केलं.

राणे पॅलेस

तीन महिने झाले होते सानू आणि सुमंतला राणे पॅलेसमधून जायला, पण त्यांच्या नसल्याने इकडे मात्र खूप गोंधळ उडाला होता असं नव्हतं. मा साहेब भारतात येणार होत्या पण घरात वातावरण बघून त्यांनी ती जिद्द सानूकडे केलीच नाही. सारंग आणि जया त्यांच्या कामात दिवस रात्र मग्न असायचे. त्याला जेमतेम यश मिळणार होतं, जया जवळची रक्कम जवळपास संपत आली होती, तिने तिच्या भावाला मदत मागण्याच सारंगला बोलून दाखवलं होतं,

“अग पण दादाला बोलूया आधी, घरची गोष्ट बाहेर कशाला.”

“अरे पण ते नाहीत ना इकडे....”

“येतील, आणि बघ मला दादा नाही नाही बोलणार.”

“हो पण ती आहे ना ती नाही बोलेल बघ.”

“असं नाही होणार मी मा साहेबांच्या खोलीत पैसे मागायला गेलो होतो, जरा रागात होतो, दाराबाहेर राहून चोरून ऐकत होतो, त्या वहिनी सोबत बोलत होत्या. पण बरंच झालं मी ते चोरून ऐकलं नाहीतर मी मासोबत  उगाच भांडलो असतो त्या दिवशी.”

“काय बोलत होत्या त्या, त्या बॉसी बाईशी,..”

“ये जयू काय बोलतेस ग...”

“अय्या, किती दिवसांनी मला जयू म्हणालात हो, दिवसांनी काय वर्षानी हो... माझे कान आतुर झाले होते ह्या शब्दासाठी.”

“जयू मी घेतली नाही ना एवढ्यात ग..”

“आता कशाला हवी तुम्हाला, नशा लागली आहे कामाची, पूर्ण करा, कुणी नसलं सोबत तरी मी आहे, मी बोलते माझ्या भावासोबत, तो करेल मदत.”

“जयू त्याची काही गरज पडणार नाही, मी माच आणि वहिनीच बोलणं ऐकलं आहे.”

“काय हो काय बोलत होत्या त्या...”

“अग हे सगळं इथे घडत आहे ना ते वहिनीने केलंय कदाचित.”

“तिने काय केलंय, सगळं बंद करून ठेवलं आपलं.”

“तेच तर, म्हणून आपण कामाला लागलो ना. मागे मुलांची फिस आपण कशी बशी भरली, पण आता दोन महिन्यापासून आली का तक्रार शाळेतून, मी फोन केला होता, वहिनीने पाठवली आहे म्हणे ह्या सेमची पूर्ण, मी ऐकलं होतं मा ला बोलतांना, वहिनी विसरली होती म्हणे म्हणून शाळेतून फोन आला होता आपल्याला.”

“अ... आणि मग हे सर्व कार्ड बंद झालेत आपले त्याचं हो काय...

“ते असते तर तू मी इथे असतो का? आपण त्या कार्ड आणि फुकटच्या मिळणाऱ्या चैनीमुळे वेडे झालो होतो आणि आपण आपलं वेड नेमकं काय होतं हे विसरलो होतो. वहिनीला वेडी म्हणत होतीस तू, हो ग आहे ती जरा वेडी, नात्यांना अलगद समजून घेण्याचं वेड आहे तिच्यात. वादळ आहे असं माहीत होतं पण कुणाला संपणार वादळ नाही ती. कशाला हवेत आपल्याला कुणाचे पैसे आपण आपलं साम्राज्य तयार करूया, आता महिना लागेल मला नवीन थीसेस तयार करायला. मग मी दादाशी बोलतो, मला आधी माझी तयारी करू दे.”

तो परत कामाला लागला, जया विचारत होती तर म्हणाला,

“विचार करू नको, आपला विचार करणारी ह्या घरात दादाने कधीच आणली आहे.”

जया स्मित हसली, तर तो तिला म्हणाला,

“ जयू कॉफी आण करून मस्त... सोबत गप्पा करत पिऊया.”

तेवढ्यात मारिया तिकडे कॉफी घेवून आली, “बाबू कॉफी फॉर यू अँड जया, आय अॅम सो हॅपी फॉर यू... जया मॅडम ते बाबूचे थीसेस सानवी मॅडमनेच रद्दी म्हणून पुढे हॉलमध्ये स्टुडिमधून आणून ठेवले होते आणि मला सक्त ताकीद देवून ठेवली होती, फेकू नकोस म्हणून, त्या रोज विचारात असायच्या तुम्ही ते बघितले का म्हणून..”

“अग बाई... मला कळलाच नाही हे... किती माहिती काढली त्यांनी आपली हो सारंग आणि आपल्याला त्यांच्या बद्दल काहीच माहीत नाही.”

सरांग आणि जया परत कॉफी पित कामात मग्न झाले होते. मारियाने खोली तिच्या पद्धतीने जरा आवरली आणि ती निघून गेली.

---

राणे बंगाला

“श्री तिकडे नाही जायचं बाळा, अजून तू कधी कधी लचतोस.”

“ममा नाही जात ग, मी तिथेच खेळतो आहे. शामल मॅडम येणार आहे ना आज?”

“हो येणार आहेत.”

सानू ऑफिसच काम करत श्रीशी बोलत होती. श्री परत म्हणाला,

“ममा, आजोबाकडे मस्त करमत होतं ग, इथे ना...”

“अरे आता आपल्याला निघण्याची तयारी करायची आहे. मग इकडे नको का राहायला. तिकडे तुला जसिका असेल तुझ्या वयाची, सुमित आणि साशंक असतील तुझ्या पेक्षा लहान, तुझी आज्जीमा असेल. सगळे वाट बघत असणार तुझी.”

“हो... सगळे माझ्याशी बोलतील काय ग ममा?”

“का नाही, तू किती गोड आहेस, बोलतील ना... आणि मैत्री आपण करायची असते ना श्री! आता समोरच्याला तुझ्या बद्दल थोडं काही माहीत आहे. जरा तू सांग जरा ऐकून घे. मैत्री होईल रे, काही काळजी करू नकोस... हे बघ मी आज तुझ्या शाळेसाठी अर्ज केलाय. माझा श्री शिकागोच्या शाळेत जाणार... “

“हे... ममा विमानात भीती वाटते काय ग?”

आता मात्र सानू लॅपटॉप बाजूला ठेवून उठली आणि श्रीला तिने तिच्याकडे बोलावलं,

“श्री, काही भीती वाटत नाही, हे असं टेक ऑफ करतं विमान आणि असं लँड करतं... तू माझ्या आणि पप्पाच्या मध्ये असणार ना मग कसली भीती रे... चल आजचा होम वर्क कर बघू, शामल येईल इतक्यात, मग आपण शॉपिंगला जावूया .”

“ममा आपण एकदा आश्रमात भेटून येवूया ना ग, मला एकदा सर्वांना भेटायच आहे, मी चालायला लगलो हे सर्वांना दाखवायचं आहे.”

“नक्की, मग आज आपण शॉपिंग करूया तुझ्या सगळ्या मित्र मैत्रिणीसाठी... चालेल!

सानूची गडबड सुरू झाली होती. तिला परत शिकागोला निघायचं होतं. पंधरा दिवस राहिले होते आता आणि हे तर नुसते शोप्पिंग आणि सगळ्यांना भेट देण्यात जाणार होते. सुमंतने पुढचे पंधरा दिवस सुट्टी घेतली होती स्वत:ला.म्हणजे सर्वाना भेटता यावं म्हणून.

आपण परत भेटूया पुढल्या भागात

कथेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचे आधीचे भाग पेजवर आहेत
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments