जोडीदार.... प्रवास तुझा माझा भाग ३६

 


जोडीदार.... प्रवास तुझा माझा भाग ३६

सोहळा मस्त रंगला होता. सगळे परतले, राणी तिच्या खोलीत होती, आणि ओरडायला लागली, राजन धावला, राणी रडत होती आणि ओरडत होती.

“राणी काय झालंय, काही दुखत आहे का?”

“अहो, सुरू झालं ना. काही करा ना, खूप दुखत हे पोटात.

राजनने गाडी काढली आणि सगळे हॉस्पिटलमध्ये पोहचले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि म्हणाले,

“गर्भपात झाला आहे, मी औषधी दिली आहे. दोन तीन तासात तुम्ही राणीला घरी नेवू शकता.”

राजन गोंधळला, “राणी कशी आहे?”

“ती ठीक आहे, पण काळजी घ्या. मी तिला आताच बोलली आहे सगळं. “

काही वेळात घरचे सगळे पोहचले, राजनची आई घाबरली होती,

“राजन काय झालंय, राणी कशी आहे.”

“राणी ठीक आहे. पण...”

“पण काय रे, सगळं ठीक आहे ना.”

“आई, ती प्यानीक होवू नकोस, त्याने काही होणार नाही. आता बेबी राहिलं नाही, काय झालं कसं झालं माझ्यासाठी हे महत्त्वाच नाही, मला काळजी आहे राणीची. “

“अरे पण आता संध्याकाळ पर्यंत सर्व ठीक होतं, हिने काय खाल्लं...”

राजनचे बाबा आता ओरडले, “तुला म्हणतोय ना तो, हे आता काही महत्त्वाच नाही म्हणून. गप्प बस. “

“राजन, आम्ही भेटायचं का रे राणीला?”

“बाबा अजून मीच गेलेलो नाही तिकडे खोलीत. आधी मी जातो.

“बर, आम्ही आहोत इकडे.

राजन आता खोलीत शिरला, राणी पार रडून लाल झाली होती, राजन येताच ती बिलगली,

“अहो मला काही कळालं नाही. मला काही माहित नाही हो.”

“अग शांत हो, काही झालेलं नाही. ठीक आहे. आपण परत चान्स घेवू. आता ठरवलं आहे ना मग विचार करू नकोस... “

“पण आई...

“आई काही बोलणार नाही, आता ती तरी काय करू शकते ह्यात.”

“अहो पण त्यांना खूप वाट होती हो.”

“मग आपल्याला नव्हती? हे बघ आता झालंय ते झालं. विसर. डॉक्टर म्हणाले अजून तीन महिने काही चान्स घ्यायचा नाही. मग बघू....

काही वेळात राजनचे बाबा आणि आई खोलीत आले. राणीने राजनचा हात घट्ट पकडला, बाबा म्हणाले,

“राणी कशी आहेस. काही दुखत नाही ना.

“नाही बाबा, पण...”

ती परत रडायला लागली, तर आई म्हणाली,

“आता नको रडून ग, परत चान्स घे ना, जावू दे, मीच लक्ष दिलं नाही तुझ्यावर...

“अहो आई, तसं नाही हो.”

बाबा, “चल राजन, डिस्चार्जच बघ. सुनबाईची काळजी घरी उत्तम होईल.”

मोहिते निवासात ही वार्ता खूप उशिरा समजली, आई बाबांना म्हणाली,

“आता आपण परके झालोत हो, मुली सांगत नाहीत आपल्याला काही.”

“आता हे तुझं नवीन  काही सुरू करू नकोस.”

“मग काय!”

“अग असं समज ना की त्यांना आता त्यांच घर प्रिय आहे. आपली कमी जाणवत नाही त्यांना.”

“हुमम, एक तिकडे शिकागोमध्ये आहे आनंदात आहे आणि एक इथे तीस किलोमीटरवर असून काही काही सांगत नाही.”

“झालं तुझं अजून सुरू.”

“नाही हो.

“अजिबात माझ्या मुलींना बोलायच नाही.”

“घ्या आता तोंडाला ना कुलूप लावते मी.”

“अग तसं नाही, आणि हा काय ग रूसवा, आता नाही राहिलं ना, राहील लगेच ग, गोड बातमी येईल लवकरच. हस बघू.”

“जा हो तिकडे. तुमचं आपलं काहीही.”

“कुठे जाऊ ग, अभि तो जिना यहा मरणा यहा इसके सीवा जाणा कहा. तुझ्या जवळ राहू दे, मला जरा जगू दे.”

“व्हा तिकडे, का आज तुमच्या मैत्रिणीचा मेसेज आलं नाही का?

“नाही ग, जरा आजारी आहे ती.”

“मग भेटायला जात नाही का.”

“आता बाळू येतोय ना, मी बोललो त्याला”

“अग बाई, हे बरं सुचलं हा आता.

“जावूया ग, मुलाच्या घरी राहू महिनाभर आणि येवू. तसाही आता त्याचा प्रोजेक्ट संपत आलाय तीकडला.

“अरे म्हणजे तो येणार आहे का इकडे?”

“ते माहीत नाही, पण येईल ना. मागे बोलला होता ना तो, आता तिकडे गेलो की अनुशी बोल, तीचं सांगू शकते काय ते, नाही तर आपला मुलगा तर काही सांगत नाही.”

“कशाला माझ्या मुलाला बोलता हो, तुमच्या मुली बघा आधी.“

“माझ्या मुली त्यांच्या संसारात त्यांच्या जोडीदारांसोबत मजेत आहेत. स्वत:च राज्य स्थापित करत आहेत. अजून काय हवं ग आपल्याला.

“हुम्म, कधी फोन करत जा म्हणव निवांतपणे, ती एक जेव्हा फोन करते घोड्यावर असते. बाबा माझी मिटिंग आहे थोड्या वेळात. आई श्रीला घ्यायला निघाले आहे गाडी चालावत आहे... तर कधी मध्येच ऑफिसमधल्या लोकांना सूचना देते आणि फोन ठेवते, बसं किती बहाणे असतात त्यांचे. आणि एक अग आई भाजी फोडणी देते आहे, उद्या बोलते, आज ना मला राजनसोबत सिनेमा बघायचा आहे. आज ना पाहुणे आहेत घरी, बापरे, जसं कि आपल्याला जणू ह्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना नाही.

“आरती कुठला राग कुठे काढत आहेस तू. बघ राणीला राहील लवकर. कशाला बोलतेस ग, मुलींच्या आई वडिलांची हीच गत असते. आता आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपण वाट बघत असतो त्यांच्या फोनची. पण ते गडबडीतही आपल्याशी दोन मिनिट का होईना बोलतात ना, मी तर समाधानी आहे ह्यात. “

आरती काही वेळाने रडली आणि शांत झाली. राणीला राहिलं नाही ह्याने ती जरा दुखावली होती आणि व्यक्त मात्र वेगळ्या मार्गाने होत होती.

बाळू आलेला, बाबा आणि आई त्याच्यासोबत बंगलोरला जायला तयार झाले होते. सगळी तयारी झाली होती. रात्री आठची फ्लाईट होती त्यांची. सकाळी सगळे गप्पा करत बसले होते. आता अनु आणि बाळू घरी असल्यावर बाबा काय फोन मध्ये गुंतणार होते. तोच सदा धावत आला, आणि म्हणाला,

“अरुण चारू राहिली नाही रे.”

अरुणला काही समजलं नाही, तर सदा परत म्हणाला,

“अरे काल रात्री तिच्या मुलाने मेसेज टाकला होता. मी आता सकाळी चहा पीत असतांना बघितला. तू बघितला नाहीस का?”

“अरे मी तर फोन विसरलो कुठे ठेवला आहे ते.

अरुण फोन शोधू लागला, फोन दिसला, मेसेज वाचला आणि आणि अरुण गप्प झाला, काही वेळ शांतता होती, मग हळूच म्हणाला,

“गळती सूर झाली रे सदा. गेली चारू, भेट नाही झाली माझी. आरतीला भेटायचं होतं रे तिला. आम्ही भेटून तीन पत्ती खेळणार होती तिघे. आता काय ह्याच वार्ता असणार आपल्या ग्रुपवर. आता कुठे आपण भेटायला लागलो होतो ग्रुपवर.”

सदा, “तू निघणार होतास ना आज बंगलोरसाठी.”

“हो रे, माझी आणि आरतीची पूर्ण तयारी झाली होती, जरा थांबली नाही रे ही चारू.”

दुपार तशीच गेली. अनु आणि अंकितने मात्र दोघांना सोबत नेण्याच ठरवलं होताच. त्यांनी तयारी केली. बाबांना आणि आईलाही तयार केलं. 

दोघेही बाळूसोबत बंगलोरला गेले, पण काही त्यांना तिकडे करमत नव्हतं. तिथेही ते दोघे घरी असायचे. उलट बाबांना आता बरंही राहत नव्हतं.

अनु, ”अंकित ऐक ना.”

“काय ग?”

“बाबा आईला नको फोर्स करूस इथे थांबायला. ते इथे राहिले ना तर आजारी पडतील रे.”

“अग पण मी एकटाच मुलगा आहे ना, आता बहि‍णी त्यांच्या संसारात सुखात आहे. मी इकडे कामात, मग मी नाही लक्ष देऊ शकत ना त्यांच्यावर, समोर राहिले तर मी लक्ष देवू शकतो आणि त्यांनी वेळेनुसार बदलावं ना ग.”

“तुझं बरोबर आहे, पण जुनी माणसं आहेत रे, इथे त्यांना असं बांधून ठेवल्या सारखं वाटत असेल. आता ते बोलत नाहीत, मी पण घरी नसते दिवसभर, काम खूप नाहीत. दिवसभर कुठे जाण नाही, ओळखीचे लोकं नाहीत.”

“अग ओळखी केली तर होते. सगळं होते.”

“अंकित रिटर्न तिकीट कर. ते तिथे जास्त आनंदी राहतील. समजलं का तुला.”

“बरं बाई. करतो.”

शेवटी अनुच्या सांगण्यावरून बाळूने त्यांची रिटर्न तिकीट करवून दिली.

कथेचा पुढचा भाग लवकरच.
कथेचे आधीचे भाग पेजवर आहेत
तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल-

Post a Comment

0 Comments