जोडीदार.... प्रवास
तुझा माझा.... भाग ३८
सावंत वाडा...
सानूला पाचवा महिना
सुरू होता आणि राणी मात्र अजूनही पाळीचे दिवसं मोजत असायची, घरात ती कुणाशी खूप
आता बोलत नसायची. राजन तिची समजूत काढत आज खोलीत होता,
“राणी, आपल्याला
आनंद झालाय ना, सानवी दीसाठी.”
राणीने नुसती मान
हलवली, राजन परत म्हणाला,
“अग तू मावशी होत
आहेस.“
“ते मी श्रीची पण
आहे.“
“मग दुसर्यांदा
होत आहेस ना.
“हुमम “
“अग, बघ तशीही ताई
मोठी ना मग तिला आधी नको का!”
“पण लग्न माझं आधी
झालंय ना.”
“नकोय ग आपल्याला
एवढ्यात, आधी तू मला सांभाळ.”
“तुमचं नेहमीच हो”
“अरे म्हणजे मी तर
अजून लहान आहे. माझं कर, तुझं ऑफिस आहे, किती गोष्टी आहेत करायच्या.“
“अहो आता
रोहिणीदीचा मुलगा दीड वर्षभराचा होईल ना.”
“हो, येणार आहे ती.”
“कधी?”
“पुढल्या महिन्यात.
“का ?”
“अग काही नाही. येत
आहे भेटायला .”
“भेटायला की आईने
बोलावलं असणार नातवाला.“
“राणी....”
राजन जरा शांत
झालं,” राणी तसं नाही आहे. तीचं माहेर आहे हे, येते तर काय झालं. आणि प्रिन्स हा ह्या
घरचा नातू आहे.”
“हुमम...”
राजन आता त्याच्या
जागेवरून उठला, आणि राणीला त्याने कुशीत घेतलं,
“राणी मला तू हवी
आहेस आता, त्या पहिल्या वेळेपासून आपण चार वेळा बाळ गमावलं ना, मग आता दोन वर्ष
मला त्या गोष्टीचा विचार नको. तू ऑफिस सांभाळ, मी बघतो सगळं, तुला कुणीही काही
बोललं ना तर माझं नाव सांग, मी बघतो मग कोण काय आणि कसं तुला काही बोलतो तर. अरे
मी आहे तुझ्या सोबत. आणि बाळ तुला होत नाही हे कसं ग, ते आपल्याला होतं नाही आहे. म्हणून
इथे तूच नाही आहेस, मी सुद्धा येतो. मी आईशी बोललो आहे ह्या विषयावर ती नाही काही
बोलणार. तू बिनधास्त राहा. रोहिणी येत आहे. तिला काही जाणवू देवू नकोस, नाहीतर
तिलाही वाईट वाटायचं आणि मग तीही येणार नाही आपल्याकडे.”
राणी राजनच्या
कुशीत खूप रडली, जरा वेळाने राजन म्हणाला,
“अग वेडाबाई, कशाला
एवढा त्रास करून घेतेस ग, तुला माहीत आहे मुलं आपल्याला नाही साथ देत ग, सुखाच्या
दिवसात आपल्या वाटेला आलेलं सुख घेऊन जातात, मग त्यांच्या जोडीदारा सोबत आणि
त्यांच्या नवीन जवाबदऱ्यानसोबत सुखाने
राहतात. शेवटी उरतो ते आपण जे आयुष्यभर त्यांच्यासाठी झटतो, मलाही आनंद होईल
माझ्या मुलांच्या असल्याने पण असं माझ्या जोडीदाराला मी तीळ तीळ झुरताना नाही ना
बघू शकत ग, तू मला माझ्या म्हातारपणात हवी आहेस, तो मुलगा नाहीतर मुलगी नसणार
माझ्या जवळ, तू असशील ग, तुझा आनंद आज जेवढा मला सुखावतो ना तेवढा त्या वेळी ही
सुख देऊन जाईल, मग आज जरा जास्त वेळ मिळत आहे आपल्याला तर जगूया, जरा आठवणी
साठवूया त्या म्हातारपणासाठी. काय ह्या म्हातार्याची गोड म्हातारी होशील ना, कि
बस माझा मुलगा माझी मुलगी करत राहशील.”
“काहीही हो तुमचं.”
“अरे, किती वेळचे हे
ऐकायला माझे कान आणि मन बेचैन झालं होतं म्हणून सांगू. आता जीव कसा जीवात आला
माझ्या.”
“काय हो, काहीही हो
तुमचं..”
“काहीही असलं तरी
तुझ्या ह्या गोऱ्या आणि उगाच रडून लाल झाल्याने गालावर हसू आलं ना, आणि मी परत
पडलोय ह्या खडीत.”
“काहीही हो तुमचं,
मी मस्त कडक चहा आणते.”
“नाही कडक नको मला,
तुझ्यासारखा गोड हवा आहे, बिना सारखरेचा कारण तुझ्या प्रेमाची साखर असणार त्यात.
काय बाबा डायबटीज झालं तर जास्त गोडाने, काय करायचं मी. म्हातारी तर आताच मुलं
मुलं करते...”
राणीने पार राजनला
ढकललं आणि ती धावत खोलीतून चहा टाकण्यासाठी निघाली. राजन मात्र जरा काळजीत पडला
होता. राणी फारच मनावर घेतलं होतं सारं.
काही दिवस रोहिणी
तिच्या मुला सोबत सावंत वाड्यात होती. प्रिन्ससोबत आनंदात दिवसं गेली होती. त्याला जवळ घेतांना, त्याच्याशी खेळतांना राणीला
सारखं वाटत होतं, मनाला बोचत होतं. रोहिनीला ते जाणवत होतं,
“वहिनी, नको ना
काळजी करूस ग, सारखा विचार नको करूस.”
“ताई मी नाही करत
हो, पण मनात सारखं येते.”
“मग सांग त्या
मनाला तुला त्रास देवू नकोस म्हणून, दादा आहे ना तुझ्यासोबत.”
“हो ग, ते आहेत
म्हणून मी आहे, नाहीतर मी तर खचले असते. पण वाटतं ना ग, लवकर राहिलं की कसं सगळं
सुरळीत आहे ह्याची शाश्वती होते मनाला आणि आपण स्थिरावतो नात्यात.”
“हा समज आहे आपला,
मुलं नात्यात खूप काही घेऊन येतात पण खरं नातं हे नवरा बायकोच असतं ग, उगाच लोक
म्हणतात मुलं झाली की नातं घट्ट होतं, पण आपण कितीतरी उदाहरण बघतो ना, मुलं असून
सुद्धा नात्यात पोकळ असते आणि मग फाटतात अशी नाती, आता माझी मैत्रीण रेणुका.”
“हा ती तुमच्यासोबत
यायची ना घरी, लग्न झालं होतं त्याच ना.”
“हो तीच, मी
आयएएसची तयारी करत होते आणि तिने लग्न केलं होतं, तिलाही शिकायचं होतं पण आईकडे
परिस्थिती नव्हती. लग्नाच्या वेळी तिने होणाऱ्या नवऱ्याला बोलून दाखवलं होतं, पण
झालं काय, त्याने लग्नानंतर त्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही. वर्ष झालं, मग नाही
नाही म्हणता म्हणता मुलं झालं, मुलं पाच वर्षाच झालं मग तिने इच्छा बोलून दाखवली
तरी त्याची प्रतिक्रिया तीच होती, तो तिला समजून घेत नव्हता आणि ती त्याला,
कुणीतरी मागे यायला हवं होतं, पण कुणीच झालं नाही, कारणाला कारण वाढले आणि सगळं
सुटत गेलं, आता ना तिला काही करण्याची इच्छा राहिली ना त्याच्या सोबत रहाण्याची,
तिला नातंच नको वाटलं. शेवटी मागच्या महिन्यात ती आणि तो वेगळे झाले.”
“आणि मुलगा?”
“मुलगा आहे
तिच्याकडे.”
“आणि ती काय करते.”
“आई वडीलांकडे आहे.
आता किती प्रश्न आहेत ना तिला, ना शिक्षण हातात आहे ना आई वडील साथ देतील ही
अपेक्षा.”
“हुमम, तिने
अॅडजस्ट करायला हवं होतं नाहीका... “
“असं सहज वाटते ग,
पण शक्य नसणार ना, सासरचे तिलाच बोलायचे म्हणे आणि जिथे तो साथ देत नाही आणि मग कुठलीच बाजू गवसत
नाही ना तिथे असे निर्णय घेतले जातात बघ. निदान त्याला तिला शिकू द्यायचं नव्हतं
तर समजवायचं होतं, संवाद हवा होता, तिच्या अपेक्षा जास्त असतील मग त्याने त्याच्या
अपेक्षा कमी करायच्या होत्या, आपण आपलाच विचार नात्यात करत बसलो ना कि मग असं
होतं, आणि नवरा बायकोच्या नात्यात तर ८०% नवरे बायकोला गृहीत धरतात. आणि जेव्हा
सासरच्या लोकांपुढे आपण एकटे पडतो तेव्हा तिथे राहून काय ग!”
“हुम्म्म्म”
“मग, तुझी बाजू
कुठे स्ट्रॉंग आहे हे आलं का लक्षात, काही असेल तर सांग, मी बोलते दादा सोबत.”
तेवढ्यात राजन
बाहेरून हॉलमध्ये शिरला,
“काय रोहिणी काय
बोलायचा आहे दादाशी, कुठली चुगली होत आहे ग माझी?”
“काय रे दादा तू
राणी वहिनीची काळजी घेत नाहीस काय रे!”
“हो कदाचित, कमी
पडतोय ग मी, कामात असतो. आता बघ ही सारखा सारखा तोच तोच विचार करत असते, ऑफिसला
जात नाही, मग मला माझं ऑफिस आणि आपलं नवीन सेट अप दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतं ग.”
राणी अलगद बोलली,
“अहो नाही हो, मी कुठे काही म्हणाले.”
राजन, “तू काही
बोलत नाहीस पण तुझ्या वागण्यात जाणवतं ना कि मी तुझी काळजी घेत नाही. तू अशी
दिसणार, कधीही हळवी होणार मग समोरच्याने काय समजायचं ग.”
“रोहिणी तू रागव
मला...”
राणी आता राजनच्या जवळ येवून बसली, “अहो नाही हो, तुम्ही आहात
म्हणून मी खूप मनाला लावून घेत नाही.”
“म्हणजे तू काहीतरी
मनाला लावून घेतेस, आणि मी असमर्थ ठरलो.”
राणीचे डोळे
पाणावले, “अहो नाही हो, आता हे नवीन काय, काहीही तुमचं हो, शी बाई मीचं कंट्रोल
करायला हवं, उगाच काय मागे लागायचं, जे आहे समोर त्याला गमवायचं नाही मला. तुम्ही
आहात अजून काय हवंय.”
“ये बात राणी, आता
कशी बोललीस, चल मग चहा कर बघू तुझ्या हाताचा.”
आणि तो तिच्या कनात
म्हणाला, “मला ना अम्माच्या हातचा हल्ली आवडत नाही, प्रेमाचा गोडवा नसतो ना
त्यात.”
राणी स्वयंपाक
खोलीत डोळे पुसत निघाली, आणि राजन रागिणीशी गप्पा मारत बसला,
“काय मग रागिणी कधी
येत आहे तुमचे जोडीदार, अजून किती दिवस आहे ट्रेनिंग रवींद्रची. फोन झाला का आजचा
तुझा?”
“हो रे दादा, आत्ता
काही वेळाआधी रवींद्र प्रिन्सशी बोलला ना, पुढच्या रविवारी येणार आहे तो.”
“आणि तू तुझे
क्लास्सेस सुरू करणार होतीस त्याचं काय झालं.”
“हो रे दादा, आता
पोस्टर वगैरे तयार करत आहे. प्रिन्स ह्या सर्व कामात दोन वर्षाचा होवून जातो. मग
सुरू करते. जागा पण शोधून झाली आहे. काही क्लाससेस कडून ऑफर आहेत पण रवींद्र
म्हणतोय की मी माझं काहीतरी सुरू करावं.”
“हो बरोबर आहे.
काही लागलं तर सांग.”
“हो रे दादा, पण
राणी वहिनी खूपच हळवी आहे रे, मगाशी ती प्रिन्ससोबत होती तेव्हा कितीतरी वेळा
तिच्या डोळ्यात पाणी बघितलं मी.”
“हुमम, पण चालायच,
आणि आता सानवी दीची न्यूज असल्याने अजूनच तिला कसं तरी होते. पण मी आहे, सांभाळतो
तिला.”
“आई काही बोलते का,
मी बोलू आईशी.”
“नाही, त्याची गरज
नाही, मी बोललो आहे आई आणि बाबांशी, तिला काही बोलायचं नाही असं, आईला बोललो जे
बोलायचं ते मला बोल म्हणून.”
“मग चिडली काय रे
आई.”
“चिडली नाही पण... जावूदे,
बाबा आहेत तिला समजून घ्यायला आणि समजूत काढायला. हल्ली ते दोघे व्यस्त असतात
त्याच्या समाज सेवेत. मीही बाबांना जरा बिझी केलं आणि आईने दोन वर्ष वाढवून घेतली
कामाची म्हणजे मीच केलं ते तीचं मन उगाच घरात राहू नये म्हणून.”
“हे ठीक केलंस.”
दोघं गप्पा करत
होते. राणी चहा घेवून आली आणि मग गप्पा प्रिन्सच्या सुरू झाल्या.
0 Comments