वॉर ऑफ टॅलेंट भाग २
शनायाने मंजिरी बद्दल
बोललेलं अजूनही समृद्धीच्या मनात घोळत होतं. नेमका मंजिरी बद्दल कसा विचार करावा
हे तिला सुचत नव्हतं. त्यात ती लाल साडीवाली सुंदर स्त्री काही केल्या तिच्या
विचारून निघत नव्हती. आता तिला पुसटस आठवत होतं. ती घोसला फार्म हाउसमध्ये शिरत
असताना तिने त्या स्त्रीला तिकडे पहिले होते. तिने खूप जोर दिला पण काही नंतर
आठवलं नाही. मनात सारखं वाटत होतं, ती बाई आणि मोठे सर सोबत असतील म्हणून ती
त्यांच्यासोबत असते सर्वीकडे. पण मग माधव सरांच्या कॅबीनमध्ये त्यांच्या आईचा फोटो
आहे. ती बाई कुठे आहे. मेंदू काही केल्या काम करत नव्हता तिचा. तेवढ्यात तिला ईमेल
नोटीफीकेशन दिसलं. तिच्यासोबत आता कुशल काम करणार नव्हता. तिला नवीन लोकं मिळाली
होती. जरा हायसं झालं होतं पण भीतीही वाटत होती. तरीही आपलं काम भलं ह्या विचारात
तिने त्या इमेलला होकार देत उत्तर दिलं. शेवटी
मला काय करायचं ह्या विचारावर कसं तरी तिने समाधान मानलं आणि कामाला लागली.
कदाचित मंजिरी ओळखून होती
कुशलच्या वागणुकीला. म्हणून काय तर तिने समृद्धीला त्याच्या टीममधून वेगळं केलं
होतं. समृद्धी आता जरा रील्याक्स झाली. उद्या तिचा तीन महिन्याचा प्रोबेशन पिरेड
संपणार होता. आता तिला कसून काम करायचे होते. शनाया मात्र मनात सारखी कुजबुज करत होती. तिचं
कामात लक्ष नव्हतं, तिला कधी एकदा बिपाशाला भेटून सगळं सांगावं असं झालं होतं. ती
दुरून रोहनच्या कॅबीनकडे लक्ष लावून होती. जसा तो तिला मोकळा दिसला तशी ती उठली
आणि त्याच्याकडे गेली.
रोहनने लंच करायला सुरुवात केली होती, शनाया लेगच
म्हणाली, “सॉरी मी नंतर येते.”
रोहन, “नो कम, इट्स ओके. तू
पण चव घे माझ्या बायकोने केलेल्या भाजीची.”
शनाया जरा स्वतःला सावरत
पुढे आली आणि खुर्चीवर बसली, “सर तुम्ही इथे जेवत नाही का?”
“अरे माझी बायको प्रेमाने
डब्बा देते मग नाही कसा म्हणू.... आणि जेवता जेवता काम होतात माझी, उगाच वेळ वाया
घालवत नाही मी लोकांसारखा लंचला बाहेर जाऊन वगैरे...”
शनाया स्मित हसली, रोहनच्या
बोलण्याचा ओघ समजला होता तिला, बसं अजून काय हवं होतं. तिने बाईट घेतला आणि
म्हणाली,
“मस्त झाली आहे भाजी... “
घास गिळत म्हणाली, “सर
तुमची रशिया विजित कशी झाली? छान अनुभव राहिला असेल ना तुमचा... मलाही...”
रोहन लगेच म्हणाला, “तुला
जायचे आहे का, मी बोलू माधवसरांसोबत.”
“अ अ... मी कशी?”
“अरे का नाही, नवीन
लोकांनाच नवीन गोष्टी सुचतात, आता मंजिरी काय जुनी झाली, तिची विचार करण्ण्याची
पद्धत आता जुनी झाली आहे.”
शनाया हसली, तसा तो रोहन
बोलला, “तशी ती नवीन मुलगी समृद्धी हुशार वाटते मला.”
आता मात्र शनाया अवघडली, “सर
कसली हुशार, नुसतं सांगितलेलं काम करते. स्वतःच काही करत नाही ती. काम कसं जीव
ओतून असायला हवं नाहीका. तिला तर नुसती निघायची घाई असते.”
रोहन मिश्कील हसत
म्हणाला, “तू किती वाजता निघतेस मग.”
“मी काय माझं काम
झाल्याशिवाय तर निघत नाही. आपलं कसं आजच काम आजच पूर्ण करायचं म्हणजे कसा पेंडिंग
काही राहत नाही, नवा दिवस नवीन काम सुरु....”
रोहन आणि ती दोघेही हसले.
रोहनने त्याचा डबा बंद करून बाजूला ठेवला आणि म्हणाला, “हे बघ माझं काही काम आहे,
तुझ्याकडे आज काही नसेल तर पूर्ण करून दे.”
शनाया जोशात बोलली, “अरे
का नाही सर, माझं ही योगदान जरा रशिया प्रोजेक्टसाठी.”
“सो नाईस ऑफ यु... मी
इमेल केला आहे. मला आजच हवी ती फाईल.”
शनायाची गोची झाली होती.
काम घेऊन परत आल्यामुळे ती टेबलबर बसून नुसती इमेल बघत होती. काहीच तिला सुचत
नव्हतं.
जवळ बसलेली समृद्धी तिला
मोबाईलवर दिसली, ती लगेच म्हणाली,
“समृद्धी तुला एक्सेल नीट
जमतं ना, माझी एक फाईल नीट करून दे ना. मला जरा अर्जेंट दुसरं काम करायचं आहे.”
समृद्धीला नाही म्हणता
येत नव्हतं, तिने मोबाईल ठेवला आणि होकार देत कामाला लागली. फाईल नीट करून तिने ती
शनायाला इमेल केली. सवयीनुसार पासवर्ड टाकून तिने इमेल मध्ये शनायाला लिहून पाठवला
होता.
सकाळी स्टॅंड-अप कॉल
होता. सगळे मंजिरीची वाट बघत रूममध्ये गप्प होते. तिने येताच प्रत्येकाला आजचा
प्लन मागितला आणि टार्गेट सेट केलं. आज काहीही करून कुणीही काम पूर्ण केल्याशिवाय
जाणार नव्हतं. समृद्धी हे ऐकून अवघडली तिला आज लवकर जायचे होते, सुहासचा वाढदिवस
होता.
तेवढ्यात रोहन खोलीत
शिरला आणि मंजिरीशी बोलू लागला, त्याला मंजिरीला प्रेझेन्टेशन दाखवून तिच्याकडे ते
पास कारवून घ्यायचे होते. म्हणाला, “मंजिरी जरा वेळ, माधव सरपण येत आहे. सगळा
स्टाफ इकडे आहेच. आज प्रेझेंट होणारं प्रेझेन्टेशन आपण सगळे बोलून घेवूया. तू तुझे
मत सांग आणि माधव सर त्याचं काय ते सांगतील. काम माझं काही स्वतःच नाही आपलं ऑफिचं
आहे.”
मंजिरी गोड हसली, “हो
अगदीच, यु आर राईट, काम ऑफिसचं आहे. तुझ माझं खाजगी नाही...”
माधव येताच रोहन सगळं
बोलू लागला, त्याने काय हवं नको ते सगळं मंजिरीच्या मतानुसार माधवच्या समोर करून
घेतलं. शेवटी माधव म्हणाला, “ते डेडा फाईल हवी ह्यात अटेंच.”
रोहन लगेच म्हणाला, “हो
तयार आहे, मी काल शनायाला बोलून करवून घेतली. तिने काल सात पर्यंत थांबून केली
आहे.”
माधव शनाया कडे बघत, “गुड,
उघडा मग, मला जरा बघायची आहे. आपण सगळा डेटा मेच करूया मंजिरी म्हणजे कसं वेळेत
आकडे चुकायला नको.”
रोहनने एक्सेल फाईल क्लिक केली. पण ती तर पासवर्ड
प्रोटेक्ट. त्याला काही उघडणे जमले नाही. त्याने शनायाला बोलावले.
आता शनायाची घाबरगुंडी
उडाली होती. तिला तर माहितच नव्हते की समृद्धीने त्या फाईलला कॉन्फिडेशल असल्याने पासवर्ड प्रोटेक्ट केले
होते ते. तिने सर्वानासमोर काहीतरी पासवर्ड टाकला पण ती काही केल्या उघडे ना...
आता तिचा नायलाज होता. तिने सर्वानासमोर समृद्धीला बोलावले, “समृद्धी तू पासवर्ड
प्रोटेक्ट केली का ही फाईल... माझं काम झाल्यावर तू रीव्हीव करत होतीस ना?”
समृद्धी दचकली, म्हणाली, “काय?
रीव्हीव तर तू करणार होतीस ना, मी तयार करून पाठवली होती तुला इमेलला, पासवर्डपण
पाठवला होता. तू बदलला का?
आता मंजिरी ओरडली, “हे
काय सुरु आहे, समृद्धी फाईल ओपन कर, ही शनाया काही करायची नाही, घे लीड घे, ओपन
फाईल आणि प्रेझेंट डेटा.... “
समृद्धीने फाईल उघडली, एक
एक पेज तिने प्रेझेन्टेशन सोबत जोडले. रोहन आणि माधव तिच्याकडे कौतुकाने बघत होते.
मंजिरी सूचना देत होती.
काही वेळाने सगळी रूम खाली
झाली. सर्व लीडर निघून गेले होते.
दुपारी ऑफिसमध्ये
परतल्यावर मंजिरी शांत बसली होती. तिच्या डोळ्यांत मिश्र भावना होत्या. तिला
अभिमान वाटत होता, पण आतून एक कुरतडणारी भीतीही होती.
समृद्धी उद्या तिची जागा घेईल का? ह्या विचारात ती काचेच्या भिंतीतून तिला बघत
होती. पण लगेच मनात विचार शिरला.
योग्य टॅलेंट निवडून त्याला पुढं
नेणं हेच खरं नेतृत्व असतं. हा वॉर ऑफ टॅलेंट आहे, जिथे आपण लोकांशी लढत
नाही, तर त्यांना पुढं नेऊन आपली टीम जिंकवत असतो. ती हसली, मनात पक्की झाली. तिचं नेतृत्व तिच्यासाठी
महत्वाच होतं. सिगार काढली आणि बाहेर आली, समृद्धीवर एक कटाक्ष तिने टाकला आणि तिच्या नेहमीच्या
जागी गेली... सार काही परत धूसर झालं तिच्यासाठी...
समृद्धी तिच्या टेबलावर
बसून होती. आनंदांत होती, आजच काम झालं होतं. सुहासला कुठे भेटायचं हे ती ठरवत
होती. तिला अजूनही समजत नव्हतं की मंजिरी तिची अडचण आहे की मार्गदर्शक. पण तिला एक
गोष्ट नक्की जाणवली, या जगात टिकायचं असेल तर केवळ मेहनत नाही, तर
प्रत्येक नातं, प्रत्येक क्षण, आणि प्रत्येक संधी हा एक
लढा आहे.
त्या संध्याकाळी
ऑफिसमधल्या मोठ्या काचांच्या भिंतीतून सूर्यास्त दिसत होता. कॉर्पोरेट जगाच्या
युद्धभूमीत आणखी एक दिवस संपत होता. पण “वॉर ऑफ टॅलेंट” कधीच थांबणारा नव्हता. तो
रोज पुन्हा सुरू होणार होता.

0 Comments