डेडलाईन्स
सकाळी कॉलवर समृद्धीच सुहासशी भांडण झालं होतं. समृद्धीचा सारखा लग्नासाठीचा आग्रह त्याला त्याच्या कॅरियरचा अडथडा वाटत होता. आणि ती घरी आता थांबवू शकत नव्हती. उलट घोसला कंपनीचे टेंडर त्याला ह्यावेळी मिळाले नव्हते त्यासाठीही तो समृद्धीला दोषी मनात होता. तिने त्याला ते कळवले नव्हते. त्यात तिची अशी काहीच चूक नव्हती. ती कुठे तिथवर पोहचू शकणार होती एवढ्यात पण सुहासला त्याच्या अपयशात आता समृद्धीचा हात आहे असेच वाटायचे. तोही ह्या स्पर्धेच्या जगात अपयशाचा खापर तिच्यावर फोडून मोकळा होऊ पाहत होता. त्याची तगमग, त्रागा सारं काही समृधीवर निघत होतं हल्ली. त्याच्या विचारात ती ऑफिसला पोहचली.
सकाळी कॉल झाला आणि डेडलाईन्स ठरल्या. नोव्हा टेक ह्या कंपनीचे नवीन प्रोडक्शन पुढ्या आठवड्यात बाजारात येणार होते. त्याची पूर्ण प्लांनिंग घोसला कंपनी करत होती. पहिल्या मीटिंगमध्येच त्यांचा मॅनेजर म्हणाला होता, “टार्गेट्स कठीण आहेत, पण तुमच्यावर विश्वास आहे. डेडलाईन पुढे ढकलता येणार नाही. डेडलाईन म्हणजे डेडलाईन.” आणि मंजिरी त्याला पाळणार म्हणजे पळणार हे सत्य होतं.
मंजिरीने सर्व रिपोर्ट, बारीकसारीक तपशील, कुठलीही चूक न करता तयार ठेवले होते. मार्केटिंग टीम सज्ज होती. मॉडेल्स काम करत होते. तिचा काटेकोरपणा सर्वाना अजूनच सतर्क करत होता. ती मागच्या आठवड्यापासून कामात मग्न होती. ऑफिसमधल्या भिंतींना तिने स्वतःची दुनिया केलं होतं. ती घरी उशिरा पोहोचायची, अनेकदा जेवण चुकायचं, परिवारांपासून दुरावली ती आधीच होती पण आता कामाने तुटलीही होती. तिच्यासाठी डेडलाईन्स म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न होता.
इनोव्हा टेक प्रोजेक्टचा पहिला टप्पा तीन महिन्यांत पूर्ण करायचा होता. सुरुवातीचे दिवस मजेत गेले. टीम मीटिंग्स, आयडिया शेअरिंग, कॅफेटेरियातल्या चर्चा सगळं उत्साहात होतं. पण जसजसा वेळ पुढं सरकू लागला, तसतसं डेडलाईनचं ओझं वाढत गेलं होतं आणि आज चक्क स्टाफ सहा वाजले तरीही जागचा उठला नव्हता. समृद्धीला जायचे होते तिला सुहासशी बोलून त्याचं भांडण मिटवायचं होतं, पण....
मंजिरी तिच्या कॅबीनमधून आली, “हॉलो, मला आज काम पूर्ण हवं आहे. उद्या पेंडिंग नको काहीच, उद्याचा पूर्ण दिवस मी राखीव ठेवला आहे. सो कुणीही मला सांगता घरी जाऊ नका आणि आजच्या कामाचं काय ते सर्व आपण अकाउंटमध्ये बघू. सो चिल... काळजी नकोच...मी सगळं ऐकून घेईल पण आत्ता मला काहीही ऐकायचे नाही...”
बसं!! कुणीच काही बोललं नाही नंतर. समृद्धी तर गप्पच झाली... तिला काही कळत नव्हतं. आज ती सुहासला भेटायला गेली नाही तर त्याचा गैरसमज अजून वाढणार हे तिला नक्की होतं. ती विचारात होतीच तर मंजिरी तिच्याकडे आली.
“समृद्धी, ह्या सगळ्या फाईल्स फोर्मुला लावून बरोबर कर. आकडे जुडत नाही आहेत. मला अर्ध्यातासात हा डेटा टेबलवर हवा आहे. चुका नको. तू करू शकतेस.”
त्यात रोहन चंद्राने काहीतरी नवीन काढलं होतं, त्याचा आणि मंजिरीचा वाद सुरू होता.
“रोहन हे मला आज नको आहे. किती वेळा हा एकच एरर येतो आहे. तुला साध टेक्निकल टीमला हाताळता येत नाहीं का?
“मंजिरी आवाज वाढवू नको. मी इकडे काही महिने नव्हतो. तुला चार्ज देऊन गेलो होतो. तू तुझं काम नीट करत नाहीस आणि मग अश्या डेडलाईन देतेस सर्वांना.”
“ऐ, असले कारण देऊ नको आता. मला काम हवं आहे. नसेल जमत तर बोल.”
“नसेल जमत म्हणजे काय गं... तुझी दादागिरी माझ्यावर चालणार नाही. तुला नसेल कुणी, पण आम्हाला घर आहे, परिवार आहे. तू अशी इथे बांधून ठेवू शकत नाही.”
“मी कशाला बांधू, तुझं काम कर आणि निघ... मला कामाशी मतलब... तू किती वाजता येतो आणि जातो ह्याचा हिशोब ठेवायला एचआर काय उगाच ठेवले नाहीत कंपनीत... "
रोहन चिडला होता. त्याला त्याचा अपमान सहन होत नव्हता. आणि मंजिरीला फक्त काम चोख हवं होतं. तिने आवाज आता मंद केला, “रोहन तुला माझा काय प्रोब्लेम आहे ते तू तुझ्या जवळ ठेव. मला आज काम हवं आहे. नसेल जमत करायला तर सांग मी दुसर्याकडून करवून घेईल... मला वाद नको. बाकी नियमानुसार मी तुझं काय करेन ते मी नंतर बघेन...”
“दुसऱ्याकडून म्हणजे? कोण गं? तो रुद्र....”
“मी नावं घेतलं नाही... मी करेन नाही करशील तर... पण उगाच विषय वाढवू नको. आधीच मी ह्या डेडलाईन ने त्रस्त आहे. लोकांना पगार हवा असतो... काम करण्यासाठी तयार नसतात. मानगुटीवर बसल्यावर ह्यांना काम खूप दिसते. सुरुवातीपासून करा म्हणव तर वेळ आहे असं बोलून वेळेआधी घरी निघतात.”
मंजिरीचा टोला रोहनला लागला होता. तो तसाच निघून गेला. मंजिरीने त्याचं काम रुद्र आणि सावीला दिलं. आणि त्याला सरळ ह्या प्रोजेक्टमधून बाहेर केलं.
आधीच तापलेल्या मंजिरीसमोर लवकर निघून जाण्याचा विषय काढणे आता अवघड आहे हे समृद्धीला समजले होते. ती सार विसरून कामाला लागली. वेळ सरकत होता. शेजारी रुद्र आणि कुशल त्याचं काम करण्यात गुंतले होते. गणपत तेवढा सर्वाना पाणी आणि कॉफी देत इकडे तिकडे फिरत होता. तेवढ्यात सर्वांसाठी खायला टेबलवर आले. मंजिरीने सर्वांसाठी स्नेक्स मागवला होता. आठ वाजले होते. मंजिरीने सावीला निघायला सांगितलं होतं. समृद्धी आज चुका करत होती म्हणून अजूनही ती ऑफिसमध्ये होती. शेवटी सगळ्या मुली आणि बायकांना मंजिरीने जायला सांगितलं. ती समृद्धीला बोलली,
“जर बायफ्रेंडचा त्रास होत असेल तर अश्याना सोडून देऊन पुढे गेलेलं कधीही चांगलं... तू कामात चुका करत नाहीस पण आज तुझ्या चुका होत्या... काय ते सोर्ट आऊट कर... उद्या मला हा डेंटा हवा आहे.”
समृद्धी अगदी लाजलीचं, तिला समजत नव्हतं मंजिरीने कसं काय हे ओळखलं होतं. ती काहीच बोलली नाही. तिचा भाऊ घ्यायला आल्यामुळे मंजिरीने तिला ताकीद देऊन सोडले होते.
मंजिरी एकटी काम करत होती. गणपत तेवढा तिच्या सोबतीला तिकडे होता. हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि कंपनीसाठी खूप महत्वाचा होता. मार्केटमध्ये घोसला कंपनी नवीन वारं घेऊन शिरणार होती ह्या प्रॉडक्टच्या माध्यमातून. आज रात्री अकरा वाजेपर्यंत लाईट्स चालू होते, मंजिरीच्या चेहऱ्यांवर थकवा दिसत होता. तेवढ्या वाजता माधव तिला घायला आला होता, आणि मंजिरीला तेवढच पुरेसं होतं आजचा थकवा घालवण्यासाठी. त्याने उद्याचे अपडेट घेतले आणि मग गणपत आणि मंजिरी दोघांनाही घरी सोडलं.
#दकॉर्पोरेट लॅडर चे आधीचे भाग पेजवर आणि साईटवर आहेत!!
to be continued...
----पुढील भाग लवकरच....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.
@followers@topfans #उर्मिलादेवेन
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AI
0 Comments