गुण्या भाई रागाने लाल झाला, “कोण हाय बे हा साला... माझी सोना ...”
म्हणत आता तो रडायला आला पण लगेच सावरत म्हणाला,
“अबे बटाटा व्हिडीओ अजून लाव.”
नंतर त्याने मोठ्या हिमतीने अजून व्हिडीओ बघितला आणि ओरडला,
“अबे हा भारत हाय, नेपाळ नाय ...अबे आपुन तिकडे शोधत अहो पण पोरगी इथं हाय साल्या. अन तिथं कोणतरी भिंगरी फिरवत होतं. दूर कुठतरी बसून, म्हणजे जो बोलत हाय तो तो नाय रे...कोणीतरी दुसरा हाय. साला आता इलेक्शनच्या वेळेवर कोण नवीन जन्माले आला तोबी येवढ्या लवकर मराले. साला अख्खा एरिया फुक रे, पोरं इथचं हाय माही.”
गुण्या भाईने सर्वीकडे स्वतःचे माणसं पसरवले होते. दोन दिवस तसेच निघून गेले पण काही हाती लागलं नाही. गुण्या उर्फ गुणवंत रावांना तर मुलीच्या किडन्याप झाल्याने सहानुभूतीही मिळायला लागली होती, कुणी हसत होतं तर कुणी बरी जिरली म्हणून चिडवत होतं. तर कुणी नुसतं फोन करून काळजी घ्यायला बोलत होतं. मिडियाला नवीन अन्न मिळालं होतं आणि ते तुटून पडले होते, आता गुणवंत रावं काय करेल ह्यावर सर्वांच लक्ष होतं. भला मोठा डोंगर चढून धाडकन खाली पडला अशी त्याची परिस्थिती झाली होती.
सर्व पोलीस डिपार्टमेन्ट आणि गुण्या भाईची सर्व फौज कामाला लागली होती. अचानक पोलिसांची गाडी बंगल्या समोर थांबली, आणि गुणवंत रावांना इन्स्पेकटर म्हणाला,
“साहेब हा आपल्या मुलीचा पासपोर्ट आहे ना? आपणास आमच्या सोबत पोलीस ठाण्यात यावं लागेल.“
गुणवंत रावांना घाम फुटला, गुणवंत रावं आणि बबनराव एकमेकांकडे बघत ताबडतोब गाडी काढली, पोलीस स्टेशन गाठलं, समोर बॉडी ठेवली होती गुण्या भाईने भीत भीत ती बघतली, आणि म्हणाला,
” नाही... ही सोना नाही!”
‘मग हा पासपोर्ट...?”
“ते माहित नाही...कसा आला हे तुम्ही माहित करा, करता काय? पण ही सोना नाही. तुम्हाला चौकशी करता येत नसेल तर द्या ना सोडून हे असलं दाखवून काय सांगता की तुम्ही मोठं काम करता म्हणून. उगाच भाव घेताय मिडिया कडून आणि भलतं सलतं दाखवायला लावता त्यांना.” आणि तो बंगल्याकडे मिडीला टाळत निघाला.
घरी पोहचताच, त्याने तोडफोड सुरु केली, तर परत बटाटा भाई पेनड्राइव्ह घेऊन आला, नजरेने इशारे करत गुण्या भाईने टीव्ही लावली, समोरन आवाज आला, “काय गुण्या घाबरलास का...? जावून आला पोलीस ठाण्यात. ही बातमी आता खरी होणार आहे. तू येतोस माझ्या कडे की तुझ्या पोरीला पाठवू पांढऱ्या कपड्यात बांधून...” आणि आवाज बंद झाला.
गुण्या भाई अजूनच भडकला, “कोण आहे बे हा साला, लाव ना बे पत्ता.... साला भेजा फाटल आता माझा. तो कोण रे नवीन छोकरा आला नाही अजून.”
तोच समोरून अँकीने एंट्री केली, सिगारच्या धुळात गुण्याभाईला त्याचा चेहरा दिसला नाही. जुत्याच्या टापांचा आवाज करत तो आतमध्ये शिरला, त्याचा तो विदेशी रुबाब, हातात डीजीटल घडी आणि चकाचक कपडे, बघून गुण्या भाई हसायला लागला,
“हा हा ...साला फांटर. अबे हा, कोण रे... विदेशी पाहुणा?”
बटाटा भाई समोर आला, “भाई हाच तो... अँकी, नवीन छोकरा भाई.. भाई दिखावे पर मत जावो, छोकरा लय हुशार हाय...आणि आपलं काही दिमाक चालून राहिलं नाय, तवा .. सुनो ना..मैइ क्या बोलता.”
“अबे बोल मत.” म्हणत त्याने एक जोरात हात अँकीवर उचलला, तोच अँकीने तोंडातली सिगार हवेत फेकली आणि त्याच्या वर परत मारा करत गुण्या भाईला खाली पाडलं. हवेतली सिगार परत तोंडात घेतली आणि पलटला,
अँकी निघाला होता, त्याच्या गुर्मीत, बेधुंत सिगारेट ओढत.
तोच गुण्या भाई स्वतःला सावरत म्हणाला, “अबे रुक, कितना खोका लेंगा? ओ तो बता दे. पावर आहे साल्या तुझ्यात.”
अँकीने जोरात सिगारेट ओढली आणि धुवा कानातून बाहेर टाकला, नाकात बोट टाकलं आणि म्हणाला, “आता आला ना सिधा तू बे, पहिले काम फिर दाम... नही दिये दाम तो काम तमाम. काय गेलं का खोक्यात? हाय की नाही? अंघोळ केली होती का आज, पाहून ये काढून ठेवलं आंघोळ करतानी की काय ते, का सरकलं घुटण्यात वय वाढल्यान.”
अँकी निघाला होता तर बटाटा भाईने त्याच्या हातात सोनाचा फोटो दिला आणि तो झटक्यात ओढून अँकी निघून गेला.
दोन दिवसात गुण्या भाईचा व्यापार ठप्प झाला होता. अंडरवर्ड मध्ये सगळे त्याला हसत होते. स्वतःला डॉन म्हणवून घेणारा आज कुण्या दुसऱ्याच्या धक्याने खाली कोसळला होता. गुंडगिरी जगतात सर्वांना उत्सुकता होती की कोण आहे ज्याने गुण्या भाईच्या पोरीला किडन्याप केलंय.
सर्वांना त्या व्यक्तीला भेटायचं होतं. त्याच्याकडून गुन्याचा काटा काढायचा होता. अंडरवर्ड आणि राजकीय नेते सर्वांना नवीन व्यक्तीमत्व लाभणार होतं. गुण्या भाई उर्फ गुणवंत रावाला कुणीही मदत करायला तयार नव्हतं. उलट सर्वांना वाट होती ती सोनाच्या बातमीची. ज्याने गुण्या भाई तुटणार होता आणि त्याचं पसरलेलं जाळंही.
दुबईच्या डॉनने त्याचा ड्रग्स आता मछली भाईला दिला होता आणि मछली भाई वाट बघत होता तो त्या अनोळखी इसमाची जो अजून समोर नसून सर्वांपर्यंत पोहचला होता.
अँकी तर डबल गेम खेळत होता, त्याला नवीन डॉनला शोधायचं होतं आणि सोनालाही.
गुणवंत रावांनी परत सभा बोलावली पण कुणीच आलं नाही, अवघ्या काही काळात गण्याच्या भीतीची भिंत कोसळली होती. अंडरवर्ड आणि नेते नवीन डॉनला सलाम करत होते. जो अजूनही समोर आला नव्हता पण त्याने गुण्या भाईला रस्त्यावर आणलं होतं.
निवडणुकीचा प्रसार जोरात सुरु झाला कुणीही आवेदन पत्र मागे घेत नव्हतं. गुण्या भाईचे मोठं मोठाले पोस्टर काढले जात होते. गुणवंतरावांची दहशत पार निस्तानाभूत झाली होती. सर्वाना त्या किडन्यापरचीवाट होती. आणि ...खुद गुण्या भाईलाही...
सात दिवस झाले होते, अजून अँकीचा पत्ता नव्हता आणि सोनाचाही, शेवटी गुण्या ओरडला, “लय झालं आता, आता माझी जुनी इमेज उभी करण्याची वेळ आली आहे.” त्याने त्याचा तोच वेष घातला आणि बंगल्यातून निघणार होता तोच बटाटा भाईने त्याला रोकलं, “भाई तू अंडर हो आता, पोलीस आपके नाम का वॉरंट लेके येत आहेत.”
“अबे, पोलीस न टोलिस, घाल त्यायले चुलीत ..मी चाललो.”
“भाई आपल्या बार आणि हॉटेलवर छापे पडले आहेत आणि सर्व माल जप्त झाला आहे. आपका आवेदन रिजेक्ट हो गया है.”
गुण्या परत मान मोडत ओरडला, “कोण हाय बे साला हा, माझ्या भेजात गेलाय आता,,,, असलं दम तर ये म्हणावं समोर...साला पोरीला किडन्याप करून लपून बसला साला, हिंमत नाही साल्यात अन लोकायची उगाच हिंमत वाढवून रायला.”
तोच दुबई वाल्या डॉन साहेबजीच्या सेक्रेटरीचा फोन आला, गुण्याने तो हळबळीत उचलला,
“हॅलो मॅडम जी...”
“हॅलो, काय गुण्या भाई... माल आला नाय... काय नाणं वाजत नाय काय तुझं आता...गुंडला का रे तू पोरीत.”
“मॅडमजी, कोण मागे लागलं, माहित झालं त .. त्याची त...”अशी फाडतो ना!”
“मग करा ना माहित .... साहेबजी विचारात आहेत पैसा कधी पोहचेल म्हणून. नाय तर सौदा संपला समजा.”
“मॅडमजी वेळ वाईट आहे... समजून घ्या, माझी एकुलती एक पोरं, किडन्याप झालेली हाय.”
“अन, तू आजवर करत होतास तर रे ....” मॅडमजी हळूच बोलल्या
“मॅडमजी, काही बोलल्या का तुम्ही, साहेबजीला सांगा ना जरा...”
“काय सांगू तू आता भाई राहिला नाही म्हणून, बऱ्या बोलणे सांगते, आम्ही त्यापेक्षा वाईट आहोत... पैसे पाठवा ...लवकर, वेळेवर, वेळ जाईल तुमची आणि दुसरा वेळ मारून घेवून जाईल आणि तू सर्व वेळ तोंडावर हात ठेवून ओरडत राहशील. मदत पाहिजे!”
आणि तोच समोरून कर्कश भिंगरी फिरवण्याचा आवाज आला, तसा कॉल कट झाला. जणू काही समोरचा त्याला संकेत देत होता.
गुण्या भाई परत ओरडला, “अबे बटाट्या ह्या दुबईवाल्या डॉन साहेबाने केलंय सोनाला किडन्याप. साला हा बिन बाई च्या आळमदी काम करतो. अबे गेली का गोष्ट भेज्यात. मागच्या वीडीओत पण भिंगरीचा आवाज होता... आणि ह्या फोनमधूनही तोच आला, शायद हा एकच माणूस आहे...”
इकडे अँकीचा शोध सुरु होता, तो शोधात मुंबईपासून दूर एका लहान खेड्यात पोहचला, आणि तो एका मोडक्या घरा समोर थांबला, गाडी घराच्या बाजूला उभी करून त्याने त्याची पिस्तूल हाताशी ठेवली आणि फाटक उघडलं, दबक्या पायाने तो वसरीत आला आणि हळूच दार लोटून आत मध्ये शिरला तोच त्याची हातापायी एका इसमाशी झाली, ज्याचा चेहरा झाकला होता. त्यातून दिसणारे ते डोळे त्याला राहून राहून त्रास देत होते.
तो त्या इसमाच्या हातून मात खात होता. शेवटी चलाखीने त्याने त्या इसमाच्या तोंडावरचा नकाब काढला तोच तिचे काळे भोर केस मोकळे झाले, पण बंदुकीच्या नोकावर तिने अँकीला समोर खुर्चीवर बांधलं.
पण तुम्ही थांबू नका, असेच सोबत राहा ...पुढचा भाग लवकरच...
पुढल्या भागाचे अपडेट साठी तुम्ही माझ्या पेजलाही लाईक करू शकता
https://www.facebook.com/manatlyatalyat
0 Comments