द गेम ऑफ अफेअर – राज्यस्तरीय पुरस्कार विजेती कादंबरी

 


कादंबरी- द गेम ऑफ अफेअर

लेखक- उर्मिला देवेन

पाठराखण- जेष्ठ कवी आणि समीक्षक, प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त', नागपूर

प्रस्तावना- सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक कुबडे ('गोंडर'कार), नांदेड

पुस्तक इथे उपलब्द आहे amazon

online कॉपी Kindle Edition

---

ती वासना की प्रेम

सहवास की मोह,

ओढ की असते नुसती हौस...

कुठली बाधा असते की बधिरपण

कि वारं असतं ते जे वाहून नेतं.

अधीर झालेलो असतो आणि मग सारं काही बधिर होतं 

नेमकं काय ते मनाला झिंगाट करून सोडतं.

का पडावी गरज त्या नात्याची ज्याच्या अस्तित्वाने भेगा पडतात नात्यांवर... 

मन गुंतली जातात, ओढली जातात, ताणल्या जातात हृदयाच्या गाठी.... 

आणि मग, अचानक आपण, आपण राहत नाही

आणि सारं काही सुटत जातं... 

मन स्वैर सुटतं, आणि सुटका नसते...

आपण प्रेम म्हणतो पण ते असते अफेअर...

आणि दोन्ही मन पात्र असतात त्या खेळाची...

मग कुणीच नसतं कुणाशी फेअर

बाजी मांडल्या जाते समोरच्याला संपण्याची

आयुष्य होतं मगद गेम ऑफ अफेअर...

आयुष्य खूप सुंदर आहे, आणि त्यात जोडीदाराची साथ लाभली की मग सुखदुखांना सोबत समोर जाण्याच धाडस मिळत असतं.

त्यातूनच परिवार ही संकल्पना उदयाला आली, प्रेम, लग्न, संसार, मुलं ह्या साऱ्या श्रृंखला निर्माण झाल्या. 

पण ह्या पलीकडे ही एक अशी गोष्ट समाजात आहे. 

तो, ती ह्यात तिसरा शिरला की मग सारंच विसरा असचं नाही का?

समाजाने बांधून दिलेल्या चौकटीत लग्न झालं असलं आणि जोडीदाराशी आपलं नातं उभं असलं तरीही मात्र काही परिवारांमध्ये हे एवढ्यावरच थांबत नाही. 

मागील काही वर्षांमध्ये विवाह बाह्य संबंधही वाढत होत आहे असे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

विवाहबाह्य संबंधातून जे घडत जातं  त्यात अनेक नाती होरपळून जातात. 

कुठे स्त्री बधिर होते, तर कुठे पुरुष हतबल...

पण अजूनही ते समाजात आहेच....  

प्रस्तुत कथा बेधुंद मनाची, मनाला असणाऱ्या मनाच्या शोधाची, एका अनोख्या नात्याची, ज्याला शब्दात रेखाटलं जातं... "अफेअर" ते प्रेम नसतं तर मग काय असतं...?

प्रेमाच्या सुंदर प्रतिमेला बदनाम करणारा शब्द म्हणजे "अफेअर" पण ते प्रेम नसतं का?

काय असतं अफेअर म्हणजे नेमकं?

त्यात काय नुसती वासना असते, अजून काही नाही... नेमकं नातं काय असतं ते?

का भासावी ह्या अश्या प्रेमाची गरज ज्याला अफेअरच नावं दिल्या जातं... कोण जबाबदार असतो अश्या संबंधासाठी? तो, ती की तिसरा... की गरज, वासना, पैसा... की यापलीकडेही जाऊन काही असतं जे पती पत्नीच्या नात्यात मिळत नाही... की नवरा बायकोच्या नात्यात बोलल्या जात नाही, काय असतं नेमकं ते?

लग्न बाह्य संबंध पुरातन काळापासून चालत आले आहे. राजे महाराजे, भले भले रंगले ह्या रंगात... माना नाही तर नका मानू आपल्या समजाचा भाग होता, आहे, असेलही... 

बस प्रेमाची चर्चा होते आदराने आणि ह्याला मिळतो फुसफुसण्याचा आवाज....

बरबाद तर प्रेमातही होतो माणूस पण अफेअर नावाचा किडा आयुष्य कुठे नेऊन ठेवतो, परतीची वाट नसते... सुरवातीलाच माहित असते अंत कदाचित भयंकर असेल पण पावलं पुढे जातात, मागे नाही... भीती राहत नाही आणि मग ते जगासाठी अफेअर होतं.... कदाचित ते त्यांच्यासाठी फेअर असतं... 

चला तर मग माझ्या लेखणी सोबत अश्याच एका कथेच्या प्रवासाला...

पुस्तक इथे उपलब्द आहे amazon

online कॉपी Kindle Edition


Post a Comment

0 Comments