आई वडिलांचा डिव्हर्स होत नसतो...
आई वडिलांचा डिव्हर्स होत नसतो....पैरेंटल एलीगेशन सिंड्रोम (पीएएस)

आई वडिलांचा डिव्हर्स होत नसतोच, कारण आई वडील हे मुलांमुळे असतात... डिव्हर्स तर स्त्री पुरुषांचा होत असतो.

सात दिवसांनी कुणाल आणि कीर्तीची केस कोर्टात मुलीच्या कस्टडी साठी लागणार होती. सहा वर्षाची चुरुचुरु हमट्टी डमट्टी गाणं सुरेख म्हणारी सानिका कटघरात उभी राहून स्वतःच मत देणार होती, कि, तिला कुणासोबत राहायचं आहे. तिला तिचा बाबा हवा होता पण त्या इवल्याश्या जीवाला तसं आईसोमोर बोलताही येत नव्हतं. मागच्या एक महिन्यापासून काही ना काही कारणाने ती तिच्या बाबांना भेटलीच नव्हती. आणि घरातले सर्वच आजी आजोबा आणि आई सतत सांगत होती कि तुझ्या बाबाला तुझी काळजी नाही, ते तुझ्यावर प्रेम करतच नाही... त्या तेवढयाश्या जीवाला ते पटतच नव्हतं कारण तिच्यासाठी तिचा बाबा तसा नव्हताच....

अचानक पाच वर्षाच्या सुखी संसारात एका विषकन्येने शिरकाव केला आणि कुणाल कीर्तीच्या संबंधांना विषबाधा झाली. गैर समाजाचे धुके एवढे वाढले कि दोघेही एकमेकांना बघूच शकत नव्हते. स्वाभिमान दावावर लागला होता. दोघेही स्वतःला सिद्ध करण्यामागे एकमेकांना खाली पाडत होते. सानिका मागच्या एक वर्षांपासून सगळं घरात बघत होती. आईला रडताना बघायची. आई तिलाच कुशीत घेवून बाबांनबद्दल नको नको ते सांगत तिचे असंख्य चुंबन घेत, माझं पिलू माझं पिल्लू म्हणत टाहो फोडायची. इवल्याश्या सानिकाला आपला बाबा असा का करतो आपल्या आईसोबत हा प्रश्न भांभावून टाकत होता.. पण बाबा घरात आला कि ती त्याच्यासोबत खेळत सर्वच विसरत होती. आज बाबा कुठलं चॉकलेट आणणार हाच विचार तिचा बाबा परतीच्या वेळेवर सुरु असायचा. आई तिला जीवभरून प्रेम करत होती आणि बाबांच्या लाडात ती आनंदात होती मग ती दोघानपैकी एकाला कशी निवडणार होती?

कोर्टाच्या बाहेर ती बाबाला बघताच, जावून गच्च बिलगली, बाबाची आई म्हणजे सानिकाची आजी तिला कानात म्हणाली, "बाबा हवाय ना तुला, तुझी आई दुष्टच आहे. तुला बाबांना भेटू देत नाही. आपण राहू ना सोबत. बाबा, तू, मी, मस्त मज्जा करू आपण. आई सोबत जावू नको हा..." 

सानिका ने मान हलवली आणि ती परत बाबांचा हात पकडून आईकडे बघत कोर्टाच्या पायऱ्या चढत होती. मनात खुप सारे विचार घेवून. पाच वर्षाच्या वर होती मग तीच मत विचारात घेतलं जाणारं होतच आणि नवीन कायद्याने कॅस्टडी हि दोघानाही मिळणारच होती पण तिला फिजिकली कठे राहायचं आहे हे ठरणार होत. अर्थात तिला आज आई बाबांचा डिव्हर्स करायचा होता. खरं तर सेपरेशन हे स्त्री पुरुषांचं होत असतं ना?

आई बाबा तर मुलांना सारखेच हवे असतात... कुणाला जवळ करणार आणि कुणाला दुरावणार... सानिकाच्या मनातली धुकधुक वाढली, फॅमिली कोर्टात तिला खूप गोड भाषेतच सर्व विचारायला सुरुवात झाली. काहीशी आपल्याच मस्तीत हमट्टी डामट्टी सारखी डोलत उंच भिंतीवर बसून तिला न्याय करायचा होता.. आणि ती विचाराने धाडकन खाली कोसळली... कथेतल्या सारखे सर्व तिच्याकडे तिला सावरायला धावले, आई ने जवळ घेतलं,

वडिलाने पापा घेतला...पण ती हमट्टी डमट्टी सारखी तुटली होती... तीच मन जुळूच शकत नव्हतं एका विचारावर. भानावर आली तेंव्हा तिच्या प्रिय बाबाला हातही लावू देत नव्हती आणि ती आता पूर्णपणे पैरेंटल एलीगेशन सिंड्रोम (पीएएस) च्या अधीन होती.

पैरेंटल एलीगेशन सिंड्रोम (पीएएस) एक वास्तविक आजार पालकांनीच मुलांना दिलेला ह्या आधुनिक युगातला, ज्यात एक पालक दुसऱ्या पालकाविरुद्ध पाल्याला सांगून त्याच्या मनावर हे बिंबवण्याचा प्रयत्न करतो कि तो कसा चान्गला आहे आणि दुसरा पालक कसा चांगला नाही. ह्या अश्या ९५ % परिथितीत आई जवाबदार असते. जी स्वतःच अस्तिव कायम ठेवण्याच्या भीतीने मुलांचा सहारा घेत वडिलांना डावलून लावते. बऱ्याचश्या डिव्हर्स केस मध्ये किंवा घरगुती भांडणात मुलं मुख्य भूमिका निभावतात. मग त्यातच मुलांना आपल्या बाजू कडे करण्याच्या ओढाओढीत हा सगळा प्रकार घडतो. ३% बाबतीत पुरुष मंडळीही आहेत जे आपल्या बायकोबद्दल मुलाला नकोस सांगून तोडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि काही २ % मध्ये हे घरच्या मंडळींकडूनही घडत असत. मग तुम्ही म्हणाला कि हे तर साहजिकच आहे. ह्यांनी काही होत नाही... आधीच्या काळापासून असच होत आहे.

संदीप, पाच वर्षासून आईला मारण्याच्या तयारीला लागला होता कारणही तसंच घडलं होत, त्याच्या आईने त्याला पाच वर्षाचा असताना वडिलांकडे सोडून माहेरी निघून आली होती, संदीपच्या वडिलांनी आईच्या पोटात असणार बाळ त्याचं नाही हा आरोप केला होता आणि त्याच्या आईला सहन झाला नव्हता. तिने रागात घर सोडलं होत पण ते कायमच ठरलं. नंतर संदीपच्या बाबांनी त्याची काळजी घेतली पण आईबद्दल अपशब्द बोलणं कधीच टाळलं नाही. इवल्याशा जीवावर काय परिणाम झाला ह्याची कुणालाच कल्पना नव्हती. बाबाने नंतर रीतसर त्याच्या आईला सोडचिठी दिलं आणि संदीप आता बाबांकडे राहत होता. 

वडिलांसोबत प्रेमाने राहून सुद्धा त्याच्या आतल्या मानाने आईला कधीच सोडलं नव्हतं. सोडलं तर त्या पालकांनी एकमेकांना होत. संदीपला तर दोघेही हवे होते. बारा वर्षाच्या संदीप मध्ये आई का सोडून गेली म्हणून राग होता आणि त्याला वडिलांनी खतपाणी दिलं होत. आता त्याला बसने प्रवास कळत होता. तो त्याच्या आईकडे निघाला, आजीच्या घरी पोहचला तेंव्हा त्याची आई त्याच्या लहान बहिणीला भरवत होती. आईला असं दुसऱ्या मुलीचा लाड करतांना बघून तो आधीकच उद्विग्न झाला आणि त्याने सोबत आणलेला चाकू बहिणीला धावत येवून भोसकला.

आईला क्षणात काय घडलं कळलंच नाही आणि ती आता कुणासाठी रडणार होती मरून पडलेल्या मुलींसाठी कि सॊमर उभ्या असलेल्या खुनी मुलासाठी. संदीप ज्या परिस्थितीत होता ते पैरेंटल एलीगेशन सिंड्रोम होत. संदीप ने जे केलं तो परिणाम पैरेंटल एलीगेशन सिंड्रोमचा होता. बालवयात पॅरेंटल अलिगशन सिंड्रोमला आहारी जावून घेतलेला निर्णय .. तेवढंच कळलं ना त्याला!

२५ वर्षाची वसुधा लग्नाला नाकारत होती, तिचे आई आणि बाबा सतत तिच्या मागे लग्नासाठी मागे लागत राहायचे पण सोबत राहत नव्हते. तिला जे हवं होत ते त्यानीं कधीच दिल नव्हतं. स्वतःच्या स्वाभिमान जपताना मुलीच्या आंतरिक मनाला ठेचत होते....प्रॅक्टिकल राहावं ह्या मुद्यांमध्ये. वावगं नव्हतंच त्यात. पण साहजिकच सेपरेशन मुळे ते दोघेही कधीच सोबत वेळ घालवू शकले नाही. कहीदा मुलींसाठी एकत्र भेटत पण वागणूक नेहमी एकमेकांच्या विरुद्धच असायची. जगासाठी दोघेही मुलीची काळजी घेत होते पण नकळत एकमेकांबद्दल विषारी बोलायला चुकत नव्हते. वसुधेने कधीच आई वडिलाना डिव्हर्स दिला नव्हता. 

त्याचं सेपरेशन ती करूच शकली नव्हती पण हळू हळू सावरली होती. आणि आज वसुधेने कायम लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय दिला त्याना. सोबत मुलंही जन्माला घालणार नाही असंही बोलून मोकळी झाली. आणि हा होता विचार करून घेतलेला निर्णय. जो पॅरेंटल अलिगशन सिंड्रोमला झुगारून पुढे गेलेला....

सानिका, संदीप आणि वसुधा आजच्या युगाचंच प्रतिनिधित्व करत आहेत... त्याचं अस्तिव नाकारू शकतच नाही आपण. काळानुसार मुलं नॉर्मल होतात पण कधी कधी त्याचा दृष्टीकोन बदलून जातो. का च उत्तर शोधताना मुलं वाईट संगतीला लागतात, ड्रग्सच्या आहारी जातात, बलात्कारी होतात, समलिंगी भावना जपतात. अपमानजनक शब्द बोलतात, वयात येताच आई वडिलांवर हात उगारतात, स्वतःच शिक्षण, लग्न झालं कि मग आई वडिलांना विचारातही नाही. स्वार्थी होतात....

मग आपण कुठे नक्की चुकतो हे बघू शकतोच ना. आयुष्य जगतांना जरा आत्मसन्माची ओघ कमी करून समजदारी स्वीकारली कि सगळे प्रश्न सुटतात. हे हि नक्की कि एखाया प्रश्नाचं उत्तर खुप मोठं असत... मग वेळ लागणारच ना. पण तरीही प्रश्न सुटला नाही आणि नात्यात सेपरेशन झालंच तर ते फक्त तुमचं होवू द्या. आई वडिलांचं नाही, कारण डिव्हर्स हा स्त्री पुरुषांचा होत असतो. मुलांना स्वतःकडून काही एकमेकांबद्दल चुकीचं बोलण्यापेक्षा चांगलंच बोला. 

अगदीच सोडचिठ्ठ झाली तरीही कारण मुलांसाठी आई बाबांचा डिव्हर्स कधीच होत नसतो. समोरचा पालक तुमच्यासाठी वाईट ठरला म्हणूं मुलांसाठी पण वाईटच असणार असं नाही ना. मुलांना मुलांचा निर्णय घेवू द्या कारण डिव्हर्स हा आई वडिलांचा होतच नसतो... आणि व्ह्ययलाही नको.. जो आदर आई आणि वडील म्हणूंन एका पालकाला असतो तो दुसऱ्या पालकाला हिरावून घेण्याचा काहीही अधिकार नाही..

आणि हा आजच्या ऍडव्हान्स आणि सेल्फ ओरिएन्टटेड जगातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि वास्तविकताही. आपण विचार करायला हवा असं माझं मत आहे. कथा माझ्या सामाजिक कामात काही प्रश्न हाताळतांना आणि चर्चासत्रात बोलतांना हातात लागलेल्या मुद्यांमुळे रेखाटल्या गेली आहे. 

तुम्ही जागरूक पालक आहातच पण ह्या उद्देशानेही जागरूकता असावी कारण चूक नकळतही घडू शकते.. आणि अशी भयंकर होवून समोर आली कि आपलीच दात आणि आपलीच ओठ असं व्ह्ययला वेळ लागणार नाही.


-उर्मिला देवेन

जोडीदार तू माझा कथेचा पुढचा भाग इथे प्रकशित झाला आहे. नक्की बघा!

Post a Comment

0 Comments