भाग २
फर्स्ट डे ऑफ वर्क! #“कॉर्पोरेट लॅडर….”
पहिला भाग इथे वाचा - फर्स्ट डे ऑफ वर्क! #“कॉर्पोरेट लॅडर….” भाग १
समृद्धी जरा घाबरली होती, भीतभीत
उठली आणि मंजिरीच्या समोर जाऊन उभी राहिली. तोच ऑफिसच्या टीव्हीवर अचानक ब्रेकिंग
न्यूज सुरू झाली.
घोसला मल्टिनॅशनल इंडस्ट्रीज ऑफ
इंडियाचे मालक रघुवीर घोसला यांनी मानवता पार्टी जॉईन केली अशी बातमी होती.
टीव्हीवर सतत रघुवीर घोसल्यांचेच दृश्य झळकत होते. मंजिरी हसत म्हणाली,
“ह्याला खरं तर काम काय आहे? बसतो नुसत्या गोष्टी करत...बिजनेस करून सोडला आहे साऱ्या गोष्टींचा.”
मग स्वर कमी करत ती जवळच्यांना
म्हणाली, “आणि ह्याचा तो मुलगा माधव घोसला? तो पडला असेल कुठल्यातरी हॉटेलमध्ये, कुणाच्या तरी मांड्यांवर डोकं ठेवून... आताही. सारे मणी एकाच माळेत
लोळत आहेत... आणि आम्ही ह्यांच्यासाठी काम करतो.”
तेवढ्यात रुद्र आला आणि शांत स्वरात
म्हणाला, “मंजिरी, नको गं असं बोलू. तुझ्या भावना
सगळ्यांना कळतात इथे. पण कुणी ऐकलं तर उगाच तुला परत त्रास होईल. कशाला बोलतेस.
जस्ट काम डाउन.”
मंजिरीने त्याच्याकडे सरळ पाहिलं, “रुद्र, तू मध्ये
येऊ नकोस. हा माझा आणि माधवचा प्रश्न आहे.”
रुद्रने हात वर करत सांगितलं, “मी
मध्ये येत नाही, पण मला तुझी काळजी वाटते.”
“माझी काळजी करू नकोस. मी माझी काळजी
करायला समर्थ आहे.”
“ठीक आहे. पण काम करायचं ना मग? की चर्चा सत्र सुरु करूया आपण इकडे?”
मंजिरीने थोडं हसत म्हटलं, “ काय
रे...जाऊ दे, तू पडू नकोस, जसा आहेस तसाच रहा. छान स्वभावाचा आहे तुझा. बरं, ऐक
हिला काम समजावून
सांग. बघ, घाबरली आहे मला.”
रुद्रने गणपतरावला सांगितलं, “गणपतराव,
थंड पाणी आणा मॅडमसाठी. बिचारीचा आज पहिला दिवस
आहे.”
मंजिरी पुन्हा समृद्धीकडे वळली, “ऐ सलवार, अजिबात
घाबरायचं नाही. मी आहे इकडे. आणि इथे परत दुसरी मंजिरी नको मला, हे लक्षात ठेव.”
इतक्यात तिने पर्समधून सिगारेट
काढली. लायटर लावून ती बाहेर आली. धूर हवेत सोडत ती जणू आतल्या आत पेटत होती. समोर
टीव्हीवर चाललेलं न्यूज टेलिकास्ट तिला तिच्या मनातल्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं
वाटत होतं.
मंजिरी मध्यमवर्गात लहानाची मोठी
झालेली. पैसा कमवणं हेच तिचं ध्येय झालं होतं. घरात मोठी असल्यामुळे वडील लवकर
गेल्यानंतर जबाबदारी तिच्या खांद्यावर आलेली. हाताला लागेल ते काम करत तिने कॉलेज
पूर्ण केलं आणि नोकरी मिळवली. पण ते दोन हजार रुपये घर चालवायला पुरेसे नव्हते. मग
लहान सहान कोर्स केले, पार्टटाईम जॉब केले. हळूहळू पगार दोन
हजारांवरून वीस हजारांवर गेला आणि आज चक्क दोन लाख महिन्याला कमवायला लागली. तरीही
का कुणास ठाऊक, तिच्या मनातल्या जखमा नेहमीच कुरवाळत
राहिल्या. पैसा मिळवूनही आतून कुठेतरी ती सतत जळत राहिली.
तेवढ्यात मार्केटिंग डिरेक्टर बिपाशा
तिकडे आली. तिला मंजिरी तिच्या जागेवर दिसली नाही, आणि ती ओरडायला लागली, “व्हेर इज शी?”
मंजिरीने तिला बाल्कनीतून बघितलं.
सिगार कूचकारत तिला बघत ओठात पुटपुटली,
“आली डोंबळी, तोफ समजते
काय स्वतःला माहित नाही, च्यायला,
मोठ्या पदावर ह्या मोठ्या घरच्या मुलिच का?
घमेंडी कुठली! बापाच्या कमाईवर वर आलेली. मेहनत
कर म्हणाव, मग कळेल.”
मंजिरी आत आली आणि बिपाशाला खोडकरपणे
हसत म्हणाली,
“हे डार्लिंग, व्हॉट अप, हाऊ आर यू... लुकिंग सो सो प्रीटी.”
दोघींनीही आलिंगन दिलं, तशी बिपाशा स्वतःचे कपडे नीट करत म्हणाली,
“मंजिरी, यु नो, आपले सर ह्यांनी मानवता पार्टी जॉईन
केली आहे. सो आपल्याला पोलिटिकल सपोर्ट पण मिळणार आहे. ह्या वेळी संजना
कन्स्ट्रक्शनचे टेंडर निघणार आहेत. बघ जरा. वी मस्ट गेट इट, अँड यू नो व्हॉट यू हॅव टु डू फॉर इट.”
नंतर ती रुद्र कडे आली, तिला तो आवडत होता, आताच त्याचं प्रमोशन झालं होतं मॅनेजर म्हणून पण रुद्रने कधीच तिला
तसा इशारा दिला नव्हता, त्याचं त्याच्या प्रियसीवर खूप प्रेम
होतं.
“रुद्र... वॉव, आज
मस्त दिसतोय रे तू, नाइस चॉइस ऑफ शर्ट... कॉफी घ्यायची
का सोबत?”
“सॉरी मॅडम, मला जरा काम आहेत.”
“ते सोड रे, तो कुशल करेल, करतो
काय तो दिवसभर....”
बिपाशाने त्याचा हात धरला आणि त्याला
घेऊन ती पॅंट्रीमध्ये गेली.
मंजिरी, “च्यामारी, तो काही भाव देत नाही तरी ही वाट
बघते. एक
रात्र तर हवी आहे हिला, काय लग्न करणार आहे ह्याच्याशी ती...”
कुशल, तिला जुनीयर होता, “मंजिरी
मॅडम, शनया आज ऑफिसमध्ये आहे, उगाच जाऊन सांगायची बिपाशा मॅडमला.”
“नो वरी कुशल, असल्या चमच्यांना घाबरत नाही मी. माझं कुणीच इथे काही वाकडं करू शकत
नाही... चिल कुशल. डरटी सेक्रेट आहेत इथे. ती बिपाशा स्वतःला बिपाशा बासू समजते.”
“ऐ सलवार बस इकडे. ह्या सगळ्या फाइल
डेटनुसार लावं, अगदीच नीट, आणि मग कम्प्युटरवर सेट कर सगळे फोल्डर. एवढचं करायचं आज. इकडे तिकडे
नाक खुपसायचं नाही. इथे मी डिपार्टमेंट हेड आहे. ते सर-बीर गेले उडत. येतील
तेव्हां बघून घेऊ.”
शनया तिचा वरचा टॉप आवरत, केसांना हलवत मंजिरीकडे काही पेपर घेवून आली, आणि समृद्धीला बघून म्हणाली, “इयु, हू इज
शी?”
मंजिरी, “तुला दिसत नाही, मनुष्य
प्राणी आहे. जनावर दिसतात तुला इकडे?”
“मॅडम, तसं नाही, सॉरी बट सलवारवर आणि घोसला
मल्टीनेशनल इंडस्ट्रीजच्या मार्केटिंग टीम मध्ये.” ती मिश्किल हसत अगदीच समृद्धीला
हातही लागू नये अशी ती तिच्या पेन्सिल हिल्स हळूच टाकत कुशलच्या जवळ आली.
मंजिरीने तिला हाताने कुशलच्या जवळून
बाजूला व्ह्यायला सांगितलं,
“सो? तुझा टॉप नीट कर आधी. चल, तुला दिलेलं काम सांग झालं का?
मला काम हवंय. इकडे मार्केटिंगच काम होतं,
मॉडेलिंगच नाही. ते करायचं
असेल तर राजीनामा टाक इकडे आणि वरच्या मजल्यावर ऑडिशन सुरू आहेत, तिकडे निघ.”
“ओ रियली मॅडम, बट... माय हाइट ना...”
तिने समृद्धीला अजून पायापासून तर
डोक्यांच्या केसापर्यंत बघितलं.
मंजिरी तिच्या त्या नजरेला वाचत हसत म्हणाली, “नाईस हाइट राईट.... तुझी.... नाही... तू नाही करू शकत.”
आणि ती समृद्धीला म्हणाली, “पण तुला जमाणार
नाही, तू हेच काम कर.”
समृद्धी गोंधळली. चेहरा पिवळसर झाला
आणि मागे सरकून बाजूला उभी राहिली. कुठेतरी बघावं म्हणून ती सुरु असलेल्या
टीव्हीकडे नजर टाकली
टीव्हीवर मात्र न्यूज सारखी सुरु
होती. आणि काही वेळाने समृद्धीला तीच गाडी टीव्हीवर दिसली, त्यात ती लाल साडीतली स्त्री होती. खूप स्पष्ट दिसत नव्हतं काही पण
तिला खात्री झाली होती कि ती तीच आहे म्हणून. गाडीची झलक तिला विसरता येणार
नव्हती.
आज पहिला दिवस होता तिचा, एवढ्या मोठ्या कंपनीत काही सुचत नव्हतं तिला.
तिलाही आता कॉफी प्यायची होती. वाशरूमला जायचं होतं. विचारू कुणाला म्हणून इकडे
तिकडे बघत होती. तोच समोरचा रमेश तिला त्याच्या भिंगातून बघत आहे असं तिला वाटलं,
तिने ओढणी नीट केली, तोच तिथून जाणाऱ्या मंजिरीच्या पायात तीची ओढणी आली,
“ऐ सलवार, उद्या पासून ओढणी अजिबात नको इकडे. नुसता टॉप सलवार घालून आली तरी चालेल.”
मग तिने तिच्या स्तना कडे बोट करत
म्हटल, “हे एवढे सुंदर काय नुसते लपवून
ठेवण्यासाठी आहेत, आम्हालापण आहेत. हे बघ मी टॉप जीन्स
घातला आहे ना, काय चुकीच आहे हयात. तुला ओके आहे तर
घाल ना पण असा पायात येणार नाही हा तुझा रेशमी दुपट्टा एवढं लक्षात ठेव.”
समृद्धीने मान हलवली, मनात नसून सुद्धा तिने मंजिरीला विचारलं, “ताई,
नाही मॅडम, मला वाशरूम सांगाल का?”
“का गं? तुला मी पिऊन दिसते? हेड आहे मी, बॉस तुझी... शोध ना, इथेच काम करायच आहे तुला, हे असे
प्रश्न मला विचारायचे नाही, समजलं! आधी शोधायचं, प्रयत्न करायचं मग यायचं माझ्याकडे. मी नुसतीच मदत करत नाही, जो खरच प्रयत्न करतो त्यालाच मी मदत करते...”
“सॉरी मॅडम, मी...”
“हुम्म.. इथून लेफ्ट जा...”
समृद्धी गेली लेफ्टला पण तिला काही
केल्या वाशरूम दिसत नव्हतं. आणि मग काही वेळाने तिला तीची बसण्याची जागा दिसत
नव्हती, रडकुडीला आली होती तर, मंजिरी परत मीटिंग रूम मधून येतांना तिला दिसली. अश्रु
पुसले आणि आता हिच्या मागे आपल्या जागेवर जायचं ठरवलं तिने. मंजिरी तिच्या जवळ आली,
“ऐ सलवार दिसली का वाशरूम? इकडे काय फिरत आहेस, काम कोण करणार?”
“नाही मॅडम... मी जाते, करते ना.”
मंजिरी हसली, समृद्धीच्या डोळ्यातलं पाणी तिला खूप काही सांगून गेलं, तिचे दिवस आठवले, म्हणाली, “हे बघ तू समोर उभी आहेस वाशरूमच्या, आपल्या कॅबिनच्या लेफ्टला. जा, आणि चेहरा धुवून ये. आणि ही इकडे राईटला कॉफी मशीन, फ्री आहे पण टेस्टी नाही, म्हणून दिवसभर पिऊ नकोस. माझं मी सांगितलं, बाकी आज तुला माफ, नाहीतर
असे प्रश्न मला चालणार नाही. मला प्रश्न विचरण्याआधी तो तूच नीट समजून घ्यायचा,
मी इकडे प्रश्न तुला विचारण्यासाठी आहे, समजलं? हयानंतर सांगणार नाही, फायर करेन.”
समृद्धीने डोळे अलगद पुसले आणि ती
काहीही न बोलता वॉशरूमला गेली. नळाखाली हात धरताच गार पाण्याचा थेंब गालावरून
ओघळला आणि डोळ्यांत साचलेलं पाणीही त्याबरोबर बाहेर आलं. तिला स्वतःचीच लाज वाटत
होती, “पहिल्याच
दिवशी असं का झालं माझ्याकडून? इतकी
का गोंधळले मी?”
आरशात स्वतःकडे पाहताना तिला जाणवलं,
चेहरा धुतला की काहीही लपून राहत नाही. बाहेरून
धुऊन टाकलं तरी आतल्या असुरक्षिततेची सावली डोळ्यांत दिसतच होती. तिने एक खोल
श्वास घेतला.
कॅबिनकडे परतताना मंजिरीच्या
शब्दांचा भार अजूनही तिच्या मनावर होता. “फायर करेन” हा भाग ऐकून पोटात गोळा आला होता, पण त्याच वेळी तिच्या आवाजातलं प्रामाणिकपणाही
तिला जाणवलं. कडकपणामागे काहीतरी वेगळी गोष्ट लपलेली आहे, हे समृद्धीला थोडंसं जाणवलं.
परत जागेवर बसल्यावर तिच्या टेबलावर
एक फाईल ठेवलेली होती, पिवळ्या चिकट स्टिकी नोटवर फक्त दोन शब्द लिहिले होते, “Start here.”
ती नोट मंजिरीनेच ठेवली असणार,
हे समजायला वेळ लागला नाही. समृद्धीने फाईल
उघडली. त्यात कामाचं तपशीलवार वर्णन होतं. अक्षरशः हात धरून शिकवल्यासारखं. तिला
आतून हसू आलं. “किती कठोर बोलते, पण
मागे वळून मदतही करते...”
मंजिरी समृद्धीला बघून काही वेळ
विचार करत राहिली. लॅपटॉप उघडून मेल्स पाहत बसलेली.
“किती वर्षं झाली मला इथे? … पहिला दिवस आठवतोय. मलाही असंच पाणावलं होतं…
कोणी विचारलं नव्हतं, उलट ओरडलेच होते. पण… मी जिंकले. आणि
आता ही मुलगी... लक्ष दिलं नाहीतर हा कॉर्पोरेट तिला गिळून टाकेल.”
समृद्धीच्या मनातल्या भीतीला थोडासा
दिलासा मिळाला होता पण
मनात अजूनही प्रश्न होते, ऑफिसमधला गोंधळ, मंजिरीची
कठोरता, आणि स्वतःची कामातली अडचण. हलक्या
श्वासासह आपला दिवस पुढे कसा जाईल याचा विचार करत होती. समृद्धीला आता लक्षात आलं
होतं की, ह्या कंपनीत प्रत्येक क्षण शिकणं आहे आणि ह्या सर्वांच्या हाताखाली काम करता करता एक दिवस ह्या सर्वांचाच यशाची लॅडर बनवायचं आहे.
0 Comments