जेव्हा ex परत येतो...भाग 4

 

भाग तिसरा इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/2021/09/ex_28.html

माधव अजूनच कासावीस झाला होता. त्याचं मन उत्तर शोधात होतं, मनात म्हणाला, माझ्यावर अतोनात प्रेम करणारी, मी येवढ्या दिवसांनी समोर भेटूनही जराही पाझरली नाही. मला जरासं काही झालं तरी अश्रू गाळत बसणारी एवढी भक्कम कशी... मनात विचारांचे धागे त्याच्या मनातल्या विचारांना घट्ट करत त्याचा जीवं ओढत होते. आताच जावं अरुंधती पुढे आणि तिला बघत बसावं म्हणजे माझी अरु वितळेल असंच त्याला वाटतं होतं, तोच परत त्याच्या खोली बाहेरून अवनीचा आवाज आला, ती वार्डात इकडे तिकडे फिरत होती आणि अरुंधती तिच्यावर ओरडत होती.

विचारांनी ग्रासलेला जरा स्तब्ध झाला, अवनी अरुंधतीची मुलगी आहे, तिला मुलगाही आहे असं म्हणाली होती ती, हे कसं झालं पण... अवनी तर ... नाही काही तरी गडबड आहे. मुलगा नसेलच तिचा पण अवनी कशी तिची असू शकते....हुम्म, अरु पण ना, काहीही सांगते मला, माझी अरु तर ... नाही... काहीतरी आहेच मध्ये. असं कसं, अरु आणि आई, शक्यच नाही... मग मी...

माधव विचारात अनेक विचार शोधायला लागला, काय सुटलंय हे शोधात होता. पण गवसत नव्हतं.

तरही विचारांना ओढत तो परत मागे पोहचला,

“अरु कशाला भरतेस ग फोर्म? आपलं बाळ येवू देत ना. काय ग गरज ह्याची आता?”

“अहो माधवराव, बाळ पण येईल आणि सर्वच नीट होईल, मी बोलले आईशी, त्या म्हणाल्या मला त्या करतील सर्व बाळाच म्हणून. आणि मी कुठे जातेय. माझं पाहिलं पिल्लू आहे. माझा छोटा माधव.”

“ये मला तर अरुंधती हवी आहे छोटाशी... ही तू आहेस ना, जरा माझं ऐकत नाहीस, बघ माझी मुलगी माझंच ऐकणार...”

“काय रे! तू तर म्हणाला होतास ना, छोटा माधव येतोय म्हणून... मी आपली आस लावून आहे... मला ना तुझं प्रतिबिंब हवंय... बघ मग?”

“असं....” आणि माधवने अरुंधतीला अलगत उचलून घेतलं, फोर्म पायाने कुचकरला गेला होता, आणि अलगत अरुंधतीला पलगावर टाकतांना पायाने त्याने पलंगाच्या आत ढकलला. नंतर त्याने तिला औषधी दिल्या. हाताच्या खुशीवर झोपवलं. ती झोपतच तो त्याच्या आईकडे आला, “आई तू अरुला म्हटलंय, अंतिम वर्षाचा फोर्म भरायला?”

“अरे पण काय झालंय? करू देत ना, घरी एवढी माणस आहेत, होईल कि सगळं अॅडजस्ट, करतो म्हणाली ती मग काय.”

 

“आई तुला कळत नाही का, अग ती माझ्या बाळाची आई होणार आहे, ह्या घराण्याचा वारस आहे तिच्या उदरात.”

बाबा घरात शिरले होते तर म्हणले, “मी नाही बोललो होता, पण राणीसाहेब?”

“अहो काय होतं हो, डॉक्टर होवून करेल कि घरी डॉक्टरकी, करू द्या, आपण काय तिला बाहेर पाठवणार काय? एक डॉक्टर हवाच ना घरात.”

“हुमम, अग डॉक्टरांनी लाईन लावू आपण, पण अरु नाही... उगाच कॉलेज, मग ते काय मुलांशी बोलणं... काय घाणेरडेपना असतो मेडीकलच्या मुलांचा... माझा मित्र आहे ना, सांगत असतो, काही लाज नसते त्याच्यात. काय काय करून मोकळे होतात ह्या फिल्ड्चे लोकं. उगाच मला अरुला गुंतवायच नाही त्यात. काय कमी आहे तिला. बोट ठेवेल ते समोर आणेल मी तिच्यासाठी, प्रेम आहे माझं तिच्यावर....”

“अग बाई, हे काही मला माहित नाही बाबा... तुझं प्रेम आम्हालाही प्रियच आहे.”

“ते काही नाही, अरु कुठेही जाणार नाही, मी तिला सांगतो तसं... काय करायचं ते घरात करावं म्हणा... काय घरात कमी आहे का, हा येवढा मोठा पसारा तिलाच सांभाळायचा आहे. कुठे वेळ मिळणार तिची ते डॉक्टरी करण्यासाठी.”

आई मान हलवत म्हणली, “तेही ठीक, बघ बाबा, तुला जे योग्य वाटत आहे ते, मला तर काही हरकत नाही. मी तर तिला बोलले, गाडी रोज असेल तिच्यासाठी म्हणून. आता नवीन मुलींना का आणि कसं म्हणून अडवायचं, मला काही तिच्याशी वाईट घ्यायचं नव्हतं, तू आणि ती काय ते बघा. मी आहेच सोबत.

“ते काही नाही, अरु मला घरात हवी...” माधव ओरडत म्हणाला. आणि त्याच्या खोलीच्या पायऱ्या चढत होता, तोच त्याची नजर अरुवर पडली, तिने खोलीच्या दारात उभं राहून काही बैठकीत घडलेला सारा प्रकार ऐकला होता. माधव तिच्या जवळ आला, अरु का ग इथे, काही हवंय का तुला. जागी कशी झालीस ग तू.

मंदा काकू पाणी घ्या अरु साठी. म्हणत त्याने अरुला हात दिला. अरु हळूच म्हणाली, "हुम्म, योग्य वेळी जागी झाले मी... आता कसं स्पष्ट दिसत आहे सांर...”

"अरु, काहीही नाही ग, तू लक्ष नको देवूस, आई काय काहीही बोलते."

"आई, कि तू?"

"मी काय तुझ्यासाठी वाईट विचार करणार, माझं प्रेम आहे तुझ्यावर...."

"प्रेम माझ्यावर आहे ना?"

"मग काही शंका...?"

"अजिबात नाही... प्रेम माझ्यावर नाहीच तुझं, तुझ्यावर आहे."

"अरु !!!"

आणि मग शांत झाला, "अरु, चल खोलीत हो, आराम कर बघू तू, उद्या आपल्याला डॉक्टर कडे जायचं आहे ना, सातवा महिना लागणार आहे....”

"हुम्म.... "

अरु काहीच बोलली नाही, शांत गुमान खोलीत शिरली. गप्पच झाली होती. माधवच अतोनात प्रेम तिच्यासाठी कैद झालं होतं, त्याला काहीच दिसत नव्हतं... अरु मात्र आता काहीच बोलत नव्हती. सासूने आणि घाच्यानी तिचा सातवा महिना जोरात केला पण अरुचा चेहरा मात्र खुलत नव्हता.

 तिला मनातून सांर काही खात होतं. माहेरचे आणि सासरचे सारेच प्रेमाचा वर्षाव करत होते. पण खरं प्रेम अरुला मिळत नव्हतं. तिच्या मनात युद्ध सुरु होतं. आपण माधवला ओळखण्यात चूक केली आणि आता काहीच बदलू शकत नाही, आपलीच निवड होती मग ती माहेरीही बोलू शकत नव्हती. हळूहळू ती गप्प झाली. खोलीच्या बाहेरही निघत नसायची. नव महिने झाले होते, घर सज्ज होतं बाळच्या आगमनासाठी.

आणि मग माधव सकाळी ऑफिस साठी निघून गेला आणि नंतर बराच वेळ अरुंधती बाहेर आलीच नाही. तिची सासुही त्या दिवशी मंदिरात गेलेली, सुनेचं सुखरूप बाळंतपण व्हवा म्हणून आज पूजा ठेवली होती तिने. घरात नोकर मंडळी आपल्या आपल्या कामात व्यस्त होती.

संध्याकाळी सासू प्रसाद द्यायला खोलीत शिरली, अरु खोलीत पडून होती. तिने तातडीने सर्वांना बोलावलं, अरुलाही हॉस्पिटल मध्ये हलवलं....पण...

शेवटी डॉक्टरांनी उत्तर दिल, बाळ पाच तासापासून उदरात मरून होतं, आणि आता अरुंधतीला वाचवण्यासाठी धडपड सुरु होती. मोठ्यांच्या वस्तीती छोट्या मनांची लोकं राहत होती. अरुंधतीची चिंता आता फक्त तिच्या आई बाबांना होती, बाळाचा अंतविधी करून सारेच पाठ भिरवून निघून गेले होते.

 माधव तर रागात व्हरांड्यात फिरत होता आणि शेवटी थकून तोही घरी निघून गेला. काय घडलं हे फक्त आता अरुंधतीच सांगू शकत होती, तो घरी येवून आईवर खूप ओरडला, 

"काय ग आई? कुठे होतीस तू? तुला माहित होतं ना, अरु जरा शांत झालेली होती ह्या दिवसात म्हणून. आणि दिवस भरले होते तिचे मग का ग गेलीस देवळात? घे ना आता, पावला तुला देवं....? अरुला तर मी बघतोच, येवू तर दे तिला शुद्धी वर, मला कळवायच होतं ना, त्रास होतं होता तर, कुणाला तरी आवाज द्यायचा होता.”

माधवच ओरडणं सूर होतं, त्याने घरातल्या प्रत्येक नौकाराला बोलावून चौकशी केली, पण कुणालाच काही अंदाज नव्हता, मंदा काकुनुसार, अरुंधती सकाळी झोपायची मग त्यांना तसचं वाटून राहिलं कि ती झोपली असावी म्हणून, पण त्यांनीही स्वतः जावून चौकशी केली नव्हती. 

त्याची आई मात्र गुमान अश्रू ढाळत होती.  तिच्या कानात सतत डॉक्टरचे शब्द घुमत होते, “तातडीने हलवलं असतं तर बाळ आज हयात असतं, तुम्ही येवढे सुसंस्कृत लोकं आणि ही हलगर्जी, अरुंधतीवर कुणाचं लक्ष नव्हतं का? कदाचित बाळाची हलचाल बंद झाली असेल तेव्हांच आणायचं होतं ना, बाळाला नाही वाचवू शकलो पण आम्ही अरुंधतीला वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय.” 

अरुंधतीचा मुलगा तिच्या उदरात मरून होता आणि ती देवाला साखळं घालत देवळात होती, निदान घरी असती तर बाळ वाचलं असतं ही सल तिला खात होती. आणि विचारात ती खाली पडली, घरात गोंधळ उडाला होता. माधवच्या आईला हॉस्पिटल मध्ये ICU मध्ये हलवण्यात आलं होतं, त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता. नुसत्या दोन तासात त्यांचा जीवं गेला.

आणि इकडे अरुंधतीला जाग आली होती, पण कुणीच नव्हतं, तिचा लहान भाऊ तिच्या जवळ होता. 

त्यालाही तिला कसं सावरायचं कळत नव्हतं, त्याने डॉक्टरला बोलावलं आणि त्यांनी तिला काहीही न सांगता शांत केलं. नंतर तिची आई इथे आली. तीही गप्प होती. आता मात्र अरुंधती ओरडली, 

“माधव माधव.... कुणी सांगताय का मला, माझं बाळ कुठे आहे ते.”

माधव तर तिथे नव्हताच पण तिचे बाबा मात्र तिथे पोहचले. त्यांनी तिला समजावून बाळ झोपलं आहे असं सांगितलं, अरुंधती समजली पण परत ती माधव साठी विचारात होती. आई बाबांनी कसबसं तिला शांत केलं. भयाण शांतता होती. बाहेर पाऊस बरसत होता, ढगांनी गोंधळ घातला होता ती रात्र भयाण रौद्र रूप घेवून आली होती, अचानक माधव ओरडत अरुंधतीच्या खोलीत आला, 

“अरुंधती, काय केलंस हे, तुझ्या खुड्या नादात तू काय गमावलंस माहित आहे का तुला..? माझं बाळ... माझी आई....”

अरुंधतीच्या आईने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण काही फरक पडला नाही, विजेच्या वेगाने तो येवून अरुंधतीवर आदळला... अरुंधतीला बाबांनी आता कुशीत धरलं होतं. ती टक लावून बघत होती माधवकडे, माधव आरोप करत राहिला आणि अरुंधती शून्यात बघत मूर्ती झाली होती. कसंबसं परत बाबांनी अरुंधतीला पलंगावर टाकलं आणि डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सूर केले. माधवही आता घाबरला होता पण तिथून निघून गेला. अरुंधतीची आई त्याला आवाज देत राहिली, 

“अहो माधवराव, थाबा हो, अरुला गरज आहे तुमची, माधवराव... माधवराव थांबा हो.. माधवराव...”

“माधवराव, आपल्या डिस्चार्जचे पेपर तयार झालेत, आपल्याला उद्या डिस्चार्ज मिळतोय” 

नर्स माधवला सांगत होती. पण माधव अरुंधतीच्या आईच्या आवाजातलं दुखं समजण्याचा प्रयन्त करत होता...शोधत होता...पण आता काय अर्थ राहिला नव्हता.....

कडी ला कडी जोडत माधव काय सुटलंय जे जोडण्याचा प्रयत्न करत होता.... त्याच्या आईचे अंतिम शब्द आज त्याच्या कानात घुमत होते, “नव्याने सुरवात कर... अरुला माफ कर... ऐकून घे तिचं...आपली सर्वांची चूक आहे.”

माधवला आज ते शब्द खूप त्रास देत होते. का ऐकलं नाही आईच म्हणून संतापला होता. समोर डिस्चार्जचे पेपर ठेवले होते पण त्याला त्याने अरुंधतीच्या अंगावर फेकलेले डीवोर्सचे पेपर दिसत होते.

एकमेकांवर अतोनात प्रेम करणारे अचानक कसे वेगळे झाले आणि दोन मार्गाने निघून गेले पण आज एवढ्या वर्षाने समोर आले... का? ह्या प्रश्नाचा उलगडा करूया पुढच्या भागात...

कथा थोडीशी दीर्घ आहे... जरा वाट बघा.... अपडेट करते लवकरच पेजवर पुढचा भाग... 

पुढचे सर्व भाग मनातल्या तळ्यात पेजवर वेळेवर प्रकाशित होतील .... पेजला लाईक करून अपडेट नक्की घ्या https://www.facebook.com/manatlyatalyat

पुढचा भाग पेजवर लवकरच..... तेव्हा स्टे connect टू मनातल्या तळ्यात. कथा कशी वाटली नक्की कळवा. माझ्या कथा वाचण्यासाठी माझ्या पेजलाही लाईक करू शकता.

कथेच्या प्रकाशाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

©उर्मिला देवेन

धन्यवाद!!

फोटो साभार in.pinterest.

जोडीदार कथेचा पुढचा भाग प्रकाशित झाला आहे... लवकरच वाचण्यासाठी ही पेजवर येतोय 




 

 

Post a Comment

1 Comments

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)