ओ वुमनिया....हमसे है दुनिया सारी ...



ओ वुमनिया....हमसे है दुनिया सारी ... वुमन्स डे स्पेशल

ती जननी, तीच पालन करणारी.

ती सुरुवात, तीच जगाची उद्धरणी.

ती प्रेम, तीच सर्वाना सोबत घेणारी.

ती दिशा, तीच मार्ग दर्शवणारी.

ती सर्वस्व  हरून.. आयुष्यात बाजी मारणारी.

ती स्त्री............आणि ती मी ...

मग खरं आहेना! हमसे है दुनिया ये सारी...हम दुनियासे नाही....

"कसला हा वूमन डे?  काम कमी तर होत नाहीत ना बायकांची... ? आणि इथे कोण आपल्याला किंमत देतं.. हैप्पी वुमन्स डे म्हणून मुलगा, मुलगी घरातून बाहेर गेलेले आणि नवराही.

मी मात्र सकाळपासून काम करते आहे, ह्या पेपर वाल्यांना दुसरं काही काम नाही. सारा पेपर भरून आहे वूमन डे च्या जाहिराती आणि शुभेच्छांनी...."

मग असावारीने TV लावली तिथेही तेच .. स्त्री स्त्री स्त्री ....हैप्पी वूमन डे .......

शेजारची मोनिका घरात आसावरी काकू असा आवाज देत शिरली. नवीन लग्न झालेली, जरा चंचलशी, अगदीच मोकळी... स्वतः जेवढी खुश दिसायची तेवढी दुसऱ्यालाही खुश करण्याच्या प्रयत्नात असायची. नौकरीच्या शोधात होती. तसा आसावरी आणि मोनिकात वयाचा १८ वर्षाचा फरक पण तिने कधी तो जाणवू दिला नाही. मग आसवारीला तिची मानसिक मदत मिळायची.   

"काकू कुठे आहात... हैप्पी वूमन्स  डे "

"हो ये, आता तूच राहिली होती!"

"का अहो काकू! चिडलात काय? वातावरण तापलं आहे का? मी निघू, कि येवू आत?

"तू ये ग.....काय ग एक दिवस कामावाचून जात नाही. आणि ह्या जाहिरातीतील बाया मोठया अभिमानाने बोलतात ..हैप्पी वुमन्स डे म्हणनू."

"अहो त्यांचं कामाचं आहे ते ..आणि काम काय आपल्याला सुटणार आहे? पण स्वतःच्या कामाचा स्वतःला रिस्पेक्ट असतो. बस, त्या रिस्पेक्ट साठी एकदा स्वतःला हॅप्पी वुमन्स डे  म्हणूंन बघा... तुम्ही स्वतः ब्लश व्हायला लागाल. आम्हाला काम असतात, आमच्या जवळ कुठे वेळ... रिकम्या बायकांचे उद्योग आहेत ते असला टोमणा मारून आपण आपलाच अपमान करतो.

काकू स्त्रीच्या कार्याला जगात कुठेच तुलना नाही पण एक स्त्रीच स्त्रीची तुलना करते ........ आता त्या जाहिरातीतल्या करीना कपूरला काय बोललात! रिकामं टेकडी! ओ वूमानिया.... तिच्या कामामुळे तिला दोनचं तास झोप घेता येत असेल."

"अगबाई, माझं तसं म्हणणं नव्हतं ग ..पण कोण आपल्या कामाला रिस्पेक्ट देतं ग? आणि आपण सामान्य स्त्रिया कसला वुमन्स डे असतो ग आपला.?

"अहो आपला रोजच वुमन्स डे असतो पण सिलेब्रेट करायला एक दिवस हवा ना! दिवाळीत बनवला जाणारा फराळ आपण वर्षभरात कहीदा बनवतो पण दिवाळी दिवाळी असते ना ?"

"काय ग! आज काय ते सिलेब्रेट करा.... आणि उद्या जैसे थे"

"काकू सिलेब्रेट काय करायचं माहित आहे का? "

"हो, सण ना..? स्त्री दिवस म्हणून ... चल मी काहीतरी गोड करते तुझ्यासाठी."

" काकू वूमन्स डे सण म्हणून साजरा करत नाही तो एक अचिव्हमेंट म्हणून साजरा करण्याचा दिवस आहे.  स्वतःच अस्तित्व साजरं करायचं आणि स्वतः साजरं करायचं..कशाला हवं कुणी.. अरे हमसे है दुनिया ये सारी...हम दुनियासे नाही...."

"अचिव्हमेंट? आपली कसली अचिव्हमेंट ? "

"आरे ... एक स्त्रीचा जन्म म्हणजे अचिव्हमेंटच असते काकू ... हरून सर्वस्व सारं ती बाजीगर होते ........ तभी तो हारके जितनेवाले हो बाजीगर केहते काकू .. यु आर द बाजीगर .. काय? अक्खा इतिहास आणि भविष्यकाळ बदलण्याची ताकद ठेवते एक स्त्री.... वो उमनिया...यु आर द सोर्स ऑफ ऑल सोर्सस .. आजही बाईच्या एक्का इशाऱ्याने सर्व बदलते .. काय! खरं कि खोटं?

घेऊ शकतात का काका कुठला निर्णय तुमच्या संमतीशिवाय? घरात दरारा कुणाचा ? तुमचा ना! अहो काका तर फक्त कमावतात पण खर्च अगदीच शिल्लक ठेवून करणं जमेल का काकांना? ह्या जन्मात तर नाहीच! आई म्हणून कुठे कमी पडलात तुम्ही कधी ? घरात येणाच्या प्रत्येकाच्या ओठांवर नांव तुमचं असतं. ह्या घरातलं एक पानही हलणार नाही तुमच्याशिवाय ... आहे ना हि अचिव्हमेंट? .. आणि हि अचिव्हमेंट जगातला कुठलाच पुरुष करत नाही ... करू शकत नाही! सो पहिले स्वतःच्या कामाला रिस्पेक्ट .. जस्ट जरा स्वतःला म्हणून बघा .. हॅप्पी वुमन्स डे.  अँड जस्ट सिलेब्रेट युअर लाईफ टाईम अचिव्हमेंट विथ यु . "

आसावरी प्रसन्न झाली होती आणि चेहरा अगदीच फुलाला होता.. तोच मोनिकाच्या नवऱ्याने तिला हाक मारली, "अहो राणीसरकार निघतोय आम्ही... तयार राहा आज... वुमन्स डे साजरा करायचा आहे ना? "

मोनिका आसावरीला हाताने टाळी देतं निघून गेली.

आसावरी सोफयावरून उठली, साडी आवरली...आरश्यासमोर गेली ..स्वतःला न्याहाळत म्हणाली, " हॅपी वुमन्स डे आसावरी ... ओ वुमनिया, यु आर द बाजीगर ... हो... ह्या घरात माझं अस्तिव उमटवण्यासाठी आयुष्याचे २० वर्ष राबली आहे मी ... आणि हि माझी अचिव्हमेंट आहे .. एक दिवस तर सिलेब्रेट करायला हवा मी माझ्या अस्तित्वाचा, मलाही मन आहे. कधी जपावं स्वतःच मन. द्यावा तो मान स्वतःच्या मनाला... सो लेट्स सिलेब्रेट...हे घरातले सर्व माझ्यामुळे आहेत मी त्यांच्यामुळे नाही, आजवर माझ्यामुळे हे घर घर आहे ... द क्रिडिट गोज टू ओन्ली मी .. आणि मला त्याला पूर्ण भाव द्यावाच लागेल तेंव्हाच समोरचा देईल... "

खरं बोलली मोनिका, हमसे है दुनिया ये सारी ...हम दुनियासे नाही "

 हैप्पी वूमन्स डे.........

 कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार कायद्याने उर्मिला देवेन कडे राखीव.  

©️उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

फोटो साभार गुगल 

धन्यवाद! 🙏🙏

माझ्या नवीन कथेसाठी/ लेखासाठी माझ्या पेज लाही लाईक करू शकता .

https://www.facebook.com/manatlyatalyat/

Post a Comment

0 Comments