कश्यपी-विषकन्येचं प्रेम - कादंबरी

 

 कश्यपी-विषकन्येचं प्रेम- २०२२ 


इथे उपलब्द आहे- Kashyapi - Vishkanyech Prem Paperback – 9 May 2022

online किंडल - Kashyapi-Vishkanyech Prem: कश्यपी-विषकन्येचं प्रेम (Marathi Edition) Kindle Edition


सादर कादंबरी ही माझी पहिली ऐतिहासिक फिक्शन कथा आहे. एका विषकन्येचं अप्रतिम प्रेम दर्शवणारी थरारक व रहस्यमय प्रेमकथा असून कल्पना विहार करत ऐतिहासिक काळात मांडल्या गेली आहे. विषकन्यांचे जीवन क्लेशदायक, वेदनादायी असायचे असे वाचायला मिळते, त्यांना प्रेम करताच येत नव्हतं, अर्थात त्यांनी प्रेम करू नये, हेच गृहीत, परंतु सर्व बंधनावर मात करत एक विषकन्या जेव्हा प्रेम करते तेव्हां ते प्रेम अजरामर होतं...

जेव्हा सम्राट बिंदुसाराचे दोन्ही पुत्र आपसात भावी सम्राट पदासाठी लढत होते. सुशीम महाराजांना प्रिय तर अशोक लोकप्रिय. अशोकाला आव्हान देवून परास्थ करणं सुशीमला अशक्य होतं. तेव्हां अशोकाला मारण्याच्या हेतूने सुशीम विषकन्या कश्यपीला नियुक्त करतो, राजवाड्यात आणतो. परंतु प्रेमाला आसुसलेली विषकन्या अशोकाला अति प्रिय होतं जाते आणि मग हि प्रेमकथा कशी सुरु होते आणि कश्यपीला कुठे घेवून जाते, सम्राट अशोकाला आयुष्यात काय देवून जाते, सम्राट अशोक ते चक्रवर्ती सम्राट ह्या प्रवासात कश्यपी कुठे आणि कशी अशोकासोबत असते, हे बघूया या ऐतिहासिक प्रेमकथेत.
कथा नक्कीच आपल्याला सम्राट अशोकाच्या काळात घेवून जाईल, तेव्हां कथेचा आस्वाद घ्या आणि प्रतिक्रिया नक्की कळवा...
धन्यवाद!!!

Post a Comment

0 Comments