लक्ष्मण रेखा.....

 


“अदिती मी नंबर लिहून ठेवला आहे, त्यांना कॉल करशील आणि त्यांच्याकडे राज्याला घेवून जाशील. दुसरीकडे जावू नकोस, उगाच तुला सांभाळता येणार नाही. डॉ देसाईला राज्याची केस माहित आहे. माझं बोलणं झालं आहे त्यांच्याशी. तुला काही त्रास होणार नाही.”

अरुण ऑफिस मधून आदितीला कॉल करून सांगत होता. अदितीला फारसं आवडलं नव्हतं. तिला तो डॉ देसाई काही ठीक वाटत नव्हता, त्याचा इलाज काही केल्या राज्याला भावात नव्हता हे अदितीला कळत होतं.

रंजिश अदिती आणि अरुणचा मुलगा, लाडाने राज्या म्हणायचे त्याला. काही महिन्यापासून सारखं त्याच्या पोटात दुखत असायचं. अदिती घरगुती इलाज करत असायची आणि जास्त झालं तर डॉ देसाई कडे त्याला घेवून जायची. आज तिच्या मनात नुसती कुरकुर सुरु होती. तिला काही डॉ देसाईकडे जायचं नव्हतं, त्याचं ते नजर रोखून वर खाली बघणं तिला काही पसंत नव्हतं. रंजिशने आज शाळेला सुट्टी केली होती, तो मोबाईलवर खेळत होता.

ती तयारीला लागली, जीन्स घातला, टोप शोधात होतीच तर अरुणने VDO कॉल केला, बोलता बोलता तिने, स्लिव्हलेस टोप हातात घेतला, तोच अरुण ओरडला,

“काय ग स्लिव्हलेस कशाला घालतेस ग?”

“अहो गर्मी किती आहे.”

“जीन्स घातलास ना? साडीवर तर नाहीस, घाल कि छानसा टॉप, तो निळा, मी आणलेल्या बघ, उठून दिसतो तुला...”

अदितीला तिच्या हातातला फिक्कट गुलाबी स्लिव्हलेस घालायचा होता, नाक तोंड वाकडं करत तिने तो ठेवून दिला... अरुणच्या सूचना सुरु होत्या. स्कूटरने जावू नको, गाडी बुक कर, जेवून घे, उगाच बाहेरचं ख्याला घेवू नकोस, काहीही घेतेस मग. राज्या सोबत आहे सरळ घरी ये, त्याला पार्क मध्ये नेवू नकोस, आपण सोबत जावूया शनिवारी. आणि हा, तुझी आवडती आईसक्रीम घेवून येईल मी सोबत. तू आणू नकोस.”

अदिती तयार झाली, “अहो मी निघते, मला राज्याला तयार करायचं आहे. काही लागलं तर कॉल करते मी.”

“माझी मिटिंग आहे, मला तू अर्ध्या तासाने कधीही कॉल कर, आणि हा आपल्या नेहमीच्या गाडीवाल्याला बोलवून घे, नंबर आहे ना. ?

“आहे हो, मी ठेवते फोन.”

अदिती राज्याला तयार करत होती, समोर टीवीवर रामायण कार्टून सुरु होतं, सीतेने लक्षमण रेखा ओलांडली आणि राज्या जोरात ओरडला, “मग असचं पाहिजे, कशाला त्या रेषेत राहायचं, तिला स्वतःची रक्षा करता येते.”

अदिती हसली, “राज्या ती रेख तिच्या सुरक्षे साठीच होती ना, बघ आता तो रावण तिला घेवून गेला ना...”

“मग काय झालं, बघ किती मजा आहे आता, मला माहित आहे कथा, तुला काय वाटतं रावणनाने युक्ती शोधली असतीच ना जर ती बाहेर आली नसती तर... आणि मग काय झालं असतं, सीतेला कुठे काय बघायला मिळालं असतं.... काही काही मजा नसती कथेत... आता बघ किती मजा असणारं.....”

अदितीला गोष्ट लागली होती, अरुणही तिच्या काळजीपोटी एक लक्ष्मण रेखाच ओढत होता आणि त्यात ति मात्र घुटमळत होती... त्याची काळजी होती कि अजून काही हेही उमगत नव्हतं, सारख्या सूचना आणि मला काहीच करता येत नाही हा भाव तिला बोचत होता, लग्नाआधी सारच स्वतः करणारी आज काहीच करू शकत नाही, नुसत्या नवऱ्याच्या सूचना ऐकत एका सीमेत राहते, मनात ह्या विचाराने उथल पथल सुरु होती. तिने बॅग उचलली आणि परत पटकली,

“शी बाई गाडी बुक करू देत.”

गाडी बुक करतांना तिने नेहमीच्या माणसाला फोन लावला पण तो काही उचलत नव्हता, अरुणने आधीच बोलून ठेवलं होतं कि त्याची मिटिंग आहे, मग तिने दुसरी गाडी बघून बुक केली. गाडी पोहचली पण ड्राईवरला बिल्डींगच गेट दिसत नव्हतं तो कुठेतरी मागच्या गेटवर यायला बोलत होता. अदितीला एवढे वर्ष फ्लॅटवर राहूनहि ह्या बिल्डींगला अजूनही एक मागच्या बाजूला गेट आहे हे माहीतच नव्हतं.... आत मात्र ती संतापली....

मनात विचारांनी वरदळ केली आणि तिला घाम येऊ लागला, अंगाला तो लांब बाह्यांचा टॉप बोचत होता. तिने गाडीची बुकिंग रद्द केली. खोलीत येवून टॉप बदलला, तिची स्कुटी काढली,

राज्याही खूप खुश झाला, त्याला बजावत तिने गुमान बसायला सांगितलं, दोघेही निघाले, डॉ देसाईच हॉस्पिटल निघून गेलं पण अदितीने गाडी थांबवली नाही, तिने पुढे थांबवली,छोट्शी क्लिनिक होती, तिच्या मैत्रिणीची, राज्याचा प्रोब्लेम तिला सांगितला. डॉ देसाईने तयार केलेली राज्याची मोठीशी फाईल तिने मैत्रिणीला दाखवली, रागिणी हसली, “काहीही झालं नाही राज्याला, गोड जरा कमी दे, जंत झालेत. हि मी औषध लिहून दिली आहे, ते शेजारच्या केमिस्ट कडून घे. काही नाही मुलांना होता हा त्रास. काळजी मुळीच करू नकोस. राज्या अगदीच ठीक आहे.”

अदितीला फार आनंद झाला होता, नाहीतर डॉ देसाईने काय अजून सांगितलं असतं ह्याचा तिला अंदाजच नव्हता. रागिणीच्या क्लिनिक समोर आईसक्रीम शॉप होतं, रागिणीने आग्रह केला, दोघीनि अदितीची आवडती सीताफळ आईसक्रीम खाल्ली, आज तिला ती आईसक्रीम खूपच आवडली होती. रागिणीने तिच्या मुलीला बोलावून घेतलं आणि पार्कमध्ये गप्पा करत बसल्या काही वेळ दोघी. नंतर अदिती मुलाला घेवून ती घरी निघाली, समोरून रोड बंद झाला होता, मग फिरत फिरत, विचारत विचारत ती बिल्डींगच्या मागच्या गेटवर पोहचली. आज तिला एवढ्या वर्षानंतर मागचं गेट माहित झालं होतं... घरी आली तेव्हां प्रसन्न वाटत होती....

आज तिने अरुणने आखून दिलेली लक्ष्मण रेखा लांघली होती... वाट कठीण होती पण मार्ग सुचत गेले आणि तो आनंद काही औरच होता.

आपल्याला काळजीपोटी किंवा नकळत/कळत पुरुष आपल्यासाठी लक्ष्मण रेखा ओढत आलेले आहेत, त्या ओलांडल्या नाहीत तर बाहेरचं जग दिसणार नाही... आणि मग आतल्या जगात घुसमट होत राहिलं, पहल करा ती लक्षमण रेखा लांघा... विश्वास निर्माण करा आणि विश्वासात घ्या. काळजी हवी आहे पुरुषांची पण लक्ष्मण रेखा नाही... आणि लक्षमण रेखा झालीच तर ती ओलांडण्यासाठीच असते.... हेही माता सीतेकडून शिका....

कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा असावी.... कुठलाही हेतू नाही....

नवीन कथा वाचण्यासाठी पेजला लाईक नक्की करा!

 https://www.facebook.com/manatlyatalyat

कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव 


एक डाव तिचा.... “द बुमरेंग” -सर्व भाग इथे वाचा 


फोटो साभार गुगल

©उर्मिला देवेन

Urmiladev@gmail.com

 

Post a Comment

0 Comments