द गेम ऑफ अफेअर

 




ती वासना की प्रेम,

सहवास की मोह,

ओढ की असते नुसती हौस...

कुठली बाधा असते की बधीरपण

कि वारं असतं ते जे वाहून नेतं, 

अधीर झालेलो असतो आणि मग सारं काही बधीर होतं

नेमकं काय ते मनाला झिंगाट करून सोडतं, 


का पडावी गरज त्या नात्याची ज्याच्या अस्तित्वाने भेगा पडतात नात्यांवर... 

मन गुंतली जातात, ओढली जातात, ताणल्या जातात हृदयाच्या गाठी.... 

आणि मग, अचानक आपण, आपण राहत नाही, 

आणि सारं काही सुटत जातं... 

मन स्वैर सुटतं, आणि सुटका नसते...


आपण प्रेम म्हणतो पण ते असते अफेअर...

आणि दोन्ही मन पात्र असतात त्या खेळाची...

मग कुणीच नसतं कुणाशी फेअर, 

बाजी मांडल्या जाते समोरच्याला संपण्याची, 

आयुष्य होतं मग, द गेम ऑफ अफेअर....


आयुष्य खूप सुंदर आहे, आणि त्यात जोडीदारची साथ लाभली कि मग सूखदुखांना सोबत समोर जाण्याच धाडस मिळत असतं. त्यातूनच परिवार ही संकल्पना उदयाला आली, प्रेम, लग्न, संसार, मुलं ह्या साऱ्या श्रुंखला निर्माण झाल्या. 

पण ह्या पलीकडे ही एक अशी गोष्ट समाजात आहे जी पुरातन काळापासून आपल्यात आहे. राजे महाराजेही ह्या मार्गाने जात होतेच आणि मग कलह निर्माण व्ह्याचा हे काही नवीन नाही... पण ते कुठेतरी लपल्या जायचं, उघडकीस येत नसायचं... 


तो ,ती ह्यात तिसरा शिरला कि मग सारंच विसरा असचं नाहीका?

समाजाने बांधून दिलेल्या चौकटीत लग्न झालं असलं आणि जोडीदाराशी आपलं नातं उभं असलं तरीही मात्र काही  परिवारांमध्ये  हे एवढ्यावरच थांबत नाही. 

मागील काही वर्षांमध्ये विवाह बाह्य संबंधही वाढत होत आहे असे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

विवाहबाह्य  संबंधातून जे घडत जातं  त्यात अनेक नाती होरपळून जातात. 

कुठे स्त्री बधीर होते, तर कुठे पुरुष हतबल...

पण अजूनही ते समाजात आहेच....  


आपल्या जोडीदारच अफेअर असणं, ते आपल्याला माहित होणं, 
तो त्रागा, ती जीवघेणी जाणीव, अस्तिवाची लढाई, आपल्याला काय हवं हा शोध, आणि सारंकाही घेवून लवकरच येत आहे कथा मालिका  .... द गेम ऑफ अफेअर.... 
एक प्रवास, दोन जीवांचा...  आणि बरच काही,,,,

कथा लवकर.... 

फोटो साभार गुगल

-उर्मिला देवेन

Post a Comment

0 Comments