स्टॅंड-अप कॉल

 

स्टॅंड-अप कॉल



आधीचा भाग

कॉर्पोरेटच्या जगात सकाळी सुरू होणारी पहिली ‘रिच्युअल’ म्हणजे स्टॅंड-अप कॉल. नावाला ‘स्टॅंड-अप’, पण प्रत्यक्षात प्रत्येकजण आपल्या खुर्चीतच बसलेला, लॅपटॉप उघडून, स्क्रीनवर टीमच्या चेहऱ्यांचे चौकोनी खिडक्या झळकत. सकाळची वेळ होती, कॉफीच्या वाफा हवेत दरवळत होत्या आणि स्क्रीनवर कॅलेंडरची पिंग पिंग सुरु होती. घोसला कंपनीत सर्वांचा दिवस सुरू व्हायचा तो “स्टॅंड-अप कॉल” नेच. सगळ्यांना वाट होती ती मंजिरीची.

ओके टीम, लेट्स स्टार्ट,” मंजिरीने आवाजातली धार लावत कॉल सुरू केला. तिचं बोलणं म्हणजे जणू घंटा वाजल्यासारखं, सगळे जागेवर सावध!

रोहन नेहमीप्रमाणे चकचकीत प्रेझेंटेशन तयार करून बसलेला. माझं काम पूर्ण आहे, डेडलाईनच्या आधी डिलिव्हर करू,” तो आत्मविश्वासाने म्हणाला. त्याच्या आवाजात जरा जास्तच चमक होती.

मंजिरीने डोळ्यांनीच त्याला स्वीकृती दिली. तसा तो परत बोलला, “मला तुझ्याकडून चेक करून घायची गरज नाही कदाचित. माझं ओके आहे.”

ती परत स्मित हसत म्हणाली, “ओके, गो अहेड देन... ही तुझी जवाबदारी आहे मग. टेक ओनरशिप!!”

तसा तो गडबडला, ओनरशिप त्याला घ्यायची नव्हती आणि तिच्या सूचनाही पाळायच्या नव्हत्या. तो तसाच थबकला.  पण मन बोलू देत नव्हतं. मंजिरीने दुर्लक्ष केलं. तिने समृद्धीकडे पाहिलं.
समृद्धी, तुझं काय?”

समृद्धीने थोडं अडखळत सांगितलं, काल क्लायंट मेल आला होता, त्यात काही बदल होते. त्यापैकी दोन बदल मी आधीच केले आहेत. उरलेले दोन आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील.”

गुड, at least कुणीतरी काम करत आहे.”

 

तेवढ्यात शनाया बोलली, माझं पण काम झालंय, पण समृद्धीनं केलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक छोटासा एरर आहे...”
सगळ्यांची नजर पुन्हा समृद्धीकडे वळली.

समृद्धीच्या चेहऱ्यावर क्षणभर काळजी उमटली. मंजिरीने लगेच उत्तर दिलं, शनाया, एरर असेल तर मला मेल कर. पण लक्षात ठेव, स्टॅंड-अप कॉल म्हणजे blame-game नाही. हा अपडेट्ससाठी असतो, गॉसिपसाठी नाही.”

शनायाचा चेहरा लाल झाला. बाकी टीमच्या चेहऱ्यावर दडपून ठेवलेलं हास्य दिसत नसलं तरी जाणवत होतं.

कॉल पुढे सरकत गेला, रुद्रने सर्व काम नीट समजून घेतलं आणि आज वेळत पूर्ण होणार हेही पक्क केलं. कुशलची मात्र पंचायत झालेली मंजिरीला जाणवली, आधी त्याचं काम समृद्धी करत असायची आणि तो नुसता बढाया मारत असायचा, मंजिरीने प्रश्न केला, “कुशल आज दहा इशू ओपेन झाले आहेत कॅस्टमरकडून. ते सगळे सुटायला हवे. उद्या पेंडीग काहीही नको मला.”

समृद्धीने आपली नोट्स बंद केली. तिला कळलं, कॉर्पोरेट जगात स्टॅंड-अप कॉल म्हणजे फक्त टास्कची यादी नाही. इथे कोण किती स्थिर उभं राहतंय, कोणाची भाषा आत्मविश्वासानं भरलेली आहे, कोण कसं दुसऱ्याला खाली खेचतंय हाच खरा रिपोर्ट असतो. कॉल संपला आणि सगळे जागेवर आले. माधव कॅबीनमध्ये पोहचला होता, आणि मंजिरी तिकडे निघाली. परत ऑफिसमध्ये शांतता पसरिली होती.

माधव आज जरा चिंतेत होता, मंजिरीला आल्या आल्या म्हणाला, “मंजिरी आज  मला नेहमीचा विषय नको गं... तुला आणि मला आपल्या बाउंड्रीज माहित आहे. त्या सीमा तश्याच राहणार.... मी नाही ओलांडू शकत नाही, तू सुद्धा त्याचे भान ठेव. तुझ्या माझ्यात जे आहे ते मी कायम जपणार आहे... पण..?

“पण.... पण त्यात मी गुदमरते ना माधव.” मंजिरी हळूच बोलली.

“मी नाही होऊ देणार तसं... पण प्रिया माझी बायको आहे... आणि आता बाबांच्या अश्या वागण्याने घरात तणाव वाढत आहे.”

आता मंजिरी शांत झाली, “काय रे... काय झालं आता, त्या मुग्धा बाईने काही नवीन कटकारस्थान केला की काय?”

माधव हसला, “तू पण ना.... कसं कळतं गं तुला....”

“तू आणि तुझा बाप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहात रे.... बायका म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला... त्यांनाही रंग दाखवता येतात तेव्हा मग तुमचा रंग उडतो... हुम्म्म...”

मंजिरीचा टोला माधवने अगदीच हसत झेलला होता, तरीही तो शांत होता म्हणजे काहीतरी गंभीर होतं हे मंजिरीने ओळखलं,

“माझं काय मी तुला असं बोलणं काही सोडणार नाहीच, मनावर घेऊ नको...”

“हो माहित आहे मला तुला काय मी आज ओळखतो...”

मंजिरी हसत जवळ आली, “काय झालंय सांग... आज उशीर झाला तुला यायला.”

“मुग्धा बाई प्रोपर्टीमध्ये हक्क मागत आहेत... आणि बाबा तो द्यायला तयार आहेत.”

“हुम्म... असे कांड केले तर मग असेच भोग येणार ना वाट्याला...”

“हो... तू तर बोलच... संधी आहे तुला...”

“मग काय निर्णय झाला आहे?”

“निर्णय त्यांनी केला आहे, पण माझी काळजी ही आहे की तिला वाटा देऊन ती शांत राहील काय... तू तिला ओळखतेस. मोठं मोठ्या लोकांसोबत असते ती...”

“तसं लिहून घ्या तिच्याकडून कायद्याने... दम द्या आणि मामला फिनिश करा...”

बोलता बोलता मंजिरी थबकली, अश्रू डोळ्यात जमले. दीर्घ श्वास घेतला.... माधव तिच्याजवळ आला, त्याला तिच्या भावना उमगल्या होत्या... म्हणाला, “मंजिरी असं कधीच होणार नाही तुझ्या बाबतीत, वचन आहे माझं... जीव गेला तरी ह्या जीवाला जपेल एवढं लक्षात ठेव...”

मंजिरी डोळ्यातले अश्रू डोळ्यातच पुसले, हळूच म्हणाली, “आज ये घरी, बसुया रे...  बियर घेऊ सोबत... हल्ली तू कसा बिझी झाला आहेस आणि मीही सारखी चिडचिड करत असते. खूप दिवस झाले तू तिकडे फिरकला नाहीस...”

“हो बघतो मी.... आज काय स्टेट्स आहे. टार्गेट सेट केलं आहेस ना सर्वांच. मला ह्या प्रोजेक्ट मध्ये काहीही ऐकायला येता कामा नये... होल्ड इट टाईट...”

मांजरीने आणि माधवने त्यांच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये एकमेकांची मुठ एकमेकांना टच केली, मंजिरी हसली, तसा माधव बोलला, “गोड दिसतेस गं हसली की तू, नाहीतर नाकावर परा असतो तुझ्या चढलेला, आणि हल्ली तर मला बघूनही तो काही केल्या खाली आलेला मी बघितला नाही.”

असं बोलताना बघून मंजिरीने त्याला डोळा मारला, तोही त्याच्या नेहमीच्या प्रमाणे घायाळ झाल्यासारखा खुर्चीत पडला, मंजिरी पुढे बोलली,“आज सकाळी स्टॅंड-अप कॉल मध्ये मला समृद्धीला बघून माझी आठवण झाली.... तेव्हा तू तो कॉल घेत असायचा.”

“हो तेव्हा बॉस प्रिया होती ना!”

“हुम्म्म.. ऐ ती मस्त बॉस होती यार.... “

“आताही आहे.... “

“हुम्म...”

“मग काय झालं... समृद्धी हुशार मुलगी आहे. बघ तुला क्रोस करायची...”

“हो, करू देत ना, हुशार आहे मग त्याचं तिला मिळायला हवं... आणि तुला का रे तिच्यात एवढा इंटरेस्ट... दूर रहा तिच्यापासून. मला न सांगता तू तिला पार्टीला बोलावलं होतं.”

आता माधव जरा दचकला, “अगं पण ती आली कुठे होती. जरा डाऊन वाटते ती... पण हुशार आहेच. घे तिला ह्या नवीन टीममध्ये.”

“अजून काम पूर्ण समजलं नाही आहे तिला. आणि तिला पुढे केलं तर बाकीचे ओरडतील.... आणि  तू तिच्यावर काही नजर ठेवू नको. तशी मुलगी नाही आहे ती. फायद्यासाठी जवळ यायची नाही... आणि तू आता बंद कर सगळं, हल्ली मुली तसल्या हुशार आहेत रे... जनरेशन नवीन आहे तेव्हा तुझा जुना डाव फेकू नको... मी फसले पण आता तू फसशील आणि बसशील बोंबलत...”

“बापरे! पण तू एवढ्यात ओळखलं तिला?”

“मग, आपली नजर असते.... असो मला काम आहेत. संध्याकाळी भेटू...”

“हो तुझा माझ्यासाठी स्टॅंड-अप कॉल झाला आहेच.... रीपोर्ट करतो संध्याकाळी.” मंजिरी हसली. माधव परत बोलला, “अशीच हसत राहा.... नेहमी... आणि सिगार जरा कमी फुक... वास येतो!”

मंजिरीने त्याला न ऐकल्यासारखं केलं आणि परत हसली...

तो परत बोलला, “व्हा... किती दिवसांनी एवढी गोड हसलीस मंजिरी..,”

“कारण आज तू किती तरी दिवसांनी मोकळा बोलला.... काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या आपल्यातल्या. माझ्या वाटेला जे आलंय ते कायम आहेच रे बसं आता काम करणं हेच मान्य केलं.... . माझं जग म्हणजे टार्गेट्स, रिपोर्ट्स, डेडलाईन्स..... आणि तू... आणि तुझा हा फक्त मी घेतलेला स्टॅंड-अप कॉल...”

माधवने तिला नजरेने होकार दिला... मंजिरी फ्रेश बाहेर आली होती. येताच तिने गणपतला आवाज देत स्पेशल कॉफी मागितली. स्टॅंड-अप कॉल नंतर सगळ्यांना सगळ्यांच्या भूमिका सपष्ट होत्या.  पण मंजिरीची भूमिका अजूनही अनेक स्टॅंड-अप कॉल होऊनही कुणालाही सपष्ट नव्हती....


#दकॉर्पोरेट लॅडर चे आधीचे भाग पेजवर आणि साईटवर आहेत!!
to be continued...
----पुढील भाग लवकरच....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.

पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AI

Post a Comment

0 Comments