#दगेमऑफअफेअर भाग ७
राघवच्या कॅबीनमध्ये:
राघव बोलत असताना त्याच्या कॅबीनमध्ये मोहिनी शिरली होती. तिचा तो रेड शॉर्ट वन पीस, लॉन्ग लटकते ईयर रिंग, शॉर्ट पण सुंदर केस, तिचा तो मोहक परफ्यूमचा मोहात पाडणारा सुवास, जशी ती आली राघव पार फ्रेश झाला. फ्लाईट डिले झालीय हे त्याला त्याच्या सेक्रेटरी कडून कळालं होतं पण आता काही त्याचा प्रेझेन्टेशन तयार करण्यात रस नव्हता. सहाची फ्लाईट रात्री नऊची झाली होती. मोहिनी कॅबीनमध्ये आली आणि आज ही संध्या राघवला मोहित करू लागली.
राघव आणि मोहिनी त्याच्या कॅबीनमध्ये बसले होते. दोघांनाही स्टाफ घरी जाण्याची वाट होती. साडेपाच वाजता माधवी त्याच्या कॅबीनमध्ये आली, “सर, सहा वाजता मी निघते, जरा आज लवकर निघायचं आहे. तुमची फ्लाईट रात्री नवची आहे. मी कॅब बुक केली आहे. नंबर मी तुम्हाला पाठवला आहे. तो सातच्या जवळ येईल. मला कॉल करेल तर मी तुमच्या कॉलवर फॉरवर्ड करेन. मी तुमचा शेड्यूल लाईनअप करून दिला आहे. तुम्ही पोहचलात की, मला तसा मॅसेज टाका म्हणजे मी उद्याच्या सर्व अपॉइनमेंट तुम्हाला तुमच्या मोबोईलवर पाठवेल.”
“ओके माधवी, तू आहेस म्हणून मला काहीच बघावं लागत नाही. थॅंक्स!!”
“सर, असं नका बोलू, तुम्ही खूप केलंय माझ्यासाठी.”
राघवने त्याच्या टेबलच्या ड्रोवरमधून चॉकलेटचं पाकीट काढलं, “ते जाऊ दे, मी दोन दिवसांआधी तिकडे दिल्लीला गेलेलो, तिकडे हे मी आपल्या बंडूसाठी घेतलं होतं. दे त्याला आणि अभ्यास कर म्हणावं, ह्या वेळी उत्तम मार्क मिळायला हवे त्याला... सांग मी म्हणालो म्हणून.”
“हो सर... पण हे?”
“घे गं, नमासाठी घेत होतो, मग आपला बंडू आठवला. घे, संकोच नको करू.”
माधवीने ठेवून घेतलं, तिथेच बसलेली मोहिनी तिला बघत होती. माधवीने तिला बघून काहीच म्हटलं नाही. म्हणणार तरी काय, मोहिनी स्वभावाने खूप मृदू होती सर्व स्टाफसोबत. तिनेही स्मित हसत तिला घ्यायचा इशारा केला होता. माधवी निघणार होतीच तर राघव परत म्हणाला, “माधवी बाबांना सांग मी आठवण केली म्हणून आणि त्यांना ह्या वेळी मेडीकल चेकअप करायला सांग, खर्च मी देईल. तू बोलली नाहीस मला काहीच, त्यांची शुगर वाढली म्हणून?”
“सर, तुम्हाला कसं माहीत?”
“अरे माझ्यासोबत काम करतेस मला माहीत नको. रमाकांत काल बोलला मला.”
“सर...”
“सर म्हणतेस, भाऊ मानतेस, मग सांगायला काय होतं.”
ती स्मित हसली आणि म्हणाली, “सर निघते मी, काही असलं आणि तुम्हाला आठवलं नाही तर कॉल करा.”
“तू ना... सर्व तुला माहीत असतं माझं.”
ती स्मित हास्य देत कॅबीन मधून निघून गेली. ती जाताच मोहिनी उठली आणि राघवच्या समोर जाऊन त्याचा लॅपटॉप बंद केला तिने. त्याचा नेकटाई तिने हाताने ओढला, “रघु, काय हे, किती काळजी घेतोस त्या माधवीची.”
राघव त्याचा नेकटाई सोडवत म्हणाला, “जान करावं लागतं, पाप करतोय हे ठाऊक आहे ना मला, मग बॅलेन्स नको का?”
“पाप!”
“हुम्म... हे पाप!”
“पाप... तू तयार आहेस ना... माझ्या पापात बरोबरीची भागीदार होण्यासाठी.”
ती अजूनच जवळ आली, राघवच्या कानाजवळ आली, त्याच्या कानावरची केसं उभी झाली होती. ती जोरात हसली, “काय रे तुझी तर ही केसं पण उभी होतात.”
“जान तू हा येवढा मोठां आइटम बॉम्ब समोर असताना काय काय उभं होईल ह्याचा काही नेम!”
त्याने तिला स्वत:कडे ओढलं, तिचे स्तन त्याच्या छातीला लागले, त्या दोन स्तनातल्या खाचेत त्याने त्याच्या हातातला पेन टाकला... तिने तोच पेन काढून त्याच्या तोंडावरून फिरविला... तिला बाहुत घेऊन त्याने फोन लावला, “दोन शेंपेन पाठवा, सोबत फ्राइड प्रॉन्स, तंदुरी चिकन, अँड ड्राय फ्रुट्स.”
राघवची फ्लाईट लेट होती, तरीही त्याला घरी ज्यायचं नव्हतं. सुधाही काही आग्रह करून बोलली नाही. राघवला माणसं जोडण्याची कला अवगत होती. पण, सुधा कुठे कमी पडली त्याच्या ह्या कलेत. तिला जोडताना मागे राहिला होता राघव आणि मग मोहिनी त्याच्याशी जोडल्या गेली होती.
राघवने फोन करून पार्टीचा बेत आखला होता, त्याच्या मिठीत मोहिनी होतीच, फोन ठेवताच त्याने मोहिनीला अजूनच घट्ट स्वत:कडे ओढलं. तिने हळूच प्रश्न केला, “तुला काही वाटत नाही का रे?”
“तुला काय वाटतं?” राघव तिच्या केसांना कुरवाळत म्हणाला.
“मला खूप मोकळं वाटतं तुझ्यासोबत, हवासा वाटतोस तू. कसलीच पर्वा करावी असे वाटत नाही.”
“मग मलाही तेच वाटतं... तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं मग?”
मोहिनी हसून त्याला परत बिलगली, “तू आयुष्यात आलास आणि सारं कसं सुंदर झालं... बस काळजी वाटते कधी कधी आपल्या नात्याची आणि भीती वाटते आपल्या सोबतच्या नात्याची.”
“ती करू नको, ते करायला सुधा आहे. मला ती भाषा नको, ठाऊक आहे ना तुला... यु आर माय लकी चार्म. मला तू हवी आहेस.”
तेवढ्यात दार नॉक झालं, राघव आतूनच बोलला, “रमाकांत बॅग ठेवून द्या खाली. तुम्ही तिकडेच थांबा. मी अजून आहे. माझ्यासोबतच घरी निघा तुम्ही.”
दारावर कुणी होतं पण काही वेळात तिकडे कुणीही नव्हतं. मोहिनी म्हणाली, “रघु, तुला कसं माहीत होतं रे ते रमाकांत काका आहेत ते?”
“बॉन्डिंग आहे माझं आणि त्यांचं... फक्त तेच माझ्या दरवाज्याला कधीही नॉक करू शकतात.”
“म्हणजे?”
“अगदी तू नग्न जरी माझ्या कुशीत असली आणि त्यांनी नॉक केलं ना तरी मला काही हरकत नाही. तरीही मी त्यांना उत्तर देणार.”
“तुला ना माणसं जिंकता येतात रे.”
“नाही गं, प्रयत्न करतो त्यांच्याशी कनेक्ट होण्याचा.”
जरा शांत झाला, तर मोहिनी म्हणाली, “तू सुधाचा विचार करतोस ना?”
“हो आता फक्त विचार करतो, तिच्याशी खूप कनेक्ट होण्याचे प्रयत्न केले मी, पण... ती एक गाठ सुटली नाही गं, मलाही वाईट वाटते, मग तू आलीस आणि…”
“आणि रे काय रघु?”
“आणि तू मला जिंकलं... तू माझ्यासोबत आहेस म्हणून मी एवढी प्रगती करतोय. तुझ्याशी बोलताना सगळं कसं मोकळं वाटतं. अर्थात तू सुरुवात केलीस आणि कधी आपण मनापासून देहापर्यंत आलो कळलंच नाही. आता तुझी सवय झाली आहे मला.”
परत दार वाजलं, राघवने लॅपटॉप उघडला, चष्मा डोळ्यावर ठेवला, मोहिनीला बसायला सांगितलं, जसा तो कामात खूप बिझी होता. म्हणाला, “रमाकांत काका, या, दार उघडं आहे.”
रमाकांत सर्व सामान घेऊन आले होते. त्यांनी गुमान सगळं टेबलवर लावलं. राघव त्यांना म्हणाला, “रमाकांत काका काही खाणार का? म्हणजे मी जास्तच मागवलं आहे. तुम्हीपण बसा आमच्यासोबत.”
“नाय नाय, साहेब, घरी जाईल मी, तुम्ही घ्या, तुम्हाला निघायचं आहे. आपल्या माधवी बाई सांगून गेल्या मला. तो कॅबवाला येणार आहे सात वाजता.”
राघवने पाचशे रुपये पाकीटमधून काढले, “काका, जेवण करून जा, नाहीतर काहीतरी घेऊन जा घरी.”
“नाय साहेब, मी ठीक आहे.”
“अरे घ्या, मगाशी तुम्ही जेवलापण नाही, माझी घाई झाली त्या मिटींगला म्हणून. आता तुमचा डब्बा पण खराब झाला असेल आणि वेळ होत आहे जेवणाची. ह्या वयात तुम्ही वेळेत जेवायला हवं.”
रमाकांत पैसे घ्यायला तयार नव्हता. राघवने त्याच्या शर्टाच्या खिशात ठेवले. तो निघत होताच तर राघव म्हणाला, “आणि गाडी घरी पोहचवून द्या मी निघाल्यावर. मी सांगेन त्या दिवशी घ्यायला यायचं.”
“बरं जी, मी आहो जी खाली, वाचमन जवळ. काही लागलं त सांगा.”
तो जाताच राघवने लॅपटॉप बंद केला. दोन ग्लास काढली, शेंपेन त्यात ओतली, म्हणाला, “जान, खूप थकलोय गं, नसा नसा कशा त्रास द्यायला लागल्या आहेत.”
त्याने एक सिप घेतला, परत तिच्याकडे बघत त्याने पूर्ण ग्लास घशात ओतला. दातांना ओठांनी दाबत त्याने समोर असलेले फ्राइड प्रॉन्स तोंडात घातले. परत त्याने ग्लासमध्ये शेंपेन ओतली. तिला नजर रोखून तो बघत होता. मोहिनीने त्याला अलगद डोळा मारला, राघवने तिला ओठाचं हवेत चुंबन दिलं. मोहिनीने तिचा ग्लास संपवला, “रघु, मी कधीच प्यायले नव्हते रे तुला भेटण्याआधी, बघ ना, तुझ्या नशेसोबत आता ही सुद्धा चढते मला...”
“असं! मी कुठे असा प्यायचो गं, तू सोबत देतेस म्हणून जगतो हे क्षण… आणि ही काय आपल्याला चढवणार आपण आपल्या प्रेमाच्या नशेत असतो सदा.”
“काहीही काय रे रघु.”
“काहीही नाही जान, ताकद आहेस तू माझी.”
“असं! मग सुधा?”
“सुधा फक्त बायको... ती कधी माझी झालीच नाही कदाचित. असू दे, आपण तिच्याबद्दल बोलणार नाही हे ठरवलं आहे ना.”
मोहिनी स्मित हसली, “ते तू ठरवलं आहे, मी नाही.”
“जान, आपण भांडणार आहोत का?”
“काय हरकत आहे? आपण काय कमी भांडतो. विषयांची कमी नाही आपल्याकडे आणि सुधा माझा आवडता विषय आहे, ज्यात तू गप्प असतोस.”
“जान, सुधा नकोय मला इथे आपल्यामध्ये. ती घरीच योग्य आहे.”
“पण मला भांडायचं असेल तर? तू ना जाम मस्त चपडू चिकना दिसतोस भांडणात मला.”
“असं? पण तुझ्याशी भांडल्यानंतरही तू मला हवीच असतेस गं
“मग, होऊन जाऊ दे ना एक अजून भांडण.”
“नको गं, आज मूड नाही.”
“मग कसला मूड आहे.”
“तो तू केलास ना तयार... बघ बाबा, हा जीव तुझा आहे. दे जरा जीवदान. जगू दे ग अजून काही दिवस. जान वेळ होतोय.”
मोहिनी दाराकडे गेली आणि तिने दार लॉक केलं... ती पालटली, दाराला टेकून स्कर्ट तिने काढला, टॉप काढत ती समोर येत होती, तिचं ते गोरं पानं अर्धं अंग, तिच्या अंगाची ती चमक त्यावर तिचं ते वागणं, सारचं कसं बेधुंद होतं. तिचं ते विलोभनीय रूप बघून स्वत:ला बिझी दाखवणारा राघव तिच्यात शिरण्यासाठी जणू वाट बघू लागला. आता ती त्याच्या जवळ आली, तिने त्याच्या शर्टच्या बटण काढायला सुरुवात केली. त्यानेही तिच्या मागून तिच्या ब्राचे हुंक्स काढले, ती खाली पडताच तिचे ते शरीर उघडे पडले. तिच्या ओठांवर ओठ पडले... आणि दोघंही एकजीव झाले. कधी त्यांनी एकमेकांना आपसात कैद केलं हे त्यांनाही कळलं नाही. प्रेमाचा उचांक त्यांनी आज परत गाठला होता. दोन्ही देह निपचित पडून होते. तोच परत दारावर नॉकचा आवाज आला.
---
पुढील भाग लवकरच--- कथा क्रमा क्रमाने पोस्ट होईल... वेबसाईटवर असेल.
आधीच्या भागाची लिंक पेजवर पिन पोस्ट (Pin Post) केलेली आहे. सर्व भाग तिकडे मिळतील.
राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त कादंबरी पुस्तकं स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध आहे.
कथा कशी वाटली नक्की कळवा...
©उर्मिला देवेन
९३७०१९४६३७
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे. ही कथा youtubeसाठी नाही, कुठल्याही गोष्टीसाठी कादेशीर परवानगी घायवी.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
फोटो आभार ai
स्टे कनेक्ट, स्टे सेफ
@followers @topfans

0 Comments