भिंगरी_“द_रिव्हेंज”_(भाग ११)

 


भावनाला असं खंबीर झालेलं बघून, अम्मामध्ये हिंमत आली होती. जी ती करू शकली नाही ते तिला भावना कडून करून घ्यायचं होतं. तिला गुण्या भाईच्या बरोबरीच उभं करून त्याच्या उभ्या केलेल्या विश्वासलाआगेत भस्म करायचं होतं.अम्मा आनंदात उठली, तिने तिच्या कपाळावर ओठ टिपले, तिला गच्च आलिंगन दिलं आणि म्हणाली, “बेटा, मी आहे तुझ्या सोबत... तुझा बदला माझा बदला... पण आधी तू बदल. हवामे खुद की पसंद की महक लानी हो तो अत्तर खुद पे पहले छीडकना पडता है.” तीने परत भावनाला गच्च मिठीत धरलं, “और हम आखरी दम तक तेरे साथ है बेटा... जा झोप, आराम कर, उद्यापासून तालीम सुरु करायची हाय.. भिंगरी बाई!” भिंगरीने वेश्यालयात राहून स्वतःला असं बदललं कि कुणीच तिला भावना म्हणून ओळखू शकत नव्हतं. वर्ष धावत होती आणि भिंगरी आता तरुण झाली होती. तिच्या रुपाची चर्चा पूर्ण मुंबईत होती. अम्मा आता म्हातारी झाली होती पण भावना तिला आई मानून तिच्या सोबत राहत होती. अम्माला भावनाला ह्या साऱ्यातून काढायचं होतं पण भावनाच सहज तिथून निघणं शक्य नव्हतं हेही ती जाणून होती. तिने भावनाला तयार केलं होतं आणि स्वतः चा मार्ग निवडायला स्वतंत्रही दिलं होतं. इकडे गुण्या भाईही स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्यात व्यस्त होता. त्याचाही दबदबा वाढला होता. नवीन नवीन पोरींच्या नादात तो भावनाला कधीच विसरला होता. आणि मुख्य म्हणजे अम्मा भावनाला साथ देत होती मग तिने गुण्या भाईकडे कधीच भावनाला पाठवलं नव्हतं आणि त्याला जाणवूही दिलं नव्हतं. अम्माच्या मते भावना आता तयार झाली होती. अम्माने तिला वेश्यालयातच सर्व प्रशिक्षण दिलं होतं, तिची शाळा अम्माने शिकवणी लावून पूर्ण केली होती. इंग्रजी बोलण्याचीही शिकवणी लावली होती भावनासाठी तिने. मग भावना मोठं मोठया बिजनेस मॅनला प्याल्यात बुडवाची, तिच्या एका रात्रीची किंमत सामान्य माणूस देऊच शकत नव्हता. तिची चर्चा रात्रीच्या पार्ट्यांमध्ये व्हायची. जगभरात लोकं तिचे दिवाने होते. अशातच त्या दिवशी दुबईच्या डॉनची भारतात व्हिजिट होती आणि अम्मा बाईकडे रात्रीसाठी मुलीची डिमांड आली, अम्मा सर्वांना ओळखून होती. मग दुबईच्या डॉनसाठी तिने भिंगरीची निवड केली. भिंगरीला काय करायचं होतं हे कळालं होतं. तिच्या साठी हीच गोल्डन संधी होती. दुबईचा डॉन काही दिवसातच भिंगरीचा नादात दिवानां झाला आणि त्याने तिला सोबत घेऊन जाण्याची डिमांड केली. अम्माच्या आणि भावनांच्या प्लॅन नुसार सार काही घडत होतं. मुबंईत वचक बसवून गुण्या भाईला मात द्यायची म्हटलं तर त्याच्या पेक्षा मोठया गुंडाची साथ असणे गरजेचं होतं. भिंगरीने दुबईच्या डॉनसोबत दुबईला जाणं मान्य केलं... आणि ती विमानात बसून दूर दुबईत पोहचली...तिच्या भावना परत उभ्या झाल्या होत्या. लहानपणी बघितलेली सर्व स्वप्न तिची पूर्ण होतं होती पण मार्ग मनाला आनंद देत नव्हता. हळूहळू ती साहेबजीचा सर्व कारभार बघायला लागली. आणि त्याला स्लो पॉइझन देत राहिली. नंतर तो तिच्यावर इतका निर्भर झाला की फक्त तिचं हुकूमत करत होती त्याच्या नावावर... दुबईच्या साहेबजीने खूप प्रगती केली, सर्व जगात सत्ता पसरवली, अंडरवर्ड मधला राजा होता तो. आणि त्याला चालवणारी राणी होती भिंगरी! तिला आता लोकं मॅडमजी म्हणून हाक मारत असत. आणि मग एक दिवस मॅडमजीने गुण्या भाईशी हात मिळवला. त्याच्या जाळ्यातून बटाटा भाईला फोडलं, मुबईची सत्ता बटाटा भाईला देऊ केली आणि त्याच्याकडून गुण्या भाईंबद्दल सर्व माहित काढून घेतली... आणि ती पूर्ण प्लॅनिंगने रिंगणात उतरली. एकीकडे तिने गुण्या भाईशी साहबेजींच्या मदतीने मैत्री ठेवत त्याला कंगाल केलं तर दुसरीकडे त्याच्या मुलीवर अमेरिकेत नजर ठेवून तिला भारतात येण्यासाठी तयार केलं. संधी निर्माण केली आणि तिला किडन्याप करून तिच्याच गावातल्या घरी कोंबून ठेवलं होतं. तिला स्वतःची आपबिती सांगून तिच्या मदतीने तिचे व्हिडीओ तयार केले आणि गुण्या भाईला तोडण्यासाठी वापरले. आणि आता सध्या सोना ही अम्माच्या ठिकाणावर सुरक्षित होती कारण मागच्या सात दिवसापासून अँकी तिच्या मार्गावर होता. अँकीने आवाज दिला, “भावना भावनांना आवर घाल, आता पुढे काय... ये भिंगरी बाई!!!” आणि भावना रागात आली आणि तिने अँकीच्या पायाजवळ गोळ्या झाडल्या, घामाने भिजली होती, श्वास फुलले होते, अँकीच्या डोक्यावर बंदूक ताणून ती म्हणाली, “अबे ये लंपट, तू कोन आहेस? आणि दादाला कसा ओळखतो?”

 कथा अंतिम चरणात लवकरच.. पुढच्या भागाच्या अपडेट साठी पेजला लाईक करा,

धन्यवाद!

Post a Comment

1 Comments

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)