भिंगरी_“द_रिव्हेंज”_(भाग अंतिम)

 

कथा कशी वाटली नक्की कळवा, हा कथेचा शेवटचा भाग आहे. आणि अश्याच कथा वाचण्यासाठी आणि चित्रित रुपात बघण्यासाठी मनातल्या तळ्यात  You Tube channel ला subscribe  करा, आम्ही सुरुवात जनजागृती पासून केली आहे .👇👇👇👇
मनातल्या तळ्यात channel

कथा पुढे .....

अँकी किती वेळचा भावनाला सहन करत होता, त्याचा बांध तुटला, तोही आता ओरडला,

आधी मला सोड मग सांगतो. नाहीतर जा, घाल गोळ्या.

भावनाने पिस्तूल तोंडात धरली, आणि त्याला बांधलेली रस्सी ती काढत होती, तिचे केंस त्याच्या चेहऱ्यावर आले होते, तिचं ते एकतार त्याच्या कडे नजर रोखून बघणं अँकीला घायाळ करत होतं. तिचा रागेट चेहरा त्याला सुंदर दिसत होता, त्याची रस्सी ढिली होताच तो तिला बिलगला, आणि दोघेही स्पर्श सुखाने मोहरले, भावना जरा वेळ मनात बावरली, भरकटली, मनाच्या कप्प्या कप्प्या मध्ये दडून असलेलं आपलंपण तिला क्षणात जाणवलं...


पण भानावर आली आणि तिने मोठया  ताकतीने त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर पाय ठेवला आणि म्हणाली, “शेवटचं विचारते तुला... तू, माझा दादा... माझ्या दादाला कसं ओळखतॊस?”

अरे थांब.” म्हणत त्याने त्याच्या खिश्यातुन त्याच कार्ड काढलं, आणि भावनाच्या हातात दिलं, इंस्पेक्टर अंकित जाधव, क्राईम ब्रांच.

नावं वाचताच परत भावनाने बंदूक ताणली,

मग, मी काय करू... माझं काही नाही बिघडवू शकत तू... आणि मी काही माझा बदला थांबवणार नाही.... माझी सत्ता ह्या मुबईवर आधीच आहे... मी ऐक फोन केला ना तरी तू खल्लास होशील... मी साहेबजीची सेक्रेटरी कधीच नव्हती.... मी स्वतः साहेबजी आहे... साहेबजी कधीच गचकला, साले मानसं, बे दुने एकच... मारलं त्याला मी पण अजून जिवंत ठेवलं आहे सर्वांमध्ये. लोकं तर त्याला शोधत आहेत मला नाही. 

आज सर्व माझ्याशी बिजनेस करायला तयार आहे... इथले सर्व नेते आणि सर्व पोलीस खातं मी माझ्या इशाऱ्यावर चालवू शकते.... तू काय माझं काही भिघडवणार... बोल माझ्या दादा सोबत काय झालं होतं.

अंकित गुमान बसला आणि शेवटचा प्रयत्न म्हणून बोलू लागला, “त्या दिवशी तूला गुण्या भाई घेवून निघून गेला आणि पोलीस वाड्यावर पोहचली होती, बटाटा भाईने सगळं वातावरण बदललं होत,

तिथे शहरातून आणलेल्या पोरी ह्या अरुणने सपलाय केल्या आहे हे त्याने पोलिसांना पटवून दिलं आणि अरुणला अटक झाली. त्याला सजा झाली होती, पोलिसांनी त्याचा भाईच्या सांगण्यावरून खूप छळ केला, तो तुरुंगात एकटाच राहत होता, बोलतही नव्हता, एकटाच भिंगरी खेळायचा आणि म्हणायचं, भिंगरे मी येईल हा... तू काळजी करू नको.

माझी नवीन पोस्टिंग होती आणि ती मुली सपलाय करण्याची केस माझ्या कडे आली, मग मी त्याला केस संदर्भात माझ्या कैदेत घेतलं होतं पण काहीच माहित झालं नाही उलट तो इनोसंट आहे हे माझ्या लक्षात आलं .

 त्याला सर्व खोदून विचारलं तर त्याने सर्व मला सांगितलं. मी त्याची मदत करणार हे पोलिसात कुणालातरी माहित झालं आणि अरुणला मारण्याचा प्रयत्न सुरु झाला. आणि ऐक दिवस तो तुरुंगात लटकलेला दिसला. मला माहित होतं त्याला मारल्या गेलं होतं म्हणून पण पुरावे काही वेगळेच होते .

तो एकटाच राहत होता आणि मग त्याने स्वतःच्या नादात आत्महत्या केली अशीच रिपोर्ट तयार झाली. त्या दिवशीच मी तुला शोधण्याचा निर्णय घेतला होता. माझं काम सुरु झालं होतं आणि जेव्हा गुण्या भाईच्या मुलीचं अपहरण झालं तेव्हा माझ्या सर्व लक्षात आलं होतं पण मी गुमान शांत होता आणि आजही आहे... पुढेही राहिल...

भावनाने परत बंदूक ताणली आणि तिने कुणालातरी फोन केला, “तिसरा पेनड्राइव्ह भेज तो गुण्या भाईको, साल्याला अक्कल नाही... निदान गावातला वाडा दिसल्यावर तरी इथे येईल... " तिने फोन ठेवला आणि बंदूक ताणून उभी होती.

इकडे भावनाच्या सांगण्यावरून गुण्या भाईकडे तिसरा पेनड्राइव्ह पाठवला गेला होता, गुण्या आणि त्याची सर्व माणसं आता निघणार होती तोच बटाटा भाईने अंगणात पडलेला पेनड्राईव उचलला, गुण्या आणि त्याची नजरा नजर झाली आणि दोघेही घरात धावत शिरले, टीव्ही लावली, वाड्याच्या अंगणात सोनाला पांढऱ्या कपड्यात गड्ड्यात ठेवल्या जात होतं आणि सर्व माती टाकत होते. गड्डा बुजला होता. आणि समोरून आवाज आला, “भाई काम खल्लास झालं. ये आणि वाचव पोरीला हिम्मत असेल तर... "

गुण्या आणि बटाटा भाई धावत गाडीकडे निघाले, सुसाट गाड्या गावाच्या दिशेने निघाल्या.

भावना अंकिताला घेऊन गावच्या वाड्यावर पोहचली होती. अंकिताला तिने बांधून ठेवलं होतं. सर्वीकडे माणसं लपून होती, फक्त तीच समोर त्या जागेवर खुर्ची ठेवून बसली होती. आज कही वर्षाने परत गुण्या भाईच्या गाड्या वाड्याकडे निघाल्या होत्या, गाड्या बदलल्या होत्या पण गावं तसंच होतं, मग धूळ तशीच उडत होती आणि गुण्या भाईला  दुरूनच  धुळात भावना दिसली.

तो गाडीतून उतरला आणि सोनाला गाडलेल्या जागेवर भावनाला बसलेलं बघून तिच्याकडे सरसावला, तोच त्याच्या साठी समोर ठेवलेल्या  ट्रॅपमध्ये तो अडकला, उलटा झाडाला लटकला, तो ओरडत होता, “सोना कुठे आहे, तू कोण आहेस..” तोच त्याचा फोन वाजला, भावनाच्या माणसानी तो फोन त्याच्या खिश्यातुन काढून त्याच्या कानाला लावला, आवाज समोरून येत होता की फोन मधून गुण्या भाईला समजलं नाही, मॅडमजी बोलत होत्या, “अबे वीस वर्षां आधी तू ह्याच वाड्यावर काय केलं होतं आठवं... तेच तुझ्या सोना सोबत झालंय एवढंच... बस मी जरा एक स्टेप पुढे गेले. .. ह्या ह्या ठिकाणी दाबलं मी...श्वास चालत होते पण तू उशीरा आलास रे...आता पर्यत तर मेली असेल ती...बिचारी. खूप त्रासली होती.  बापाचं भोगलं तिने.”

आणि मग बटाटा भाईला म्हणाली, “ये बटाट्या काय मुबई पाहिजे ना तुला? घाल ह्याच्या त्या भागावर गोळ्या जो लहान मुलींमधेही घालतांना वाकत नाही...”

असं म्हणताच गुण्या बटाटा भाई कडे बघत राहिला. आणि मग परत भावना ओरडली, “अबे साल्या चिंद्या करिन मी, तू नाही ह्याला मारलं तर...”

आणि तिने तिच्या माणसांनां गड्डा करण्याचा इशारा केला. अंकित तिला थांबवत होता पण तिने त्याच्याही पायाजवळ गोळ्या झाडल्या आणि त्याला गप्प केलं , म्हणाली, “माझ्या मागे पुढे कुणी नाही.... पण ह्या गुण्याला संपवल्या शिवाय मी तुला सोडणार नाही.”

भावनाने तिच्या जवळ असलेली भिंगरी काढली आणि ती फिरवत होती, दोरा बांधत होती आणि फेकत होती... भावनाच्या माणसांनी खोदलेला गड्डा पूर्ण झाला होता. आणि भावना थांबली, गुण्या भाईजवळ आली, त्याचे केसं पकडून म्हणाली, “ओळखलं का मला, साल्या ह्या इथेच, ह्या समोरच्या खोलीत तू माझ्यावर बसला होता... पण आता तुझ्यात काय राहिलं रे... मी तेच तुझ्या मुलीसोबत करायला लावलं, काय रे पार्टी कशी होती... मज्जा आली ना...”

एकाने उत्तर दिलं, “मॅडमजी भारी होती, मानतच नव्हती, दिल्या दोन अन...केलं काम...

गुण्या भाई चौथळुन उठला होता. पण माफी मागत होता, त्याने तिला ओळखलं होतं. भावनाने चवताळून त्याच्या खालच्या भागावर बंदुकीतल्या पाच गोळ्या झाडल्या... आणि एक गोळी तिने तो लटकलेल्या दोरीला मारली, तो खाली पडताच तिने त्याच्यावर पावडयाने माती टाकून त्याला गाडलं. घामाने थर्र झाली होती, अंगाची लाही लाही होती होती. सर्व अंग अश्रू ढाळत होतं, सार आसमंत तिच्याकडे बघून शांत झाला होता. खूप रडली, ओरडून ओरडून शांत झाली आणि मग बटाटा भाई जवळ आली, तिला जवळ बघताच तो घाबरला, म्हणाला, “मॅडम मला माफ करा, मुंबई नको मला...सारं आयुष्य आपला गुलाम म्हणून राहिलं. जावूद्या मला.

तू कसा सुटू शकतोस चमच्या, तूच होतास ना ज्याने माझ्या दादाला फसवलं आणि मग त्याला मारलं पण...”

तिने बंदूक ताणली, “साल्या तुचं होतास ज्याने माझ्या आईला गुण्या भाईच्या समोर उभ केलं आणि मलाही ह्या तुझ्या घाणेरड्या हाताने उचललं होतस ना?” तिने त्याच्या हातवर गोळ्या झाळल्या. आणि ती बंदूक फेकून त्याला मारली, तो खाली पडला, आणि तिने तिच्या माणसाच्या हातून पिस्तूल ओढून त्यालाही खल्लास केलं... शांत झाली होती.

YouTube Channel - मनातल्या तळ्यात लवकरच घेवून येत आहे एक नवीन कथा ,,, बहायला विसरू नका, YouTube Channel ला subscrib करा. 


तिच्या माणसाने तिच्याजवळ पाण्याची बॉटल आणुन दिली, तिने पाणी तोंडावर फेकलं, उठली, अंकित जवळ आली आणि तिने त्याला सोडलं, “म्हणाली, आता तुला जे करायचं ते कर... मोकळा आहेस.” आणि तिने एक फोन केला.

अंकित म्हणाला, “मला काहीच करायचं नाही... तू सर्वच केलसं.” त्याने पोलिसांना फोन केला आणि तिकडे बोलावून घेतलंला  तिला म्हणाला, “ इट्स युअर रिव्हेंज ....अँड माय वर्क... माझं कामं फक्त ह्या गुंडांना पकडणं नव्हतं. मी तर अरुणसाठी ही खटपट केली होती, त्याला शब्द दिला होता, तुला शोधण्याचा... शोधलंय...तुझी इच्छा, तुला माझ्यासोबत यायचं आहे की ...”

तिने काहीच उत्तर दिलं नाही... तीने तिच्या सर्व माणसांना गाड्यात बसल्याला सांगितलं, तीही गाडीत बसायला लागली, अंकित तिला परत म्हणाला, अरुण ने माल तुझी काळजी घ्यायलाही सांगितलं होतं,

ति गाडीत पाय ठेवून बसलीही आणि म्हणाली, “आता त्याची गरज राहिली नाही, मी समर्थ आहे.”

“अग पण.... मी...”

“इन्स्पेक्टर अंकित, आपल्यासाठी मी नाही...”

“पण तू माझ्यासाठीच आहेस, लक्षात ठेव...”

“माझे कही नावं आहेत त्यातली मी कुठली तुमच्यासाठी ते तरी शोधा आधी.”

“ त्याची गरज नाही मला...”

“आणि मला तुमची नाही” तिने गाडीचा काच लावला, आणि ती तिच्या माणसांसोबत तिथून निघून गेली.

गाड्या धूळ उळवत निघून गेल्या, अंकित दूर वर बघत राहिला. काही वेळात तिथे पोलिसांचा थाफा पोहचला. दुसऱ्या दिवशी न्यूज होती, गुणवंत रावांच्या पोरीचं अपहरण त्याच्याच खास माणसाने केलं होतं आणि त्यांच्या एकमेकांच्या वादात दोघेही मारल्या गेले... दोन गुंडांचा अंत आणि मुंबई शांत!

सोनाला पोलिसांनी अम्माकडून आणलं होतं आणि ती अमेरिकेत निघून गेली होती...

अस्तित्वात नसलेल्या साहेबजीच वर्चस्व वाढत होतं.... दुसऱ्या रुपात भावनाने तिचं गावं दत्तक घेतलं होतं. दादाच्या नावाची शाळा काढली होती,.. आणि आता तो वाडा पाडल्या गेला होता जिथे रासलीला होत होत्या, त्या जागी भव्य वस्तीग्रहू बांधल्या गेलं होतं... हळूहळू भावना समाजसेवक म्हणून नावा रुपाला आली होती... आणि अलगत तिने दुबईच्या डॉनची काथ टाकली.

आज पाच वर्षाने परत मुबई तिच्या हातात होती पण अंडरवर्ड डॉन म्हणून नाही तर समाज सेवक म्हणून... आज तिची सभा होती आणि परत तिची नजर भेट अंकितशी झाली, ती थांबली, आणि म्हणाली, “तू साथ दिली नसती तर मी आज इथे नसते. खूप धन्यवाद...”

अंकित हसला आणि म्हणाला, “मी आजही तुला साथ द्यायला तयार आहे जन्मभराची... बस तू हो म्हण.”

भावना परत काहीही न बोलता निघून गेली, अंकितने त्याची कॅप घातली आणि तोही तिला सलाम करून निघून गेला…

 समाप्त

कथा कशी वाटली अभिप्राय नक्की कळवा. 

अश्याच बोलक्या कथा वाच्यासाठी यापुढे chanal ला subscrib करा 

YouTube Channel - मनातल्या तळ्यात लवकरच घेवून येत आहे एक नवीन कथा ,,, बहायला विसरू नका, YouTube Channel वर.


©उर्मिला देवेन 

urmiladev@gmail.com

तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!

सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

Post a Comment

0 Comments